माझ्या तामिळ मैत्रीणीकडून शिकलेली मुरूंगकाय(शेवग्याच्या शेंगा) सांबार रेसिपी.
साहित्य.
1. तुर डाळ 1 वाटी
2. 3 टोमॅटो
3. 8-9 सांबर ओनिअन्स(शेलोट्स) नसतील तर एक मिडीयम कांदा
४. 3 लसूण पाकळ्या
५. मिरची पावडर
६. सांबार पावडर
७. हळद
८. हिंग
9. चिंचेचा कोळ
१०. शेवगा
११. जिरे, मोहरी, मीठ
१२.कडीपत्ता
● कूकरमध्ये तूर डाळ,पाणी, 4-6 छोटे कांदे,3 टोमॅटो,3
लसूण पाकळ्या टाकून 3 शिट्ट्या करून घ्या.
● दुसरे भांडे गैस स्टोव्ह वर ठेवा. फोडणी ला तेल टाका, तेल
तापल्यावर मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिंग, कांदा, हळद ,
शेवगा टाका. जरा परतून घ्या मग चिंचेचा कोळ,मिरची
पावडर, सांबार पावडर,मीठ टाकून उकळून घ्या, चिंचेचा रॉ
स्मेल जाईपर्यंत.
● मग हवे तितके पाणी टाकून उकळू द्या.
कोथिंबीर टाका.गैस बंद करा.
● हे मिश्रण कूकरमध्येच शिजवलेल्या डाळीत टाका.एक
शिटी करून घ्या.
सांबार तयार. गरम गरम भाताबरोबर खा.सोबत आप्पलम (पापड)असेल तरी बास.
शेवग्याच्या शेंगा बरोबर आवडीच्या भाज्या पण घालू शकता.
हा जो south indian पापड असतो
हा जो south indian पापड (जो अप्पलम म्हणून mention केला आहे तो) असतो तो वेगळा असतो ना? कशाचा असतो?
वरील सांबार रेसिपीचा फोटो
वरील सांबार रेसिपीचा फोटो
![1597742975783.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u70058/1597742975783.jpg)
अप्पलम बेसिक उडद डाळ आणि
अप्पलम बेसिक उडद डाळ आणि तांदूळ याचा असतो.
त्यात पण व्हरायटी असू शकते, नाचणीचे,ज्वारीचे अप्पलम.
धन्यवाद मृणाल.
धन्यवाद मृणाल.
करून बघते या आठवड्यात. मी थोडी साखर टाकते.
प्रचंड ऍसिडिटीचा त्रास असल्याने तूर डाळ, शेंगदाणे, पोहे, साबुदाणा हे प्रकार कमी खाल्ले जातात त्यामुळे सांबर ही खूप कमी वेळा खाल्लाय त्यामुळे झालं काय की मूळ सांबारची चवच विसरलेय मी.
मृणाली मी जरा शॉर्टकट वापरते.
मृणाली मी जरा शॉर्टकट वापरते..आदल्या दिवशी वरण करताना त्यातली थोडी शिजवलेली डाळ फ्रिजमधे आधीच काढून ठेवते .. मग दुसऱ्यादिवशी कुकर मध्ये तुम्ही सांगितलंत तशी फोडणी करून मसाला घालून ..हव्या त्या कच्च्या भाज्या घालून परतते.. २ सेकंद कोथिंबीर घालून थोडे परतते . मग आधीच शिजवलेली डाळ घालायची. थोडे पाणी घालून कुकरला २ शिट्ट्या काढल्या कि सांबर तयार..
आदल्या दिवशीच वरण उरले असेल तर अशीच फोडणी करून भाज्या घालून सांबार करते.. छान होते. आणि वरण पण संपते..
मी सांगितलेली सांबार पावडर पण
पिन्की,मी सांगितलेली सांबार पावडर पण बघा ना करून.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सोपी आहे आणि चव पण छान होते. फक्त प्रमाण. बरोबर घ्या.
माझ्या मराठी माहेरी पण सांबार, भाज्यामधे थोडं गोड घालतात.
दाक्षिणात्य सासरी सगळं तिखट.
मी शेवग्याच्या शेंगा कुकर
मी शेवग्याच्या शेंगा कुकर मध्ये कधीच नाही घालत.. अगदी विरून जातात.
श्रवू, चांगली आयडिया आहे की.
श्रवू, चांगली आयडिया आहे की.
मी पण शक्यतो साध्या, सोप्या रेसिपीज करते
सांबार पावडर रेसिपी पण इथेच
सांबार पावडर रेसिपी पण इथेच टाकते.
![IMG_20200817_183531.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u70058/IMG_20200817_183531.JPG)
● 1 n 1/2 tablespoon चना डाळ
● 1 n 1/2 tablespoon उडद डाळ
● 1 tablespoon तूर डाळ
● 8-12 सुक्या लाल मिरच्या
● 4 tablespoons धणे
● 3/4 teaspoon मेथी दाणे
● 2 teaspoon जिरे
● 2 स्प्रिंग कडीपत्ता
● 1/8 teaspoon हिंग
● 1/4 teaspoon हळद
सगळं छान भाजून घ्या.
गार झाल्यावर मिक्सरमध्ये ग्राईंड करा.
सांबार पावडर तयार.
इतर भाज्यांमधे पण हा मसाला घालू शकता.
मी शेवग्याच्या शेंगा कुकर
मी शेवग्याच्या शेंगा कुकर मध्ये कधीच नाही घालत.. अगदी विरून जातात......
हो श्रवू बरोबर आहे, अगदी एक किंवा अर्धी शिटी करते मी कुकरची.
पिंकी मला पण ऍसिडिटी चा त्रास
पिंकी मला पण ऍसिडिटी चा त्रास आहे.. मी वरण करताना थोडी तूर डाळ आणि थोडी मूग डाळ घालते. आणि भाज्या ज्या पचायला हलक्या असतात.. म्हणजे दुधी, भोपळा, फरसबी, सुरण अशा भाज्या घालते..आणि एखादी पाककृती जेव्हा उरले सुरले मधून बनते.. तेव्हा ती जास्त चांगली बनते.. माझा अनुभव..
सध्या कुठलीही रेसिपी आली की
सध्या कुठलीही रेसिपी आली की आधी प्रतिसाद स्क्रोल करून पाहणे आवश्यक बनले आहे नाहीतर उगीच मामा बनण्याचा धोका
छान,
छान,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिल्या धाग्याबद्दल अभिनंदन
मला खुप आवडतं सांबार.. आमच्या
मला खुप आवडतं सांबार.. आमच्या बाजुला कर्नाटक ची कन्नड कुटुंब आहेत बरीचशी.. अन त्यांच्याकडुन आलेल्या सांबारामुळे मला हे खुप आवडु लागलं.. बाजुची अम्मा खुपच छान सांबार बनवी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या रविवारी मी बनवलं होतं सगळ्या भाज्या वापरुन अन मसाला बनवुन.. छान झालं होतं
मसाला कृती दिलीत ... खुप छान.. बनवेन नक्की
सांबार मी नुसतं पिते , मला
सांबार मी नुसतं पिते , मला खुप आवडतं.गोरेगावांत मंडइमधे साउथ इंडियन भाज्या, सामानाच दुकान आहे तिथून सांबार मसाला घेते मी खास साउथ इंडियन. तुझ्या पद्धतीने करून बघेन. छान दिसतय सांबार , मृणाली.
आणि एखादी पाककृती जेव्हा उरले सुरले मधून बनते.. तेव्हा ती जास्त चांगली बनते.. माझा अनुभव..>>>अगदी अगदी श्रवु
सध्या कुठलीही रेसिपी आली की
सध्या कुठलीही रेसिपी आली की आधी प्रतिसाद स्क्रोल करून पाहणे आवश्यक बनले आहे नाहीतर उगीच मामा बनण्याचा धोका.......![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
धन्यवाद ऋन्मेष, भावना, धनुडी.
धनुडी, तुम्ही रस्सम खाल्लय का कधी आय मीन पीलाय का कधी, सांबार नुसते प्यायला आवडते तर रस्सम ही आवडेल.
हेल्दी पन असते. डायजेशन साठी चांगले असते. माझ्याकडे दिवस आड बनते, पेप्पर रस्सम. मुलांना ही विशेष आवडते.
मृणाली मी हि करते रसम..सगळी
मृणाली मी हि करते रसम..सगळी हीच कृती.. पण फक्त फोडणीत कांदा नाही घालत..आणि भाज्याऐवजी २/३ टोमॅटो पेस्ट करून घालते.. आणि मग १० मिनिटे उकळी आणून झाकून ठेवला.. कि झाले तयार रसम..मी खास डाळ जास्त शिजवून थोडी फ्रिज मध्ये ठेवते ..दुसऱ्यादिवशीच्या रसमसाठी.असेच प्यायला मस्त लागते रसम..
चांगली रेसिपी
चांगली रेसिपी
आता रस्समची ही कृती द्या ताई.
आता रस्समची ही कृती द्या ताई.
अर्थात मी ते कधी करेन हे नक्की नाही पण पाककृती असू द्यावी हाताशी.
सांबर मसाला करून बघेन या रेसिपीने.
@श्रवू सध्या लेकीमुळे डाळी मिक्स करूनच वापरते कारण नुसत्या तुरडाळीने गॅस होतील म्हणून.
अरे वा, आली की रेसिपी आणि
अरे वा, आली की रेसिपी आणि फोटोपण.
श्रवू, मी विदाऊट डाळ रस्सम
प्यायला मस्त लागते रसम.........
सेम हियर श्रवू,
मी विदाऊट डाळ रस्सम करते.
रेसिपी पण थोडी वेगळी.
पिन्कि रेसिपी देते लवकरच.
आमटीवर धागा आहे एक मोठा
आमटीवर धागा आहे एक मोठा
सांबार मसाल्याची रेसिपी पण वर
सांबार मसाल्याची रेसिपी पण वर धाग्यात टाका म्हणजे प्रतिसाद वाढले तरी सोपे होईल, शोधायला लागणार नाही, अन हेडर तसे अपडेट करा
हो करते.
हो करते.
धन्यवाद मानव,
धन्यवाद मानव, मार्गदर्शनाकरीता.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/14872
वरण चर्चा
हेल्पींग पीपल, थोडी मदत करा
हेल्पींग पीपल, थोडी मदत करा.सेम पाककृती लेखात एका पेक्षा जास्त रेसिपीज कशा टाकायच्या?
फोटो लेखात कसे टाकायचे??
लेख संपादीत करता येतो, कुठे
लेख संपादीत करता येतो, कुठे संपादन हा ऑप्शन दिसतो ते बघा. एका खाली एक दोन रेसिपीज. फोटोही प्रतिसदात देतात तसाच लेखात द्यायचा. लेखात तुम्हाला ज्या ठिकाणी फोटो दिसायला हवा त्या ठिकाणी कर्सर ठेवायचा आणि खाली insert image वर क्लिक करायचे, पुढील कृती सारखीच आहे.
चांगली आहे रेस्पी.
चांगली आहे रेस्पी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केरला स्टोर मध्ये; 'ब्राम्हीन्स' ब्रँड चा सांबार मसाला मिळतो. सध्या हा वाला फारच आवडला आहे. हिंगाचा फारच मस्त सुवास आहे याला.
मी गृहिणी सांबर पावडर वापरते
मी गृहिणी सांबर पावडर वापरते मस्त असतो..
Pages