विषय- CIBIL Score Calculation
लेखक- विश्वजीत बाबुराव म्हमाणे
आजच्या काळात तुमची CIBIL Score किती यावरून तुमची सध्याची फायनान्शियल परिस्थिती कशी आहे हे कळते आणि याच आधारावर बँकांना व फायनान्शिअल कंपनीला तुमची लोनची पात्रता किती हे ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावते.साधारणता प्रत्येक व्यक्तीचा Cibil Score हे 300 ते 900 च्या दरम्यान असतो ज्यामध्ये 750 Score हा सर्वात उत्तम समजला जातो.भारतातील सर्व बँका आपले 80 टक्के लोन हे 750 Score असलेल्या कर्जदारांना पुरवते.CIBIL Score हे कुठल्या गोष्टींवर अवलंबून असते ते आपण पुढे समजून घेणारच आहोत.त्याआधी CBIL कंपनी बद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात.आपल्या देशात 4 क्रेडिट कंपनी काम करतात त्यामध्ये CBIL, Equifax, Highmark, Experian हे त्या कंपनीचे नावे आहेत.या सर्वांमध्ये CBIL ला सर्वात जास्त ट्रस्टेड कंपनी म्हणून ओळखलं जात.
CIBIL(Credit Information bureao India Limited)
2005 साली भारताच्या लोकसभेत सर्वांच्या संमतीने (Credit Information Company Act) पास करण्यात आला त्यामध्ये सर्व प्रकारच्या बँका,पतसंस्था,फायनान्स कंपनी यांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक कर्जदाराचे पूर्ण माहिती CIBIL कंपनीला देणे बंधनकारक करण्यात आले.CIBIL कंपनी हि देशाची सगळ्यात विश्वासू कंपनी आहे.
CIBIL Score Calculation
साधारण CBIL Score 300 ते 900 च्या दरम्यान असते.750 हा Score सर्वात चांगला समजला जातो.CIBILScore चे Calculation हे महत्त्वाच्या चार गोष्टींवर केला जातो.
1)Past Performance : 30 टक्के हे तुमच्या दोन-तीन वर्षापूर्वी घेतलेल्या लोनच्या परतफेडीवर(Repayment Scheduled) अवलंबून असते. म्हणजे तुम्ही अगोदर घेतलेल्या लोनची परतफेड व्यवस्थित झाली की नाही. त्याचा हप्ता वेळेवर भरण्यात आला की नाही. जर तो वेळेवर भरला नसेल तर तुमचा CIBIL Score कमी होईल त्याउलट जर तुम्ही त्याची परतफेड वेळेवर केला असाल तर तुमची CBIL Score वाढेलेला असेल. हे स्कोर तुम्ही घेतलेल्या लोनच्या संदर्भाबरोबरच बाकीच्या गोष्टींवरही अवलंबून असते जसे की Credit Card bills Repayment, Consumer loan Repayment या संदर्भातही होतो.
2)Credit Mix and Duration: 25 टक्के हे तुमच्या Secured Loan आणि Unsecured Loan यावर अवलंबून असते. Secured Loan म्हणजे जर तुम्ही तुमच्याकडे असलेली गोष्ट तारण ठेवून Home Loan किंवा Mortgage Loan घेतला असेल तर त्या लोनची परतफेड वेळेवर केलात की नाही हे तपासले जाते.आणि Unsecured Loan म्हणजे Personal Loan, Credit Card, Consumer Loan ज्या लोनमध्ये तुम्हाला काहीही तारण ठेवण्याची गरज नाही.या लोनची परतफेड वेळेवर झाले की नाही हे तपासले जाते.एवढेच नाही तर तुम्ही कमी कालावधीमध्ये 5 ते 6 प्रकारचे लोन घेतला असाल तर याही गोष्टींचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होतो. म्हणजे CBIL कंपनी च्या पॉलिसीप्रमाणे एका व्यक्तीचे ३ पेक्षा जास्त लोन असल्यास तो दिवाळखोर होऊ शकतो.
3)Leverage : 25 टक्के हे तुमच्या Credit Card Limit आणि तुमच्या क्षमतेच्या किती टक्के लोन घेतलेले आहात यावर अवलंबून असते.समजा तुमच्या Credit Card चे Limit 1 Lakh असेल आणि तुम्ही तुमच्या Limit च्या 90 टक्के वापर म्हणजे 90 हजार केला असाल तर या गोष्टींमुळे ही तुमचा Score कमी होऊ शकतो. CIBIL कंपनीच्या पॉलिसी प्रमाणे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर त्याच्या limit च्या 30 ते 50 टक्केच वापर केला पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची लोन घेण्याची क्षमता तुमच्या इनकम प्रमाणे 30 लाखाची असेल तर तुम्हाला तुमच्या क्षमतेच्या 75 ते 80 टक्के म्हणजेच तुम्ही 20 ते 25 लाखएवढेच लोन घेतले पाहिजेत.CIBIL कंपनीच्या पॉलिसी प्रमाणे तुम्ही तुमच्या क्षमतेच्या 100 टक्के लोन घेऊ नयेत.या गोष्टींचाही परिणाम तुमच्या सिबिल स्कोर मध्ये होतो.
4)Other Factors : 20 टक्के हे तुमच्या Credit behaviour व Loan application वर अवलंबून असते. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या लोन ची गरज असल्यास तुम्ही तुमचे कागदपत्र 5 वेळा वेगवेगळ्या बँकांमध्ये व फायनान्स कंपनीमध्ये जमा केलात तर पुढे ती बँक व फायनान्स कंपनी CIBIL कंपनीकडे Credit history तपासण्यासाठी पाठवते.आणि CBIL कंपनीकडे एकाच व्यक्तीच्या Credit Score ची तपासणी जास्त वेळा होत असेल तरीही त्याचा परिणाम क्रेडिट स्कोर वर होतो. या गोष्टींमध्ये तुम्हाला दोन गोष्टींची काळजी घ्यायची आहे.एक म्हणजे कोणत्याही ऑनलाइन साइटवर आपला क्रेडिट स्कोर अनेक वेळा तपासू नका. दुसरी गोष्ट तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तुम्ही ठराविक व चांगल्या बँकेमध्ये आपल्या लोनचा अर्ज भरा.
वरील चार गोष्टींवरून हे समजून येतो की आपला क्रेडिट स्कोर उत्तम ठेवण्यासाठी प्रमुख तीन गोष्टी केल्या पाहिजेत.एक म्हणजे कोणत्याही लोन ची परतफेड योग्य वेळेत केले पाहिजेत.दोन Credit Card चा वापर त्याच्या Limit च्या 30 टक्केच केला पाहिजे व त्याचे Repayment वेळेवर केले पाहिजेत. तीन आपण आपला क्रेडिट स्कोर ची तपासणी लोनच्या संदर्भातच केली पाहिजेत.म्हणजे कोणत्याही साइटवर आपला क्रेडिट स्कोर वारंवार तपासणे टाळले पाहिजेत.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे खालील ईमेल आयडीवर सांगा - Vishwajeetmhamane@yahoo.com
जय हिंद जय भारत.
छान माहिती
छान माहिती
छान
छान
खेडोपाडी पतसंस्था , जिल्हा बॅंक ह्यांची कर्जे बुडवले , त्यांच्या सीबील स्कोर चे काय होते ?
सुंदर माहिती. आपण आपला सिबिल
सुंदर माहिती. आपण आपला सिबिल स्कोर बॅंकेत न जाता नेटवर जाणून घेऊ शकतो का?
चांगले माहितीपूर्ण लिहिले
चांगले माहितीपूर्ण लिहिले आहे. आम्ही इमेल नाही बाई करत कोणाला. जे काही बोलायचे ते इथेच.
मला फायनान्स कंपन्यांचे सारखे मेसेज येत असतात नो युअर सिबिल स्कोअर म्हणून उगीच पीडा. ७०० ॠ चार्ज.
चांगले माहितीपूर्ण लिहिले
चांगले माहितीपूर्ण लिहिले आहे. आम्ही इमेल नाही बाई करत कोणाला. जे काही बोलायचे ते इथेच.
मला फायनान्स कंपन्यांचे सारखे मेसेज येत असतात नो युअर सिबिल स्कोअर म्हणून उगीच पीडा. ७०० ॠ चार्ज.
माझा स्कोअर ८५७ आहे, चालल का?
माझा स्कोअर ८५७ आहे, चालल का? की ७५० च हवा
फुकट चेक करून मिळतो
फुकट चेक करून मिळतो