आठवणी ऑलिंपिक्सच्या- माझा अ‍ॅटलांटा ऑलिंपिक्सचा अनुभव.

Submitted by मुकुंद on 3 August, 2020 - 09:36

या जगाचा निरोप घेण्याआधी माझ्या काही माफक इच्छा आहेत/ होत्या. त्यात विंबल्डनला जाउन .. स्टॉबेरी क्रिम खात खात विंबल्डन टेनिसचा अंतिम सामना पाहायचा आहे, तसच पॅरीससारख्या रमणिय शहरी जाउन.. रोलँड गॅरसला फ्रेंच ओपन टेनिसची फायनल बघायची आहे .झालच तर ऑगस्टा, जॉर्जिया ला.. र्होडेडेंड्रॉनच्या बहराच्या पार्श्वभुमीवर.. टायगर वुड्सला मास्टर्स जिंकताना बघायचे आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे.. जिवंत असेपर्यंत.. याची देही.. याची डोळा.. एकतरी ऑलिंपिक्स.. प्रत्यक्ष बघायचे आहे...

सुदैवाने.. माझे ऑलिंपिक्स बघता येण्याचे स्वप्न १९९६ ला अ‍ॅटलांटा ऑलिंपिक्सच्या वेळेला खरच पुर्ण झाले!

मी आज तुम्हाला.. माझ्या अ‍ॅटलांटा ऑलिंपिक्सच्या ...अविस्मरणिय १५ दिवसांच्या काही निवडक अनुभवांबद्दल सांगणार आहे. मी त्या सर्व १५ दिवसात स्वतःला .. अक्षरशः ऑलिंपिक्सच्या अनुभवात पुर्ण भिजुन घेतले होते..

तर चला मंडळी.. आज जाउ आपण.. अ‍ॅटलांटा ऑलिंपिक्सला....

१९९६ ला माझ्या नशिबाने माझा भाउ ऍटलांटालाच सिटा या फ़्रेंच टेलीकम्युनीकेशन कंपनीत कामाला होता. तो त्यावेळी मेरिआटाला राहायचा. त्यामुळे मी १५ दिवस त्याच्याकडेच तळ ठोकला होता.

मेरीआटापासुन डाउनटाउन ऍटलांटा ...डनवुडीपासुन येणारी ट्रेन घेतली तर ... फक्त ३० मिनिटावरच होते.जुलै २७ १९९६ च्या सेंटेनिअल ऑलिंपिक पार्कमधील बॉंबस्फोटानंतरच्या दुसर्‍याच दिवशी आम्हाला पुरुषांच्या १०० मिटर्स फ़ायनल्स असलेल्या ऍथेलेटिक्स इव्हेंटला जायचे होते. त्या संध्याकाळच्या सेशनमधे १०० मिटर्स फ़ायनलबरोबरच पुरुषांची २०० मिटर्स सेमिफ़ायनल, पुरुषांची लॉंग़ जंप फ़ायनल व १०,००० मिटर्स लेडिज फ़ायनल व महिलांच्या हेप्टेथलॉनच्या पहिल्या ४ राउंड्स..... अश्या बर्‍याच स्पर्धा होत्या.

मी, माझा भाउ, माझी आई व माझी वहिनी(यात वहिनी व आईला आम्हा दोघा भावांनी बळेच ओढुन आणले होते हे आधीच नमुद करतो!:-))डनवुडी पासुन निघालेली मार्टा(ऍटलांटा अंडरग्राउंड रेल्वे) ट्रेन घेउन डाउनटाउन ऍटलांटाला मेन ऑलिंपिक्स स्टेडिअम(टर्नर फ़िल्ड)ला जायला दुपारी २ लाच निघालो. सेशन संध्याकाळी ७ ला सुरु होणार होते पण आदल्या दिवशीच्या बॉंबींगमुळे टिव्हीवर सांगीतले होते की सुरक्षा खुप कडक असणार आहे व प्रेक्षकांची कडक तपासणी केली जाणार आहे त्यामुळे रांगा मोठ्या असतील तेव्हा ३ ते ४ तास आधीच स्टेडिअमवर या.त्या सुचनेला मान देउन आम्ही घरुन २ वाजताच कुच केले. आणी मेन ऑलिंपिक स्टेडिअमवर गेलो तर खरच तिथे मारुतीच्या शेपटीसारखी रांग होती. त्या रांगेत ३ तास उभे राहुन आम्ही ६.३० ला स्टेडीअममधे प्रवेश केला व आत पाहीलेल्या द्रुष्याने अंगावर काटा आला...

इतकी वर्षे या ऑलिंपिक्सबद्दल फक्त ऐकत किंवा वाचत किंवा टिव्ही वर बघत आलो होतो.. आज प्रत्यक्ष..याची देहा याची डोळा..... मी मेन ऑलिंपिक्स स्टेडिअम अनुभवत होतो. ८० हजार लोकांचा जनसमुदाय डोळ्यासमोर उभा होता. पाठीमागेच वरच्या सेक्शनमागे ऑलिंपिक्सची मशाल तेवत होती..(पण ती मशाल मला मॅकडॉनल्डच्या फ़्रेंच फ़्राइजच्या पुड्यासारखीच भासत होती:-(... ओव्हरकमर्शलायझेशनचा परिणाम!..मॅकडॉनल्डने त्यासाठी किती पैसे दिले कोणास ठाउक!)

ठिक सात वाजता जॉन विलिअम्सच्या मनोवेधक ऑलिंपिक्स म्युझिकने सेशनला सुरुवात झाली. मी भारावुन जाउन ते सर्व जबरदस्त ऍथलिट जवळुन पाहात होतो. सगळ्यात आधी महिलांच्या हेप्टेथलॉनच्या चार स्पर्धा झाल्या.यातली एकही स्पर्धक माझ्या माहीतीची नव्हती पण त्यांची तुकतुकीत वेल टोन्ड कांती ते जागतीक दर्जाचे ऍथलिट आहेत याची साक्ष देत होते.

मग आले मेन्स २०० मिटर्स सेमीफ़यनलमधले स्पर्धक व सगळ्या स्टेडिअममधे फ़्लॅश लाइट्समुळे काजवे चमकत आहेत असा भास झाला. ते फोटो दुसर्‍या तिसर्‍या कोणासाठी नसुन अमेरिकेचा गोल्डन रनर मायकेल जॉन्सन यासाठी होते. विश्वविक्रम करुन ती रेसच नाही पण ४०० मिटर्सची रेसपण तोच जिंकणार हे सगळ्यांना ठाउक होते.. फक्त किती मिलिसेकंदाने तो आपलाच विश्वविक्रम तोडतो हे सगळ्यांना पाहायचे होते. नायके शुज कंपनीने त्याला सोन्याचा वर्ख असलेले शुज घालायला दिले होते. ते सोनेरी शुज त्याच्या पायात चम चम असे चमकत होते. बंदुकीच्या गोळीचा फाट... असा आवाज झाला व मायकेल जॉन्सन जो सुसाट सुटला म्हणुन सांगु! १९ सेकंदांनी जेव्हा सेमीफ़ायनलची पहीली हिट संपली तेव्हा सगळे स्टेडिअम लोकांच्या ओरडण्याने दणदणुन गेले होते... मायकेल जॉन्सनने त्याच्या चाहत्यांची निराशा केली नव्हती... स्कोरबोर्डवर त्याच्या नावावर विश्वविक्रम दाखवला जात होता.. स्टेडिअम शांत व्हायला तब्बल १० मिनिटे लागली... त्याचा तो सुसाट वेग खरच एकदम इंप्रेसिव्ह होता...

मग आले मेन्स लॉंग जंपमधले खेळाडु व पुन्हा एकदा सगळे स्टेडीअम टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमुन गेले... साक्षात कार्ल लुइसने स्टेडिअममधे पदार्पण केले होते... आतापर्यंत ऑलिंपिक्स स्पर्धेत आठ सुवर्ण पदके मिळवुन कार्ल लुइसने आपले नाव ऑलिंपिक्सच्या इतिहासात अजरामर केलेच होते पण आज तो लांब उडीमधे लागोपाठ चौथे सुवर्णपदक मिळवायचा प्रयत्न करणार होता. जवळजवळ दिड तासाच्या लढ्यानंतर कार्ल लुइसने सुवर्णपदक जिंकुन फ़िनलंडच्या पावलो नुर्मीच्या ९ सुवर्णपदकाच्या ऑलिंपिक्स विक्रमाची बरोबरी केली.या महान ऍथलिटला धावण्याच्या शर्यतीत नाही तरी लांब उडीच्या शर्यतीत तरी बघण्याचे सौभाग्य मला लाभले. लांब उडीच्या आधी स्टार्ट घेताना तो १०० मिटर्स स्प्रिंट करत आहे असाच तो धावत होता... त्याचा तो स्पिड पाहुन तो १०० मिटर्सच्या फ़ायनलमधे नाही हे बघुन मला खरच नवल वाटले.

एव्हाना रात्रीचे साडेनऊ वाजले होते. मी व माझा भाउ एका सेक्शनमधे तर वहिनी व आई एका सेक्शनमधे अशी तिकिटे आम्हाला मिळाली होती. थोड्याच वेळात ऑलिंपिक्समधली सगळ्यात प्रिमिअम स्पर्धा.. ज्याने फ़ास्टेस्ट मॅन ऑन अर्थ हा किताब कोणाला तरी मिळणार होता... ती स्पर्धा सुरु होणार होती..१०० मिटर्स फ़ायनल्स! आठ अव्वल दर्जाचे खेळाडु शर्यतीला उभे राहीले.... एवढ्यात आमच्या मातोश्री व वहिनी आमच्याकडे आल्या.... व जोरात माझी वहिनी(जी मराठी नाही) तिने इंग्लिशमधे प्रश्न केला.... when are we going home? we are sleepy and tired!

त्या प्रश्नाने मला एकदम लाज वाटली... इथे जगातले सगळ्यात फ़ास्टेस्ट ऍथलिट्स फ़ायनल धावायला तयारीत उभे आहेत व माझी वहिनी व आई झोपायच्या गोष्टी करत होत्या... मी त्यांना कसेबसे आवरले व सांगीतले की अजुन थोडा वेळ कळ काढा... आजुबाजुचे सगळे दर्दी प्रेक्षक आमच्याकडे पाहात होते... व त्यांच्या नजरेत मला पुर्ण दिसत होते की ते म्हणत आहेत.... अरे या लोकांना १०० मिटर्स फ़ायनलला झोप येउ शकते?... कमाल आहे या लोकांची!...

असो. पण याही शर्यतीत आम्हाला दिवसातला दुसरा विश्वविक्रम बघायला मिळाला. १९९२ चा ऑलिंपिक विजेता ब्रिटनचा लिनफ़ोर्ड ख्रिस्टी दोनदा फ़ॉल्स स्टार्ट केल्यामुळे बाद झाल्यावर कॅनडाच्या डॉनाव्हन बेलीने ९. ८६ सेकंदाच्या वर्ल्ड रेकॉर्ड टाइममधे १०० मिटर्सची स्पर्धा डोळ्याचे पाते लवायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात जिंकली...

तर अशी १०० मिटर्स फ़ायनल्सची शर्यत डॉनाव्हन बेलीने जागतीक विक्रम करुन जिंकल्यावर मी माझ्या भावाला सांगीतले की तु आई व वहिनीबरोबर घरी जा मी मात्र संपुर्ण सेशन संपेसपर्यंत इथे राहाणार आहे. एव्हाना जोराचा पाउसही सुरु झाला होता व अर्धे स्टेडिअम रिकामे झाले होते. महत्वाच्या शर्यती ज्यात अमेरिकन ऍथलिट्स भाग घेणार होते त्याही संपल्या होत्या व आता फक्त महिलांची १०,००० मिटर्सची शर्यत बाकी होती. १०,००० मिटर्स म्हणजे स्टेडिअमला २५ फेर्‍या मारायच्या. म्हणजे अजुन ४५ ते ५० मिनिटेतरी अजुन ती शर्यत संपायला लागणार असा विचार करुन बरेच जण पावसापासुन व शेवटी होणार्‍या गर्दीपासुन सुटका व्हावी म्हणुन स्टेडिअम सोडुन चालले होते. पण माझ्यासारखे क्रिडाप्रेमी पावसात थांबुनच राहीले होते. पण अर्धी माणसे निघुन गेल्यामुळे एक फायदा झाला... संयोजकांनी बाकीच्यांना पुढे येउन बसण्याची मुभा दिली व मला ट्रॅकपासुन अगदी ४ फ़ुटांवर पहिल्या रांगेत जागा मिळाली जिथुन मला सगळे स्पर्धक हाकेच्या व हात शेक करायच्या अंतरावरुन बघायला मिळणार होते.

शर्यत सुरु झाली. मी माझा या शर्यतीबद्दलचा थोडा अभ्यास आधीच घरुन करुन आलो होतो. त्यावरुन मला माहीत होते की १९९२ मधे बार्सिलोना मधे ही शर्यत इथिओपियाची डिरार्टु टुलु हिने जिंकली होती व याही वेळी तिच संभावीत विजेती होती. पहिल्या दहा फेर्‍यांनन्तर टुलुच पहिली होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा टुलु माझ्या समोरुन पास होत होती तेव्हा मी जोरात ओरडुन 'गो टुलु गो' असे ओरडुन तिला प्रोत्साहन देत होतो. मी पहिल्या रांगेत असल्यामुळे तिला माझा आवाज ऐकु येत होता. तिला वाटले असेल की हा कोण आहे माझ्या नावाने मला प्रोत्साहन देणारा? माझ्या मनात मात्र टुलु ही मला आतापर्यंत माहीत असलेल्या ऑलिंपिक्स हिरोंचे प्रतिनिधीत्व करत होती... माझ्या मनात तीच झाटोपेक होती,तिच अलाय मिमु होती,तिच फ़ॅनी ब्लॅन्कर्स कुन होती व तीच स्टिव्हन अखवारी होती... त्या महान ऍथलिट्सनी जेव्हा ऑलिंपिक्सच्या रंगमंचावर आपापले मास्टरपीस(स्लार्टीच्या भाषेत.... मालकतुकडे!:-))सादर केले होते तेव्हा मी त्याला मुकलो होतो... आज टुलुला प्रोत्साहन देताना माझ्या मनात मी अप्रत्यक्षरित्या त्या व त्यांच्यासारख्या महान ऍथलिट्सना पोस्थ्युमसली एनकरेज करत होतो... माझे अंग पावसात पुर्ण भिजले होते पण त्याहीपेक्षा माझे मन माझ्या ऑलिंपिक्सच्या आठवणींनी त्याक्षणी जास्त भिजले होते. असा अनुभव आपल्याला आयुष्यात परत कधी अनुभवयाला मिळेल की नाही हे मला माहीत नव्हते म्हणुन मनापासुन टुलुला नावाने व बाकीच्यांनासुद्धा प्रोत्साहन देत मी संपुर्ण शर्यत संपेसपर्यंत उभा होतो. शर्यत संपली... टुलु पहीली आली नाही... तिला यावेळेला पदकही मिळाले नाही. पण मला त्याची पर्वा नव्हती. ती आणी हे सगळे वर्ल्ड क्लास ऍथलिट्स शर्यतीत भाग घेउन..... माणसाचे जे स्वाभावीक नेचर असते की आपण आपले सर्वस्व पणाला लावुन ट्राय टु बी द बेस्ट..त्याचे उत्तम उदाहरण होते. माझ्या मनात ते सगळे विजयी होते. मला शेवटचा नंबर आलेल्या ऍथलिटची तिने या ऑलिंपिक्समधे भाग घेण्यासाठी केलेली आयुष्यभरची मेहनत दिसत होती व म्हणुन तिचेही टाळ्या वाजवुन मी कौतुक करत होतो.

शर्यत संपली. लोक स्टेडिअम रिकामे करुन जात होते. मी मात्र झिम झिम पावसात माझ्या सिटवर बराच वेळ बसुन होतो. त्या ऑलिंपिक्सच्या विशाल स्टेडिअमकडे बघत माझ्या मन्:पटलावर मला माहीत असलेले ऑलिंपिक्सचे जुने क्षण आणत होतो व ते क्षण या स्टेडीअममधे परत एकदा जगत होतो. स्टेडिअम रिकामे असुनसुद्धा मला १९५२ मधल्या हेलसिंकी ऑलिंपिक्स स्टेडिअममधला झाटो...पेक....झाटो....पेक.. चा गजर ऐकु येत होता... मला जेसी ओवेन्स माझ्यासमोरुन वार्‍याच्या वेगात धावताना दिसत होता... भारताचा महान हॉकीपटु ध्यान चंद व त्याचा भाउ रुप चंद बर्लिन ऑलिंपिक्समधे त्यांच्या हॉकीच्या तळपत्या बॅटीची जादु दाखवत बॉल ड्रिबल करत सफ़ाइने गोल करताना दिसत होते...झालच तर आपल्या भारताची पलावलकुंडी ठाकरमपिल उषा फक्त एक शतांश सेकंदाने ४०० मिटर्स हर्डल्समधे पदक हुकल्याने कंबरेवर हात ठेवुन वाकुन निराशेने लॉस ऍन्जेलीस ऑलिंपिक्स स्टेडिअममधे उभी असलेली दिसत होती...

स्टेडिअममधले दिवे मालवले गेले व शेवटी मला उठायलाच लागले. परत एकदा त्या भव्य पण रिकाम्या ऑलिंपिक्स स्टेडिअमकडे पहात व माझ्या पाठीच तेवत असलेल्या ऑलिंपिक्स मशालीला मनातल्या मनात वंदन करुन मी भिजल्या अंगाने व ऑलिंपिक्सच्या आठवणींनी तितक्याच भिजल्या मनाने स्टेडिअममधुन जड अंत्:करणाने काढता पाय घेतला व डनवुडी ट्रेन पकडुन मध्यरात्री घरी पोहोचलो.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी ! मागे वाचला होताच, पुन्हा वाचायला तेव्हडीच मजा आली.>>>>+1
प्रत्येकवेळी तितकीच मजा येते आणि मी पण तुमच्या शेजारी हळूच येऊन बसलेला असतो

अप्रतीम अनुभव कथन..
स्टेडियम मधला जोश आणि उन्माद अतिशय रोमांचक असतो.
माझे बंधू १००,२००,४०० मीटर धावण्यात स्टेट लेवल खेळलेले आहेत... तेव्हा हे सारे अतिशय जवळून अनुभवले आहे..

मुकुंद, मस्त रे ऑलिंपिक्सच्या आठवणी...

अगस्ताच्या मेन राउंडसची तिकिटं मिळणं हे लॉटो जॅकपॉट हिट करण्या सारखंच आहे. मी रिलिजस्ली दरवर्षी प्रयत्न करतो, परंतु दरवर्षी निराशाच पदरी पडते. (कंपनी कृपेने '१० साली गेलो होतो, पण विनर टायगर न्हवता, लेफ्टि होता). असो.

त्यानंतर बर्‍याचदा काहितरी जुगाड करुन मी मास्टर्स्ला गेलो आहे, पण ते प्रॅक्टिस राउंड करता. अ‍ॅक्च्युअली, इट्स फन टु वॉच देम प्ले प्रॅक्टिस राउंड्स. मस्त रिलॅक्स्ड असतात, टिपिकल आपण फोरसम मधे मजा करतो तशीच मजा करत असतात...

पुढे भविष्यात मला मास्टर्सची लॉटरी लागली तर तुला अगस्ताला नक्कि नेइन...

वा. मस्त मुकुंदराव.
माझ्या मनात मात्र टुलु ही मला आतापर्यंत माहीत असलेल्या ऑलिंपिक्स हिरोंचे प्रतिनिधीत्व करत होती... माझ्या मनात तीच झाटोपेक होती,तिच अलाय मिमु होती,तिच फ़ॅनी ब्लॅन्कर्स कुन होती व तीच स्टिव्हन अखवारी होती... >> हे सर्वात जास्त आवडले.

माझ्या यादीतही विंबल्डन फायनल (कोणी माईका लाल/लाली असेल तर बरच), लॉर्डस - भारत जिंकत असलेली टेस्ट मॅच आहेत. Happy

पण लॉर्डसला नुसत गेल्यावरही मन उचंबळून आल होत.

अभिप्रायाबद्दल सगळ्यांना धन्यवाद.

माझा ऑलिंपिक्सचा अनुभव मी तुम्हा सगळ्यांबरोबर शब्दातुन का होइना.. शेअर करु शकत आहे याचा मला आनंद वाटतो. पण तुम्हा स्वतःला जर कोणाला ऑलिंपिक्सचा अनुभव प्रत्यक्ष पुढे कधी घेता आला तर जरुर घ्या.. अमेरिकेत असाल तर २०२८ ऑलिंपिक्स परत एकदा अमेरिकेत... लॉस एन्जेलीस , कॅलिफोर्निया इथे होणार आहे...

आहेत का कोणी मायबोलिकर लॉस एन्जेलीस मधे राहणारे? तेव्हा तिथे होटेल्स मिळणे मुश्किल होइल... तुमच्या कोणाकडे जर नुसती राहण्याची सोय झाली तर त्याची किंमत मोजायला मी तयार आहे... Happy

राज... तु म्हणतो ते बरोबर आहे... मास्टर्सची लॉटरी लागणे मुष्कील आहे ... बट आय विल बी हॅपी टु एक्सेप्ट युअर ऑफर.. Happy इफ अँड व्हेन दॅट मटेरिअलाइझेस...सो आय कॅन मार्क ऑफ वन मोर थिंग फ्रॉम माय बकेट लिस्ट.... Happy

ऑगस्टाला येउन..मॅग्नोलिया लेन वरुन गाडी चालवत..फाऊंडर्स सर्कल वरुन मास्टर्स क्लब हाउस मधे येत.. मग ते बघत बघत.... मग क्रोज नेस्ट ..अस बघत बघत .. क्लब ग्राउंड्सवर ..पहिल्या होलपासुन .. फायनल राउंड मधे... टायगर वुडला फॉलो करत करत... रेज क्रिक... जो १२ ग्रीन व १३ टी च्या मधुन जातो... त्याच्यावरचा... १२ ग्रीन ला घेउन जाणारा वर्ल्ड फेमस मास्टर्स लँडमार्क .. पिक्चर्सिक..होगन्स ब्रिज क्रॉस करुन... व नंतर रेज क्रिकवरचाच नेल्सन ब्रिज ओलांडुन... १३ टी पासुन १३ होलपर्यंत जाउन... व शेवटी... १८ व्या होलवर टायगर वुड्स मास्टर्स जिंकल्यावर .. बटलर्स केबीन मधे जाउन त्याला ग्रीन जॅकेट घालताना मला बघायचे आहे...

आणी हे सगळे ..एप्रिलमधे.. मास्टर्स गॉल्फ क्लबच्या सगळ्या हिरव्यागार ग्रिन्सच्या मधे मधे .. वसंत रुतुत..सर्वत्र पसरलेल्या.. अतिशय नेत्रसुखक अश्या .. किरमिजी व परपल रंगाच्या..र्होडेडेंड्रॉन व अझेलियाच्या फुलांच्या ऐन बहराच्या पार्श्वभुमीवर...... यापेक्षा स्वर्ग व मोक्ष काय वेगळा असणार राज? तुच सांग! Happy

तळटीपः .. १९८९ पासुन व खासकरुन १९९७ ला टायगर वुड्सने पहिल्यांदा जेव्हा मास्टर्स टुर्नामेंट जिंकली.. तेव्हापासुन..(टीव्ही वर).. ...मास्टर्स गॉल्फ क्लब बरोबर... दर वर्षी एप्रिलच्या सुरुवातीला .. वसंत रुतुच्या सुरुवातीला सुरु होणार्‍या या मास्टर्स गॉल्फ टुर्नामेंटबरोबर...त्याच्या नयनरम्य व मनाला भुरळ घालणार्‍या पिक्चरसिक ... १८ होल्सबरोबर .. तिथल्या अझेलिया व र्होडेडेंड्रॉन च्या फुलांच्या बहरांबरोबर...रे..ज क्रिकबरोबर..होगन ब्रिजबरोबर.. नेल्सन ब्रिजबरोबर.... साराझान ब्रिजबरोबर.. आणी..निक फाल्डो, होजे मरिया ओलाफाबल , सर्जियो गार्सिया व खासकरुन अमेझींग टायगर वुड्स व लेफ्टी फिल मिकल्सन यांच्या खेळांबरोबर... दर वर्षी .... तन्मयतेने मी एकरुप झालेलो आहे!

हर्पेन.. जर अजुन कोणी दर्दी क्रिडाप्रेमी सोबत असेल तर ऑलिंपिक्स स्पर्धा बघतानाचा आनंद द्विगुणीतच होइल... Happy

पराग.. कुठे गायब आहेस सध्या? तिथे कोव्हिड-१९ पँडेमिकमुळे खर्‍या टेनीस स्पर्धा बंद पडल्या आहेत व इथे तु गायब असल्यामुळे टेनीस बीबी ओस पडल्या आहेत.... Happy

राज.. मास्टर्स गॉल्फ बद्दल .. तिथल्या ग्रीन्सचे स्लोप कसले जबरी आहेत ना? मी काही काही आश्चर्यकारक पट शॉट्स इथल्या ग्रीन्स वर एक्झ्युक्युट केलेले पाहीले आहेत. काही काही वेळा टायगरने होलच्या ६०- ७० फुट डावीकडे किंवा उजवीकडे शॉट मारुन... बॉल.. स्लोपचा उपयोग करुन... ... कर्व्ह करुन.... ऑल्मोस्ट जादु केल्यासारखे... होलमधे टाकताना बघीतले आहेत...आणी मग त्याचे ते फिस्ट पंपींग! .. Happy

२००५ मधला त्याचा १६ व्या होलवरचा शॉट कोण विसरेल? अहाहा!

आणी एकेका होलची नावे पण काय सुंदर सुंदर... #२.. पिंक डॉगवुड.. , # ५ .. मॅग्नोलिया..., # ६ ... ज्युनिपर.., #११... व्हाइट डॉगवुड... , # १३ अझेलिया.., # १६ ...रेडबड...., # १८.. हॉली.....

ऑगस्टा मास्टर्स वरची सोडुन अजुन एकच वर्ल्ड फेमस गॉल्फ होल म्हणजे १७ वे होल.. प्लेअर्स चँपिअनशिप .. अ‍ॅट टी पी सी सॉ-ग्रास.. पाँटे व्हेड्रा बीच, फ्लोरिडा... कसले इंटीमेडेटींग होल आहे ना ते!

>>२००५ मधला त्याचा १६ व्या होलवरचा शॉट कोण विसरेल?<<
अरे असे कितीतरी मॅजिकल मोमेंट्स टायगरने दिलेले आहेत. हि त्यातल्या काहिंची झलक. यात तु वर उल्लेख केलेल्या '०५ मास्टर्स मधली चिप आहे. मला आवडलेला टायगरचा ग्रीनसाइड फ्लॉप शॉट, '१२ मेमोरियल ५:१६ला बघ. काय कंट्रोल आहे, इन्क्रेडिबल!

टिपिसी सॉग्रास #१७ सारखंच आमच्या इथे ब्रिज मिल्स गॉल्फ कोर्समधे #१६ आय्लंड ग्रीन आहे. अ‍ॅटलांटाला आलास कि खेळुया...

अरे काय डोंबलाच खेळुया... मी जरी गॉल्फ गेमवर खुप प्रेम करत असलो तरी प्रत्यक्षात कधी गॉल्फ खेळलो नाही.. एक दोनदा....२००० - २००१ च्या सुमारास... टायगरला इतक सहज खेळताना व लिलया बर्डी व इगल्स करताना बघुन .. गॉल्फ रेंज वर बकेट घेउन टी शॉट मारुन बघीतले... २५ बॉल्स पैकी एक दोन वरच क्लबचा फटका( स्विंग ) बसला.. बाकीचे बॉल.. कट लागुन आजुबाजुलाच गेले.. जे काही एक दोन फटके व्यवस्थित बसले.. ते बॉल .. ज्या आर्कमधे जायला पाहिजे त्या आर्क ऐवजी भलत्याच अँगलला सिक्सर मारल्यासारखे ...वेडेवाकडे गेले.. तेव्हापासुन गॉल्फ हा खेळ.. सोफ्यावर बसुन..टीव्हीवर बघताना वाटतो ...तितका सोप्पा नाही याचा साक्षात्कार झाला! व टायगर ज्या लिलयेने गॉल्फ खेळतो.. त्याचे अ‍ॅप्रिशिएअशन.. लाख पटीने वाढले... Happy

मी क्रिकेट व स्विमिंग सोडुन दुसरे कुठलेच आउटडोअर खेळ खेळलेलो नाही... पण इन जनरल... बहुतेक सगळ्याच खेळांचे मला जबरदस्त आकर्षण मात्र आहे! तु मात्र पट्टीचा गॉल्फ खेळणारा दिसतोस!

माझा मुलगा मात्र...जो लवकरच १४ वर्षाचा होइल.. .. गेली ६ वर्षे कंपॅटिटीव्ह स्विमींग करतोय.. तो .. त्याच्या एज ग्रुपमधे(१३-१४).. अजुन १३ वर्षाचाच असुनही डिस्ट्रिक्ट लेव्हलला.... ५० मिटर्स फ्रिस्टाइल, १०० मिटर्स ब्रेस्ट स्ट्रोक, १०० मिटर्स बटरफ्लाय व २०० मिटर्स इंडिव्हिज्युअल मेडले मधे टॉपर असतो.. गेल्या वर्षी.. स्टेट लेव्हलला.. ही वॉज इन टॉप ३ इन एव्हरी इव्हेंट (४)ही एंटर्ड... या वर्षी.. फेब्रुवारी मधे ही अगेन क्वालिफाइड अ‍ॅज अ टॉप स्विमर अ‍ॅट डिस्ट्रिक्ट लेव्हल ....बट स्टेट चँपिअनशिप वॉज कँसल्ड इन मार्च... ड्यु टु पँडेमिक.. इथे व्हिडियो कसे टाकायचे? त्याची एखादी रेस टाकली असती इथे...

ती टायगरची क्लिप जबरीच आहे... बघताना.. टायगरची सगळी कारकिर्द्र झर्रकन.. डोळ्यासमोरुन गेली... काय एक एक शॉट त्याने मारले आहेत.. २०१० ते २०२०... ही दहा वर्षे.. व्हॉट अ कंप्लिट वेस्ट ऑफ टॅलंट....

अमोल.. धन्यवाद. Happy असामी, तु, मैत्रेयी हे जुने मायबोलिकर अजुन मायबोलिवर आहेत.. येतात हे बघुन खरच खुप बरे वाटते. आय मिस रार...तिच्याशी काँटॅक्ट झाला तर सांग मुकुंद मिस करतोय तिला... आणी झक्की कसे आहेत?

>>इथे व्हिडियो कसे टाकायचे?<<
मस्त रे, आणि मनःपुर्वक शुभेच्छा तुझ्या छोकर्‍याला. तु क्लिप्स यु-ट्युबवर टाकुन त्याची शेरेबल लिंक इथे दे, म्हणजे आम्हा सगळ्यांना बघता येईल...

काल पिजीए चॅपियन्शिप्स बघितलीस? काय नेक अ‍ॅड नेक कांपिटिशन चालली होती फ्रंट नाइन पर्यंत. एका वेळेला तर फाय वेर टाइड फॉर द फर्स्ट पोझिशन. माझी इच्छा होती डिजे जिंकावा, पण तो ढेपाळला. कॉलिन मारकावा वाज ए सर्प्राइज एलिमेंट. धिस किड प्लेड लाइक ए चँप. हि वेंट टु #१६, (पार ४) विथ ए वन शॉट लीड, ड्रोव दि टी शॉट (अबौट २९० यार्ड्स) टु ग्रीन, लँडेड ८ फिट फ्रॉम द कप, अ‍ॅंड फिनिश्ड द होल विथ अ‍ॅन इगल. यु गाट्टु सी इट टु बिलिव इट...

माझा रविवार सत्कारणी लागला...

टायगर कंटेंशन मधे नसुन सुद्धा बघीतली..

मारकावा... टायगर्,जॅक निकलस व रोरी च्या पंगतीत जाउन बसला.. विनींग वॉनामेकर ट्रॉफी अ‍ॅट एज २३..

गॉल्फ चॅनल वर व सगळीकडे लगेच त्याला डोक्यावर बसवले आहे... स्लो डाउन गाइज!

माहीत आहे ना जॉर्डन स्पिथचे काय झाले होते २०१५ मधे मास्टर्स व यु एस ओपन २१ व्या वर्षी जिंकल्यावर? २०१६ च्या मास्टर्स मधे १२ होलपर्यंत ५ शॉट लिड असुन... १२ व्या होलवर क्वाड्रिपल बोगी... आणी मास्टर्स हरला.. ही इज स्टील लिकिंग हिज वुंड्स!

डी जे.. खेळ चांगला आहे... पण त्याच्यात टायगर सारखे किलींग नेचर नाही... आठवत.. एक वेळ असा होता... टायगर फायनल राउंड मधे जाताना जर लिडर असेल... तर बाकीचे सगळे त्याच्या खेळापुढे इंटिमिडेट होउन अक्षरशः नांगी टाकायचे?

तसे इंटिमिडेशन ना डी जे कडे आहे .. ना ब्रुस कोपका कडे आहे.. ना जॉर्डन स्पिथकडे आहे..

जस्टीन थॉमस व रोरी मॅक्लोरीचे पण तसेच आहे..

पॉल केसी... खुप वेळा फायनल राउंड मधे कंटेंशन मधे असतो.. पण वय ४३ झाले तरी.. एकही मेजर नाही.. बिचारा..

या रवीवारी... मला वाटते एके वेळी.. सेव्हन वे टाय होता..

टायगर वॉज आउट ऑफ कंटेंशन आफ्टर पुअर सेकंड राउंड.. थर्ड वॉज वर्स्ट.. फायनल राउंड बेटर.. बट टु लिटल.. टु लेट..

मला अजुनही वाटते... मास्टर्स गॉल्फ कोर्स.. पर्फेक्टली सुट्स हिज गेम.. इव्हन नाउ.. अ‍ॅट हिज एज..

गॉल्फसाठी वेगळा बी बी उघडुयात.. Happy

वेबमास्टर.. इथेच डायरेक्ट व्हिडियो नाही टाकता येत का?( १ ते २ मिनीटाचा?)

मुकुंद, आठवण काढल्याबद्दल धन्यवाद. तुम्हीही पुन्हा लिहायला लागलात हे छान! मस्त चाललीय ही सीरीज! तुमच्या लिहिण्यातून नेहमीच तुमची खेळांबद्दल ची पॅशन जाणवते.

मस्त लिहिला आहे. क्रिडाप्रेमी जेव्हा सामने बघतात तेव्हा आपणच खेळत आहोत असा जोश त्यांच्यात निर्माण होतो. इतकं समरस होतात की आजुबाजुचे भान रहात नाही हे मी अनुभवलं आहे.
जाता जाता ओव्हरकमर्शलायझेशनचा मला राग आलेला प्रकार सांगतो. अर्थात त्याचा लेखाशी अजिबात संबंध नाही. मागे एक धर्मगुरू वारले तर अनुयायांनी अंतिम विधींची बोली लावली. जो जास्त पैसे देईल तो तिरडीला खांदा देईल, स्नान घालील ... वगैरे. या प्रकारात झालेली हेळसांड दिसत होती. Sad

तुमच्या लिहिण्यातून नेहमीच तुमची खेळांबद्दल ची पॅशन जाणवते. >>> + टोटली. आणि मुलालाही शुभेच्छा!

मुकुंद, बाकी तू गॉल्फ मधला "रावसाहेब" दिसतोयस Happy मला गॉल्फचा अजिबात गंध नसल्याने तुला या विनोदाचा राग येउ नये Light 1

https://drive.google.com/file/d/1yCv1Kmr5Fqm2N7sApUr7ptonz7QyilT9/view?u...

राज, असामी, पराग,अमोल, हायझेनबर्ग.. व इतर कोणी... जर तुम्हाला माझ्या मुलाची ... आदित्यची... या फेब्रुवारीत झालेल्या डिस्ट्रिक्ट फायनल्समधली......५० मिटर्स फ्रिस्टाइल ची क्लिप पहायची असेल तर या वर दिलेल्या लिंकवर तुम्हाला त्याची रेस दिसेल.

आदित्य लेन २ मधे आहे... वरुन दुसरी लेन.. त्याने ब्लॅक जॅमर्स व ब्लु स्विम कॅप घातली आहे.

ही सेमिफायनल हिट होती... फायनल मधे मात्र त्याला फेव्हरेट लेन ..म्हणजे.. लेन ४ मिळाली होती. त्यामुळे त्याच्यावरचा ड्रॅग कमी झाला व त्यामुळे फायनलमधे त्याचे टायमींग होते २६.३७ सेकंड्स...( त्याचे बेस्ट टायमींग आहे २५.६९ सेकंड्स ) व त्याच्या एज ग्रुपमधे तो सहज पहिला आला व स्टेट साठी क्वालिफाय झाला . पण पँडॅमिक मुळे एप्रील मधली स्टेट टुर्नामेंटच रद्द झाली . तो १०० मिटर्स बटरफ्लाय, १०० मिटर्स ब्रेस्ट स्ट्रोक व २०० मिटर्स इंडिव्हिज्युअल मेडले मधे पण स्टेट साठी क्वालिफाय झाला होता. त्यामुळे त्याचा खुप हिरमोड झाला.

ही सेमीफायनल तुम्हाला जेसन लिझॅकच्या.. २००८ च्या बैजींग ऑलिंपिक्समधल्या.. रिले रेसच्या परफॉर्मंसची आठ्वण करुन देइल.. ( जस्ट किडिंग! ...... Happy )

लेन २ मिळाल्यामुळे..ड्रॅग खुप असल्यामुळे..अगदी शेवटपर्यंत आदित्य थोडा मागे होता.. पण लास्ट मिलीसेकंडला.. त्याच्या आउट् स्ट्रेच्ड हाताने .. त्याने फिनिश बोर्डला हात टेकवला...

होप तुम्हाला त्याची ही क्लोज रेस आवडेल.... Happy

हा त्याचा फोटो...वॉर्म अप पुल मधे ..स्टार्टिंग ब्लॉकवरुन रेस स्टार्टची प्रॅक्टिस करताना ...पाण्यात सुर मारताना.

7793210E-9917-4588-9592-A91F7E82CD73.jpeg

अमोल... नो वरीज! Happy

फक्त मी दिलेली लिंक चालते का ते सांग.. असला लिंक तयार करुन इथे टाकायचा प्रकार पहिल्यांदाच केला आहे.. होप ती लिंक तुम्हाला बघता यावी.

>>होप तुम्हाला त्याची ही क्लोज रेस आवडेल<<
सहि रे. सॉलिड पोटेंशियल आहे आदित्य मधे. कॅलिफोर्निया/कोलराडोला मुव व्हायची तयारी ठेव...

गजानन, राज.. धन्यवाद!

राज.. मित्रा... नाही रे.. अजुन त्याला बरेच इंप्रुव्ह करायला लागेल.. कालोराडोला मुव्ह व्हायला. ही डझ हॅव्ह पोटेंशिअल.. अ‍ॅज पर हिज कोच.

जस्ट टु गिव्ह यु अ पर्स्पेक्टिव्ह... कंपॅटिटिव्ह स्विमींग मधे प्रत्येक एज ग्रुपमधे.. टायमींग स्टँडर्ड्स् असतात.... B-,( slowest)... to BB-, A-, AA-, AAA- and finally AAAA-( fastest) ...

आदित्यचे टायमींग सध्या AA- आहे. पण ते इंप्रुव्ह करायला त्याला याच एज ग्रुपमधे ...अजुन १ वर्ष आहे. त्याच्या कोचनुसार.. तो बहुतेक पुढच्या वर्षीपर्यंत.. AAA- and AAAA- च्या मधे असेल. Time will tell!

त्यालाही सगळ्या खेळात आवड आहे.. त्याला बास्केटबॉल, बेसबॉल व फुटबॉलही खेळायचे आहे. पण त्याला समजवुन सांगीतले की काँटॅक्ट स्पोर्ट्स मधे खुप धोके आहेत. त्यापेक्षा स्विमींग आवडत आहे तर त्यावर आपण जास्त वेळ व मेहनत घेउ. स्विमींग कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स नाही.

गेली ५ वर्षे आठ्वड्यातुन ४ वेळा.. प्रत्येक वेळी दिड तास.. म्हणजे आठ्वड्यातुन ६ तास.. त्याची कोच बरोबर प्रॅक्टीस असते.

अमेरिकेत तुला तर माहीत आहे सगळे स्पोर्ट्स किती कंपॅटीटिव्ह असतात.सगळी मुले खुप मेहनत घेत असतात. मी त्याला म्हटले की जोपर्यंत तु स्विमिंग एंजॉय करत आहेस तोपर्यंत नीट मेहनत घे. कसलेच प्रेशर घेउ नकोस. मिडल स्कुल मधे असुनही हायस्कुल व्हारसीटी टाइमींग तर त्याचे आत्ताच आहे.

इस्ट कोस्ट व वेस्ट कोस्ट मधे तर अजुन जबरी टेलंटेड मुल-मुली असतात.

पण त्याचे स्विमींग वरचे प्रेम असेच राहीले व तो इंप्रुव्ह होत राहीला तर एन सी ए ए कॉलेज स्कॉलरशिप मिळाली तरी खुप.. कालोराडो स्प्रिंग वगैरे खुप पुढच्या गोष्टी झाल्या... Happy