“कोरोना जगातून हद्दपार” “ओल्ड नॅार्मल कडे वाटचाल शक्य”
भारतातल्या एका आळसावलेल्या सकाळी ही बातमी ईडियट बाॅक्स, थोबाडपुस्तक, टिवटिव, कायप्पा, ई-पत्रे या सर्वांमधून लोकांच्या कानावर आदळायला लागली आणि आळसावलेली माणसे खडबडून जागी झाली.
मग सगळीकडे पोस्टींचा, प्रश्नांचा एकच पाऊस पडला. ओल्ड नॅार्मल म्हणजे काय यावर चर्चा-चर्वणं सुरू झाली.जवळजवळ एक आठवडा झाला तरी ही मतांची धुमश्चक्री थांबेना. सगळीकडे गोंधळाचे वातावरण पसरले. ई-आर्मी बोलवायची वेळ येते की काय ही भीती वाटायला लागली.
शेवटी , सरकारने जो माणूस आपल्या उदाहरणाने न्यू नॅार्मल-ओल्ड नॅार्मल स्थित्यंतर यशस्वीपणे करून दाखवेल त्याचे नाव जगाच्या इतिहासात कोरलं जाईल अशी घोषणा केली आणि स्थित्यंतर योजना जाहीर केली. तेव्हा कुठे हा ई-गदारोळ थांबला आणि लोकं कामाला लागली.
त्यात एक होता सखा हाॅटेलवाले. स.खा म्हणजे सतत खाऊ घालणारा. आता हा सखा म्हणजे एक प्रचंड हरहुन्नरी , थोडक्यात किडे करणारं व्यक्तिमत्व. कामत, शेट्टी, मॅरियट सगळं कोळून प्यायलेला,टप री ते सात ता री(हो हो तेच ते बुर्ज अल् अरब) पर्यंत सगळीकडे मुशाफिरी केलेला एक पध्दतशीर तरूण.वडापाव ओरिएंटल पध्दतीने आणि पास्ता मराठी पध्दतीने बनवू शकणारा एकमेव इसम....साॅरी, शेफ कम सर्व काही.
न्यू नाॅर्मल मध्ये स्वत:च्या,घरातील अगदी सर्वांत छोट्या-सर्वांत मोठ्या सभासदांमधील प्रत्येकाच्या,अगदीच बदल म्हणून स्वयंपाकीण बाईंच्या हातचं खाऊन कंटाळल्यामुळे ओल्ड नाॅर्मल मध्ये आपल्या रेस्टॅारंट मध्ये पहिल्या दिवसापासून लोकांची झुंबड उडेल आणि आपण जे खायला घालू ते सर्वजण आनंदाने खातील अशी त्याला आशा, नव्हे तर खात्रीच होती.
पण अरेरे, पहिले ३-४ दिवस तिथे काळं कुत्रं सुध्दा फिरकलं नाही.पण आपला सखा काही घाबरला नाही. तो पध्दतशीर असल्याने संभाव्य अडचणी व त्यावरच्या उपायांचा त्याने आधीच अभ्यास करून ठेवला होता.
त्याने त्याच्या रेस्टाॅरंटचे मेक-ओव्हर करायचे ठरवलं. सर्वात प्रथम नवीन लाॅक डाऊन मेनू त्याने सुरू केला.त्यात डालगोनाचा स्वतंत्र विभाग केला. त्यात डालगोना काॅफी, डालगोना दाल-राइस,डालगोना पालक-पनीर ते डालगोना व्हिस्की पर्यंत अनेक प्रकार ठेवले. इतर नेहमीचे यशस्वी (घरी केलेल्या रव्याचा!) रवा केक, कुकर मधला केक, टुटीफ्रुटी, ओरिओ पेस्ट्री, पाणीपुरीच्या घरी केलेल्या पुर्या, घरगुती पावाचा पिझ्झा असे विविध पदार्थ ठेवले.
त्यानंतर त्याने प्रत्येक दिवसाला एका यू-ट्युब चॅनेल चे नाव दिले. रविवारी अर्थातच मधुराज् रेसिपीज्.बाकीचे दिवस त्याने निशामधुलिका, विष्णू मनोहर, रणवीर ब्रार, संजीव कपूर ,हेब्बार्स, वाहशेफ मध्ये वाटून टाकले. त्या त्या दिवशी त्यांच्याच पध्दतीने पदार्थ बनणार , एवढचं नव्हे तर ज्याचं बिल सर्वात जास्त होईल त्याला किंवा तिला त्या त्या दिवशीच्या सेलिब्रिटी यू-ट्युबरला भेटता येणार , नव्हे त्याच्या बरोबर कोणतीही पाककृती बनवता येणार अशी भन्नाट योजना त्याने आखली.
या उपायांमुळे त्याच्या रेस्टाॅरंटमध्ये तुरळक गर्दी व्हायला लागली.पण म्हणावी तशी टेबलं अजूनही भरत नव्हती.त्याने कारणांचा शोध घेतला तेव्हा त्याच्या लक्षात आले की लोकांना चालणे, गाडी चालवणे या कौशल्यांचाच विसर पडलाय.मग त्याने त्याच्या भात्यातील पुढचे अस्त्र काढले.
त्याने साई ड्रायव्हिंग स्कूल, कुलकर्णी ड्रायव्हिंग स्कूल अशा अनेकांशी संधान बांधले. येथे ड्रायव्हिंग रिफ्रेशर कोर्स करा, रेस्टाॅरंट पर्यंत गाडी चालवत या आणि बिलावर तब्बल ९.९९% सुट मिळवा अशी योजना त्याने जाहीर केली.
आता टेबलं रोज ५०% वर भरत होती.पण सखाचा अस्वस्थ आत्मा काही शांत होत नव्हता. त्याच्या भात्यातील सर्व शस्त्रंही संपली होती.सखाने एक दिवस सरकारची स्थित्यंतर योजना काही उपाय सापडतोय का या विचाराने भिंग लावून परत एकदा वाचायला सुरूवात केली.
त्याला बारीक अक्षरात एक कलम असे दिसले की हे स्थित्यंतर सुरळीत होण्याकरिता कोणी काही जुगाड केला तरी तो गुन्हा मानला जाणार नाही.
हे वाचताच त्याच्या मनात अतिथोर आयडियाची कल्पना आली.
त्याने त्याच्या भागातील मोबाईल कंपन्यांना , इंटरनेट प्रोव्हायडर्संना घोळात घेतले आणि ३ दिवस त्या भागातील मोबाईल,इंटरनेट पूर्ण बंद ठेवायला त्यांना राजी केले.
१ ला दिवस गेला,२ रा दिवस गेला , आता मात्र लोकांचे धाबे दणाणले. शेवटी ३ र्या दिवशी याचा शोध घ्यावा म्हणून सर्वजण रस्त्यांवर उतरले. उतरतात तो काय त्यांना परिचित, अपरिचित अश्या विविध पदार्थांचा घमघमाट सुटला होता आणि त्यांची पावले आपसूक सखाच्या रेस्टाॅरंटकडे वळली.
त्याने ओल्ड नाॅर्मलच्या तिसाव्या दिवशी जगाच्या इतिहासात पहिला यशस्वी स्थित्यंतरकार म्हणून स्वत:चे नाव कोरण्यात यश मिळवले.
यात वरील उपायांबरोबरच रेस्टाॅरंटमध्ये येणार्या गेस्टस साठी “घराबाहेर कसे वागावे/बोलावे/कोणते कपडे परिधान करावे” या त्याने घेतलेल्या काॅम्प्लिमेंटरी सत्रांचाही हातभार लागला हे सांगणे नलगे.
सखाची ओल्ड नाॅर्मल ची गाडी जशी सुसाट धावू लागली तशी तुमची, आमची, सर्वांची लवकरात लवकर धावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
काही चूका, सुधारणा असतील, तर
काही चूका, सुधारणा असतील, तर जरूर सांगा. धन्यवाद सगळ्यांना.
मस्त हलका लेख आहे
मस्त हलका लेख आहे
कल्पनाविलास असला तरी आताच्या काळात वाचून छान वाटलं.
तथास्तु.
आवडला।
आवडला।
छान हलका लेख.
छान हलका लेख.
छान लेख
छान लेख
संदर्भ लागला नाही. मला वाटलं
संदर्भ लागला नाही. मला वाटलं अगोदर की हे शिक्षण धोरणातले नवीन प्रकार आहेत.
धन्यवाद mi_anu,मंजूताई,मानव
धन्यवाद mi_anu,मंजूताई,मानव पृथ्वीकर, mrunali.
Srd-आमच्या एका ग्रुपच्या परवा
Srd-आमच्या एका ग्रुपच्या परवा गप्पा चालू होत्या. त्यात हे new normal किती बरं वाटतयं असं काहीजण म्हणत होते.त्यावर विचार करताना ही कथा सुचली. धन्यवाद.
भारीये
भारीये
धन्यवाद विनिता.झक्कास.
धन्यवाद विनिता.झक्कास.
आवडली !! न्यू नॉर्मल (नवी
आवडली !! न्यू नॉर्मल (नवी जगरहाटी) ची चांगली चुणूक...
अरे मस्त कल्पनाशक्ती.. आवडली
अरे मस्त कल्पनाशक्ती.. आवडली कथा
धन्यवाद सीमंतिनी,ऋन्मेऽऽष.
धन्यवाद सीमंतिनी,ऋन्मेऽऽष.
वरील व खालील सर्वजण, ज्यांचे लेख, कथा,प्रतिसाद मला खूप आवडतात त्यांचे प्रतिसाद वाचून मला भारी वाटतयं.
सर्वांना खूप खूप धन्यवाद.
छान आहे. आवडलं. लवकर नॉर्मल
छान आहे. आवडलं. लवकर नॉर्मल आधीसारखं लाईफ सुरु व्हावं हीच इच्छा.
छान आहे. आवडले.
छान आहे. आवडले.
धमाल लिहिलंय!
धमाल लिहिलंय!
धन्यवाद अंजली_१२,मी_अस्मिता,
धन्यवाद अंजली_१२,मी_अस्मिता, सनव.