Submitted by निर्झरा on 30 July, 2020 - 09:47
सध्या पुण्यातिल वातावरण बरेच खराब असुन कुठलेही पिठ दळुन आणन्यासाठि बाहेर पडणे धोक्याचे वाटत आहे. कारण ज्या भागात गिरणी आहे त्या भागात कोविड पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे घरातच घरघंटी वर पिठ करायचे आहे. त्या करता कोणत्या कंपनीची चक्की चांगली आहे? माबो वर कोणी ती वापरली आहे का? या बद्दल माहिती हवी आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
1 वर्षं पूर्वी microfine
1 वर्षं पूर्वी microfine घेतली, ऑटो क्लीन मॉडेल आहे पण स्वतः स्वच्छ करावीच लागते... चांगली आहे ...
माझ्या मैत्रीणीकडे आहे...
माझ्या मैत्रीणीकडे आहे... तिला मेसेज केलाय. कळवते.
आमच्याकडे ही आहे.
आमच्याकडे ही आहे.

स्वच्छता नीट करावीच लागते.आम्ही ज्वारी बेसन गहू एका दिवशी प्लॅन करतो आणि मग चक्की बरोबरचा ब्रश, आणि व्हॅक्युम क्लिनर ने पूर्ण पीठ साफ करतो.साधारण 50 ते 100 ग्रॅम वाया जाते ते कंपोस्ट मध्ये टाकतो.त्याला मसाला ऍटॅचमेण्ट आहे.हौस असल्यास मसाले, मिरपूड, दालचिनी पूड,कॉफी वगैरे करता येतात.
स्वच्छता नीटच करावी लागते.
पण पीठ ताजं मिळाल्याचा आनंद असतो.
ट्रे मध्ये एका वेळी साडेतीन किलो धान्य बसते.ते खाली गेल्यावर अजून टाकता येते पण खालचा पीठ डबा साडेतीन किलोत भरतो.
कोणत्याही केस मध्ये चक्कीचे ब्लेड, पार्ट धुण्याचा विचार करू नये.सर्व स्वच्छता त्याबरोबर असलेल्या ब्रश ने करावी.अजून वाटल्यास छोट्या व्हॅक्युम क्लिनर ने.पीठ पडण्याचा कापडी चॅनल काढून धुता येतो.खालचा स्टील चा डबा काढून धुता येतो.स्वच्छ प्लास्टिक पिशवी घातल्यास सारखा धुवावा लागत नाही.बाजारात थोड्या लहान आणि क्लिनिंग ला मोटर आणि नळी दिलेल्या चक्क्या मिळतात.अनुभव नाही.
(मी इतक्या वेळा च वापरलेत म्हणजे त्या स्वच्छत्यातल्या वेदना कळल्याच असतील.)
पण अनु, मग ते ऑटो क्लीन का
पण अनु, मग ते ऑटो क्लीन का लिहितात? आपल्यालाच ब्रशने साफ करायला लागत असेल तर.
Natraj atta chakki, 4.5 kg
Natraj atta chakki, 4.5 kg in 1 time
Price 16000, she is happy with it and using it from 10 years.
एवढे 4 किलो पीठ एकदम घेऊन काय
एवढे 4 किलो पीठ एकदम घेऊन काय करतात ?
ऑटो क्लीन वाल्या आता मिळतात
ऑटो क्लीन वाल्या आता मिळतात
आमची मॅन्युअल आहे लोकल ब्रँड ची.
ती एकदम करते का नाही माहिती
ती एकदम करते का नाही माहिती नाही पण क्षमता असेल चक्कीची एकावेळी 4.5kg पीठ दळायची.
एवढे 4 किलो पीठ एकदम घेऊन काय
एवढे 4 किलो पीठ एकदम घेऊन काय करतात ?>>>

काही नाही. भातुकली खेळताना टाल्कम पावडरऐवजी पीठ वापरतात.
आणि तरीही पीठ उरलं ना तर घरात असलेल्या काळ्या मांजरीला दुधाबरोबर पोळी खाऊ घालतात.
एकदम 5 किलो पीठ करणे बरे पडते
एकदम 5 किलो पीठ करणे बरे पडते(कणिक भाकरीच्या पिठा प्रमाणे जुनी नवी फार फरक पडत नाही)
भाकरी पीठ 2 किलो एकेका वेळी केले तर बरे पडते.
ऑटो क्लीन वाल्या आता मिळतात
ऑटो क्लीन वाल्या आता मिळतात
आमची मॅन्युअल आहे लोकल ब्रँड ची.>> ओह! पण तू दिलेल्या फोटोत ऑटो क्लीन लिहिलंय ना.
नवीन ऑटो क्लीन असलेल्या चक्क्या स्वच्छ करायला सोप्या असतात का?
अय्या हो का
अय्या हो का
ऑटो क्लीन लिहिलंय का
मी वाचलं नाहीये
म्हणजे, आपण ब्रश ने पुसल्यास चक्की न हलता उभी राहून आपल्याला पुसू देते या अर्थाने ऑटो क्लीन म्हटले असेल.
4 किलो एकाचे ना ?
4 किलो एकाचे ना ?
गव्हाचे 4 किलो
ज्वारीचे 4 किलो
बेसन 4 किलो
ही बेसिक पीठे झाली
अजून तांदूळ , नाचणी , बाजरी ... किचन म्हणजे शक्ती पीठ होऊन जाईल
माझ्या घरी नंदादीप नावाची
माझ्या घरी नंदादीप नावाची कंपनीची आटा चक्की गेल्या वर्षी दादर कबुतरखाना येथील मार्केटमधून घेतली .
दुकानदाराने विविध मशिन्स compare करताना खालील मुद्दे विचारात घेतले
१. सर्व्हिसिंग
२. अॅक्सेसरीजची उपलब्धता व टिकाऊपणा ( एकदा त्याचे गॅस्केट खराब झाले होतेपण रिप्लेस ही लगेच करून दिले )
३. मोटार चा परफॉर्मन्स
४. Capacity 2.5 vs 5 kg
५. कंपनीचे हिस्ट्री व रेप्युटेशन (हे मी जास्त ऐकले नव्हते पण ओळखींमधील फॅमिलीत हेच असल्यामुळे घेतली )
दुकानदाराने व्हॅक्यूम क्लीनर अटॅचमेंट असलेले घेऊ नये असे सुचवले त्यापेक्षा दुसरा वेगळा व्हॅक्युम क्लिनर घ्यावा आणि त्याने स्वच्छता करावी ( गरज वाटली तर ) असे त्याचे म्हणणे .
स्वच्छतेच्या बाबतीत मी अनू यांना अनुमोदन .
आम्हीही आठवडाभराचे धान्य उदाहरणार्थ नाचणी गहू बाजरी ज्वारी थालिपीठ भाजणी इत्यादी एक वेळी लावतो .
शक्यतो जाळ्या धूत नाही परंतु कमी वापरली जाणारी जाली पाण्याने स्वच्छ धूवून कोरडी करून ठेवतो
या चक्की ला वेगळं मसाला अटॅचमेंट नाही ( अवांतर : लालबाग मार्केटातील मसाला विक्रेत्यांच्या मतानुसार मसाले घरघंटी वर करू नयेत )
अनुभव: १. दळण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर (एक फनी रिंगटोन वाजते ) दरवाजा बराच वेळ बंद ठेवल्यास आतमध्ये वाफेने पीठ चिकटून बसते म्हणून दळण झाल्यावर लगेच दरवाजा उघडून ठेवतो व थंड झाले की पीठ दुसऱ्या डब्यात ट्रान्सफर करतो . तेवढीच कमी स्वच्छता करावी लागते
२. चक्की खूप तापते त्यामुळे थोड्या थोड्या अंतराने दळण करावे
३. प्लास्टिक चाके खूप तकलादू वाटत
४. भाकरी व्यवस्थित येतात .पोळ्यांची पिठ क्वॉलिटी बाजारू चक्कीचा पिठापेक्षा कमी वाटेल परंतु रेडिमेड पीठापेक्षा नक्कीच चांगली .
मी दळण कांडण जास्त करत नाही पण Lockdown च्या काळात आमच्या सिनियर सिटीझन ना घरघंटी खूपच सोयीचे पडले
आम्ही पण विचार करतोय की
आम्ही पण विचार करतोय की घ्यावे पण कन्फ्युझ आहे.
आम्हाला तर महिन्याला पिठही जास्त लागते. १० किलो गहू, १०-१५ किलो तांदूळ अन ५ -१० किलो ज्वारी.
अन हो भाकरीचे पीठ सलग वापरात असले तर महिना दोन महिन्यात काही फरक पडत नाही. चव सारखीच असते
अय्या हो का Happy
अय्या हो का Happy

ऑटो क्लीन लिहिलंय का
मी वाचलं नाहीये >> भिरभिऱ्याच्या आकाराच्या पांढऱ्या गोलात लिहिलंय.
म्हणजे, आपण ब्रश ने पुसल्यास चक्की न हलता उभी राहून आपल्याला पुसू देते या अर्थाने ऑटो क्लीन म्हटले असेल. >>
तुझा उपकरणांवरचा धागा वाचलाय मी.
भाकरी पीठ मस्त होते.एरवी
भाकरी पीठ मस्त होते.एरवी विकतचे पीठ कधीकधी दगा देते.
भाजणी पण एक दोन वेळा करून पाहिली आहे.
भाकरीत फॉक्सटेल मिलेट, आणि कोणतातरी मिलेट आणि नाचणी असे प्रयोगही केलेत.(भाकऱ्या फडफडीत झाल्या.)
भाकरीत मूठभर उडीद टाकतो 1 किलो ला.
मसाला वाली अटॅचमेंट आम्हीही फार वापरत नाही.पण चांगली आहे.
बेसन चांगले होते.दलिया पीठ, रवा, पिठीसाखर वगैरे होते असे मॅन्युअल मध्ये वाचून आहे पण कधी करावेसे वाटते नाही.
पावसाळ्यात आम्ही गिरणीत ऑफिसला जाण्या पूर्वी दळण ठेवायचो.तेव्हा गिरणी बंद असायची.मार्कर ने डब्यावर नाव लिहून ठेवायचो.मग 2 दिवसाने ऑफिस हून येताना आणायचो.या सगळ्या व्यापाचा कंटाळा आल्याने पावसाळ्यात ही चक्की घेतली.ही चक्की आम्ही घेतल्यावर दुकान बंद पडून त्या जागी दरवाज्याचे दुकान आले.मग एक चहाचे हॉटेल आले.
सुदैवाने नंबर वर फोन केला की राजगुरूनगर फॅक्टरी मधला माणूस चांगला गायडन्स देतो.तरीही नाही झाले तर दुरुस्तीला येतो.
नटराज व नवदीप कंपनीची पण
नटराज व नवदीप कंपनीची पण चांगली आहेत पण popular असल्याने किंमतीत थोडा फरक होता व नंदादीप चे knob बळकट वाटले. Onlineबरेच variety आहे ,दुकानात हे तीन चार खपणारे मोडेल अस्तात , इतर मोडेल पुस्तकात दाखवतात
नटराज चे नाव ऐकलेय खूप.
नटराज चे नाव ऐकलेय खूप.
माहिती दिल्याबद्दल सर्वांचे
माहिती दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
mi_anu....... (मी इतक्या वेळा च वापरलेत म्हणजे त्या स्वच्छत्यातल्या वेदना कळल्याच असतील.)
हो वेदना कळाल्या. साफसफाई हे कंटाळवाणे असले तरी मशिन नीट रहायला करणे जरुरी आहे.