चिकन - बोनलेस चिकन ब्रेस्ट (किंवा थाय पीसेस ही चालतील), १ वाटी ऑल पर्पज फ्लार, ड्राय ओरेगनो चुरा एखादी चिमुट, मिरपूड अर्धा टी. स्पून, मीठ
मश्रूम - बटन किंवा पोर्टबेला मश्रूम स्लायसेस १ बोल
वाइन - मर्साला वाइन एक ते दीड कप -यात स्वीट आणि ड्राय असे वेगवेगळे प्रकार येतात. आपल्याला ड्राय वापरायची आहे. मर्साला नसल्यास इतर कोणती रेड वाइन चालू शकेल. किंवा व्हाइट वाइन +दोन चमचे ब्रँडी, किंवा शेरी.
इतर - ऑलिव ऑइल, लसूण ५-६ पाकळ्या स्लाइस करून, १ लहान किंवा अर्धा मध्यम कांदा काप करून, रेड बेल पेपर स्लाइसेस (ऑप्शनल), चिकन ब्रॉथ *सुमारे २ ते ३ कप , फ्रेश थाइम** ( रोजमेरीसुद्धा चालू शकेल), फ्रेश पार्सली, कॉर्न स्टार्च १ चमचा , १-२ चमचे बटर, हेवी क्रीम किंवा हाफ न हाफ मिल्क अर्धी वाटी
मर्साला चिकन म्हणजे मर्साला वाइन सॉस मधे शिजवलेले चिकन. घरात सगळ्यांचीच आवडीची डिश. मी हे सर्वप्रथम ऑलिव्ह गार्डन मधे खाल्लं होतं, नंतर बर्याच चांगल्या इटालियन रेस्टॉरन्ट्स मधेही खाऊन झालं. मग बर्याच रेसिपीज नेट वर वाचून आणि यूट्युब वर बघून शेवटी या पद्धतीने मी केली. बर्यापैकी सोपी, सहज मिळणारे इन्ग्रेडिय्न्ट्स वापरून चांगली जमली असे वाटले म्हणून इथे शेअर करतेय.
या डिश मधे दोन स्टार इन्ग्रेडियन्ट्स आहेत, जे अगदी हवेच. ते म्हणजे वाइन आणि मश्रूम्स. ते वगळून कुणी ही डिश केलीच तर त्याला कृपया वेगळे नाव देणे
कृती -
आधी चिकन ब्रेस्ट ला आडवा कट करून २ थिन स्लायसेस करून घ्या. मग त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करा. २ ब्रेस्ट्स चे साधारण ८ तुकडे होतील. थाय पीसेस घेतले तर ते पाउंडिंग करून थिन करता येतील. एका ताटलीत ऑल पर्पज फ्लार, मीठ, मिरपूड आणि ओरेगनो हे कोरडेच मिक्स करा. गॅस वर एका कढईत किंवा फ्राय पॅन मधे थोडे बटर + २ चमचे तेल गरम करा. चिकन पीसेस एकेक करून ताटलीतील पिठावर दोन्ही बाजूने हलक्या हाताने दाबून जास्तीचे पीठ झटकून मग पॅन मधे सोनेरी रंगावर दोन्ही बाजूने १-२ मिनिटे भाजा. आणि एका ताटलीत बाजूला काढून ठेवा.
पिठाच्या लेयर मुळे चिकन पीसेस चा वरचा लेयर जरा फर्म आणि सोनेरी होतो , पूर्ण शिजवण्याची गरज नाही कारण हे चिकन आपण नंतर सॉस मधे शिजवणार आहोत.
आता सॉस बनवायचा आहे. ज्या कढईत चिकन चे पीसेस केले तीच घेतली तर उत्तम. थोडे बटर आणि ऑलिव ऑइल घालून गरम करा. त्यात कांदे आणि लसणाच्या स्लाइसेस घालून थोडे परता. मग मश्रूम स्लाइसेस आणि थाइम किंवा रोजमेरी घालून मश्रूम चा कच्चट वास जाईपर्यन्त परता. रेड बेल पेपर्सही घालायचे असल्यास या स्टेप ला घाला.
आता यात एक कपपेक्षा थोडी जास्त वाइन घाला आणि मिनिटभर शिजू द्या. मग चिकन चे आधी तयार केलेले पीसेस आणि चिकन ब्रॉथ घालून झाकण ठेवा आणि आणखी ५-७ मिनिटे शिजू द्या. आता चिकन चे पीसेस नीट शिजले असतील. या स्टेप ला चिकन पीसेस पुन्हा ताटलीत काढून घ्या ( नाहीतर ओवर कुक होऊ शकते) आणि उरलेला सॉस हवा त्या कन्सिस्टन्सी ला आटवून घ्या. आता चिकन पुन्हा सॉस मधे घाला.
काही ट्रॅडिशनल रेसिपीज इथेच संपतात, पण सॉस क्रीमी होण्यासाठी ( आम्हाला असा आवडतो) यापुढचे फॉलो करा. आता सॉस मधे हाफनहाफ मिल्क किंवा हेवी क्रीम घाला, कॉर्न स्टार्च २ चमचे पाण्यात कालवून घाला आणि एक दोन मिनिटे अजून शिजवा. चवीप्रमाणे मीठ , हवं तर देशी चवीला आवडत असल्यास किंचित तिखट ही घालायला हरकत नाही. सुरेख क्रीमी चिकन मर्साला तयार!
वरून गार्निशिंग साठी फ्रेश पर्सली चिरून घाला. सोबत आवडीचा पास्ता किंवा मॅश्ड पोटॅटो आणि एखादी मस्त वाइन ... मस्त जेवण होईल!
* ब्रॉथ नसल्यास घरी करू शकता. घरात असलेल्या भाज्या, चिकन बोन्स इ. ३-साडेतीन कप पाण्यात घालून ते मिश्रण आटवणे. ब्रॉथ न वापरल्यास चव जरा पांचट लागते.
** थाइम ड्राय पण मिळते पण फ्रेश असेल तर खूप छान फ्लेवर येतो, फ्रेश थाइम ही अशी दिसते.
हा प्रकार आमच्या घरी पण आवडता
हा प्रकार आमच्या घरी पण आवडता आहे. रेसिपी संबंधितांना देण्यात येइल. (अग्ग बाई! मी पैली की काय...)
मस्त आहे रेसिपी.
मस्त आहे रेसिपी.
मर्साला चिकन म्हणजे मर्साला
छान दिसतेय
आणि हे भारीय
मर्साला चिकन म्हणजे मर्साला वाइन सॉस मधे शिजवलेले चिकन.
>>>>
मी मोठ्या आशेने शुद्धलेखनाची चूक काढायला आलेलो
Mastach. I must check if our
Mastach. I must check if our wines store stocks red wine. I was looking for something new to do with chicken. Thanks. Mushroom and pepper s are available in star bazar.
मस्त दिसतंय
मस्त दिसतंय
भारी दिसतय
भारी दिसतय
भाहारीही!! रेसिपी योजा पाठवत
भाहारीही!! रेसिपी योजा पाठवत आहे.
करून पाहणार
करून पाहणार