GDP देशाच्या उत्पनाचा मोजमापाची पद्धत

Submitted by विश्वजीत बा. म्हमाणे on 26 July, 2020 - 02:50

विषय- GDP देशाच्या उत्पनाचा मोजमापाची पद्धत
लेखक - विश्वजीत बाबुराव म्हमाणे

एकूण देशाची उत्पादन ज्याला आपण Gross domestic product असे म्हणतो त्याचे मोजमाप GDP च्या आखलेल्या पद्धतीप्रमाणे मोजली जाते. त्याआधी याचा शोध कधी व कोणत्या कारणासाठी केला होता ते जाणून घेऊयात.अमेरिकेत सन 1934 साली सायमन कुझनेट्स यांनी Gross Domestic Product व त्याची मोजमाप पद्धत(Method) विकसित केले.या गोष्टींची मदत देशांतर्गत होणाऱ्या एकूण उत्पादन किती ते मोजमाप करण्यात होईल हा त्याचा प्रमुख उद्देश होता.विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर GDP पद्धत(Method) वापरानंतर व्यवस्थापनेला कळू लागले आपल्या देशाची उत्पन्न व विकास किती टक्के आहे याची जाणीव होऊ लागली.पुढे सन 1991 मध्ये अमेरिकेने अर्थव्यवस्थेमध्ये GDP व त्याची पद्धत वापरण्यास चालू केला व तसेच बऱ्याच देशांनीही याची पद्धत आपल्या अर्थव्यवस्थेत वापरण्यास सुरुवात केली.या गोष्टींचा फायदा देशांतर्गत होणाऱ्या निर्यात,आयात किती केला पाहिजे आपला उत्पन्न कसा वाढवला पाहिजे या गोष्टींमध्ये होऊ लागला.त्याच बरोबर आपल्या मित्र देशांमध्ये काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी GDP Method चा आधार घेण्यात आला.GDP हा देशांतर्गत तिमाही व वार्षिक केला जातो ज्यामध्ये एग्रीकल्चर, मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिसिटी, गॅस,वॉटरसप्लाय,कन्स्ट्रक्शन,ट्रेड, हॉटेल, ट्रान्सपोर्ट,फायनान्सिंग,इन्शुरन्स,कम्युनिटी,सोशल आणि पर्सनल सर्विसेस व इतर सगळ्या क्षेत्रांचा आढावा घेतला जातो. याचे मोजमापाची पद्धत कशी करतात ते बघूयात.
Method of GDP = C + I + G + (X − M)
(C)Consumer Expenditure म्हणजे ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे दैनंदिन सामान, नवीन घर,गाडी व इतर गोष्टींवर केलेला खर्च.
(I)Industrial Investment म्हणजे औद्योगिक क्षेत्रांमध्ये झालेली गुंतवणूक व त्यामधून आलेली कमाई.
(G)Government expenditure म्हणजे सरकारने केलेल्या सर्व क्षेत्रांमधील खर्च हे आरोग्य, कला, शिक्षण, नवीन योजना, शेती बाबत नवीन तंत्रज्ञान,संरक्षण व इतर या गोष्टींच्या स्वरूपात असतो.
(X)Export-Import म्हणजे देशांतर्गत झालेल्या उत्पादनाच्या निर्याती मधून देशांतर्गत बाहेरून आलेल्या गोष्टी ज्याला आयात असे म्हणतात तो वजा केला जातो.

अशाप्रकारे याचे मोजमाप होते. भारताची जीडीपी व्हॅल्यू 2019 ला $2.94 ट्रिलियन व ५ टक्के एवढी होती आणि जगामध्ये आपण पाचव्या स्थानावर होतो. भारत सरकारने मेक इन इंडिया च्या अंतर्गत 2025 पर्यंत आपली जीडीपी $5.9 ट्रिलियन करण्याचा निर्धार घेतला आहे.तो यशस्वी होईल ते स्वदेशी वस्तू व वोकल फॉर लोकल या मंत्रामुळे…

जय हिंद जय भारत

आपल्याला ही माहिती कशी वाटली यासंदर्भात मला कमेंट करा खालील इमेल आयडीवर- vishwajeetmhamane@yahoo.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults