करोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण फक्त ऑनलाइन होत आहे अशा सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे.
विद्यार्थी व्हिसावर अमिरेकेत गेलेल्या विद्यार्थ्यांना अमेरिकन प्रशासनाच्या या नविन निर्णयामुळे खूप मोठा धक्का बसला आहे.
जी शाळा, काॅलेजेस निदान काही लेक्चर्स प्रत्यक्षरित्या न घेता संपूर्ण ऑनलाईन पध्दतीने घेतील त्यामधील परदेशी विद्यार्थ्यांना त्यांचा व्हिसा रद्द करुन मायदेशी पाठविण्यात येईल असे प्रशासनाने ठरविले आहे.
मायदेशी जायचे नसेल तर जी काॅलेजेस संपूर्ण अभ्यासक्रम ऑनलाइन घेत असतील त्यातील विद्यार्थ्यांना ज्या काॅलेजमधे प्रत्यक्षरित्या शिकवले जाते अशा ठिकाणी ॲडमिशन घेणे आवश्यक राहिल.
अमेरिकेत नवीन विद्यार्थ्यांनाही संपूर्ण ऑनलाइन अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यापीठात अशा विद्यार्थी व्हिसावर प्रवेश दिला जाणार नाही.
कुठल्याही परिस्थितीत काॅलेजेस चालू व्हावीत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा Outbreak झालेल्या अथवा ज्या ठिकाणी पुढे होईल तिथल्या काॅलेजेस/विद्यापीठांनाही याबाबतीत सूट नसेल.
हा निर्णय जाहीर केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यानी "डेमोक्रॅटसना शाळा काॅलेजेस आरोग्याच्या कारणासाठी बंद रहायला हवी नसून राजकीय कारणासाठी बंद रहायला हवी आहेत" अशा आशयाचे ट्विट केले आहे.
अशा परिस्थितीत ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा काढला आहे.
पंकज उधास म्हणतो ते बरोबरच
पंकज उधास म्हणतो ते बरोबरच आहे...
आजा उम्र बहोत है छोटी, अपने घर में
भी है रोटी...
कशाला पाहीजे अमेरिका तसेही तेथे शिकून भारतात चांगली नोकरी मिळेल याची शाश्वती नाही. तर कशाला पैसे वाया घालवा. (If you are not studying in top 10 universities)
काही फील्ड मधील कटिंग एज
काही फील्ड मधील कटिंग एज नॉलेज तिथे मिळते म्हणून धडपड. ते इथे भारतात किंवा ऑनलाइन प्राप्त करणे अवघड आहे. वर राज म्हटले तसे विद्यार्थ्यांनी आपले गोल तपासू न पाहायची वेळ आहे.
https://www.business-standard.com/article/education/the-great-american-d...
हे चांगले आर्टिकल आज वाचनात आले. मी विरल दोशीं शी संपर्क साधणार आहे.
इतर देशात गेलेल्या
इतर देशात गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अमेरिकेच्या तुलनेत नगण्य असते. गेली काही वर्षे ऑस्ट्रेलिया, युरोप, न्युझिलंड वगैरे गेलेले विद्यार्थी एकत्र केले तरी अमेरिकेत आलिल्या विद्यार्थ्यांची बरोबरी (संख्येने) होत नाही..
आता बहुतेक सगळी महाविद्यालये काही क्लास प्रत्यक्ष ठेवतील, त्यामुळे फारसा फरक पडणार नाही.
काही लाख विद्यार्थ्याना भारतात परत न्यायला काही वर्षे लागतील एयर इंडियाला ... त्यात भारतात बाहेरच्या विमानाना यायची परवानगी नाही आहे, ३१ जुलै पर्यंत आणि ती ही तारीख पुढे जाईल....
पण बरेच स्टुडन्ट्स बहुधा
पण बरेच स्टुडन्ट्स बहुधा ऑलरेडी भारतात गेले असतील ना ? अॅकॅडमिक इयर संपलेच होते एप्रिल मधे आणि मे च्या परीक्षा ऑनलाइन होत्या. बर्याच कॉलेजेस नी एप्रिल एन्ड -मे सेकंड वीक मध्येच कँपस रिकामा करायला सांगितले होते.
पण त्यावेळी जर फ्लाईट्स निघतच
पण त्यावेळी जर फ्लाईट्स निघतच नव्हती तर परत कशी जातील मुलं? (जर मार्चच्या आसपास निघाली नसतील तर).
ह्या निर्णयाने अमेरिकेचा
ह्या निर्णयाने अमेरिकेचा नक्की काय फायदा होणार आहे ? वर्कव्हिसा बंदी मुळे लोकल एम्प्लॉयमेंट वाढेल हे आर्ग्येमेंट ठीक पण एक- दोने सेमिस्टर पुरतं ऑनलाईन शिक्षण आहे म्हणून विद्यार्थ्यांना परत नेऊन नक्की काय साध्य होणार ? उलट त्यांचं रेंट वगैरे मिळणार नाही, शिवाय चंबूगबाळं उचलून परत गेल्यावर ते विद्यार्थी परत न येण्याची शक्यता वाढून युनिव्हर्सिटीचं नुकसान अधिक. नक्की काय लॉजिक ?
बेक्कारे हा निर्णय!
बेक्कारे हा निर्णय!
युनिव्हर्सिटी चे पैसे नाही
युनिव्हर्सिटी चे पैसे नाही जाणार... ऑनलाईन मध्ये क्रायटेरिया पण बदलेल हळू हळू... एका वर्गात पन्नास लिमिट असेल तर ऑनलाईन मध्ये पाचशे जाईल... प्रॉफिट च आहे ...
नक्की काय लॉजिक ?....>
नक्की काय लॉजिक ?....> निव्वळ राजकीय हेतू
युनिव्हर्सिटीजना वठणीवर
युनिव्हर्सिटीजना वठणीवर आणायला प्रशासनातील कोणा डोकेबाज व्यक्तीने निर्णय घेतला असावा.
वर जे परिचितांच्या कन्येचं उदाहरण दिलंय त्यात तिला युनिव्हर्सिटी धड काही सांगत नव्हती की क्लासेस ऑनलाइन असतील का कॅम्पसवर असतील. आणि त्यांचं नक्की ठरेपर्यंत कॅम्पसवर राहू पण देत नाहीत. तिची लकीली सोय झाली म्हणून ठीक. तिने भारतात जायचं आणि लगेच परत यायचं का? तिथे अडकली तर? त्यापेक्षा नक्की काय ते कळलं तर ती एक टर्म इंडियात सुखात राहील (जर ऑनलाइन असेल तर). आणि हायब्रीड असेल तर कॅम्पसवर राहता येईल.
या निर्णयामुळे आपल्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून देणाऱ्या युनि.ना धडा मिळेल.
जर इतकी लहान 19-20 वर्षांची मुलं शिकायला येतात तर युनिची जबाबदारी नाही का? सरळ कॅम्पस खाली करायला सांगतात.
या केसमधील मुलीची तिथल्याच नातेवाईकांकडे सोय झाली. आम्हीही बोलावलं होतं पण आम्ही लांब पडतो. शिवाय तिच्या घरी आर्थिक समस्या नसल्यामुळे तिकीटाचे पैसे , राहण्याचा खर्च वगैरे इश्यू नाहीये. पण इतर मुलांनी काय केलं असेल देव जाणे.
अमेरिकेत किंवा जगात ( भारतात
अमेरिकेत किंवा जगात ( भारतात खाजगी कॉलेज / युनी) सगळ्या युनिव्हर्सिटी ऑनलाइन मुळे खुप प्रोफ़िट मध्ये आहेत. एकदा क्लास रेकॉर्ड केला की तो कितीतरी वर्ष चालतो. ऑनलाइन परीक्षा यामुळे पेपर तपासायचा खर्च कमी. लायब्रेरी, स्पोर्ट्स हॉल मेंटेनेंस नाही, कोविड असले तरी ह्या ऑगस्ट साठी अॅडमिशन चालुच होत्या फक्त ACT/SAT च्या परिक्षा न झाल्याने त्याचे मार्क्स लागत नाहीत.
ऑनलाइन केल्यामुळे मिड वेस्ट अमेरिका मध्ये बर्याच युनी फक्त पास -फेल असाच निकाल देत आहेत त्यामुळे पास होण्याचे प्रमाण जवळपास १००% टक्के आहेत. एरवी ३०% मुले ईजिनियर मधुन पहिल्या वर्षी न झेपल्याने drop off घेउन business, material science सारखे विषय घ्यायचे . ह्या वेळी सगळे पास, फक्त ज्यानी स्वताहुन निर्णय घेतला त्यानीच स्विच केले. एकंदरित ह्या दोन वर्षात जी मुले बाहेर पडतिल त्याचे जॉब मार्केट मध्ये अवघड आहे. कदाचित ह्या कारणासाठी पण मुलाना घरी पाठवत असतिल जेणेकरुन ही मुले F1 घेउ शकत नाहीत.
ओहायो , पिट्सबर्ग आणि कॅलीफोर्निया मध्ये स्प्रिंगब्रेक चा आधीच सांगितले होते की स्प्रिंगब्रेक नंतर ऑगस्ट पर्यन्त ऑनलाइन असेल म्हणुन आणि हॉस्टेल रिकामा केला होता. राहायला जागा नसल्याने हॉस्टेल मधली मुल जे विमान मिळेल त्याने भारतात परतले. जी मुले ऑफ कॅपस होती आणि आठवडाभर राहुन जाउ असा विचार केला ती अडकली.
परदेशी मुलांच्या विषयाशी
परदेशी मुलांच्या विषयाशी असंबंधीत पण ऑनलाईन शिक्षण व परिक्षेसंबंधी एक पोस्ट.
माझी मुलगी ऑनलाईन काही विषय शिकवते व तिने भारतात ऑनलाईन शिकवणाऱ्या काही संस्थांच्या वेबसाइट्सवर स्वतःला रजिस्टर केले आहे. त्या संस्थांना कोणी रिक्वेस्ट टाकली की हिलाही नोटिफिकेशन येते. ती सांगत होती की हल्ली काही लोक ऑनलाईन अमुक विषय शिकायचा आहे अशा विषयाची रिक्वेस्ट टाकतात. उघडून पाहिले असता 'माझी अमुक तारखेला ऑनलाईन परीक्षा आहे, मी प्रश्न वाचून दाखवेन, मला उत्तरे सांगा' ही मागणी असते. लोक पैसे देऊन सध्या ही सेवा मागताहेत.
हवाई वाहतूक करणार्या
हवाई वाहतूक करणार्या कंपन्यांची लॉबी असेल का या निर्णयामागे ?
हवाई वाहतूक करणार्या
हवाई वाहतूक करणार्या कंपन्यांची लॉबी असेल का या निर्णयामागे <<< ते नसले तर तात्या आहेच ना? त्याच्या मना काय पण येऊ शकेल
तात्याच्या मनात काय असते
तात्याच्या मनात काय असते त्याला काय लॉजिक नसतं. आज बातमी होती की तात्या ने सांगितलेय ते किविड बिविड आमाला माहित नाय, शाळा सप्टेंबरात उघडल्या नाहीत तर फंडींग काढून घेईन!
ज्यांना कोविड होईल त्यांनी
ज्यांना कोविड होईल त्यांनी व्हाईट हाऊसात या क्वारंटाईन व्हायला.
इतका सावळा गोंधळ आहे की
इतका सावळा गोंधळ आहे की युरोपला मार्च मध्ये ट्रॅव्हल बॅन केला तो तिथे परिस्थिती सुधारली तरी अजून कायम आहे.
आणि इंडियात localised outbreaks सुरू आहेत तरी इंडियावर बॅन नाही. प्लेनं भरून पेरेंटं येतायत!
युरोपने अंतर्गत, कॅनडा,
युरोपने अंतर्गत, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड इ. वरचा बॅन उठवला पण अमेरिकेचा नाही. सो अमेरिकन प्लेन युरोपला जाऊ शकत नाहीत, आणि युरोपिअन प्लेन अमेरिकेत आली तर परत जाऊ शकणार नाहीत.
बाकी युरोप वरुन (जिकडे करोना कंट्रोल मध्ये आलाय) कशाला कोण येईल?
अफवा पसरवू नका, कृपया
अफवा पसरवू नका, कृपया
Press Trust of India
@PTI_News
India has not yet reached community transmission stage of COVID-19; there have been some localised outbreaks: Health Ministry
4:42 PM · Jul 9, 2020·PTI_Tweets
धन्यवाद भरत, एडिट केलंय.
धन्यवाद भरत, एडिट केलंय.
अमितव, युरोप ते अमेरिका विमानं सुरू आहेत पण फक्त अमेरिकन नागरिकांसाठी आहेत. एखादा ब्रिटिश सिटीझन असेल तर नाही ट्रॅव्हल करू शकत. आणि असे लोक आहेत ज्यांचे कुटूंबीय/प्रियकर/प्रेयसी अमेरिकेत आहेत पण ट्रॅव्हल नाही करू शकत.
आता याचं उत्तर म्हणून युरोपने अमेरिकेला बॅन करायची तयारी केलीय. वर ते लोक चिन्यांना मात्र येऊ देणार आहेत!
आणि तात्या रशिया व भारत या दोन देशात कितीही केसेस वाढल्या तरी बॅन घालत नाहीये. युरोपचा बॅन काढत पण नाहीये. थोडक्यात, त्याच्या कोणत्याच ट्रॅव्हल बॅनला काही लॉजिक नाही. मग युरोप असो स्टुडन्ट असो एच वन असो.
Government Rescinds Plan to
Government Rescinds Plan to Strip Visas From Foreign Students in Online Classes
शाब्बास तात्या!
शाब्बास तात्या!
केला का बदल? १९ राज्यांनी
केला का बदल? १९ राज्यांनी कोर्ट गाठले होते म्हणे.
जे विद्यार्थी सुरुवातीपासून
जे विद्यार्थी सुरुवातीपासून ऑनलाईन शिकत होते आणि तरीही विद्यार्थी व्हिसा मिळवत होते ते व्हिसा रद्द करण्याबाबत काही म्हणणे नाही.
पण कोरोनाच्या उद्रेकामुळे प्रत्यक्ष संपर्क टळावा या अपरिहार्यतेतुन जर मर्यादित काळापुरते वर्ग ऑनलाईन भरत असतील तर अशा प्रतिबंधक उपायाकरिता व्हिसा रद्द करणं योग्य नव्हतं...
ठीक आहे.. देर आये दुरुस्त आये..
नशीब, निर्णय बदलला.
नशीब, निर्णय बदलला.
Pages