पारीसाठी:
२ कप मैदा
१/४ कप कणिक
१/३ कप तेल (कडकडीत तापवून, मोहन म्हणून)
मीठ, चवीनुसार
सारणासाठी:
१ कप मूग डाळ (पिवळी, साल विरहित)
१०-१२ तिखट हिरव्या मिरच्या
१-१/२ इंच आलं
१०-१२ पाकळ्या लसणाच्या
बचकाभर कोथिंबीर
२ छोटे चमचे बडीशोप
१ छोटा चमचा हळद
२ छोटे चमचे धणेपूड
अर्धा चमचा हिंग
चवीनुसार मीठ
चवीनुसार लिंबू रस
परतण्यासाठी तेल
--
तळण्यासाठी तेल - लागेल तितकं
पाकृ पोस्टस् मध्ये नमनाला घडाभर तेल हल्ली 'मस्ट' असल्यामुळे मी त्याला अपवाद असू इच्छित नाही!
तर, माझा जन्म मुंबईत झाला पण मी मूळची खानदेशी. जळगाव जिल्ह्यातल्या एका खेड्यात (आमचं मूळ गांव!) माझं ऑल्मोस्ट सगळंच बालपण गेलं. हॉटेल म्हणावं असं एकच काय ते छोटसं खोपट आमच्या गावाच्या मेन चौकात होतं. आणि बाहेरचं खाणं हे फक्त मुंबईला, उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे गेल्यावरच असायचं. मात्र विदर्भ एक्सप्रेसने घरी परत येताना नांदुरा स्टेशनवर शेगाव कचोरी ठरलेली असायची. (शेगांवपासून दोन-तीन स्टेशन सोडून नांदुरा आहे आणि आमच्या गावात जाण्यासाठी सगळ्यात जवळचं रेल्वेस्थानक ही हेच.)
आमचं खेडं हे अगदीच खेडं असल्याने खाऊ सदृश सगळ्याच गोष्टी घरातच केल्या जायच्या. माझ्या आठवणीत पाणीपुरीच्या पुरीसाठी लोखंडी खलात लोखंडी बत्त्याने राव मैदा कुटतानाच्या आई आणि आजीची इमेज अजूनही ताजी आहे. पण मोप सुगरण असल्या तरी हॉटेलची चव काही दोघींना गावली नव्हती. त्यामुळे कचोरी कितीही आवडत असली, तरी ती खाण्याचा योग लिमिटेड असायचा. (आणि हो, आमच्याकडे कचोरी बेसनाची आणि बटाट्याची आणि कांद्याची नसते बरं का! मुगडाळीची असते, पचायला हलकी वगैरे!)
पण मग काही वर्षांनी आमच्या घरात एक भाडेकरू आला आणि योगायोग असा की तो ह्या हॉटेलमध्ये आचारी होता. अतिउत्साही असणाऱ्या आई आणि आजीला आयतीच संधी चालून आलेली. त्या दोघींनी ह्याला पकडलं आणि त्याच्याकडून हॉटेलवाली काचोरीची रेसिपी शिकून घेतली.
माझ्या उष्टावणापासूनच माझं खाण्यावरचं प्रेम मी जाहीर केल्याने मला ही रेसिपी आंदणात मिळाली, हे वेगळं सांगायला नकोच!
हुश्श! झालं घडाभर तेल वापरुन. हे तेल लागणाऱ्या जिन्नसात धरलेलं नाही बरं का!
--
कृती:
सर्वप्रथम मुगाची डाळ धुवून दोन एक तास तरी भिजत घालावी. (हा वेळ लागणाऱ्या वेळात धरलेला नाही.)
डाळ भिजतीय तोवर आपण बाकी तयारी करून घेतली तरी चालेल, पण तसं mandatory नाही.
सगळ्यात आधी पारीसाठी मैदा भिजवून घेऊयात. मैदा, कणिक, मीठ एकत्र करून त्यात मोहन घाला. तेल खूप कढत असेल तर हात जळू शकतो (माझ्या भाजला आहे!) त्यामुळे ती काळजी ज्याने त्याने आपापली घ्यावी. तेल घातल्यानंतर पण्याशिवायच मैदा नीट मळून घ्यावं, तेल नीट सगळीकडे लागलं पाहिजे, पीठ मुठीत घट्ट धरलं तर तसंच मुठीचा आकार धरून ठेवेल इतकं. ह्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून मळून घ्या. पारीची कणिक सारण भरल्यावर सहज पसरवता येईल, इतपत सैल ठेवायची आहे. सारणाची तयारी होईपर्यंत कणिक मुरू द्यावी.
आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि बडीशोप खलबत्त्यात घेऊन छान बारीक खलून घ्यावं. शोप थोडी भरड राहिली तरी चालतं. मात्र, आल्याचे तुकडे घासात आल्याने जर डोक्यात संतापाची तिडिक जात असेल, तर ते लक्षपूर्वक बारीक करावं. मिक्सर वापरण्याला माझ्या विरोध नाही, पण खलबत्त्यात खललेल्याची चव मिक्सर मध्ये येत नाही म्हणून हा आग्रह.
तर, हे वाटण नीट काढून बाजूला ठेवून द्यावं.
डाळ भिजल्यानंतर ती मिक्सर मधून blitz करून घ्यावी. म्हणजे, भरड वाटून घ्यावी. आपल्याला मूग डाळीची पेस्ट नको आहे, हे लक्षात असू द्यावं आणि मिक्सरच्या तलवार बेभान न होता सजगपणे फक्त भरड वाटावं.
एक कढईत परतण्यासाठीचं तेल घेऊन ते तापलं की त्यात आलं लसूण इत्यादीचं वाटण घालावं, ठसका लागू शकतो त्यामुळे वेळीच exhaust fan सुरू करावा. त्यात हिंग, हळद आणि धणेपूड घालावी, आणि मग भरड वाटलेली मूग डाळ घालावी. (हे सारण चवीला थोडं स्ट्रॉंग असणं अपेक्षित आहे, त्यानुसार वाटलं तर वाटण वाढवावं.) सगळं मिश्रण कोरडं होईपर्यंत नीट परतून घ्यावं आणि मग ते गार होईपर्यंत आपण वरमानेनी टाइमपास करावा. गार झाल्यावर लिंबाचा रस घालून नीट एकत्र करून घ्यावं.
साधारण १०-१५ मिनिटात सारण वापरण्याइतकं गार होतं, त्यामुळे आता भराभर कचोऱ्या करायला घ्याव्या.
पुरीसाठी घेतो त्याहून किंचित मोठा गोल घेऊन थोडा लाटून घ्यावा, मग त्यात अजिबात कंजूसपणा न करता सारण भरावे, गोळा नीट बंद करून नीट, हलक्या हाताने लाटून घ्यावा आणि कडकडीत तापलेल्या तेलात सोडावा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर टाळून घ्यावा आणि नंतर टिशू पेपरवर काढून घ्यावा.
ह्याच पद्धतीने होतील तेवढ्या कचोऱ्या कराव्यात. (साधारण १५-२० होतात!)
आवडत असल्यास बरोबर तळून मीठ लावलेल्या मिरच्या, केचप, चिंगु चटणी ह्यातलं काहीही घ्यावं.
१. आधाशीपाणे खाऊ नका.
२. मध्ये मध्ये वाट बघण्याचा वेळ ह्यात धरलेला नाही.
३. कचोऱ्या टंब फुगल्या नाहीत तर चिडू नका, ह्या थोड्या फ्लॅटच असतात.
४. तळणाऱ्याने करत असतानाच खाऊन घ्या, नंतर मिळण्याची काही एक खात्री नाही.
रेसिपी लिखाण फार आवडलंय.
रेसिपी लिखाण फार आवडलंय. रेसिपी पण मस्त आहे. आता झोमॅटोवरून मागवाव्या लागतील.
रेसिपी लिखाण फार आवडलंय.
रेसिपी लिखाण फार आवडलंय. रेसिपी पण मस्त आहे. आता झोमॅटोवरून मागवाव्या लागतील. >>>>> मामी, पत्ता पाठवा, पाठवून देते, कशाला मेल त्या झोम्याटोच्या डोंबलावर पैसे टाकायचे?
पण आचाऱ्याने टिशू पेपर वापरले
पण आचाऱ्याने टिशू पेपर वापरले नसतील.
-------------
उत्साहवर्धक पाकृ कारण आताच पाऊस सुरू झाला आहे आणि काहीतरी खमंग खायचे आहे.
आज केली. झकास झाली.
आज केली. झकास झाली.
रेसिपी मस्त.
रेसिपी मस्त.
शेगावची कचोरी मी शेगाव स्टेशन वर खूप लहान असताना खाल्ली होती त्यामुळे आतील सारणात काय भरले होते ते आठवत नाही पण आमच्या ठाण्यात जी शेगाव कचोरी मिळते त्यात मात्र बेसन असते. मध्यंतरी मी अंदाजाने बेसन वापरून बनविली होती तेव्हा सेम इथे मिळणाऱ्या कचोरी सारखी लागत होती.
आता मुगाच्या डाळीची करून बघेन.
आज इतका पाऊस पडतोय .
आज इतका पाऊस पडतोय .
उशिरा लक्षात आले , कचोरी करायला हवी होती .
आता परत कधीतरी
ही आमची.....
ही आमची.....
आता परत कधीतरी Happy
आता परत कधीतरी Happy
- म्हणजे काय? पाऊस लगेच जाणार नाहीये. चार महिने आहे.
(No subject)
Hi mi mage keli hoti.besan
Hi mi mage keli hoti.besan takun.baki masala toch hota.sunder lagte.
इतकं छान वाटतंय, प्रतिसाद आणि
इतकं छान वाटतंय, प्रतिसाद आणि केलेल्या कचोऱ्या बघून!
करा, खा, मजेत रहा!
उष्टावण छान लिहिलंय. फोटो पण
उष्टावण छान लिहिलंय. फोटो पण यम्मी दिसत आहेत.
कुठलं गाव तुमचं?
माझ्या कचोऱ्या
माझ्या कचोऱ्या
कसले अफलातून फोटोज आहेत
कसले अफलातून फोटोज आहेत
मी रविवारी केल्या होत्या. छान
मी रविवारी केल्या होत्या. छान झाल्या.
मी लिंबुरसाऐवजी आमचूर घातले. व सारणात थोडे बेसन घातले होते.
उष्टावण Happy छान लिहिलंय.
उष्टावण Happy छान लिहिलंय. फोटो पण यम्मी दिसत आहेत.
कुठलं गाव तुमचं?
धन्यवाद!
माझं गांव वढोडा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव !
सगळ्यांच्याच कचोऱ्या कमाल
सगळ्यांच्याच कचोऱ्या कमाल दिसतायत!
(No subject)
ही मी बनवलेली, घरातल्यांना खुप आवडली. कव्हर मस्त्पैकी फ्लपी नी पापुद्रेदार झालं होत. फक्त एकच की मीठ जरा जास्त झालं होत. पण पहिल्याच प्रयोगात अस बनणं म्हणजे........
फोटोसाठी सजावटीला वेळ दिला नाही :((
रच्याकने मी बी खान्देशी
आज शेवटी केली शेगाव कचोरी.
आज शेवटी केली शेगाव कचोरी. गरम गरम छानच लागल्या. पण थंड सुद्धा अतिशय मस्त लागतात.
आजच करून पाहिल्या. आवरण अतिशय
आजच करून पाहिल्या. आवरण अतिशय खुसखुशीत झालं होतं. घरचा अंदाज घेऊन मी मिरच्या फारच कमी टाकल्या म्हणून तिखट नाही झाल्या एवढ्या. पण चव मस्त.
झकास रेसिपी.
झकास रेसिपी.
हुरूप आला की करून बघण्यात येईल.
मी पण करून बघितली . बेसन
मी पण करून बघितली . बेसन घालून चव शेगाव च्या कचोरी जवळ जाते असे वाटले. पण तळून झाल्यावर काही वेळाने मऊ पडली . नुसता मैदा घ्यायला हवा होता का ?
एकेक फोटो सॉलिड आहेत, शेगाव
एकेक फोटो सॉलिड आहेत, शेगाव नाही पण खस्ता कचोरी रेडीमेड आणलेली खात खात बघतेय म्हणून बरं नाहीतर भूक लागली असती.
मी एअर फ्रायर मध्ये आज ह्या
मी एअर फ्रायर मध्ये आज ह्या रेसिपीने कचोर्या केल्या मस्त झाल्या. २-३ कचोर्या सोडल्या तर बाकी मस्त फुगल्या.
पुढ्च्या बॅच मध्ये मस्त सोनेरी रंगाच्या झाल्या होत्या पण पटापट गरम गरम सगळ्यांनी खायला घेतल्या त्यामुळे हा पहिला प्रयोगाचाच फोटो देतेय.
रेसिपीबद्दल धन्यवाद.
वाह अनुश्री,तोपासू
वाह अनुश्री,तोपासू
मस्त अनुश्री.
मस्त अनुश्री.
एअर फ्रायर घेणार होतो, पण बजेट कोलमडले.
कुणी गिफ्ट देतंय का वाट पाहतोय
अनुश्री भारी एकदम.
अनुश्री भारी एकदम.
Pages