पाताल लोक

Submitted by सान्वी on 28 May, 2020 - 06:05

नमस्कार,
आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आधीच ही सीरिज पहिली असेल, किंवा काहीजण आत्ता पाहत आहेत. सर्व कलाकारांचे दमदार अभिनय आणि वेगवान कथा ह्या बलस्थानांमुळे मलाही ही सीरिज प्रचंड आवडली. या धाग्यावर स्पोईलर सकट चर्चा करायला नक्की आवडेल मला, म्हणून हा वेगळा धागाप्रपंच...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मलाही तो रोझ -रघूचा सीन नीट समजला नाही.
तो वाजंत्री वाजवत असतो...ते बहुदा दिल्लीत असावे. लोक दिल्लीतील दिसतात. म्हणजे आधीची गोष्ट.
तिथे त्याला रोझ दिसते. पण ती जखमी अवस्थेत का असते?
आणि वाजंत्री -मिरवणूक जास्त असताना अगदी बाजूलाच निर्मनुष्य रस्ता आणि त्यावर एक असहाय्य तरुणी असताना, तिला कुणीच मदत करत नाही हेही पटत नाही.

माधव यांनी (तिकडे) लिहिलेले बरेचसे पटण्यासारखे आहे पण ते आता नंतर जाणवते. सिरीज बघताना आपण गुंग होऊन जातो. तो स्नायपर इतक्या लोकांना का मारत सुटला आहे मला जरा प्रश्न पडत होता पण सिरीज वेगाने पुढे निघून जाते. हाथी राम काहीतरी धडाकेबाज करतो आणि आपण हे आधीचे विसरून जातो.

मला प्रत्यक्ष बघताना जाणवलेले एकच म्हणजे हाथीरामला बघेल तिकडे सहज क्लू सापडत असतात. Seemed a little too easy. पण वरच्यासारखेच, सिरीज विचार करू देत नाही.

पाताळलोक २ ही एकदम भन्नाट... काही पात्रे (नावे नाही लिहीत) मारले जातात तेव्हा फार वाईट वाटले. जयदीप अहलावत तर भुमिका जगला आहे. कुठेही तो अभिनय करतोय असे वाटले नाही इतके सहजपणे वावरला आहे. काही छोट्या छोट्या प्रसंगातून इतरांनीही त्यांच्या त्यांच्या भुमिका चांगल्या वठवल्या आहेत. दिग्दर्शन उच्च लेवलचे होते. उदा: शेवटच्या सिन मध्ये ५ लाख रुपये हाथिराम गुड्डूच्या आजोबांना देतो व गुड्डूच्या डोक्यावर हात ठेवतो. त्यावेळी गुड्डू हलकेच स्माईल देतो. ते फार छान चित्रित झाले आहे. नंतर आजोबा ५ लाख रुपये पहातात व गुड्डूकडे प्रश्नार्थक चेहर्‍याने पहातात. त्यावेळी गुड्डू दोन्ही डोळे हलकेच मिटून ठेऊन घ्या असे दर्शवतो. इतक्या लहान मुलाकडून कसे काय असा अभिनय करवून घेतला असेल?

त्या रघू पासवानला नागालँड मधे शेवटी रोजला वाचवताना का दाखवले आहे ? तो तर आधीच मेलेला असतो ना ? कि तो सीन म्हणजे रोजचा भ्रम होता ?मग कारमधल्या त्या तिघांना तो कसा काय दिसला ?
हे केव्हा दाखवले ? कुठल्या एपिसोडला ? शेवटच्या एपिसोडमध्ये असे काही दिसले नाही. उलट रोज हॉस्पिटलमध्ये गेली असे थॉमसन हाथिरामला सांगतो असे दाखवले आहे. रघू पासवान व रोज एकत्र असे फ्लॅशबॅकमध्ये किंवा सिसिटीव्ही फुटेजमध्येच दाखवले आहेत. नागालॅड्मध्ये कुठल्या तिघांना तो कारमध्ये दिसतो? कुठल्या एपिसोडला?

त्या रघू पासवानला नागालँड मधे शेवटी रोजला वाचवताना का दाखवले आहे ? तो तर आधीच मेलेला असतो ना ? कि तो सीन म्हणजे रोजचा भ्रम होता ?मग कारमधल्या त्या तिघांना तो कसा काय दिसला ?>>> हा दिल्लितला सीन आहे..फ्लॅशबॅक...मधे मधे येणार्‍या फ्लॅशबॅकने माझाही सभ्रम झाला होता...

बरोबर... प्राजक्ता...!! तो तर दिल्लीतला सिन आहे फ्लॅशबॅकमधला. कदाचित तो सिन म्हणजे रघू व रोजची पहिली भेट असावी. त्या मदतीमुळे रोजने रघूला नंतर चांगले पैसे मिळावेत म्हणून ध्रुव व जोगीकडे पाठवले असावे.

मला प्रत्यक्ष बघताना जाणवलेले एकच म्हणजे हाथीरामला बघेल तिकडे सहज क्लू सापडत असतात. Seemed a little too easy. पण वरच्यासारखेच, सिरीज विचार करू देत नाही.
तसे नाही. हाथिरामची एकदम तीक्ष्ण नजर आणि लोकांचे निरीक्षण करण्याची सवय + "हाथी जैसी याददाश".... यामुळे त्याला लवकर क्लू सापडतात. उदाहरण द्यायचे म्हणजे रेड्डीच्या बायकोचे डील चालू असताना त्याने रघू पासवान विषयी विचारलेले प्रश्न व त्यामुळे तिच्या मॅनेजरची झालेली चलबिचल हे तो क्षणार्धात टिपतो. तसेच शेवटी त्याच्या घरच्या सिनमध्ये रिक्षावाला त्याच्या घरी असतो. रघूची आई रघूविषयी विचारते त्यावेळी रिक्षावाल्याची झालेली चलबिचल. नंतर तो रिक्षावाला कुछ पता चला ? असे काहीतरी विचारतो त्यावेळी त्याचे हावभाव .. ह्यामुळे हाथिरामला क्लू मिळत असावेत. (नाहीतर तो कशाला परत फुटेज तपासून रिक्षा त्या फुटेजमध्ये आहे हे शोधून काढतो?)

मला तर असं वाटलं की ती रिक्षा त्याने पहिल्यांदा पाहिलेली असते फुटेज मध्ये पण जास्त महत्त्व दिलं नाही त्या गोष्टीला.

नंतर, रिक्षाच्या मागे लिहिलेलं वाक्य आणि हाथी जैसी याददाश्त,
मग पुन्हा फुटेज पाहतो

मस्त चर्चा. मला आता पाताल लोक सीजन १ बघाविशी वाटू लागली. हाथोड्याने डोकं फोडंण म्हणजे फारच रक्तपात हिंसा बघवत नसल्याने पुढे केला होता बराच भाग.. मिर्झापूर सारखं..

Pages