प्रेरणा: https://www.maayboli.com/node/74700 (अजय चव्हाण)
समीप तंबाखूत माझ्या चुना होऊन जा..
तुझ्याविना अपूर्ण इडा माझा, पूर्ण तू होऊन जा..
संपलेली गायछाप माझी, थोडी तुझी देऊन जा..
नाही जमलं तुला तर, चूनापुडी सोडून जा..
कधी एकाएकी तलफ आली, तर हातावर हात मारून जा...
नसलीस चघळणार तरीही, बारीक नाकाने ओढून जा..
सकाळी सकाळी कधी आडवेळी, कामाला मात्र ठेवून जा..
गायछाप पळवताना माझे हाल, कळा, अश्रू, आठवून जा..
पत्र्याच्या डबल डबी मध्ये थोडासा माल भरून जा..
मागच्या डबीतला चुनाही सुकलाय, थोडं पाणी टाकून जा..
लॉकडाऊनमध्ये ही पुडी जपतोय, थोडी तलफ सोसून जा..
(इडा भेटणार नाही म्हणून) गावाच्या ह्या नदीकाठी प्रयत्न निष्फळ करून जा...
शब्दार्थ: इडा- विडा.. गावच्या भाषेत चुना मिसळून थोपटून वगैरे खाण्यासाठी तयार केलेली तंबाखूची चिमूट.
बारीक नाकाने ओढून जा: विड्याची चिमूट उचलल्यावर हातात उरणारी तंबाखूची बारीक पूड, जी शिंका आणण्यासाठी नाकाने ओढतात.
तंबाखु हा माझा नावडता विषय!
तंबाखु हा माझा नावडता विषय! त्यामुळे कविता वाचली नाही. माझा पास!
ग्रेट !
ग्रेट !
परत विडंबन तुमचं स्वतःचं
परत विडंबन तुमचं स्वतःचं स्वतंत्र लिखाण वाचायचं आहे.
Mnya नावडत्या विषयाला नेहमी
Mnya नावडत्या विषयाला नेहमी पास करता का? अस करू नका
पाटील खतरनाक. हातावर उरणारी तंबाखू ओढतात नाकाने ही नविन माहीती. म्हणजे तपकिरित तंबाखू असते का?
फक्त निरीक्षणातून आलेले ज्ञान
फक्त निरीक्षणातून आलेले ज्ञान! हो तैमुर, तपकिरीत तंबाखू असते. होस्टेलवर असताना एकदा भरपूर सर्दी झालेली, तेव्हा एका गायछापप्रेमी सिनियरने तशी उरलेली तंबाखू नाकाने ओढायला लावली होती मला.. सटासट ५,७ शिंका आल्या आणि सर्दी गायब!
परत विडंबन Sad तुमचं स्वतःचं
परत विडंबन Sad तुमचं स्वतःचं स्वतंत्र लिखाण वाचायचं आहे.>> जे जमतं ते माणसाने का करू नये? रच्याकने, माझं विडंबनाव्यतिरिक्त असं थोडंफार लिखाण आहे इथे, तुम्ही वाचू शकता.
नावासहित फॉरवर्ड करू शकतो का
नावासहित फॉरवर्ड करू शकतो का ? तंबाखू खाणारे खूप मित्र मैत्रिणी आहेत...
तुम्हाला असं वाटतं नाही का
तुम्हाला असं वाटतं नाही का तुम्ही जरा जास्तच टेकन फाॅर ग्रांटेड घेत आहात..आधीची विडंबन मी स्पोर्टींगली घेतली पण दरवेळेस परवानगी न घेता पोस्ट करणं आणि समोरच्याला गृहीत धरणं चुकीच वाटतं नाही का तुम्हाला?? माझ्या एका धाग्यावर तुम्हीच कमेंट केली होती ना..ठीक आहे जा इतकं का छान लिहतं नाहीस तु.. मी असं म्हणतचं नाहीये की, मी छान लिहतो पण तुम्हाला वाटतं नाही तरी विडंबनासाठी माझाच कंटेन्ट का हवा असतो..
ह्याआधीही परवानगी घेतली नव्हती पण अॅटलीस्ट ओझी कंटेट कुणाचा आहे ह्याचा उल्लेख किंवा लिंक तरी होती...ह्यात असं काहीच नाही..
ह्याचा काय अर्थ निघतो??
कविता सुचणं आणि लिहणं हे महाकठीण काम आणि एका क्षणात तुम्ही त्याचा कचरा करता??
काहीच वाटतं नाही का?? तुम्ही छान लिहू शकता ह्यात नो डाऊट..
लिहा काहीतरी स्वतःच.. जमेल तुम्हाला...
प्रेरणा टाकायची राहिली
प्रेरणा टाकायची राहिली त्याबद्दल क्षमस्व.
https://www.maayboli.com/node/71299 या धाग्याबद्दलचा राग आहे का अजयराव? आज घडलेली कहाणी आणि न सांगितलेली प्रेमकहाणी पुन्हा वाचून काढल्या, कुठेही तुम्ही म्हणता तसं <<माझ्या एका धाग्यावर तुम्हीच कमेंट केली होती ना..ठीक आहे जा इतकं का छान लिहतं नाहीस तु.. >> या आशयाचं काहीही मला आढळून आलं नाही, कृपया लिंक द्याल तर बरे होईल.
अजिंक्यराव, विडंबन जमतं
अजिंक्यराव, विडंबन जमतं तुम्हाला, पण प्रेरणा टाकायला विसरू नका.. तुमचं स्वतंत्र लिखाण देखील आवडलं, त्यावर अधिक भर दिली तर जास्त आनंद होईल, (फक्त अपेक्षा समजा, सूचना नव्हे)
तो धागा उडवला गेलाय .. राग
तो धागा उडवला गेलाय .. राग नाहीये फक्त विडंबन करण्याआधी सांगा तरी किंवा मूळ लेखन कुणाचं आहे हे तरी नमूद करायला हवं असं मला तरी वाटतं.. तुम्ही ते केलं नाही म्हणून थोडं वाईट वाटलं इतकचं आणि पुढे नकाच करू विडंबन माझ्या लिखाणावर..
अशक्य आहे हे अजय, मी कधीच
अशक्य आहे हे अजय, मी कधीच कुणाला नाउमेद केलं नाही, लिखाण आवडलं तर सकारात्मक प्रतिक्रिया देतो, बऱ्याचदा आवडुन सुद्धा लॉग इन केलं नसलं तर तीदेखील द्यायची राहून जाते, पण "तुला लिहिता येत नाही" असे आजवर लिहिलेले नाही.
पाटील कविता आवडली. ओरिजिनल
पाटील कविता आवडली. उत्तम जमली आहे (ओरिजिनल कवितेपेक्षा जास्त असे म्हणणार होतो पण ते जमवणे काही मोठी बाब नाही)
विडंबन केल्यावर ओरिजिनल कवितेचा डायरेक्ट "कचरा" कसा काय होतो? असे वाटणे इथेच प्रॉब्लेम आहे. तुमचे कविता करणे इतरांच्या प्रतिसादाचे इतके बटीक आहे का? आणि कविता सुचणे महाकठीण असेल ...... बरं मग?
आम्ही कोण म्हणून काय पुसता?
आम्ही कोण म्हणून काय पुसता?
आवडली कविता.
कागदी तंबाखु पुडी, नंतर
कागदी तंबाखु पुडी, नंतर आलेली पत्रा डबी, सध्याची प्लास्टिक चुना नळी. एका मळणीत २-४ ईडे बनायचे. तंबाखुच्या समीप आणल्या बद्दल धन्यवाद.
च्रप्स, बिंधास्त करा! नाबू,
च्रप्स, बिंधास्त करा! नाबू, भरत, धन्यवाद.. किशोर, अजूनही त्या डब्या आमच्या मराठवाड्यात, म्हाताऱ्यांच्या चंच्यांतून, बंडीतून आपले अस्तित्व टिकवून आहेत..
एकदम छान कविता!!! क्रिएटिव्ह
एकदम छान कविता!!! क्रिएटिव्ह!!!
मला असं स्वतंत्र तंबाखूचे व्यसन नाहीये पण तंबाखू हा विषय माझा खूप आवडीचा आहे कारण माझ्या भोवताली बरीच मंडळी तंबाखू सेवक आहेत. आणि त्यांचा तंबाखू मॅनेजमेंट बघून मला खूप काही शिकायला मिळालं.
भांडण, वादविवाद झालेल्या
भांडण, वादविवाद झालेल्या व्यक्तीकडे तंबाखू काढ असे म्हणताच भांडण मिटते. भांडणावर गुणकारी औषध.