स्वच्छ केलेले, शेपट्या काढलेले मध्यम आकाराचे श्रिंप/ कोलंबी साधारण अर्धा पाउंड. ( मी कॉस्कोतले फ्रोझन अनकुक्ड श्रिम्प वापरले) , १ अंडे, ३-४ चमचे सोया सॉस, १ वाटी ऑल पर्पज फ्लॉर + कॉर्न स्टार्च मिक्स करून, अर्धी वाटी मेयॉनीज, स्वीट चिली सॉस पाव वाटी, सिराचा सॉस २-३ चमचे, मीठ, मीरपूड, तेल.
सजावटीसाठी भाजलेले तीळ, कांद्याची पात बारीक चिरून.
इथे बर्याच रेस्टॉरन्ट्स मधे डायनामाइट श्रिम्प या नावाची लोकप्रिय डिश आहे. काही ठिकाणी बँग बँग श्रिम्प, फायरक्रॅकर श्रिम्प असंही म्हणातात.
माझ्या मुलांची भारीच फेवरीट डिश त्यात सध्या बराच निवांत वेळही हाताशी असल्यामुळे तशीच रेसिपी घरी बनवण्याचा प्रयत्न केला, जो बर्यापैकी यशस्वी झाला म्हणून इथे देतेय. सोपी आहे ही रेसिपी.
डायनामाइट सॉस -
खरं तर नावावरून वाटला तरी फार तिखट वगैरे नसतो हा सॉस. क्रीमी, चटपटीत, आंबट, तिखट अशी चव असते. तर एका बोल मधे मेयो, स्वीट चिली सॉस, सिराचा सॉस हे नीट मिक्स करून घ्या. झाला सॉस तयार. तो बाजूला ठेवून द्या.
श्रिंप
३० मिनिट हा करण्याचा वेळ दिला असला तरी श्रिंप आधी थोडा वेळ तरी ( १-२ तास) मॅरिनेट केले म्हणजे चव छान मुरते. श्रिम्प फ्रोझन असतील तर थॉ करून घ्या. एका बोल मधे १ अंडे फोडून थोडेसे फेटा. त्यात सोया सॉस आणि २ चिमूट मिरपूड घाला. सोया सॉस असल्यामुळे वेगळ्या मिठाची गरज नाही. लसणाच्या १-२ पाकळ्या किसून घातल्या तरी चालतील - ऑप्शनल. या मिश्रणात श्रिंप घालून तास दोन तास ठेवावे.
एका उथळ भांड्यात किंवा ताटलीत कॉर्न स्टार्च आणि ऑल पर्पज फ्लार चे मिश्रण आणि किंचित मीठ घालून व्यवस्थित हलवून पसरून घ्या.
दुसर्या बाजूला कढईत तेल तापयला ठेवा. श्रिंप मिश्रणातून निथळून काढून दोन्ही बाजूने या कोरड्याच पिठात बुडवून जरासे झटकून मग कढईत सोनेरी रंगावर तळून घ्या. किंवा दोन्ही बाजूने नीट शॅलो फ्राय केले तरी चालतील. तळून झाल्यावर पेपर नॅपकिन वर ठेवले की जास्तीचे तेल निथळून जाईल.
हे तयार श्रिंप ताटलीत हवे तसे अरेन्ज करून वरून त्यावर चमच्याने सॉस एकसारखा ओता. (काही रेसिपीत बोल मधे हे श्रिंप आणि सॉस घालून टॉस करा असे लिहिलेय पण मला पूर्ण ओल्या श्रिंप पेक्षा वरून घातलेले जास्त आवडले.) जास्त स्पायसी आवडत असेल तर थोडा एक्स्ट्रा सिराचा सॉस शिंपडा. भाजलेले तीळ, बारीक चिरलेली कांद्याची पात वरून घातली तर दिसायला छान दिसते आणि चवीत पण भर पडते. हे एक मस्त आणि करायला, खायला सोप्पे असे अॅपटायजर होते.
फ्राय केलेले श्रिंप लगेच घेतले तर मस्त क्रिस्पी असतात पण बराच वेळ ठेवले तर मऊ होऊ शकतात. तळून झाल्यावर क्रिस्पी असतानाच सॉस घालून लगेच सर्व करावे. नाहीतर आधी करून मग आयत्या वेळी सर्व करण्याआधी अवन मधे गरम करून क्रिस्पीनेस टिकेल का बघाय्ला हवे, मी आयत्या वेळीच केले होते त्यामुळे माहित नाही.
सही दिसतायत !!
सही दिसतायत !!
कोस्कोत मिळणारे श्रीम्प धागा काढलेले असतात का? नसल्यास धागे काढत बसायला लागेल ना ? हर माहीत नसल्याने अजून कधी कोस्कोतून श्रीम्प आणले नाहीत.
मस्त रेसिपी आणि तयार डिशचा
मस्त रेसिपी आणि तयार डिशचा फोटो अफलातून!!
मस्त स्टार्टर !
मस्त स्टार्टर !
पग्या, Peeled & Deveined
पग्या, Peeled & Deveined Shrimp असेच मिळतात कॉस्कोत. काहीही करावे लागत नाही. पाकिट फेकले नेमके आता नाहीतर फोटो दाखवला असता. बहुतेक Olivia Frozen Wild Argentinian Shrimp असे लिहिलेले पॅकेट होते.
कोलंबी घेताना Cooked म्हणजे
कोलंबी घेताना Cooked म्हणजे शिजवलेली/उकडलेली शक्यतो घेऊ नये... रबरी होण्याची शक्यता असते..
भारी आहे रेसिपी. ब्रोकोली
भारी आहे रेसिपी. ब्रोकोली किंवा कॉलीफ्लावरची करून बघणार.
परदेसाई, करेक्ट, श्रिम्प
परदेसाई, करेक्ट, श्रिम्प अनकुक्ड च घ्यायचे आहेत. कॉलिफ्लावर ची कल्पना भारी आहे! मला पण करून पहावेसे वाटतायत
भारी दिसतायत. रेसिपी यो.जा.
भारी दिसतायत. रेसिपी यो.जा. पोचवणेत येईल.
स्वीट चिली सॉस कुठल्या ब्रॅन्डचा वापरला?
कॉलीफ्लॉवरची आयडिया चांगली आहे - मी ब्याडवर्डबद्दल विचारणारच होते.
आमची फेव रेसिपी. कॉलीफ्लॉवर
आमची फेव रेसिपी. कॉलीफ्लॉवर जर स्प्राऊट मधे मिळणारा ऑरेंज वाला वापरला तर बर्यापैकी बँग बँग श्रिम्प्स ची टेस्ट वाटते.
माझ्याकडे हा सॉस आहे: बहुतेक
माझ्याकडे हा सॉस आहे: बहुतेक मॅगीचाही चालेल.
असाम्या, ऑरेंज वाला? म्हणजे कोणता ?
ओके, बघते. धन्यवाद.
ओके, बघते. धन्यवाद.
भारी रेसिपी !
भारी रेसिपी !
ऑरेंज रंगाचा असतो बघ.
लाईट ऑरेंज रंगाचा असतो बघ. त्याची चव नि टेक्शचर वेगळे लागते नेहमीच्या पेक्षा.
३-४ वर्षापूर्वी हे प्रकरण
३-४ वर्षापूर्वी हे प्रकरण पहिल्यांदा भारतात मेनलँड चायना मध्ये खाल्लं. लेकाला भलतंच आवडलं म्हणून आम्ही पण घरी प्रयोग केलेले. सोप्पं आहे करायला...मस्त लागतात. हा आमचा (म्हणजे आम्ही केलेल्या डाश्रिंचा!) फोटो.
फोटो भारि रायगड !
फोटो भारि रायगड !
डायनामाइट श्रिम्प खालल्ीय का
डायनामाइट श्रिम्प खालल्ीय का आठवत नाही. घरात सध्या टाकोबिको जमवले जातात त्यात या श्रिम्प्स जातील असं वाटतंय. योग्य व्यक्तीकडे पाठवते रेसिपी. या मिमित्ताने काॅस्टको वाइल्ड श्रिम्प्स ठेवतात हे पण कळलंं शोधते.
असामीने आणलेला साॅस कुठून घेतला? शंभर दुकानं नाही करत शक्यतो पण नंतर तरी पाहता येईल.
वरचा फायनल फोटो आणि रायगडचा फोटो साॅलिड टेंम्प्टिंग आहे.
रायगड, भारी दिसतायत.
रायगड, भारी दिसतायत. सर्व्हिंग आयडिया छान आहे!
असामी सॉस बद्दल नाही, कॉलिफ्लावर बद्दल बोलत होता.
ऑह तुझा फोटो आहे आता पाहिलं.
ऑह तुझा फोटो आहे आता पाहिलं. कुट्।ऊन घेतलास?