सीन ०:
{टीप: थर्मोडायनॅमिक्सच्या लॉ सारखंच १नंबर आधीच लिहिला होता, म्हणून या सीन ला ० नंबर दिलंय....}
मी मस्त इडली सांबार खात विचार करतोय.
{फ्लॅशबॅक सुरू....}
सीन १:
साधारण चारेक महिन्यांपूर्वीची गोष्ट.
नुकत्याच सुरू झालेल्या कट्ट्यावर स्वा, चिमण आणि मी जुनी गाणी वगैरे गप्पा करत असतानाचा संवाद-
स्वा- अँ आणि चिमण, लीड्स ला या ना एकदा, मस्त मेहेफिल करू.
चि- स्वा, बरी आहेस ना, नुकतीच ओळख झालिये, डायरेक्ट घरी बोलवायची रिस्क घेतेयस, खरंच आलो म्हणजे.
स्वा- अरे खरंच या, धमाल करू.
अँ- मी नक्की येईन, फक्त कधी ते नाही सांगत, वेळ मिळाला की नक्की, ईस्टर ब्रेक वगैरे कधीतरी.
चि- अँ, तू ये जाऊन आधी. (सहीसलामत आलास तर विचार करू... :फिदी:)
सीन २:
कट टू मार्च अखेर.
आता तीनेक महिन्याच्या रोजच्या संवादामुळे ओळख वाढलिये. मला स्वा चा फोन येतो. ईस्टरला दोघांनाही शक्य नसल्यानी ईस्टर ऐवजी मी वीकेंड ट्रिप करायची असं आम्ही ठरंवतो. टेंटेटिव्हली २५-२६ चा वीकांत नक्की होतो आणि एक दोन दिवसात माझं तिकीट बुक होऊन त्यावर शिक्कामोर्तबही होतं.
सीन ३:
मी जायच्या सातेक दिवस आधी.
मला स्वा ची मेल- 'तुला सांगायचं होतं, श्रीनी (श्रीयुत स्वा) अतिशय गंभीर प्रवृत्तीचा आहे. त्याला जास्त टीपी करणं पसंत नाही आणि त्याला मराठी येत नसल्यानी आपल्याला हिंदी/इंग्लिश मधेच बोलावं लागेल.'
अनपेक्षित आलेल्या बाऊंसर मुळे मी गोंधळलेल्या अवस्थेत. पण तरीपण स्वतःवर विश्वास. स्वतःलाच म्हणालो 'मैं हूं ना!' आणि स्वा ला रीप्लाय केला- 'ओक्के, कर लेंगे मॅनेज.'
यावर लगेच तिची मेल- 'काहीही झालं तरी येणं कँसल करू नको.'
माझं धतिंग- 'नो वे, आखिर कट्टेकी इज्जत का सवाल है.'
सीन ४:
२४ च्या दुपारी कट्ट्यावर.
स्वा- अँ तू कधी पोचणार?
अँ- साधारण ७.३०
स्वा- ओके, श्रीनी येईल तुला न्यायला, त्यानी पाहिलाय तुझा फोटो. तो सहा फूट उंच आहे. घरी आलास की भेटूच आपण. (इथे मला परंत थोडंसं टेंशन त्यातच पुढची पोस्ट.)
मल्ली- सहा फूट उंच>>> नक्की मार खातंय अँकी... (पुढचं न वाचता मी आवरायला पळालो, अनिल कपूर ष्टाईल असणारे कल्ले एकदम छोटे करून मस्त गुळगुळीत दाढी केली. पहिल्यांदाच भेटणारे, इंप्रेशन बरं पडलं पाहिजे ना राव.)
सीन ५:
बस मधे शेजारी चक्क मरठी मुलगा. गप्पा मारता मारता, मी प्रत्यक्ष न भेटलेल्या मैत्रिणीच्या घरी केवळ ऑनलाईन ओळखीवर चाललोय हे कळल्यावर त्यानी वासलेला आ पाहून मला परत माबो विषयी अभिमान आणि भेटीबद्दल टेंशन असं मिश्र फीलिंग. तेवढ्यात स्वा चा फोन की ती पण येतिये घ्यायला. थोडा रिलीफ.
सीन ६:
हाय हॅलो होऊन स्वाच्या कार नी घरी जाताना मी इंग्लिश बोलतोय आणि अचानक श्रीनी मराठी बोलला. मी चकित, स्वा म्हणे काय हे. कित्ती मस्त प्लॅन केला होता गंडवायचा, पण श्रीनी ला रोल चं बेअरिंगंच घेता आलं नाही. मेरा टेंशन गुल. घरी पोचल्यावर थोडीफार एकमेकांची ओळख झाली आणि कपातल्या कॉफीबरोबरच फॉर्मॅलिटीज पण संपल्या. स्वा कन्या श्रुती नी कॉफी न प्यायल्यानी अजून थोडं आईसब्रेकिंग बाकी होतं. पण ती थोडा वेळ घेते असं स्वा कडून कळलं त्यामुळे एकदम अॅट होम झालो.{श्रीनी, स्वा, श्रुती, अँ}
स्वा नी मस्त रगडा पॅटीस चा बेत केला होता. ती ते बनवत असताना किचनमधे आमच्या गप्प रंगल्या. जनरल गप्पा, माबो, कट्टा असे रूळ बदलंत बदलंत गाडी गाण्यांवर आली. एव्हाना श्रुतीचं जेवण उरकून तिला झोपवून श्रीनी पण आम्हाला जॉईन झाला होता.
गाण्यांना सुरुवात झाली राहत फतेह अली खानच्या नैना ठग लेंगे नी. एक एक गाणी ऐकंत, थोड्या संगीतचोर्यांवरून पडदा हटंवता हटंवता स्वाचं रगडा पॅटीस तयार झालं आणि जेवणाबरोबर मुख्य मेहेफिल सुरू झाली. नव्या गाण्यांनी सुरुवात करून जुन्या गाण्यांकडे जायच्या विचारावर एकमत झालं (कारण जुन्या गाण्यांमधे गेल्यावर नव्या गाण्यांमधे येणं अशक्य आहे हे तिघांनाही मान्य होतं) शंकर महादेवन च्या गाण्यांनी समाँ बांधायला सुरुवात केली आणि हळू हळू मेहेफिलीला रंग चढायला लागला.
मुख्य पोटपूजेनंतर गोड दुधीहलवा खाऊन गाण्यांचा मस्त आस्वाद घेत असताना सरत्या वेळाबरोबर निद्रादेवींनी आपल्या आगमनाची चाहूल द्यायला सुरुवात केली. सकाळाचा यॉर्क दर्शनाचा साधारण प्लॅन ठरवून आम्ही स्वप्नदुनेयेत दाखल होण्यासाठी प्रस्थान ठेवलं. मेगा जीटिजी ची सुरुवात तर मस्त झाली होती.
सीन ७:
सकाळी उठून मस्त सांजा खाऊन आवरून आम्ही यॉर्कला जायला निघालो. श्रीनी च्या मित्रपरिवारापैकी युसुफ त्याच्या परिवाराबरोबर आम्हाला जॉईन झाला. प्रथमदर्शनी युसुफ मस्त जॉली माणूस वाटला. मोबाईलमधली गाणी ऐकत आम्ही यॉर्क ला पोचलो.{अँ, श्रीनी, श्रुती, स्वा, कोमल, फहाद, युसुफ}
युसुफ बरेचदा यॉर्क ला येऊन गेल्यानी माहितगार होता. त्याच्या सांगण्यानुसार कार पार्क करून आम्ही रेल्वे म्यूझियम बघायला गेलो. नीट जतन करून ठेवलेल्या विविध रेल्वे आणि इंजिनं पहायला मला प्रचंड मजा आली.
म्यूझियम बघून झाल्यावर सगळ्यांच्याच पोटात कावळे ओरडायला लागले. त्यांना एका चिनी क्षुधाशांतिगृहात शांत करून आम्ही यॉर्क कॅसल पहायला गेलो. आता मदहोश करणारी शाम सुरू झाली होती. त्यत कॅसल च्या प्रथमदर्शनानी आम्ही आवाक झालो. ये तो टीलेपे किला निकला.
त्या कॅसलपेक्षा शेजारचं कॅसल म्यूझियमच त्याच्यापेक्षा मोठं होतं.
कॅसलकडून कार कडे जाताना तर्र झालेल्या आणि डोक्यात तुरे खोवलेल्या महिलांच्या एका तांड्यानी आमचं मनोरंजन केलं. परत एकदा मोबाईली गाणी ऐकत आम्ही घरी परतलो.
सीन ८:
दिवसभरच्या चालीमुळे थकल्यानी आणि दुपारी जड जेवल्यानी रात्री हलकं खायचा विचार आला आणि माझी मिसळ करण्याच्या जबाबदारीतून मुक्तता झाली. श्रीनी नी बनवलेली झकास व्हेज बिर्यानी, पापड आणि दही खात, टीव्ही बघत, गप्पा मारत दुसरा दिवस संपवला.
सीन ९:
आता श्रुतीशी छन ओळख झाली होती. सकाळी तिच्याशी बॉल खेळत धमाल सुरू झाली. मग कट्टेकर मित्रवर्य पर्याचा फोन आला. त्याच्याशी बोलून, थोड्या टवाळक्या करून एकदम मस्त वाटलं. ब्रेकफास्ट नंतर अ. अ. गाण्यांचा विषय निघाला आणि माबो चा बीबीचं वाचून आणि व्हिडिओ पाहून आमची हहपुवा झाली. त्यातूनच अ. अ. चित्रपटांचा विषय निघाला आणि जन्नत, शर्त आणि फूंक च्या विच्छेदनाचं वाचन झालं.
यात वेळ कसा सरला ते कळलंच नाही. एक वाजत आल्यानी स्वा किचन मधे पळाली आणि मी श्रीनी चा सिंथ वाजवायला लागलो. थोडी गाणी वाजवून घड्याळ पाहिलं तर ते २ वाजल्याचं दाखवंत होतं, ३ ला परतीची बस असल्याची आठवण झाली आणि मी आवरायला पळालो. झटपट पॅकिंग आवरून स्वा नी केलेल्या मस्त इडल्या खाऊन (आणि बरोबरही घेऊन) मी निघालो. 'मामा थांब ना' म्हणणार्या श्रुती ला आणि स्वा-श्रीनी ला परत यायचं आश्वासन देऊन मी बस मधे बसलो.
सीन १०:
घरी पोचलो. स्वा ला फोन करून पोचल्याचं कळवलं. तासभर टबात डुंबुन फ्रेश झालो आणि आता स्वा नी दिलेल्या इडल्या खात विचार करतोय...
{...फ्लॅशबॅक समाप्त}
जुनी विशेष ओळख नसताना पहिल्या भेटीतच इतकी जवळची वाटणारी माणसं भेटवणार्या माबोला धन्स द्यावेत,
की एक अत्यंत सुखद अनुभव दिल्याबद्दल स्वा-श्रीनी-श्रुती चे आभार मानावेत,
की अशी माणसं भेटवण्याला पूर्वपुण्याई आणि देवाची कृपा समजावी...
या विचारात पूर्ण भंजाळलोय...
काही सुधरंत नाहिये...
फक्त एकच गाणं डोक्यात वाजतंय-
...मदहोश किये जाय!!!
काय स्वा.. काय म्हणतेस...
************ धन्य
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
किरु
किरु

कुठल्याही
कुठल्याही गटग मध्ये आपण असलो की त्याचा मेगा म्हणूनच उल्लेख करायचा
मोठ्ठ अनुमोदन
अॅक्च्यु
अॅक्च्युअली किरु, तुला तिने नानकटाई दिली होती. तू घाईघाईने इडली समजून खाल्लीस.
एकदा आमच्या स्वाने केली होती नानकटाई
तिकडून आला किरु त्याने हळूच पाहिली
इडली इडली म्हणून त्याने सांबारात टाकली..
(हे भगवंता कमलाकांता च्या चालीवर..)
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
अश्विनी,
अश्विनी, नानकटाईच्या नावाने किरूकटाई चाललीये असे दिसतें.
---------------------------------
देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
आशु
आशु
-------------------------------------------------------------------------------
http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अॅड बघा.
Donate Eye - Bring Light to Blind
अशे
अशे
अशे
अशे
-----------------------------------------------------
कोणाची तरी ओढ लागली की ओढाताण होतेच !
अँक्या,
अँक्या, मस्त वृत्तांत. तू खरच सहीसलामत आल्याचं वाचून आनंद जाहला.
>> तेव्हान्चा तो वेगळाच शिडशिडीत (लुकडा वा सुकडा या अर्थाने ) दिसत होता
हल्ली रोज तो मॅकडोनल्ड बालामृत घेतो त्याचे परिणाम.
पण तू फोटोत असा एका बिचार्या कोकरासारखा का दिसतोयस? आधी चांगला डॅशिंग होतास हो. बाकी ६ फुटी माणसाची गरीब गाय करणार्या ५ फुटी स्वाला काय अशक्य आहे म्हणा.
चिमण :फिदि:
चिमण :फिदि:
लोक्स... प्र
लोक्स...
प्रतिसादांबद्दल धन्स...
सर्वांन्ना बेक्कार मिसलं...
तेव्हान्चा तो वेगळाच शिडशिडीत (लुकडा वा सुकडा या अर्थाने ) दिसत होता
>>>
तेंव्हा मी जरा सुदृढ वर्गात होतो... आता रोडावलोय... पण केस वाढवून मी ते लपवण्याचा यशस्वी प्रयत्न करतो...
_______
...मदहोश किये जाय!!!
मस्त
मस्त वृत्तांत..अगदी तिथे हजर असल्यासारखं वाटलं
सुमेधा पुनकर
**************************************
पतंग्यानेच का जावं आगीजवळ ?
ज्योतीला सांग, नमन कर ना एकदा
**************************************
मस्तच !!!!
मस्तच !!!!
मस्त
मस्त लिहीलंय अँकी! आणि 'शर्त' ने तुम्हाला हसवले वाचून मस्त वाटले.
फार छान
फार छान वृत्तांत लिहिला आहे.
अॅड्मिन,
गटग साठी एक वेगळा विभाग उघडुन सगळे गटग वृत्तांत त्यात टाकले तर?
धन्यवाद.
मनोज,
मनोज, चांगली आयडीया आहे
मिस्टर
मिस्टर "मदहोश किये जाय!!!", व्रुत्तान्त खूऊऊऊप क्यूऊऊऊट लिहिलाय्स
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भलेही शहर में मौसम बदलते रहें हो....
बहार तो अब आइ है..
अंक्या
अंक्या वृत्तांत बोले तो एकदम झक्कास!
अँकी,
अँकी, मस्तच रे. बरोबर छायाचित्रेही दिल्याने आणखी मजा आला.
झकास
____________________________________________
मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/
अँकी,
अँकी, भारीच एकदम हं तुम्च मेगा जी टी जी, मस्त लिहिलय्स.अगदी शिर्षका पासुन
पण मला तुझा प्रो तला फोटो बघुन दोन वेगळे अँकी वाटतायत :स्मित:, एक बहुदा पॉप गायक असावा
हे हे हे
हे हे हे हे...
स्मिता... माझे लुक्स सतत बदलंत असतात...
बाकी लोकहो ५० हून अधिक प्रतिसाद दिल्याचे धन्यवाद...
_______
...मदहोश किये जाय!!!
>>पण मला
>>पण मला तुझा प्रो तला फोटो बघुन दोन वेगळे अँकी वाटतायत , एक बहुदा पॉप गायक असावा
अँकी, अपरिचित हा डब्ड चित्रपट किंवा अन्नियन हा तामिळ चित्रपट तुझ्या वरुनच घेतला काय? ...
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...
छान वर्णन
छान वर्णन केलं आहे.. फोटो पण चन आहेत.
-----------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
मस्त मेगा
मस्त मेगा वृत्तांत मामा
*********************
प्रतिकार आणि प्रतिहल्ला यात फरक असतो!
स्वसंरक्षणार्थ असतो तो प्रतिकार अन् दुसर्याला स्वरक्षणाची संधी देतो तो प्रतिहल्ला! 
Pages