हि पाककृती लिहायच्या आधी याबद्दलची थोडी माहिती ...
फलाफल आणि हमस हे दोन्ही काबुली चण्यापासून बनवले जाते .
१९५० च्या सुरवातीच्या काळात Yemeni Jews या लोकांनी फलाफल लोकप्रिय केले . त्यांनी पिटामध्ये (flatbread चा एक प्रकार ) फलाफल घालून विकायला सुरु केले . या सोप्या आणि जलद रेसिपीमुळे, फलाफल Middle ईस्ट मधील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड बनले .
इस्त्रायली फलाफल सामान्यत: पिटामध्ये फलाफल ,हमस आणि ताहिनी (फक्त तिळापासून बनवलेली पेस्ट) भरून सोबत आपल्या आवडीच्या भाज्या भरून सर्व्ह केले जाते. या भाज्यांमध्ये काकडी ,टोमॅटोपासून बनवलेल्या क्लासिक इस्त्रायली कोशिंबीरपासून ते गाजर, कोबी, तळलेले वांगे , आंब्याच्या लोणच्याचे Sauce, Yemeni hot sauce यांचा समावेश असतो.
हमसच्या उत्पत्तीविषयीची खूप जुन्या चर्चा आहेत . यामध्ये ग्रीक लोक स्वतःचा हक्क सांगतात पण अरब लोकही त्यांच्या दाव्यांमध्ये तितकेच ठाम आहेत. अगदी इस्त्रायलींही हाच दावा करतात . पण सत्य काय आहे हे कोणालाही खरोखर निश्चितपणे माहित नाही. ऐतिहासिक माहितीच्या आधारे, हमसची उत्पत्ती प्राचीन इजिप्तमधून झाली असावी. हमसचा सर्वात प्राचीन उल्लेख 13 व्या शतकात इजिप्तचा आहे.
ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये एक डिश दर्शविली जाते, जी आपण आज खात असलेल्या हमससारखेच आहे, जे 13 व्या शतकात कैरोमध्ये खाल्ले जात होते .आता हे हमस मूळचे कोठूनही आहे याची पर्वा न करता, हे एक अतिशय स्वादिष्ट deeping आहे जे केवळ ग्रीक आणि मध्य पूर्वच नव्हे तर जगातील बहुतेक सर्व भागांमध्येही चवीने खाल्ले जाते .
(हि सर्व माहिती अंतरजालावरून साभार !!!!)
चला तर आता वळुया पाककृतीकडे ....
२ कप काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजवा.
(हे प्रमाण हमस आणि फलाफल दोन्ही साठी मिळून आहे )
हमस -
१/२ कप भिजलेले चणे उकडुन घ्या .
१ वाटी तीळ
१ कप ऑलिव्ह ऑइल
३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या
चवीनुसार मीठ
१ लिंबाचा रस
१ चमचा अतिरिक्त ऑलिव्ह ऑइल
१ चमचा मिरची पावडर
फलाफल -
दीड कप भिजवलेले चणे
१/२ चमचा जिरे
१/२ कप कोथिंबीर
२ हिरवी मिरची
१ मध्यम बारीक चिरलेला कांदा
३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या
चवीनुसार मीठ
१/२ वाटी तांदळाचे पीठ
तळण्यासाठी तेल
हमस कृती - मिक्सर मध्ये उकडलेले चणे (पाणी पूर्णपणे निथळून घ्या) , तीळ ,लसूण, लिंबूरस , मीठ,तेल एकत्र करून एकदम बारीक पेस्ट करा . हे बनवताना तेलाचा सढळ हाताने वापर करा. पाणी आजिबात वापरायचे नाही , लवकर खराब होते . काचेच्या बाटलीत भरून फ्रिज मध्ये ठेवा .६ ते ७ दिवस चांगले राहते. मिक्स सलाड मध्ये सुद्धा छान लागते . खायच्या वेळी वरून १ चमचा ऑलिव्ह ऑइल आणि चिमूटभर मिरची पावडर भुरभुरा . Deeping Ready
फलाफल कृती - भिजवलेले चणे , कोथिंबीर, लसूण, जिरे, मीठ सगळे एकत्र करून थोडेसे जाडसर वाटून घ्या . एका bowlमध्ये हे वाटण घेऊन त्यात चिरलेला कांदा घाला . लागेल तसे तांदळाचे पीठ घालून पॅटी बनेल असे बनवून घ्या .गरम तेलात तळा. खूप मोठ्या आचेवर fry करू नये नाहीतर आतून कच्या राहतात .फलाफल आणि हमस सर्व्ह करण्यास तयार आहे !
वाह छानचं.. मस्त आहे रेसिपि..
वाह छानचं.. मस्त आहे रेसिपि.. protein rich.. can we replace olive oil with other?
मी एकदा खाल्ले
मी एकदा खाल्ले
पण हेही चणे अन तेही चणे हे झेपले नाही
हमस मला खूप आवडतं. मस्त चव
हमस मला खूप आवडतं. मस्त चव येते तोंडाला. नुसत्या हमस बरोवर आख्ख जेवण होऊ शकत माझं इतकं आवडत.
नेहमी रेडिमेड च खाल्लं आहे. आता ह्या रेसिपीने करून पाह्यलं पाहिजे सगळं ओके झालं की.
माझी मैत्रीण , दही घालते आणि
माझी मैत्रीण , दही घालते आणि शिजवलेल्या चण्याची सालं काढते.
मस्तच texture येतं.
सगळ्यांना धन्यवाद !!
सगळ्यांना धन्यवाद !!
@ShitalKrishna ... ऑलिव्ह ऑइल ला दुसरा पर्याय नाही .. हमसला जी चव येते ते त्यामुळेच
@BLACKCAT ... काबुली चणे पचायला तसे जडच ..
@मनीमोहोर ... नेहमी रेडिमेड च खाल्लं आहे +++१ मी पण ... आता घरी बनवते तेव्हापासून बाहेरचे कधीतरी आणलेले पण आवडत नाही
@स्वस्ति .. या पद्धतीने पण करून पाहीन .. काबुली चणे शिजवताना थोडे मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा टाकला कि फारशी साल निघत नाही आणि शिजतात हि मस्त
विकतचे हमस प्रचंड आवडते,
विकतचे हमस प्रचंड आवडते, म्हणुन एकदा घरी उद्योग केला. पण त्याला अबब! ऑलिव्ह ऑईल लागते, नाहीतर creamy texture येतच नाही आणि भरडसर राहते. फलाफलपण बाहेर खाल्लंय, घरी करायला आवडेल. आता करुन बघण्यात येईल.
ग्रीक पद्धतीच्या काकडी,
ग्रीक पद्धतीच्या काकडी, टोमॅटो, कोबी, बाबा गनुश, ग्रीन आणि रेड स्पायसी सॉस इ. बरोबर फलाफल पीटा विथ ताहिनी प्रचंड आवडते. अर्थात यातलं काहीही घरी कधी केलेलं नाही.
परवाच फलाफलचं पीठ आणलंय. आता बाहेरचं हमस संपलं की एकदा घरी करुन बघेन.
रेसिपीसाठी धन्यवाद,
@टयुलिप .. यात पाणी वापरता
@टयुलिप .. यात पाणी वापरता येत नाही त्यामुळे बारीक पेस्ट बनवायला फक्त आणि फक्त ऑईलचा वापर होतो .. मी पहिल्यांदा केलं तेव्हा हेच वाटलेला किती तेल लागतंय !!!
Thank you अमितव
मी हमस नाही करत कधी.
मी हमस नाही करत कधी.
बेक केले फलाफल या वेळी तळण्यापेक्षा. पण तळलेलेच जास्त चांगले लागतात हे कळलंय
ऑऑ एक्स्त्रा व्हर्जिन हव की
ऑऑ एक्स्त्रा व्हर्जिन हव की लाईट चालेल? माझ्याकडे लाइट ऑऑ आहे.
हमस खुप आवडतं.. पण केल नाही
हमस खुप आवडतं.. पण केल नाही कधी.. रेडिमेड खाल्लयंं..
डिश मस्तच..!
मस्त आहे पाकृ
मस्त आहे पाकृ
Hummus prachanda awadta, lock
Hummus prachanda awadta, lock down nantr karun baghte donhi!
@ अंजली_१२ .. मी एअर फ्रायर
@ अंजली_१२ .. मी एअर फ्रायर मध्ये try केले होते पण मजा नाही आया !!!!
@प्राजक्ता .. मी एक्सट्रा व्हर्जिनच वापरलं आहे पण Light वापरायला हरकत नाही
Thank you Piku , जाई , TI
@ अंजली_१२ .. मी एअर फ्रायर
....