लाल संत्र्यांचे घरगुती मार्मलेड

Submitted by मेधा on 29 March, 2020 - 14:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

२ मध्यम आकाराचे ब्लड ओरेंजेस. नसल्यास वलेन्सिया / नेवल सुद्धा चालतील. सेव्हिए संत्री मिळाल्यास बेस्ट.
१ लेमन
१ कप साखर

क्रमवार पाककृती: 

संत्री आणि लिंबू कोमट पाण्याने स्वच्छ धूऊन, कोरड्या कपड्याने पुसून घ्यावीत.

प्रत्येक संत्र्याचे आणि लिंबाचे दोन उभे तुकडे करावेत. मग प्रत्येक अर्ध्या भागाचे परत दोन तुकडे करावेत. आता प्रत्येक भागाच्या १/८ इंच जाडीच्या चकत्या कराव्यात. ( काही लोक मॅंडोलिन वापरुन बारीक चकत्या करतात. मला संत्रे मँडोलिनवर धरायची काळजी वाटली)
सगळे तुकडे साधारण अडीच ते तीन कप होतील.
जाड बुडाच्या पातेल्यात जितके तुकडे तितकं पाणी घालून मध्यम आचेवर २०-२५ मिनिटे , अधून मधून ढवळत शिजू द्या. संत्र्याचा रस आणि पाणी आटून साली शिजत आल्या की साधारण पाऊण कप साखर घालून नीट ढवळा.
आच वाढवून एक सणसणीत उकळी येऊ द्या. मग आच मंद करून अजून १५-२० मिनिटे शिजू द्या. वरचेवर ढवळत रहा.
साधारण मार्मलेड इतके घट्ट झाले की आच बंद करुन थंड होऊ द्या. स्वच्छ धुतलेल्या , कोरड्या, काचेच्या बाटलीत भरून फ्रीज मधे ठेवा. महिनाभर टिकू शकतो.

वाढणी/प्रमाण: 
खाल त्यावर
अधिक टिपा: 

मार्टिनी करायला म्हणून आणलेली ब्लड ऑरेंजेस घरात होती. ती संपवायला केलेले उद्योग.
मूळ रेसिपीमधे मायर लेमन्स आणि जितक्यास तितकी साखर घालायला सांगितलेलं आहे. आमच्याकडे मायर लेमन्स नव्हते आणि इतकी साखर जास्त होईल असं वाटलं म्हणून कपभरच घातली. त्याची चव घरच्या मेंबरांनी अप्रूव्ह केली आहे.

माहितीचा स्रोत: 
न्यू यॉर्क टाइम्स
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मस्त!
मार्मालेड खूप आवडते. ताज्या ब्रेडवर आपलं लोणी, मार्मालेड लावून स्ट्राँग कॉफीबरोबर ब्र्ह्मानंद टाळी' नाष्टा होतो. करून खाणार!

74776FF4-BBB0-438D-9CD9-2B3CBB8CC294.jpeg

फोटोमधे रंग जास्त गडद वाटतो आहे. गुलाबी दिसतो आहे.

पराग, सालासकट घायचे सगळे सिट्रस . बिया असतील तर त्या काढून टाकायच्या. उद्या सावरडो ब्रेड करणार आहे. मग त्याबरोबर मार्मलेड.

क्वारंटाइनची लफडी संपली की लोण्याचे प्रयोग करणार.

भारी. पूर्वी केलेलं आता परत करून बघेन.
असाच स्ट्रॉबेरी ज्याम करतो. लिंबू रस घातला की एकदम बाहेरच्या
स्प्रेड सारखा घट्ट होतो.

फोटो तर चांगला आहे. रेसिपी पण.

आता एक प्रश्न लिंबाची अलर्जी असेल तर काय वापरावं?

आणि अंजलीला अमेरिकेत “ आपलं लोणी” कुठे मिळतं?

मस्त! मला मार्मालेड असे नुसते म्हटले तरी तोंडाला पाणी सुटते.
>>ताज्या ब्रेडवर आपलं लोणी, मार्मालेड लावून >> स्लर्प!

“ आपलं लोणी” >> आपल्या घरात!
होममेड लोणी. हेवी व्हिपींग क्रीम आणून स्टँड मिक्सरमधे घुसळून लोणी काढता येतं. यूट्यूबवर असंख्य व्हिडीओज आहेत.

आपलं लोणी > मी हेवी व्हिपिंग क्रिमला विरजण लावून आयपीत ठेवते योगर्ट सेटिंगवर. नंतर अंजलीने लिहीलय तसे हँड मिक्सरने घुसळले की अगदी देशात घरी असते त्या चवीचे लोणी!

कुणी डायरेक्ट शेवटची कमेंट वाचली तर तुपातलं मार्मालेड वगैरे आहे का म्हणून परत वर रेसिपी वाचायला जाईल Wink

सध्या आहे तोच गोंधळ बरा आहे म्हणून मी लोणी (आणि माले) आॅप्शनला टाकते. स्टॅंड मिक्सर /इंपाॅ ही लोढणी इतक्यात नकोत.

अजून एक किवे, रेसिपीत एक कप साखर आणि टाकताना पाउण कप. ये सरासर नाइन्साफी है Uhoh

छान रेसीपी. मी परवा अशीच स्ट्रॉबेरी जॅम ची बघितली. करणार होते घरात एक स्ट्रोबेरी पाकीट होते म्हणून. पण त्या नटेलात बुडवून फस्त केल्या. जॅम बाजुलाच राहिला. मार्मलेड मला क्लासीक ऑरेंज च आव डते. ह्याची चव वेगळी असेल ना? कशी आहे साधारण? मार्टीनी तून उरली कशी काय. द नेशन वाटंस टू क्नो. Wink

माझे लोणी अमूल बटर देशका बटर. त्यात सध्याच्या धाम धुमीत प्रेसिडें ट नावाचे प्रिमीअम बटर सुदीक मिळाले ते आणून ठेवले आहे. मस्तच. ब्रेड तेवढा बंद आहे.

वेका Happy
एक दोन इंस्टंट पॉट रेसिपी पण दिसल्या होत्या. पण एकतर माझा न्यू यॉर्क टाइम्स च्या रेसिपींचा अनुभव चांगला आहे आज पर्यंत. आणि इंस्टंट पॉटमधे सॉते मोड वर काही ढवळत रहायचा कंटाळा येतो मला.
स्टँड मिक्सर नाही पण एस शेप ब्लेड वाल्या फूड प्रोसेसर बद्दल प्रश्नोत्तरे होऊ शकतात !

अमा, मार्टिनीत त्या ऑरेंज ज्यूसची आम्हाला दोघांना फारशी आवडली नाही. नुसता ज्यूस आवडतो. सॅलड मधे चकत्या आवडल्या आहेत. पण मार्टिनी डिड नॉट वर्क फॉर अस.

My husband liked James bond movies. James bond prefers vodka martini shaken not stirred .

म्हणून लॉजिक नुसार मी आजकाल स्पेशल दिवस जसे अ‍ॅनिवर्सरी, वाढदिवस ह्या दिवशी. एक मार्टिनी घेते. व दोघांची आठवण काढते. मला

मार्टिनी ओरिजिनल रेसीपेनेच आवडते. इथे एकदा पवईत इंडिजो फाइन डाइन आहे तिथे गेलो होतो क्रिसमस लंच साठी तेव्हा ही कोकम ज्युस वाली मार्टीनी प्यायली होती. ही तर सोलकढीत वोडका घातल्यावाणी लागते हे माझे प्रामाणि क मत्त. Variations bomb sometimes. I learnt after paying 375 for that Konkani martini.. shewantini Wink

Masta ch recipe! karun baghte lock down nantr!
@ama! Ithe mumbait Khar social la Kokam martini milate, malahi ti kokmachya sara sarkhi ch watli! Shewantini Lol

आता खरेतर शेवंतिनी कॉकटेल बनवते. ह्या शब्दावर माझा कॉपिराइट आहे बरं. एक एक मार्टीनी द्यावी लागेल फी म्हणून. ( मेधा, सॉरी हं तुमच्या धाग्यावर अवांतर गंमत केली)

>>घुसळले की अगदी देशात घरी असते त्या चवीचे लोणी! >>> ते कढवून तूप होतं का?>>
हो. ठोकळा बटरला बेरी अशी नसते, या लोण्याचे तूप करताना थोडी बेरी तयार होते. नवर्‍याने कौतुकाने 'तुझ्यासारखे तूप ' म्हणत माझ्या आईला स्काईप वर दाखवले.

ओह ओके. आम्ही कोस्कोतून आणलेल्या बटरचं तूप करतो. त्याला येते छान बेरी. दोन ब्लॉक्सचं केलं की लहान वाटीभर निघते. पण हे ट्राय करू आता.