सामाजिक उपक्रमाचे हे आपले ११ वे वर्ष. हा उपक्रम तसा मायबोलीकरांना नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली १० वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत.समाजासाठी कार्य करणार्या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो.
गेल्यावेळेप्रमाणेच देणग्या खालील पद्धतीने स्वीकारल्या जातील,
१) ज्यांना देणगी द्यायची आहे त्यांनी स्वयंसेवकांपैकी कोणालाही संपर्क करुन तुम्ही किती देणगी देणार आहात इतकेच कळवावे. यासाठी ३१ मार्च ही मुदत ठेवत आहोत.
२) एप्रिलपासून, किती देणगी मिळत आहे ते पाहून सर्व संस्थांना साधारण समान निधीवाटप करण्यात येईल. त्याचवेळेस त्या निधीतून त्या संस्थेसाठी दिलेल्या यादीतून काय सामान घेता येईल, तेकोठून घेता येईल वगैरे ठरवले जाईल.
३) देणगीदारांचे गट करुन कोणी कोणत्या संस्थेला देणगी पाठवायची, संस्थेच्या अकाउंटची माहिती इत्यादी कळवण्यात येईल. त्यानंतर तुम्ही संस्थेच्या खात्यावर रक्कम जमा करु शकता.संस्थेच्या अधिकृत टॅक्स खात्याची माहिती इथेही लिहिण्यात येईल.
४) देणगीदारांनी देणगी पाठवल्यावर स्वयंसेवकांपैकी कोणालाही त्याबद्दल कळवणे महत्वाचे आहे. त्याप्रमाणे संस्थेला कळवले जाईल.
५) सर्व देणगीदारांनी देणग्या पाठवल्याचे आम्हाला कळवले की प्रत्येक संस्थेकडून खातरजमा केली जाईल.
६) सर्व जुळले की मग वस्तू विकत घेण्यासाठी पाऊल उचलले जाईल.
७) वस्तू खरेदी झाली व संस्थेला पोचली की इथे सांगितले जाईल.
ही पद्धत गुंतागुंतीची वाटेल पण देणगीदारांनी योग्य त्या संस्थेला फक्त योग्यवेळी देणगी पाठवायची आहे. बाकी काम उपक्रमाचे स्वयंसेवक करतील.
काही संस्था अभारतीय चलन पण स्विकारतात. ज्यांना वेगळ्या चलनामधे देणगी द्यायची आहे त्यांनी संपर्क किंवा विपुद्वारे स्वयंसेवकांशी संपर्क साधावा. जे मायबोलीचे सभासद नाहीत परंतु मदत करण्यासाठी उत्सुक आहेत ते सुनिधीशी lataismusic@yahoo.com या ईमेलवर संपर्क साधू शकतात.
या वर्षीच्या उपक्रमाद्वारे मदत केल्या जाणार्या संस्था खालीलप्रमाणे आहेत.
१. संस्थेचे नाव:- सहारा अनाथालय.
संस्थेचा पत्ता:- सहारा अनाथालय परिवार, बालग्राम, गेवराई, बीड.
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
ऊसतोडणी कामगारांच्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तसेच वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या ८५ मुलामुलींचे पालकत्व, पालन पोषण, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, शिक्षणेतर उपक्रम.
आयकरातील सवलत :- ८०जी.
संपर्क :- संतोष गर्जे, +919763031020
नोंदणी क्रमांक :- Mumbai Public Trust Act 1950-F- 13146 Beed.
वेबसाईट:- http://www.aaifoundation.org/
२. संस्थेचे नाव:- शबरी सेवा समिती.
संस्थेचा पत्ता:- 'Anand', Dr Phadke hospital, Kotwal Nagar, Karjat (Dist Raigad)
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
वनवासी क्षेत्रातील बालकांचे कुपोष, बालमृत्यू थांबवणे, आनंददायी शिक्षण, महिला विकास
आयकरातील सवलत :- ८०जी.
संपर्क :- प्रमोद करंदीकर Tel: (02148)-222102
नोंदणी क्रमांक :- F / 26509 (Mumbai).
वेबसाईट:- http://www.shabarisevasamiti.org/english/index.html
३. संस्थेचे नाव:- स्नेहवन
संस्थेचा पत्ता:- हनुमान मंदिर, चक्रपाणी वसाहत
भोसरी, पुणे ४११०३९
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
ऊसतोडणी कामगारांच्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तसेच दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मुलामुलींचे पालकत्व, पालन पोषण, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, शिक्षणेतर उपक्रम.
आयकरातील सवलत :- ८०जी.
संपर्क :- अशोक देशमाने, +91-8796400484
नोंदणी क्रमांक :- F/46512//P
वेबसाईट:- http://www.snehwan.in
www.facebook.com/snehwan
४. संस्थेचे नाव:- सावली
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
सावली संस्थेकडून देवदासी,वेश्याव्यवसायातील स्त्रिया, एच आय व्ही पॉझिटिव्ह पालक, एकटे व गरीब पालक, व्यसनाधीन पालक, गरीब शेतकरी व झोपडपट्टीत राहाणार्या गरीब पालकांच्या वंचित मुलांना आधार देण्यात येतो. आपल्या आर्थिक मदतीतून खालील गोष्टी झालेल्या आहेत:
# आम्ही हुजूरपागा मुलींच्या शाळेत शिकणार्या ज्यु. के.जी. ते बारावीपर्यंतच्या ७३ गरजू मुलींची फी भरू शकलो.
# इयत्ता आठवी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतच्या सावलीतील ७८ गरजू मुलांच्या फी आम्ही भरत आहोत.
# आम्ही मुलांना गणवेश, दप्तरे, शैक्षणिक साहित्य, सँडल्स, स्वेटर्स इत्यादी पुरवू शकलो. तसेच नूतन समर्थ विद्यालय बुधवार पेठ शाळेतील ६० मुलांची सहल संस्कृती रिसॉर्ट येथे घेऊन जाऊ शकलो.
# आमच्या १३ मुलांना आदर्श स्कूल, आगरकर स्कूल, भावे स्कूल येथे इयत्ता आठवीसाठी प्रवेश मिळाला आहे.
# सावलीतील ७ मुले इयत्ता १०वीच्या परीक्षेसाठी बसत आहेत आणि ४ मुले बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी बसत आहेत.
# आम्ही ६ मुलांसाठी वसतिगृह व भोजनाची सोय केली आहे.
आयकरातील सवलत :- ८०जी.
संपर्क :- मृणालिनी भाटवडेकर
Mob-9823270310
Land line- 020-24203282
नोंदणी क्रमांक :- Reg No. E-5079 (Pune)
वरील संस्थांचे यंदाचे प्रोजेक्ट्स आणि त्यासाठीची अर्थिक गरज याचे तपशील या धाग्यावर लवकरच अपडेट करु.
मागील काही वर्षी केल्या गेलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल वाचण्यासाठी प्रतिसादात लिंक देत आहोत
सामाजिक उपक्रम स्वयंसेवक चमू -
अरुंधती कुलकर्णी, सुनिधी, अतरंगी, कविन, महेंद्र ढवाण, निशदे, प्राची.
नमस्कार
नमस्कार
अशा प्रकारच्या संस्थांना वेगळ्या प्रकारची मदत करण्याची माझी इच्छा आहे. अशा संस्थांच्या कामाची जाहिरात व्हावी आणि त्यांचे काम जास्तीत जास्त लोकांपुढे यावे म्हणून मी एक वेबसाईट तयार करतो आहे. साईटचे नाव आहे www.dhumdhumdhumak.com ढुमढुमढुमाक डॉट कॉम.
या साईटवर अशा संस्थांच्या उपक्रमाची जाहिरात केली जाईल. या संस्थांची माहिती दिली जाईल. आणि या सेवा पूर्णपणे नि:शूल्क असतील.
धन्यवाद अतुल. खूप चांगली
धन्यवाद अतुल. खूप चांगली कल्पना आहे. आम्हाला ज्या संस्था गेल्या दहा वर्षात माहिती झाल्या आहेत त्यांच्या विषयीची माहिती आमच्या डेटाबेसमधे आहे. काही मदत लागल्यास नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचे कार्य पोहोचणे हे महत्वाचे आहे.
आपण गेली दहा वर्ष निधी संकलनाचा उपक्रम करत आहोत त्यामागचा मूळ उद्देशही हाच आहे. म्हणून तर इथेही वाचक कमी झाले, प्रतिसाद संख्या कमी झाली, देणगी रक्कम आणि देणगीदार यांची संख्या किती? या सगळ्याचा विचार बाजूला सारुन आपण हे काम करत होतो, आहोत आणि राहू.
इतक्या वर्षांमधे एक बंध निर्माण होऊन काही देणगीदार कायमचे यातल्या काही संस्थांशी जोडले गेले आहेत हि खूप मोठी जमेची बाजू आहे आमच्याही साठी मग भले त्यांचे योगदान आपल्या उपक्रमामधून दिले जावो किंवा स्वतंत्र. संस्था आणि देणगीदार एकमेकांशी जोडले जाणं हेच महत्वाचे आहे.
इतके तपशीलवार प्रतिसादात लिहीले कारण हे सगळे सगळ्या स्वयंसेवकांचे मनोगत म्हणून मांडायचे होतेच कधीतरी. तुमच्या प्रतिसादाने तार छेडली गेली इतकेच.
मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा.
अकराव्या वर्षीच्या उपक्रमाला
अकराव्या वर्षीच्या उपक्रमालाही उदंड शुभेच्छा!
उपक्रमाला शुभेच्छा.
उपक्रमाला शुभेच्छा.
उपक्रमाला शुभेच्छा.
उपक्रमाला शुभेच्छा.
हर्पेन, अन्जू, कुमार१
हर्पेन, अन्जू, कुमार१ शुभेच्छांबद्दल आभार
उपक्रमाला शुभेच्छा!
उपक्रमाला शुभेच्छा!
धन्यवाद अश्वे
धन्यवाद अश्वे