सध्या किंवा भविष्यात कोणती बॅँक सुरक्षित आहे? बँकिंग व्यवसायावर संकट का आले आहे?

Submitted by केशव तुलसी on 7 March, 2020 - 05:46

सध्या अनेक बॅंका या आर्थिक संकटात सापडल्या आहेत.देशाचे नेतृत्व करत असलेले नरेंद्र मोदी यांचे तथाकथित धाडसी निर्णय देशाच्या सामान्य जनतेच्या अंगी येत आहेत.पीएमसी ब्ँक आणि सध्या येस बँक यांनी दिवाळखोरी जाहीर केली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणात हस्तक्षेप करणे ,मोठे आर्थिक निर्णय घेताना सल्लागारांना दुय्यम लेखणे असे प्रकार चालू आहेत .यामुळे सर्वसामान्य ठेवीदार भांबावून गेला आहे.आपले पैसे कोणत्या बँकेत सुरक्षित आहेत हे त्याला कळेनासे झाले आहे.हा धागा यासाठी उघडला आहे की याविषयावर चर्चा व्हावी की कोणत्या बँका या सध्या सेफ आहेत पैसे ठेवायला किंवा भविष्यातही मजबूत राहु शकणार्या खाजगी व राष्ट्रीतकृत बँका कोणत्या आहेत.पैसे अडकले तर रिझर्व्ह बँक काय पावले उचलते? खुप संभ्रम आहेत जे जाणकारांनी दुर करावेत,ठेवी कश्या सुरक्षित राहतील यावर चर्चा व्हावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑडिट कसं चालते.
Audior कसे खरी आर्थिक परिस्थिती लपवतात.
फक्त पेपर वर कोणतीही संस्था आर्थिक बाबतीत मजबुत आहे असे दाखवणे आपल्या देशात अवघड नाही.
पाहिले एकच लाख का विमा संरक्षण होते असता ५ लाख ल आहे.
एकच बँकेत सर्व पैसे ठेवण्या पेक्षा विविध बँकेत ठेवा.
सरकारी बँका dubat नाहीत ही अंध श्रद्धा आहे.
कोणतीही बँक,अर्थ संस्था बुडीत मध्ये जावू शकते..
त्याला महत्वाचे कारण वसूल होण्याची बिलकुल शक्यता नसलेल्या लोकांना संगनमताने कर्जा chya नावावर पैसे देणे.

सरकारी बँका ही बुडू शकतातच पण त्यांची मालकी सरकारी असल्याने सरकार त्याना बुडू देत नाही. आणीबाणीच्या प्रसंगात सरकार त्याना आर्थिक मदत देते आणि वाचवते. पर्यायाने depositors ना प्रत्यक्ष झळ पोचत नाही. अर्थात सरकारचे पैसे tax payers चेच असल्याने अप्रत्यक्षपणे जनता सफर होतेच.

एलआयसी,matul फंड, ईपीएफ
ह्या संस्था सुध्दा कधी गोत्यात येतील हे सांगता येत नाही.
पैसा कोणाला नको आहे.
त्या मुळे जबाबदार अधिकारी चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवणुीबाबत बाबत फक्त स्वा हिताचा वापर करून ह्या संस्था बुडीत काढू शकतात.

थोडक्यात कुठलीच बँक सुरक्षित नाही. म्यु फंड,ईपीफ वगैरे गुतवणुकी असतात पण बराच पैसा बँकेत ठेवायची मानसिकता आहे.चांगला परतावा व सुरक्षीत पैसे कुठेच नाहीत असेच म्हणावे लागेल.
सध्यातरी अनेक ठीकाणी व बँकांमध्ये विभागुण पैस् ठेवावेत असे दिसते

सगळ्या बँकांची विश्वसनीय कुंडली कुठं बघायला मिळेल?
Submitted by केशव तुलसी >>>>>>>>

येथे बऱ्यापैकी माहिती आहे.....
https://m.rbi.org.in//Scripts/AnnualPublications.aspx?head=Statistical%2...

बँकेचा NPA कमी व profit जास्त असेल तर काळजी नसते.

यस बँक इकॉनॉमिक टाइम्स व पिंक पेपर बातम्यांमध्ये गेले दीड वर्श आहे. राणा कपूर ह्यांने सर्व कंट्रोल हातात घेतले होते. दुसरे फाउं डर त्यांचे भाउ जे वारले त्यांची विडो व मुलगी व कपूर फॅमिली ओफिस हे बँकेचा बोर्ड कंट्रोल करण्यासाठी भांडत होते. ह्यात मला इंट्रेस्ट म्हणू न मी ती न्युज वाचत होते. एच डी आय एल घोटा ला, पी एम सी बँक घोटाळा डी एच एफ एल हे सर्व कनेक्टेड आहे. दिवान वधवान एकच मोठे कुटुंब आहे.
डीएच एफ एल चे एक डील क्रिमिनल पण आहे. ही सर्व माहिती पिंक पेपर्स साइट वर उपलब्ध आहे. सर्च करून बघा.

बँकांमध्यील गैर व्यवहार संबंधाने, डॉइशा बँक मधील घडामोडींबद्दल. सब प्राइम क्रायसिस, रशिअन लोकांचे गैरव्यवहार, डेरि वेटिव
ट्रेडिंग मध्यील गैर व्यवहार, जनरल मिस मॅनेज मेंट व ट्रंप साहेबां चे आर्थिक व्यवहार ह्या संबधाने डार्क टावर्स म्हणून एक पुस्तक गूगल प्ले स्टोअर मध्ये आहे ते जरूर वाचून घ्या. एकं दर बँकेचा कार भार वाचून मन दडपून जाईल.

मध्यमवर्गीय लोक विश्वास ठेवतात ह्या गृहितकावरच अने क आर्थिक गुन्हे आधारित आहेत. व यशस्वी पण होतात.

पूर्वी पण ग्लोबल ट्रसट बँक हैद्राबादची प्रीमिअर बेंक बंद पडली ती केस वाचण्या सारखी आहे.

पैसे गुंतवण्याची मानसिकता असते त्या पैशात वाढ झाली पाहिजे.
मग ती जास्त व्याज मिळत असेल तर जास्त वाढ होईल किंवा share market, company bond madhye paishe वाढतील ही अपेक्षा असते.
कमी कालावधीत जास्त रिटर्न देणाऱ्या योजनांकडे लोकांचा कल असतो.
फक्त आहे ते पैसे सुरक्षित राहावेत असा विचार करणारी माणसं विरळाच.
जमीन खरेदी करणे
ह्या मध्ये पैसे कधीच dubnyachi शक्यता नाही .
पण ह्या मधून रिटर्न किती मिळेल हे सांगता येणार नाही पण आहे ती किंमत नक्की मिळेल ही शास्वती.
रोजच्या खर्चाची आणि थोडी भविषात लागणारी रोकड बँकेत ठेवून .
मालमत्ता ,सोने ह्या मध्ये केलेली गुंतवणूक बुडू शकणार नाही.
फक्त त्या मध्ये किती वाढ होईल हे सांगता येणार नाही

जमीन खरेदी करणे
ह्या मध्ये पैसे कधीच dubnyachi शक्यता नाही .

हे बरोबर नाही. अनेक लोकानी जमिनी घेतल्या त्यानंतर त्यावर कुणीतरी खटला टाकला की जमीन 20-25 वर्षे अडकली.

किंवा त्या जमिनीवर अतिक्रमण झालं किंवा सरकारने तेथील आरक्षण बदललं तर आपले पैसे पूर्ण बुडतात

किंवा त्या जमिनीवर अतिक्रमण झालं किंवा सरकारने तेथील आरक्षण बदललं तर आपले पैसे पूर्ण बुडतात

नवीन Submitted by सुबोध खरे on 9 March, 2020 - 04:59
>>>गुंठेवारीतली जमीन घेऊ नये.एन ए वर आरक्षण पडत नाही.

एन ए वर आरक्षण पडत नाही.

बारामतीकरांनी सर्व काही केलेलं आहे. लष्कराचे कॅण्टोन्मेण्ट सुद्धा अनारक्षित करायचा घाट चालला होता.

एन ए कसलं घेऊन बसला आहात

बॅंकेत ठेवावयाचे पैसे टॉपच्या राष्ट्रीयीकृत बँक आणि प्रायव्हेट बँक यामध्ये विभागून ठेवावेत. राष्ट्रीयीकृत बँकेत जास्त. टॉपच्या प्रायव्हेट बॅंकेत कमी आणि एफडी कमी कालावधीची करावी (जसे की १-२ वर्षे). बाकी मोठ्या बँक बुडत असतील तर ते काही एका दिवसात होणार नाही. फक्त न्युज कडे नजर असावी. काहीसे संशयास्पद वाटले तर सरळ एफडी मोडावी. अगदीच गरज असेल तर थोडेसे पैसे आंतरराष्ट्रीय बँकेतपण ठेवावेत ज्या खूपच मोठ्या आहेत आणि ज्यांना टू बिग टू फेल असेही म्हणले जाते (जसे की सिटी बँक, HSBC, स्टॅंडर्ड चार्टर्ड, Deutsche, Barclays etc ). त्या व्याज कमी देतात थोडेसे पण सुरक्षित आहेत तश्या. भारतीय प्रायव्हेट बँकेत मलातरी HDFC ani ICICI Bank तश्या बऱ्या वाटतात. या पण टू बिग टू फेल भारतीय version वाल्या बँक आहेत. मध्ये ICICI बँकेविषयी थोडी निगेटिव्ह बातमी आली होती जेंव्हा चंदा कोचर पायउतार झाली पण बँकेने ते व्यवस्थितपणे हाताळले. राष्ट्रीयीकृत बँकेत शक्यतो मोठ्या बँकच निवडाव्यात जश्या की SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा कारण छोट्या बँक्यांचाही काही भरवसा राहिला नाही.
थोडक्यात काय तर ५-६ राष्ट्रीयीकृत आणि प्रायव्हेट बँक अजूनही बऱ्यापैकी सुरक्षित वाटतात त्यात पैसे ठेवायला हरकत नाही (हेमावैम)

बँकांचे दोनदा विचित्र अनुभव आले.
एकदा इंडियन बँक च्या atm मधून पैसे काढले तर त्या मध्ये पाचशे रुपयाच्या टेप लावून चिकटवले ल्या नोटा आल्या.
म्हणून इंडियन बँकेच्या कस्टमर care la phone kela tar ti phone घेणारी मुलगी दक्षिण भारतीय ना ती इंग्लिश बोलणं ना हिंदी .
कोणती तरी दक्षिण भारतीय भाषा बोलत होती .
दोनदा प्रयत्न केला पण अनुभव तोच म्हणून माझ्या अकाऊंट असणाऱ्या बँकेत फोन केला तर त्यांनी जबाबदारी घेण्याचे टाळले.
शेवटी त्या नोटा चालवल्या कशा तरी.
एकदा icici बँकेच्या एटीएम मधून पैसे काढले 4000 रुपये पैसे बाहेर आलेच नाहीत पण खात्या मधून वजा झाले.
म्हणून तबोडतोप तक्रार केली.
आणि 15 दिवसा नंतर माझ्या खात्यात बँकेने 8000 जमा केले 4000 हजार जास्त.
मला वाटलं चुकून झाले असेल करतील कट .
पण ती चूक बँकेच्या लक्षात आलीच नाही आणि 4000 मला असेच मिळाले.
असे अनुभव बाकी लोकांना सुद्धा आले असतील.

मी पण हेच शोधत आहे. चांगले व्याज देणारी , पुण्यातील मस्त बँक मला सरळ विपू करून सांगा प्लिज
SBI च्या वेब वर वेगळं , प्रत्येक माणूस एकाच शाखेतील वेगळं सांगतो , प्रत्यक्षात वेगळंच व्याज मिळतं
मी युवा कार्ड मागितलं , मला साधं दिलं होतं
तात्काळ अकाउंट बंद केलं Happy

फुकटाचे चार हजार रुपये वापरायला काहीच वाटले नाही. अर्थात तुझ्याकडून अपेक्षा नाही राजेश. मी लगेचच परत केले असते पैसे. तूला चाळीस हजारांचा फटका बसणार कर्मसिध्दान्तानुसार.

नवीन Submitted by बोकलत on 9 March, 2020 - 20:52>>> बोकलत ही बँकपण बुडू शकते. मीच बुडवलीय बऱ्याचदा माझ्या भावाची. गल्ला न तोडता न फोडता त्यातले पैसे मला काढता यायचे, त्यामुळे मी त्याच्या गल्ल्यातले पैसे काढून माझ्या गल्ल्यात टाकायचे. त्यामुळे व्हायचे असे की माझा गल्ला लवकर भरायचा अन त्याचा कधीच नाही Proud मी असे करते हे त्यालापण माहीत होते पण तो बिचारा कधी काही बोलायचा नाही

मला एक नमूद करावेसे वाटते - बँकांचे / शेअर कंपन्यांचे रिलेशनशिप मॅनेजर - सावध रहा
एक मोठी लीगल केस एका वकिली कामाच्यासाठी वाचनात आली होती
हे लोकं , घरी येऊन अकाउंट उघडू इ. सांगून गृहप्रवेश करतात , मग फॅमिली फ्रेंड्स बनतात ,
घरची परिस्थिती , पैसे किती माहिती काढून बरेच फसवतात.

सर्व आर्थिक व्यवहार स्वतः , गोपनीयता बाळगून करावेत
कोणालाही तिर्हाहिताला मध्ये घेऊ नये.

Pages