अंडा खांडोळी (कोल्हापुरी)

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 7 February, 2020 - 02:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अंडी ३, ब्रेड स्लाइस ३, टोमॅटो सॉस, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला , बारीक चिरलेली कोथिंबीर, १ कांदा ( गोलाकार चकत्या), तेल

क्रमवार पाककृती: 

गॅसवर तवा चांगला तापवून घ्यावा आणि थोडं तेल सोडावे. त्यावर १ अंडे फोडून नीट पसरून घ्यावे आणि लगेच ब्रेड स्लाईस ठेवावा. ते दोन्ही बाजूने चांगले भाजून घेतल्यावर एका ताटलीत काढावे आणि सुरी किंवा कावीलथ्याने त्याचे समान (छोटे) तुकडे करून घ्यावे. त्यानंतर त्यावर कांदा लसूण मसाला, सॉस घालावा. त्यावर कोथिंबीर आणि कांद्याच्या गोलाकार कापलेल्या चकत्या ठेवून डिश सजवा. आणि गरमागरम खांडोळी फस्त करा.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी पोटभर होतं, पण आवडीनुसार अंडी आणि ब्रेडचे प्रमाण वाढवू शकता.
अधिक टिपा: 

गरमागरम खाण्यातच मजा आहे, गार खाऊ नका .

माहितीचा स्रोत: 
कोल्हापूरमधली फेमस डिश, सो सगळ्यांनाच माहीत आहे :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी @Dj, थोडंस तेल लागतं अगदी, भाजून घेण्यापुरतं.
योग्य तो बदल केला आहे लिखाणात.

Btw मी 2 -3 वेळा फोटो upload करायचा प्रयत्न केला, पण माझे फोटो दिसत नाहीयेत, नक्की काय करू ?

त्या ऐवजी अंड्यातच मीठ मसाला सगळे नीट मिसळून घेतले व मग अंडे तव्यावर टाकल्यास चव अधिक चांगली लागेल.. मधेच तिखट व मधेच खारट्ट असे लागणार नाही!
खांडोळी म्हटल्यावर एकदम शिवकालीन मावळे असल्या सारखे वाटते.
Happy

मीनाक्षीताई,
१. तुम्ही प्रतिसादाखाली असलेल्या 'मजकूरात image किंवा link द्या.' या वाक्यातल्या image वर क्लिक करा.
२. अपलोड विंडो येईल. तिथे तुम्हाला हवा तो फोटॉ ब्राउज करा.
३. अपलोड बटण वर क्लिक केल्यावर तुमचा हवा तो फोटो लिस्ट मधे अ‍ॅड होईल. नंतर अपलोड विंडो क्लोज करा.
४. तो फोटो लिस्ट मधे दिसु लगेल. लिस्ट मधल्या हव्या असलेल्या फोटोवर फोटोवर क्लिक करा आणि Insert file वर क्लिक करुन विन्डो क्लोज करा.
५. आता तुमच्या मजकुरात एच.टी.एम.एल. लिंक दिसु लगलि असेल.. मग तुमचा प्रतिसाद सेव करा Bw

@dj ... अहो मी ही सगळी प्रोसेस करून पहिली, लिंक दिसते पण फोटो मात्र दिसत नाही..
Anyway थँक्स, परत करून पाहते एकदा..
@ आंबट गोड, हे सगळं ऑम्लेट मध्ये चांगलं लागेलच, पण खांडोळीची एक वेगळी मजा आहे, मला स्वतःला तरी ती चव भारी आवडते, सो हे omlet with ट्विस्ट मी कधीमधी करते Happy

वेगळी रेसिपी.
अंडं फेटुन तव्यावर घालायचं आहे की हाफ फ्राय साठी डायरेक्ट तव्यावर फोडतो तसं?