घरबसल्या यंत्रमानव कसा बनवावा?

Submitted by अश्विनीमामी on 8 January, 2020 - 00:38

मला आर टू डीटू व सी थ्री पी ओ. फार आवडतात. सॅम संग कंपनीने पर्वाच्याच प्रदर्शनात बॉली नावाचा घरी राहणार्या लोकांसाठी सोबत म्हणून एक बॉल शेप्ड रोबो चे प्रात्यक्षिक देले आहे. पण हे सगळे परदेशी प्रकार झाले. आपल्या घरी आपल्या सोबत राहू शकेल , थोड्या बहुत बेबी योडा सारख्या खोड्या करेल. गप्पा मारेल असा रो बो बनवायचा आहे. तो कसा बनवता येइल. त्या संबंधात खालील प्रश्न आहेत.

१) त्याचे नाव काय ठेवावे: सध्या यंमा असेच मनात आहे. अमा आणि यंमा. युगा युगांचे सोबती इत्यादि.

२) पावर सोर्स काय असावा? इलेक्ट्रिक चार्जिंग किंवा बॅटरी किंवा सोलर पॅनेल ने चार्जिन्ग. घरात उन्हे येत नाहीत. त्यामुळे काहीतरी सोय करावी लागेल.
३) सॉफ्ट वेअर काय व कसे असावे? आज्ञा प्रणाली, व त्याचा रिस्पॉन्स हे.

४) हार्ड वेअर कुठे मिळेल? किंवा रेडिमेड सेकंड हँड रोबो मॉडिफाय करता येइल. मला साधारण वॉल ई लेव्हल बास आहे फार फॅन्सी व हुषार नको आहे. टेक्निक लोगो व तत्सम असेंब्ली किट मिळतात का?

५) अलेक्षा, एको डॉट व गुगल असिस्टंट तत्सम प्रकार फारच लक्ष ठेवून असतात. पण ह्या रोबो बरोबरीने वापरावेत का? तुमचे काय अनुभव आहेत

६) सर्वात महत्वाचे खर्च किती येइल. रिटायर्ड माणसाला परवडले पाहिजे.

हे सर्व मी गूगल करीनच व व्हिडीओ पण सर्च करेन. पण आपला अमुल्य सल्ला महत्वाचा आहे.

माहिती साठी आगाउ धन्यवाद

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या यंमा असेच मनात आहे. अमा आणि यंमा. युगा युगांचे सोबती इत्यादि.
>>>

छान आयड्या आहे. तुम्ही त्याला आपल्या रण्गरुपातही डिजाईन करू शकता. जसे रोबोटमध्ये रज्नीकांतने आणि रावनमध्ये शाहरूख खानने केले होते.

म्ही त्याला आपल्या रण्गरुपातही डिजाईन करू शकता>> नाही मला माझी प्रतिकृती नको आहे. एक तर मी मेगॅलो मॅनि आक नाही. व सोबत पण आपलीच ही फेज आहेच की त्यात सुधारणे साठी तर यंमा . कोणी तरी बारके छोटुकले क्युट असे असले तर बरे पडेल. आर्टू डीटू बेस्ट पण तो फार महाग आहे.

अमा कशाला रोबोच्या फंदात पडताय. एक मस्त जशे घ्या. तुम्ही तीन रिक्वायरमेंट दिल्या आहेत. गप्पा मारेल, खोड्या करेल, सोबत राहील. सगळ्याच पूर्ण होतात की. Happy

पण एक चांगला यंत्रमानव पार्कात ठेवला/(ठेवले) तर लोकांना तो तास अर्धा तासाला भेट म्हणून ठरवता येईल. कमी खर्चात अद्ययावत खेळणे मिळेल आणि भरपूर पर्याय मिळतील. तुमच्या आवडीनिवडी क्लाउड मधून पाहून कुठेही कोणतेही यंत्रमानव त्याच्या पद्धतीने वेगळ्या गप्पा मारतील.
मग जाहिराती येतील "आमच्या @@@ची भेट ठरवा, करमणूक निश्चित" वगैरे.

चीनमधल्या त्या खटपट्या माणसास भेटा. फेमस आहे तो. बऱ्याच चीनी डॉक्यूमध्ये दाखवतात. तो शिकलेला नाही पण स्वत:च माहिती करून रोबो बनवतो भंगारातले पार्ट्स जोडून.

तो केल्यावर 'नाव काय ठेवू?' हा शतकी धागा मायबोलीकर चालवतील.