वासनेने पिसाळलेली जनावर !

Submitted by MANPRVAAH on 26 December, 2019 - 01:30

(बलात्कारीची मानसिकता )
प्रा डॉ महेश पाटील .
आज धकाधकीच्या जीवनात अनेकजण स्वतःला विसरून गेले आहेत त्यांना आपण कोण आहे याचे सुद्धा भान राहिले नाही. कोपर्डी सारखी घटना किंवा हैद्राबाद सारखी घडली कि आमच्यातील माणसुकी जागी होते.आणि आम्ही निषेध मोर्च्या काढण्यासाठी रस्त्यावर उतरतो. तो पर्यंत यांना माहीत नसते कि आपण कोण आहे मनुष्य आहे कि माणसं आहे ?मनुष्य प्राणी कि वासनेने पिसाळलेला जनावर आहे आपण देव मानणारे आहे कि असह्य माताभगिनींवर अत्याचार करणारे दानव आहे . यातील नेमकं कोण आहे. हेच यांना माहीत नाही त्यामुळे आज असे प्रकार घडताना दिसतात . आज अनेक माणसं माणसात राहिली नाहीत ती जनावरात जमा झाली आहेत त्यामुळे ती जनावरां प्रमाणे वागू लागली आहेत. त्यामुळे समाजात बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. आजू बाजूला मुकी जनावर पाहतो पण ती सुद्धा एवढी क्रूरपणे वागत नाहीत एवढी क्रूरपणे हि चालती बोलती माणसातील जनावर वागू लागली आहेत . त्यांना आपण कोण आहे याचा विसर पडला असावा. म्हणून आज त्यांना त्याची ओळख करून देणे गरजेचे झाले आहे .
आपला देश म्हणजे साधू संतांचा आणि देवावर नितांत श्रद्धा असणारा देश ज्या देशात ३३ कोटी देवाची निर्मिती झाली तो आमचा भारत देश आणि त्या देशातील हि एक विसाव्या शतकातील पिढी कोण्यात्या दिशेनं वाटचाल करीत आहे हा संशीधनाचा विषय आहे म्हणून आजवर घडलेल्या घटना कडे जर आपण पाहिले तर तुमच्या देखील मनात प्रश्न उभे राहतील
१),कोपर्डी नंतर तरी बलात्काराचे प्रमाण कमी झालेआहे असे वाटते का ?
२)कडक कायदे केले तरी अशा विकृती लोकांवर अंकुश ठेवता आला का ?
३)निषेध मोर्चे काढून याच्या मानसिकतेत काही बदल झाला का ?
४)हैद्राबाद घटनेमद्ये सामील असणारे निर्भयाच्या वेळी निषेध मोर्च्यात सहभागी नव्हते का?
मग का म्हणून निषेध मोर्च्या काढण्याचे नाटक करत आहोत आणि आज मोर्च्यात सहभागी असणारे उद्याचे गुन्हेगार नसतील का? असे अनेक प्रश्न आज आमच्या सारख्या संशीधकाना पडलेले असताना आम्ही किती दिवस गांधारीची भूमिका निभत बसायचं याना कुणीतरी मार्गदर्शनाचे डोस पाजायला नकोत. किती दिवस याना आपलं आपलं म्हणून सांभाळून घ्याचं . शाळेत घातलं तेव्हा पासून रोज थोर महापुरुषाचा इतिहास शिकवला धर्माची शिकवण दिली देशाच्या विविधतेची शिकवण दिली तरी देखील हे म्हणतात रामची आई कोण तर सीता .मग शिक्षकाने काय शिकवले म्हणून समाज त्याच्या नावाने बोंब मारणार पण विद्या घेणारच माणूस नसेल त्याची मानसिकता जनावरांप्रमाणे असेल तर गुरु काय करणार आज हि आपल्या देशाबाबत काही गोष्टी आपल्याला ठाऊक नाहीत, किंवा आपण त्या जाणून घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही. आपल्या देशातील सर्व पाठ्यपुस्तकांच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात राष्ट्रीय प्रतिज्ञा छापण्यात आलेली असते. त्याचप्रमाणे शाळा भरताना जेव्हा राष्ट्रगीत होतं त्यावेळीही प्रतिज्ञा बोलायला सांगण्यात येते. आम्ही देखील म्हणतो ....... भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ... ..... . मी माझ्या पालकांचा गुरुजांचा आणि वडीलधाऱ्या माणसाचा मन ठेवीन प्रत्येकाशी सौजन्याने वागेन....... मग तुम्ही तुमच्या देशातील नागरिकांशी सौजन्याने वागतता का ? हा प्रश्न आधी स्वतःला विचार मग कळेल नक्की तुम्ही आहे कोण ? आणि मगच तुम्ही रस्त्यावर उत्तरा कारण तुम्ही सुद्धा धुतल्या तांदळासारखे स्वच्य नाही पण कोणत्याही माता भगिनींवर अत्याचार करणार नाही आणि समोरं होत असताना तो मी सहन करणार नाही याची पहिली खबरदारी घ्या .तरच तुम्ही माणूस आहात अन्यथा तुम्ही सुद्धा त्याचेच सगेसोयरे आपली ती बहीण आणि दुसऱ्याची बहीण शिकार वाटते. तेव्हाच तुमची मानसिकता कळते ! तेव्हा अशा प्रवृत्ती ला जर तुम्ही खतपाणी घालत असाल तर वेळीच सावध व्हा ! अन्यथा आपली देखील माता भगिनीं अशा गिधाडांच्या विळख्यात शिकार होऊ शकतात. म्हणून स्वतःची पारख स्वतः करा आणि स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा कि मी आहे कोण ? मनुष्य प्राणी कि वासनेच्या आहारी गेलेलं जनावर यातील फरक तुमचा तुम्ही ओळखायचा आहे आणि निषेध मोर्च्यात सहभागी व्हायचे आहे . पुरूषांनो मुक्या प्राण्यामध्ये सुद्धा सौजन्यता असते ते विना वस्त्राचे भटकून देखील कुणावर जबरदस्ती करत नाहीत. आणि आपण नेमके कुणाचे आचरण करतो याची जरा लाज वाटू द्या ! आपण धर्माचे बांधील आहे , समाजाचे बांधील आहे , कायद्याचे बांधील आहे ,गुरुचे बांधील आहे आईवडिलांचे संस्कार आहेत . तरी आपल्याकडून अशा गोष्टी घडाव्या हा पुरुष जातील लागलेला कलंक आहे . म्हणून सर्व पुरुष जातींना माझे एकच आव्हान आहे जर तुमच्यात एवढी धमक असेल तर ज्या क्षणाला तुम्हाला असे कृत्य करण्याची बुद्धी सुचते त्या क्षणाला तुम्ही लग्न करण्याचा विचार घरच्यांना बोलावून दाखवा मग तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल. त्या क्षणाला तुम्ही कोण आहे ,कुणाच्या जीवावर पोसलेले बांडगुळ आहे , तुम्हाला कशासाठी जन्माला घातले या सगळ्याची उत्तर तेव्हा मिळतील. तेव्हा मित्रानो आधी स्वतः चा शोध घ्या . मी माणूस म्हणूच का जन्माला आलो ? मी माणूस म्हणूंन जन्म घ्यावा हि कुणाची पुण्याई होती . मी माणूस नसतो तर काय ? अशा अनेक प्रश्न स्वतःला विचारा आणि पंडित माता भगिनींच्या ठिकाणी मी किंवा माझी माता भगिनी असती तर मी काय यातना भोगल्या असत्या किंवा माझ्यावर काय प्रसंग ओढवला असता याचा तुम्ही विचार करा. मनुष्य जन्म हा एकच जन्म तुम्हाला पुण्य मिळवण्यासाठी भगवंताने दिला आहे. फक्त याच जन्मात तुम्ही पुण्याचे काम करू शकता अन्यथा बाकीच्या ८3 योनीचा प्रवास तुमचा खडतर असणार आहे तेव्हा माणसा माणूस म्हणून जग...... उगीच जनावरासारखा वागू नको . मिळालेला मनुष्य जीवन असाच वाया जाऊन देऊ नकोस. भगवंताने ज्या कामासाठी तुला जन्माला घातले ते पहिले कर्त्यव्य तू पार कर स्वतःच्या स्वार्थासाठी असे पाप करू नको नाहीतर तुझ्या saat पिढ्याना ते भोगावे लागेल. ………
A9_0.jpg (6.86 KB)
सौजन्य : क्रांती बहुद्देशीय संस्था विटा चिखलहोल

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users