दुधी भोपळ्याच सांबार

Submitted by प्राजक्ता on 4 December, 2019 - 16:56
dudhi sambar
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दुधी भोपळ्याच्या साल काढुन फोडि-१ कप
दही- १ कप
चणा डाळ-२-३ टेबलस्पुन (धुवुन भिजवुन)
डाळिच पिठ- एक डाव भर
कढिपत्ता, कोथिबिर, फोडणीच साहित्य, तेल, मिठ, साखर

क्रमवार पाककृती: 

दुधी भोपळ्याच्या साल काढुन फोडि करुन घ्याव्या यात भिजवलेली चणा डाळ मिसळुन कुकरला २-३ शिट्ट्या करुन मउ शिजवुन घ्याव.
शिजलेल्या फोडी गार झाल्या की त्यात डावभर पिठ, दही जरा घुसळुन आणी पाणि घालुन शिजायला ठेवाव.
एकिकडे कढईत कढिपत्ता जिरे मोहरी , हिन्ग, हळद आणि तिखटाची चरचरित फोडणी करावी आणी वरच्या शिजलेल्या मिश्रणात ओतावी, तिखट आणी तेल हेमट्या हाताने घालु नये पण अगदी सणसणित करायची गरज नाही. सांबार घटट वाटल तर जरा पाणी घालुन पळिवाढ कराव, मिठ आणि साखर चविप्रमाणे घालाव.
कोथिबिर घालुन गरम भात किवा पोळिबरोबर खाव.

अधिक टिपा: 

१) फोडणित मिरच्या , बारिक चिरलेला कुरकुरित लसुण पण छान लागतो .
२) सांबाराची consistency पळिवाढ्या पातळ भाजिसारखी हवी.

माहितीचा स्रोत: 
साबा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वेगळा प्रकार. करून पाहायला हवं. Happy मी लाल सुकी मिरची आणि लसूण वापरीन फोडणीत. कुटाची मिरचीही मस्त लागेल यात बहुधा.
पाकृत तिखटपणा करता काहीच नाही वापरलं का?( का?)

जरा शुद्धलेखनाकडे लक्ष देणार का कृपया?

इतके अशुद्ध लिहिले आहे मला वाटले मीच लिहिलेय कि काय एके काळी Happy

मी खाल्ले आहे हे सांबार - मस्त लागते. रेसिपी व्यवस्थित दिलीय- धन्यवाद !!!!!

खूप भारी लागते हे सांबार. मी खाल्लेय पण चणाडाळ वापरलीय हे लक्षात आले नाही. मी तूरडाळ वापरून करायचा प्रयत्न केला पण ती चव आली नाही. दहीपण घालतात हे अर्थातच माहीत नव्हते. दुधीच्या फोडी करण्याऐवजी अर्धचंद्राकृती कापले होते, त्यामुळे मस्त दिसत होते.

कृतीबद्दल धन्यवाद. करून पाहणार.

सुधारुन पुन्हा लिहु अस विचार होता पण बिझी शेड्युलमधे लक्षात नाही राहिले .( कुठेतरी जरा उत्साह पण मावळला, जाउ द्या झाल! म्हणुन सोडुन दिल)

सांबारापेक्षाही चव कढीच्या जवळ जाणारी असणार.>> अग हो ! कढि आणी पिठल यातला मधला प्रकार आहे जरा, सांबार का म्हणतात ते माहित नाही पण
मी करून पहाणार नक्की>> थन्डित करायला बेस्ट आहे , करुन पहा ऩक्की .

अगं हे बरचसं डाळ वांग्यासारख वाटतय. आमच्या भागात हे दुधी ऐवजी वांगी वापरून करतात. ही बघ इथे आहे रेसीपी:
https://www.youtube.com/watch?v=0UVcuA8HBZA

इन्स्टंट पॉट मध्ये करायला आणखी एक रेसीपी दिलीस कि ? Happy
मी करून बघते उद्याला आणि लिहिते इथे रिझल्ट.

दुधी घरात होता म्हणून करून पाहिली. नाही आवडली. कढीमध्ये उकडलेला दुधी अशी चव लागली. अर्थात मी फार तिखट खाऊ शकत नाही पण दुधीला चढे न दुजो रंग इफेक्टमुळे मजा नाही आली. कुणा सुगरणीने करून दिली तर चांगली लागावी.पण पुन्हा करेन का शंकाच आहें
फार हौसेन् काढला म्हणून फोटो.
9AE78B85-ECA5-49B3-8C3D-7F55CA9E89B9.jpeg

तुम्ही हळद्,तिखट अस काही घातल नाही का? सांबाराची consistency कढीसारखी नको तर पळिवाढ्या दाटसर पातळ भाजिसारखी हवी.
फोडणि पण जरा चरचरितच हवि, मिळमिळित नाही चान्गला लागणार सांबार .