एक पावभर (२५० ग्रॅम) लाल भोपळा
दोन लहान बटाटे
एक वाटीभर दही
अर्धी ते पाउण वाटी भाजलेल्या शेंदाण्यांचं जरा दाणेदार पोताचं कूट
मीठ, साखर चवीनुसार
३-४ हिरव्या मिरच्या
अर्धा इंच आलं
तेल
जिरे
थोडी कोथिंबीर
इथे लाल भोपळ्याचं भरीत शोधलंं तर ते जुन्या साईटवर आहे आणी ती सध्या काहीही न करता बंद असते. ही कृती आमच्या इथे सहसा केल्या जाते. उपासाला 'चालते'
तर कृती -
याकरता शक्यतो, काळ्या पाठीचा आणि चांगला केशरी रंगावरचा भोपळा घ्यावा. साल सोलून काढून टाकावी आणि मध्यम आकारात चिरून घ्यावा.
बटाट्यांची सालं काढून तेही भोपळ्याच्या आकारांत चिरून घ्यावे. जरा मोठ्या पातेल्यांत भोपळा आणि बटाटा बुडेल इतकं पाणी घेऊन ते उकळू द्यावं. एक उकळी फुटली की मग यात चिरून ठेवलेला बटाटा घालावा. मिनिटभरानंतर मग भोपळाही त्याच उकडहंडीत सोडावा.
एकीकडे आलं बारीक किसून तर हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत आणि कोथींबीर बारीक चिरून तयार ठेवावी.
भोपळा, बटटा शिजला की, त्यातलं पाणी काढून टाकावं आणि गार करत ठेवावं.
जरा गार झाले की यांत मीठ, साखर, कोथिंबीर, दही, आलं आणि दाण्याचा कूट घालावा.
आता एका कढल्यात तेल जिर्याची फोडणी करून/ जिरं फुलवावं आणि यात मिरच्या घालून जरा होऊ द्याव्यात. ही चळचळीत फोडणी भरीतावर ओतावी आणि नीट कालवून घ्यावं. सुरेख चवीचं भरीत तयार आहे. एका माणसाला एका वेळेला अन दोन लोकांना बाकी फराळाबरोबर पुरेल.
दह्याला आल्याचा स्वाद फार मस्त लागतो सो ते वग़ळू नका.
मिरच्या तिखटपणानुसार कमी जास्त करता येतील.
बटाटा उगीच वापरलाय असं वाटू शकेल पण त्यामुळे भरीत जरा मिळून येतं असं मला वाटतं.
ऑफिशिअली ब्याड वर्ड आणि कर्ड वापरलेलं आहे
करून लगेच खायचं.
करून लगेच खायचं.
छान लिहिली आहे पाकृ. आम्ही
छान लिहिली आहे पाकृ. आम्ही तूपजिऱ्याची फोडणी घालतो.
आम्ही तूपजिऱ्याची फोडणी घालतो
आम्ही तूपजिऱ्याची फोडणी घालतो++ amhi pan
इंटरेस्टिंग पाकृ, माहीत
इंटरेस्टिंग पाकृ, माहीत नव्हता हा प्रकार.
मस्त लिहिलं आहेस.
मस्त लिहिलं आहेस.
मस्त. आम्हीही तूप जिऱ्याची
मस्त. आम्हीही तूप जिऱ्याची फोडणी आणि नो बटाटा, नो दाण्याचं कूट. आता असं करून बघितलं पाहिजे.
दही न घालता केले तर चालेल का?
दही न घालता केले तर चालेल का? ऍलर्जी असल्याने दही चालत नाही
मी पण तुप जिऱ्याची फोडणी
मी पण तुप जिऱ्याची फोडणी घालते आणि नो बटाटा. बाकी योकू स्टाईल मस्तच
मस्त रेसिपी!
मस्त रेसिपी!
बटाटा घालून बघितलं नाही कधी.
बटाटा घालून बघितलं नाही कधी. वेगळी रेसिपी.
मी भोपळा शिजतानाच मिरची पण ठेवते त्याबरोबर. आलं हवंच आमच्याकडेही. तुप जिरं फोडणी करतो. बाकी साखर मी अजिबात घालत नाही, इथला भोपळा खूप गोड असतो त्यामुळे ओरीजनल गोड चव येते भरताला.
सगळं साहित्य घरात असल्याने
सगळं साहित्य घरात असल्याने लगेच करून पाहिलं. पण मी पण तूप जिऱ्याची फोडणी घातली आणि बटाटा घातला नाही. आल्याने खरंच भारी स्वाद येतो.
मस्त रेसिपी!
वरणभाताबरोबर फोड उकडायची अन
वरणभाताबरोबर फोड उकडायची अन गार झाली की कुस्करुन को.,ला.ति, किंचित साखर, दही.. २ मिन्टात भरीत तयार .. वरुन फोडणी.
बटाटा नको, आले घालून पहाते.
जरा गार झाले की यांत मीठ,
जरा गार झाले की यांत मीठ, साखर, कोथिंबीर, दही, आलं आणि दाण्याचा कूट घालावा.
आता एका कढल्यात तेल जिर्याची फोडणी करून/ जिरं फुलवावं आणि यात मिरच्या घालून जरा होऊ द्याव्यात>>> माझी एक कलिग सेम अ शीच भाजी करते.फक्त भोपळया एवेजी सुरण असत . ते ही चांगल लागत.
chhan
chhan
भोपळ्याचं भरीत पाककृतीही
भोपळ्याचं भरीत पाककृतीही टुणुकटुणुक धावत आहे.
बटाटा? बाबौ! भारी आयडिया
बटाटा? बाबौ! भारी आयडिया असतात एकेक तुझ्या!
हल्ली सगळ्याच रेसिपींमधे फोटोंना पूर्ण दांड्या मारल्यामुळे एक कडक वार्निंग देण्यात येत आहे.
व्ही बी, दही वापरायचं नसेल तर
व्ही बी, दही वापरायचं नसेल तर (अर्थात मग ते भरीत नाही होणार) -
साजुक तूप + जिर्याच्या फोडणीवर आलं; हिरवी मिरची परतून मग भोपळा घालायचा वर चवीप्रमाणे मीठ साखर आणि दाण्याचं कूट घालून जरा खरपूस होऊ द्यायचं प्रकरण पॅन मध्ये. अशी भाजी टाईप मस्त लागेल (उकडलेल्या बटाट्याची उपासाची भाजी करतो तसंच).
वांग्यांच्या भरताचा अपवाद (मला तरी हाच एक आठवतोय) वगळता भरतात बहुधा दही असतंच.
>>घालत नाही, इथला भोपळा खूप
>>घालत नाही, इथला भोपळा खूप गोड असतो त्यामुळे ओरीजनल गोड चव येते भरताला.
हो अन्जू.
>> बटाटा उगीच वापरलाय असं वाटू शकेल पण त्यामुळे भरीत जरा मिळून येतं असं मला वाटतं.
हं यासाठी एकदा बटाटा घालून पाहिला पाहीजे.
माझा अत्यंत आवडता प्रकार आहे हा.
होय आवडता पदार्थ
होय आवडता पदार्थ
वांग्याचे पण भरीत म्हणजे
वांग्याचे पण भरीत म्हणजे दह्यातले असते आमच्याकडे. बिना दह्याचे पंजाबी style ला 'भरता' म्हणतात.
बटाटा घेऊन अवघड आहे, आलं घालून बघते. Original लाल भोपळा भरीत प्रचंड आवडीचे आहे त्यामुळे त्यात काही बदल होणे अवघड!
बटाटा मी इमॅजिनच करु शकत नाही
बटाटा मी इमॅजिनच करु शकत नाही आहे.
भोपळा भरीत करते पण आलं आणि दाकु नाही घालत. ते घालून बघायला हवं. हिरवी मिरचीवरच माझी भिस्त असते.
अमेरिकेत खूप मोठा भोपळा तुकडा मिळतो. त्यामुळे बरेचदा भोपळा उकडून अर्ध्याचं भरीत आणि उरलेल्या अर्ध्यात कणिक-गूळ घालून घारगे होतात.
वांग्याचं दह्यातलं भरीत
वांग्यांच्या भरताचा अपवाद (मला तरी हाच एक आठवतोय) वगळता भरतात बहुधा दही असतंच. >>>
वांग्याचं दह्यातलं भरीत आमच्याकडे करतात, कोकणात तेच माहितीय जास्त. नवऱ्याला पंजाबी टाईप जास्त आवडतं, म्हणून तसं जास्त करते. मला दोन्ही प्रकार आवडतात.
भरता हा भरीतला हिंदी शब्द आहे
भरता हा भरीतला हिंदी शब्द आहे ना?
दह्यातले केले तरी ते लोक त्याला भरताच म्हणतील, भरीत नाही.
वांग्यांच्या भरताचा अपवाद
वांग्यांच्या भरताचा अपवाद (मला तरी हाच एक आठवतोय) वगळता भरतात बहुधा दही असतंच. >>>
वांग्याचं दह्यातलं भरीत आमच्याकडे करतात>>हो आमच्या कडे पण दह्यातील वांग्याचं भरीत करतात.
आणि मानव म्हणतोय ते बरोबर आहे हिंदी भाषीक कुठच्याही भरीताला भरताच म्हणतील
भोपळ्याचं भरीत पाककृतीही टुणुकटुणुक धावत आहे.>>>>>srd
मस्त पाकृ. मी भोपळा आणते
मस्त पाकृ. मी भोपळा आणते बरेचदा, हा प्रकार नक्की करून पाहीन.
ऑफिशिअली ब्याड वर्ड>>>>
कुठला बरे? की भरीत हाच ऑफिशिअली ब्याड वर्ड आहे????