जपान मध्ये शिकण्याच्या आणि करियरच्या संधी

Submitted by Ashwini_९९९ on 19 November, 2019 - 23:40

B.E. (IT) पास स्टुडण्टला जपानमध्ये करियरच्या काय संधी आहेत ?
जपानी भाषा शिकून झाली आहे. पुण्या मध्ये याबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या काही इन्स्टिटयूट आहेत का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी सुद्धा जपानी भाषा दुभाषक म्हणून काम करते! पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि रानडे इन्स्टिट्यूट ह्या दोन ठिकाणी तुम्हाला माहिती मिळू शकेल!

@ सामो.... धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद....
@ TI ....त्याने रानडे इन्स्टिटयूट मधूनच जपानी भाषेचा कोर्स पूर्ण केला आहे. आर्टिफिशिअल intelligence मध्ये तो आत्ता इंटर्नशिप करत आहे.
ह्याच्याशी रिलेटेड काही जपानमध्ये जॉबच्या संधी आहेत का ह्याची माहिती मिळेल का?

आर्टिफिशिअल intelligence madhe baryach sandhi tyala japan madhe upalabdha hou shaktil, tumhi ekda tilak maharashtra vidyapithala bhet dya. Japanese universities chi barich mahiti online milu shakte, tithe hya filed madhle kahi pudhche shikshan + internship programs ahet ka he baghu shakta! sadhya Enjin navachya eka werbsite var register karun tithe hi mahiti milte ka baghu shakta. he Field khupach boom madhe ahe ani bhavishyat khup sandhi ahet, Japanese che shikshan kiti zale ahe? Aaj kal Japanese Universities, Japanese na yenarya bharatiya mulana baryapaiki sandhi det ahet! kahi thikani vayachya maryada ahet. Student asel tr uttam sandhi! JLPT levels zalya nastil tar JLPT levels cha abhyas suru karava!

B.E. (IT) पास स्टुडण्टला जपानमध्येच जायचे काय कारण? केवळ जपानी भाषा येते म्हणून की ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्यात जपान अग्रेसर आहे म्हणून? उदा. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स. कदाचित इतर देशात पण A.I. मध्ये काम मिळू शकेल उदा. चीन, युके, कॅनडा, जर्मनी वगैरे.

एखादी भाषा शिकल्यावर आपोआप त्या देशात नोकरीसाठी जाण्याचा विचार सुरु होतो आपल्याही नकळत. नोकरी शक्य नसेल तर फिरायला तरी जावं असं वाटतं. आपण जो त्या देशाचा इतिहास, संस्कृती शिकलो, खाण्यापिण्याच्या पदार्थाना काय म्हणतात ते शिकलो, ते सर्व प्रत्यक्ष बघावं असं वाटतं.

एखादी भाषा शिकल्यावर ..... नोकरीसाठी जाण्याचा विचार सुरु होतो >>>
Ok. मग बंगाली किंवा तेलगू का शिकत नाही कुणी फारसे? किंवा मंडारीन, व्हिएतनामीज, पोर्तुगीज, रशियन वगैरे?

(कुणी कुठली भाषा शिकावी किंवा शिकू नये, याबद्दल टीकाटिप्पणी म्हणून न्हवे), पण खरोखर उत्सुकता म्हणून विचारले की बहुतेक विद्यार्थी जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, जॅपनीज अशा "सेक्सी" भाषा (इतरांकडून wow मिळेल अश्या) शिकतात कारण त्या भारतात शिकणे तुलनेने सोपे आहे आणि कॉलेजात मार्क कमवायला या उपयोगी पडतात. त्यामुळे तुम्ही म्हणता तसे, जी भाषा शिकलो त्या देशाचा इतिहास, संस्कृती, खाण्यापिण्याचे पदार्थ याबद्दल फारसे ममत्व असेल याबद्दल खरंच शंका आहे.

Koni kuthli bhasha shikavi ani tyache pudhe career karave ki nahi ha prattekacha vaiyaktit prashna ahe! shikshana cha drushtine vichar kela tar bangali, tamil, telgu hya bhashanmadhe udarnirvahasathi tyamanane sandhi kami ahet! ani जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, जॅपनीज अशा "सेक्सी" hya bhasha sexy kevha pasun zalya kiva tumhi ase ka mhanta he kalale nahi!
Me Japanese shikle karan mala Japanese culture baddal utsukata hoti, ani kanbhar hi kami utsukata mala aplya deshatlya bhashanbaddal nahi asa tyacha artha hot nahi! bhartatlya saglya bhashancha abhyas karta ala tar uttamach! for that matter mala french hi yeta! gujrathi bangali hi samjte!
tyamule @चंपा hyancha mhanna 100% patatay!
AI madhe kontyahi deshat sandhi upalabdha hou shaktil tyyat vaad nahi, Bhartat suddha! pan ekhadyala Japan la jayche asel tar tyat chukicha kahi watat nahi!
Me swata kadhihi Japan la gele nahi, sandhi milali nahi ani me khup prayatna kelehi nahit! pan ekda Japan la nakki bhet dyaychi ahe!

१. जपानी भाषा शिकलो आहे (आवड म्हणून), आणि करियरमध्ये संधी म्हणून जपानला जायचा विचार आहे (उदा. जर्मनीला जायला मिळत असले तरी जपानलाच जायचे आहे) की
२. पुढे करियरसाठी जपानमध्ये जास्त संधी आहेत, म्हणून जपानी शिकत आहे? असे मला विचारायचे होते.

आवड म्हणून जपानी शिकत असेल कुणी तर मग बंगाली किंवा तेलगू का शिकत नाही कुणी फारसे? किंवा मंडारीन, व्हिएतनामीज, पोर्तुगीज, रशियन वगैरे? => याचे उत्तर तुम्ही दिले आहे, bangali, tamil, telgu hya bhashanmadhe udarnirvahasathi tyamanane sandhi kami ahet!
माझे दोन्ही प्रतिसाद कृपया परत वाचलेत तर मला काय म्हणायचे आहे, ते लक्षात येईल. स्पष्ट होत नसेल तर तो माझ्या लेखनाचा दोष समजावा.

<<< Me swata kadhihi Japan la gele nahi, sandhi milali nahi ani me khup prayatna kelehi nahit! pan ekda Japan la nakki bhet dyaychi ahe! >>>
आयुष्यात कधीतरी एकदा जपानला जाईन केवळ या कारणासाठी, मी तरी जपानी भाषा शिकण्याचा खटाटोप करणार नाही. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी.
करियरसाठी मी तरी मँडॅरिन (918 million native speakers), स्पॅनिश (480 million native speakers) शिकायचा प्रयत्न करेन, पण पुन्हा तेच की प्रत्येकाची आवड वेगळी.

जाता जाता हे वाचा.: जपानमध्ये आय.टी. क्षेत्रात पगार तिथल्या तुलनेने जास्त असले तरी तिथली महागाई बघितली ते तसे कमीच आहेत.

Prattekache choices ani awdi veglya ani nusta deshat jata yava mhanun koni ti bhasha shikat nasta! tumhala nakki kai mhanycha ahe he spashta hot nahie! ekhadyane tyat shikshan ka ghetle ha prashna asel tr to nusta bhashepurta maryadit ahe ka? tumchya mhannya pramane ekhadyane IT kele tr medical ka nahi asa hot ahe!
bhasha he sadhan ahe ekhadi goshta ajun janun ghyayche! ti konti ani ka shikavi ha prattekacha icchecha bhag ahe! koni udarnirvaha sathi shikta koni hous mhanun!
ani Ashwini madam ni mahiti ahe ka vicharle mhanun tyana madat karavi hi apeksha ahe! madat hot nasel tar at least tyala virodh karu naye! kahi chukicha watla asel tr kshama asavi pan ha vaiyaktik mudda ahe tyamle hyavar kahi bolava asa watat nahi!

कृपया इथे वाद विवाद नकोत.... .प्रत्येकाची मत वेगळी असू शकतात.
भाच्याने आधीपासून ठरवले होते कि त्याला इंजिनीरिंग नंतर जपानलाच जायचे आहे.
@ IT त्याची JLPT ची ३ री लेवल चालू आहे.

जपानी शिकण्याचा मी अर्धवट प्रयत्न केलाय. याचे कारण माझे जपानवरती निरतिशय प्रेम आहे आणि माझ्या स्वप्नातला राहण्यायोग्य देश जपान आहे.
जपानचा "एजिंग प्रॉब्लेम" खरा आहे. या विकी लेखाच्या खाली तुम्हाला मान्यवर संस्था आणि सरकारांचे अहवाल सापडतील.
सेवा क्षेत्रातल्या खूप संधी जपान मध्ये तयार होतील. त्यामुळे भारतीय तरूणांनी जागरूक विचार केला पाहिजे.

तरीही -

जपानच्या एकंदरीत आयटी वाढीबाबत मी साशंक आहे. इथे बीई करून जपानला जाऊन टोक्यो/क्योटो किंवा ओसाकासारख्या ठिकाणी जॉब करणे मला फारसे सयुक्तिक वाटत नाही. त्याचे मुख्य कारण कोणत्या तंत्रज्ञानात करियर घडवायचं आहे त्यावर हे फार अवलंबून आहे. दुसरं कारण मोठी शहरे फार महाग आहेत. त्यामुळे तिकडे ना पैसा ना आयुष्य अशी पाळी येऊ शकते. एकटेपणा भेडसावणार त्याचं काय करायचं हेही ठरवावं लागेल. कारण श्यामछाप पोरांची धाव कुठवर असणार?
छोट्या गावांमध्ये जर आयटी जॉब करता आले तर पाहा. असे ट्रेंड अनेक लहान गावांमध्ये सुरु झालेले आहेत. कामियामा हे फार उत्तम उदाहरण आहे. अशा ठिकाणी तुम्हाला उत्तम आहार, जॉब आणि जपानी संस्कृतीत मिसळण्याची संधी मिळू शकते.

काही लिंक्स :
https://www.japantimes.co.jp/community/2019/01/30/how-tos/demand-non-jap...

https://yourstory.com/2019/10/tech-japan-connecting-indian-talent-japane...

भारतातल्या काही कंपन्या जपानसाठी इंजिनिर्स औटसोर्स करतात. तसेच काही इन्स्टिट्यूट्स 'भारतात जापनीज शिका आणि जपान मध्ये नोकरी करा' असेही बिसनेस मॉडेल चालवतात. मुंबई पुणे आणि इतर विद्यापीठांच्या सूचना फलकावर सर्रास असले पोस्टर्स सापडतील.

केवळ भाषेचं ज्ञान आहे म्हणून त्या देशात जाऊन नोकरी करायची असेल तर लवकरात लवकर त्या दिशेने पावले उचला - वर्क व्हिसा बद्दल माहिती, नोकरी करिता एजेन्सी, कुठे राहायचे वगरे. नेट वर खूप खोदून खोदून अभ्यास करावा लागेल.

Consulate-General of Japan ला भेट देत राहा सेमिनार्स किंवा तत्सम कार्यक्रमांसाठी.

मार्गदर्शन आणि सल्ल्यांसाठी सर्वांचे आभार !!
तो जपानला चालला आहे या डिसेंबर मध्ये.....ज्या इन्स्टिटयूट मधून त्याने जपान लँग्वेज कोर्स पूर्ण केला, त्यांनीच त्याचे तिथे जॉब interviews arrange केले आहेत.

माझ्या भावाच्या मुलाला जपानमध्ये जॉब मिळाला .
१ ऑक्टोबर 2020 ला जॉईन व्हायचे आहे,.
भारतातून 40 ( त्यात पुण्यातली १२ जण) स्टुडन्ट गेले होते. त्यातून हा आणि अजून एक चेन्नई चा स्टुडन्ट सिलेक्ट झाला.

तुम्हा सगळ्यांच्या सल्ल्यांबद्दल धन्यवाद.

माझा पुतण्या इकडून क्याम्पस इंटरव्यूमध्ये सिलेक्ट झालेला. ती जपानी कंपनी अमेझोन टाईप मार्केटिंगची होती. सहा महिन्यांत शेवटची परीक्षा होईपर्यंत जपानी भाषा जुजबी शिकायला सांगितले ते स्काईपवर पूर्ण केले आणि तो रिझल्टच्या अगोदरच गेला होता. दीड वर्षांचा अनुभव घेऊन मग युएसमध्ये पिजीसाठी अर्थ केला. तिकडे शिकून आताच जॉब मिळाला.
माझ्या मते सुरुवातीच्या संधीचा फायदा उठवावा. तुमच्या पुतण्याचे भविष्य करिअर चांगले होणार याची खात्री आहे.

एखादी भाषा शिकल्यावर ..... नोकरीसाठी जाण्याचा विचार सुरु होतो >>>
मी सुद्धा तेलगू भाषा शिकलो आणि तेंव्हापासूनच अमेरिकेला जायचा विचार डोक्यात येऊ लागला !!!