Submitted by मोरपिस on 6 November, 2019 - 03:24
काही दिवसांपूर्वीच अग्निहोत्र-२ ही मालिका येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अग्निहोत्राच्या पहिल्या भागाने तर धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये शरद पोंक्षे, मोहन जोशी, विनय आपटे, इला भाटे, मुक्ता बर्वे इ. कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका खूप रंजक बनली होती. आता अग्निहोत्र-२ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार यात शंका नाही. अग्निहोत्रच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागातील जास्तीत जास्त कलाकार असतील तर अजूनच मजा येईल. दुसऱ्या भागात काय नवीन रहस्य दडलेली असतील हे पहायची माझी खूप उत्सुकता आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
निरंजन समिहा जोडी बघायला
निरंजन समिहा जोडी बघायला आवडेल. मला ही दोघं जास्त आवडतात.
अर्थात इथे नायक नायिका जोड्यांपेक्षा सप्तमातृका कोडं लवकर सोडवलं तर आवडेल, सिरीयल जास्त लांबणार असेल तर इंटरेस्ट निघून जाईल, आत्ताच स्लो वाटतेय. आतातरी महादेव काका घरी पोचूदेत.
पण तो निरंजन पॉझिटिव्ह
पण तो निरंजन पॉझिटिव्ह कँरँक्टरच आहे ना,कधीकधी तो मला निगेटिव्ह वाटतो.कारण अक्षरा आणि विक्रमची जोडी दाखवायची असेल तर निरंजनमध्ये काहीतरी खोट दाखवतील हे लोक.
पण क लक्षात आल का,ज्या ज्या मात्रुकांच्या मूर्त्या तो सुहाह पळशीकर लावत होता त्या सगळ्या अविवाहित आहेत,मग भागीरथी कशी येईल,म्हणजे अजून चार मात्रुका यायच्या बाकी आहेत.म्हणजे परत चार नवी कँरँक्टर्स.
त्या सगळ्या अविवाहित आहेत >>
त्या सगळ्या अविवाहित आहेत >> पण पुढच्या मातृका अविवाहित असतीलच असा काही नियम नाही ना
आला महादेवकाका वाड्यात
आला महादेवकाका वाड्यात
गोन्साल्विसचे काम करणारा कलाकार कोण आहे?
ती अक्षरा कित्ती मठठ आहे,
ती अक्षरा कित्ती मठठ आहे, मोठ्यामोठ्याने फोटो दाखवत सांगत होती, ह्या बघ हातात अंगठ्या. वाड्याच्या बाहेर पण ऐकू गेलं असेल आणि गोन्साल्वीस तर जवळ होता, बरं त्या अंगठ्या इतक्या उठून दिसत होत्या एरवीही, तरी समीहाचं लक्ष गेलंच नाही आधी कधी त्याच्याकडे. दोघींना इतकं उल्लू बनवता येऊ शकते की बास रे बास.
कलाकार नाही माहिती पण बरेचदा असतो सिरियल्समधे.
महादेवकाका आलेले मला आज रात्री बघायला मिळतील, पण प्रीकॅप बघितला, आता शरद पोंक्षे परत छान तेजस्वी दिसतायेत, आजारपणाच्या खुणा जाणवत नाहीयेत, मध्ये जाणवत होत्या.
बरं त्या अंगठ्या इतक्या उठून
बरं त्या अंगठ्या इतक्या उठून दिसत होत्या एरवीही, तरी समीहाचं लक्ष गेलंच नाही आधी कधी त्याच्याकडे. दोघींना इतकं उल्लू बनवता येऊ शकते की बास रे बास.
होना अगदी सहज त्या अंगठ्यांकडे लक्ष जातं.
गोन्साल्विसचे काम करणारा
गोन्साल्विसचे काम करणारा कलाकार - ह्रदयनाथ राणे
बऱ्याच सिरिअल्स मध्ये असतो . जय मल्हार मध्ये होता माझ्या आठवणी प्रमाणे.
धन्स मनीला
धन्स मनीला
दोघींना इतकं उल्लू बनवता येऊ
दोघींना इतकं उल्लू बनवता येऊ शकते की बास रे बास.>>पण अक्षरा जरा जास्तच भैताड दाखवली आहे
अक्षरा स्वतःला जाम अतिशहाणी
अक्षरा स्वतःला जाम अतिशहाणी समजते, साधं बोलायचं तरी ठासून ठासून आव आणत बोलत असते, जाम बोअर करते. समिहा आणि आता संगीता येईल त्या दोघींपुढे फिकी पडणार आहे, समिहासमोर पडतेच आहे.
शैलेश दातार मस्त करतायेत, भिती वाटायला लागली.
अजुन सुरु आहे होय ही सिरीअल.
अजुन सुरु आहे होय ही सिरीअल. टीआरपी बघता मागेच बंद झाली असेल असं वाटलेलं.
शैलेश दातार मस्त करतायेत>>हो
शैलेश दातार मस्त करतायेत>>हो
डीजे, टीआरपी कुठे बघता येतात?
डीजे, टीआरपी कुठे बघता येतात??
तसंही trp मध्ये पहिल्या पाच
तसंही trp मध्ये पहिल्या पाच कायम झी मराठी सिरियल्स असतात. नंतर पाच मधे काहीना स्थान मिळालं तर मिळते म्हणून झी च्या काही भंगार सिरियल्स वर्षानुवर्षे चालतात.
आता हे काय खो खो खेळत आहेत का
आता हे काय खो खो खेळत आहेत का? निरंजन आला आणि विक्रम गेला गोव्यात,महादेव वाड्यात आला,अण्णा फोनवर बोलण्यापुरताच राहिला आहे.
समीहा गेली आता संगीता वाड्यात आली.
समीहा गेली, बोअर होणार.
समीहा गेली, बोअर होणार. समीहा आणि संगीता दोघी एकत्र हव्या होत्या वाड्यात. हि सिरीयल वेगवान आणि चार सहा महिन्यासाठी हवी होती, लिमिटेड एपिसोड्सची, आत्ताच कंटाळवाणी झालीय.
७ मातृका आणायच्या आहेत एकत्र
७ मातृका आणायच्या आहेत एकत्र! किमान वर्ष दिड वर्ष चालेल!
त्यातल्या देखिल काही मातृका मध्येच बदलू शकतात!
दीड वर्ष कोण बघणार, आता
दीड वर्ष कोण बघणार, आता आठवड्यातून एक दिवस बघू का विचार करतेय.
मुख्य मातृका बोअर आहे. तिलाच जास्त काम दिलंय.
डीजे, टीआरपी कुठे बघता येतात?
डीजे, टीआरपी कुठे बघता येतात?? >> इथे - https://www.auditionform.in/news/news/marathi-serial-trp-ratings/
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=6UycgzNmwis
मालिकेत मोहन जोशींची एन्ट्री
जाम बोअर होतेय मला ही सिरीयल.
जाम बोअर होतेय मला ही सिरीयल. बिग बॉस सुरु होईपर्यंत बघेन, मग आपोआप सुटेल.
काल अक्षराच्या आईने छान सुनावलं तिला, साधा चौकशीचा फोन कधीच करत नाही, कामासाठी बाबांना फोन सतत.
त्या अक्षराच्या अभिनयात तोच तोचपणा आहे आणि तिलाच जास्त काम आहे, तिच्याबरोबर तो समीर बघून तोही आवडेनासा होत चाललाय मला
सोमवार एपिसोडमधे महादेवकाका रंगी दोघांचा सीन रंगला, दोघांनी फार छान केला.
मो जो एक दोन सीन्स साठी येतील, कारण ते हिंदी डेली सोपमध्ये बिझी आहेत.
It's a wild goose chase this
It's a wild goose chase this time! काहीतरी लॉजिक आहे का प्लॉट लाईनमध्ये? आत्तापर्यंत मिळालेल्या दोन मोहरा वाड्यात काम करत असलेल्या कामगारांना मिळाल्या याचा अर्थ उरलेल्या मोहोरा कदाचित कामगार जिथे काम करत होते तिथे जाऊन शोधाव्या हे काही अक्षराच्या (=कथा लेखकाच्या) डोक्यात येत नाही. किंबहुना दोन्ही मोहरा आपल्याच वाड्यात सापडल्या हाच साक्षात्कार घडायला किती वेळ लागेल देव जाणे!
संगीचं काम फार छान होतय! आवडली ती मला. तिचे आणि महादेव काकांचे सीन बघायला मजा येते.
खरय.अक्षरा जाम डोक्यात जायला
खरय.अक्षरा जाम डोक्यात जायला लागली आहे.खोट बोलण्याच्या गुन्ह्याखाली हिलाच पोलिसांनी अटक करायला पाहिजे.
अक्षरा ही पुण्यात वाढलेली,
अक्षरा ही पुण्यात वाढलेली, शिकली सवरलेली मुलगी असूनही एवढी बावळट का दाखवली आहे, जी पोलिसांशी खोटं बोलते आणि गुंडांना शोधायला जाते?
ही सिरीयल संपतेय किंवा वेळ
ही सिरीयल संपतेय किंवा वेळ बदलतेय. नऊ मार्चपासून नवीन सिरीयल येतेय रात्री दहाला.
अक्षराला नावं ठेऊन आले
नवीन प्रोमोवर आणि समीहा संगीताचे कौतुक करून आले. मो जो आणि रोहिणीआत्या भुयारात अडकतात असा आहे प्रोमो.
नऊ मार्चपासून नवीन सिरीयल
नऊ मार्चपासून नवीन सिरीयल येतेय रात्री दहाला......कोणती सिरियल.स्टार प्रवाहने सपाटा लावला आहे नवीन सिरियली काढण्याचा.
वैजू नं. १ सिरीयलचं नाव,
वैजू नं. १ सिरीयलचं नाव, समीर खांडेकर आहे, माधुरी मिडलक्लास आणि काहे दिया परदेसमधे होता. मिहीर राजदा आणि त्याची बायकोपण आहे. खरंतर याचे प्रोमोज पुर्वी दाखवायचे पण ऑन एअर यायला उशीर झाला आणि सहकुटुंब सहपरीवारचे प्रोमोज ऑन एअर तारीख घेऊनच आले.
मो जो आलेत. ह्यात त्या
मो जो आलेत. ह्यात त्या निरंजनला मेन बॉस दाखवा, रुद्रम सारखं. अक्षराचे केस आवडतात मला आणि डोळे कधी कधी. तिला एकच ड्रेस दिला आहे बहुतेक, तीच घालून दुनिया फिरते. काल पी एन जी ची अॅड केली. मी निरंजन अक्षरा सीन म्युट ठेवला, फार बघितलाही नाही. मला समीरबरोबर ती, असं बघायला ऐकायला त्रास होतो
मो जो भांडून गेले
मो जो भांडून गेले
कथा फार विखुरलेली वाटते आहे.
निरंजन / रेमो कुणीतरी खलास होण्याची शक्यता आज दाखवतील
आता आवरायला सुरुवात करायला
आता आवरायला सुरुवात करायला हवी, जमत नाहीये. रुद्रम, कट्टीबट्टी सारख्या सिरीयल्स देणारी टीम असं करतेय, यावर विश्वास बसत नाहीये.
नशीब अक्षराला दुसरे ड्रेसेस दिले, किती दिवस एकच ड्रेस घालून घरात बाहेर फिरत होती. समीहाला फार काही काम नाहीच.
काल तरी रेमो वाचला. एकतर मला त्या मुळपुरुषाचं कळत नाही, काल संगी रंगीला मोहोर वाड्याबाहेर नेऊ दिली नाही, अशीच गोष्ट कामगारांबाबत का झाली नाही, ते आरामात घेऊन गेले, इथे तिथे विकल्या.
ह्या सिरीयलची वेळ बदलणार असेल, नऊ मार्चला नवीन सिरीयल येतेय. संपणार असेल असं कथानक नेतायेत असं वाटत नाही.
Pages