तिखट कडकणी by Namrata's CookBook : १७

Submitted by Namokar on 4 October, 2019 - 04:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

SAVE_20191001_120850.jpg

१ वाटी मैदा
१ वाटी बेसन पीठ
२ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता)
मीठ
तेल
पाणी
जिरे
ओवा
Screenshot_2019-10-04-12-21-59-886_com.google.android.youtube.png

क्रमवार पाककृती: 

१. एका भांड्यात /परातमध्ये १ वाटी मैदा , १ चमचा रवा / सूजी घ्या आणि चवीनुसार मीठ घालून , आवश्यकतेनुसार पाणी घालून मळून घ्या.
२. आता थोडेसे तेल घेऊन पुन्हा कणीक मळून घ्या. झाकून ठेवा
Screenshot_2019-10-04-12-24-35-493_com.google.android.youtube.png

३. आता बेसन पीठ घ्या, चवीनुसार मीठ, लाल तिखट, जिरे, ओवा घाला,आवश्यकतेनुसार पाणी घालून कणिक मळून घ्या.
४. आता थोडे तेल घालून परत कणीक मळून घ्या
५. बेसन पीठाचे लहान आकाराचे गोळे बनवा
Screenshot_2019-10-04-12-28-06-582_com.google.android.youtube.png
६. मैद्याचा पीठाचे थोडेसे मोठे गोळे बनवा
७. मैद्याचा गोळा घ्या, हाताने छोटी पुरी बनवा
Screenshot_2019-10-04-12-29-48-899_com.google.android.youtube.png
८. आता बेसन पिठाचा छोटा गोळा यामध्ये घालून आणि सर्व बाजू व्यवस्थित बंद करा(पुरण पोळी सारखे)
Screenshot_2019-10-04-12-29-58-316_com.google.android.youtube.png
९. आता पीठाचा लावून चपती सारखे लाटून घ्या (पातळ लाटा)
Screenshot_2019-10-04-12-30-39-750_com.google.android.youtube.png
१०. कढईत तेल घ्या, तेलात गरम झालेकी मध्यम आचेवर कडकणी तळून घ्या
Screenshot_2019-10-04-12-30-59-520_com.google.android.youtube.png
तिखट कडकणी तयार आहे

SAVE_20191001_120850.jpg

अधिक टिपा: 

रेसिपीचा पूर्ण व्हिडीओ : https://youtu.be/3HaE7ak7i9Q

वरील मजकूर आणि प्रतिमा त्या लेखकाच्या आहेत. प्रिंट आणि वेब कोणत्याही माध्यमात कोणतीही सामग्री पुनरुत्पादित होण्यापूर्वी लेखकाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे .

माहितीचा स्रोत: 
आज्जी , आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवरात्रात सातारा भागात अशा कडकण्यांची माळ करतात बहुतेक. ही कडकणी जर न तळता खरपूस भाजून घेतली तर छान खाखऱ्यासारखी लागेल असं वाटलं. करुन बघायला हरकत नाही.

नवरात्रात सातारा भागात अशा कडकण्यांची माळ करतात बहुतेक. >>> कोल्हापुरातही करतात, पण ती तिखट कडाकणी नसुन गोड कडाकणी असतात

मस्त रेसिपी.
बादवे, दाल पकवान मधील पक्वान असेच बनवत असावेत!

रेसिपी छान आहे.
Btw चणा डाळीचे पिठ = बेसन.
बेसन पीठ ऐकायला फार विचित्र वाटतं.

चणा डाळीचे पीठ म्हणजे बेसन नाही.
विकतचे बेसन, चणा डाळ + वाटाणे + मका + सोयाबीन असे मिक्स धान्याचे पीठ असते. अर्थात मुख्य घटक चणाडाळच असते. हॉटेलातून बटाटेवडे वगैरे बनवण्यासाठी असेच बेसन वापरतात.

चणा डाळीचे पीठ म्हणजे बेसन नाही.>> छान शोध आहे हा. मग pure चणा डाळीच्या पिठाला काय म्हणतात ते पण सांगून टाका.

बेसन पीठ म्हणजेच चणा डाळीचे पीठ. वाटाणा , मका हरभऱ्यापेक्षा स्वस्त असल्याने भेसळ सुरू झाली. आमच्या कडे पिठल्याला बेसन हा समानार्थी शब्द आहे.

शुद्ध चणा डाळीचे पीठाचे पदार्थ जास्त तेल पित असावेत म्हणून हॉटेलवाले शुद्ध बेसन पीठ वापरत नाहीत.

जसे व्होल मिल्क, २%, १% , फॅट फ्री, स्कीम, लॅक्टोज फ्री असे सगळे मिल्कच असते तसाच बेसन हा प्रकार आहे.
तुम्हाला त्यापासून कुठला पदार्थ बनवायचा आहे ह्यावरून कुठले बेसन निवडायचे ते ठरते.
बटाटेवडा, फरसाण, लाडू, ढोकळा ह्या सगळ्यांसाठी बेसनच लागते पण ह्यात वापरलेला बेसनाचा प्रत्येक प्रकार वेगवेगळा असतो. ज्यात वर ऊल्लेखलेले घटक कमी अधिक प्रमाणात येतात. हलवायांना विचारून पहा ते छान समजावतील.
तुम्हाला १००% चणा डाळीचे पीठ हवे असेल तर दुकादाराला प्युअर बेसन मागून पहा... पुना डाळ अँड बेसन मील्सचा हीरा ब्रँड तुम्हाला १००% नाही पण त्यातल्या त्यात सर्वात जास्त चणा दाळ कंटेंट वाले पीठ देईल. १००% चणाडाळीचे बेसन सर्वात कमी विकणारे बेसन असते.
घरी चणा दाळ दळून आणून बटाटेवडे करून पहा... हॉटेलातल्याईतके स्वादिष्ट होऊन आवडले तर ईथे रेसिपी लिहा.

इतके रामायण सांगायची गरज नव्हती. मी इतकंच म्हणाली होती की बेसन हे पिठच असतं (चणाडाळीचं) त्यामुळे बेसन पुढे पिठ शब्द लावायची गरज नाही. ऐकायला विचित्र वाटते.
Thats it.

ओह! तुम्ही प्रश्न विचारला म्हणून माहिती सांगितली. माफ करा चूक झाली.
इतके रामायण सांगायची गरज नव्हती. मी इतकंच म्हणाली होती की बेसन हे पिठच असतं (चणाडाळीचं) >> बरोबर. सीता ही रामाची बहीण होती असेही एक रामायण सांगितल्या जाते.

माझं तर असं आहे की जेजे आपणासी ठावे ते इतरा सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ...........

भारी.
कडाकण्या म्हणतो आम्ही. टेस्टी प्रकार.

छान आहे रेसिपी आणी तिखट कडाकणी ची कल्पना.

मला गोड कडाकण्या खुप आवडतात. पण आमच्यात करत नाहित. पण आम्ही जिथे रहात होते तिथे दसरा असतो तेंव्हा काही लोकांकडे गोड कडाकण्या करायची पद्धत आहे. पुर्वी लोक खुप कडाकण्या करुन सगळी कडे वाटायची. भरपुर करत असल्याने आम्ही लाटायला जायचो शेजारी. पण आता एखादी गोष्ट करुन आजूबाजुला वाटयची प्रथा बंद झालीये . त्यामूळे गोड कडाकण्या खायला मिळत नाहित Sad

या पदार्थांच फक्त नाव ऐकल होतं आणि नावावरून वेगळाच पदार्थ वाटला होता. छान आहे रेसिपी आणि तुम्ही थोडक्यात छान समजावता. सचित्र असल्याने अजून आवडतं.
(माझ्यासारखं) ज्यांना कॉफीबरोबर नमकीन खायला आवडतं त्यांच्यासाठी योग्य पदार्थ.

हाब, बेसन पिठाची ही माहिती, माझ्यासाठी अगदीच नवीन आहे.

श्रध्दा, बेसन पीठ म्हणतात की. आणि ते योग्य पण ठरेल कारण बरेच ठिकाणी पिठल्याला बेसन म्हणतात.

त्यांनी बेसन पीठ म्हटलंय , तसंच मैद्याचं पीठही म्हटलंय आणि लाल तिखटसुद्धा.

इथे पीठ म्हणजे मळलेला गोळा म्हणायचं असावं.

त्यांनी बेसन पीठ म्हटलंय , तसंच मैद्याचं पीठही म्हटलंय आणि लाल तिखटसुद्धा.
इथे पीठ म्हणजे मळलेला गोळा म्हणायचं असावं.
Submitted by भरत. on 4 October, 2019 - 23:04
भरतजी कृपया राग मानू नका. मी देखील वरती बेसन पीठावर माझं मत लिहिले आहे. पण असं वाटलं की उत्खनन करून एखाद्या शब्दाचा कीस काढणं ही माबोकरांची खासियत आहे.