बालवैज्ञानिक - लहानग्यांसाठी "विज्ञान प्रकल्प" उपक्रम (मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.)

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

baalvaidnyaanik.jpg

नमस्कार मायबोलीकर!
विज्ञान या शब्दात ज्ञान हा मूळ शब्द आहे. विज्ञानाची सोपी व्याख्या, विशेष ज्ञान, विशिष्ट ज्ञान म्हणजे विज्ञान अशी करता येईल. विज्ञान कधी अस्तित्वात आलं याचा विचार केला तर असं लक्षात येतं की माणसाच्या उत्क्रांती पासून विज्ञान आहे आणि त्याची निरंतर प्रगती होत आहे. उतारावरून झाडांचे ओंडके घरंगळत येताना पाहून चाकाची कल्पना माणसाच्या मनात आली. चाकाचा शोध हा सर्वात प्राचीन शोध समजला जातो. चाकाच्या शोधापासून ते चांद्रयान, महासंगणक, मोबाईल फोन्स, आणि इतरही अनेक शोध ही विज्ञानाची प्रगती मानवाला अचंबित करणारी आहे.
आपण कणाद किंवा आइनस्टाइन नसलो म्हणून काय झाले? कुतूहल असेल, ते शमवण्यासाठी विचार आणि प्रयोग करण्याची तयारी असेल, तर विज्ञानाच्या वाटेवर आपणही चालत राहू शकतोच! कुतूहल हा विज्ञानाचा स्रोत आहे.

आता सगळीकडे गणेशोत्सवाचे वारे वाहत असताना, मायबोलीवर सुद्धा अनेक स्पर्धा आणि उपक्रमांची तयारी सुरू झालीये. तुम्ही सुद्धा स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची तयारी सुरू केली असेलच... पण त्याचबरोबर तुमच्या पाल्यांसाठीही आम्ही एक शैक्षणिक उपक्रम घेऊन आलो आहोत - बालवैज्ञानिक.
बालवैज्ञानिक हा उपक्रम आपण भावी मायबोलीकरांच्या शोधक वृत्तीला चालना देण्यासाठी राबवणार आहोत. तरी आम्ही मायबोली तर्फे सर्व मायबोलीकरांना आग्रह करू इच्छितो की, त्यांनी आपल्या पाल्यांना या उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे.
या उपक्रमात Working Modelsच असावे, असा मुळीच आग्रह नाही. तुम्ही प्रकल्पाची प्रतिकृतीही सादर करू शकतात, किंवा पोस्टर जरी असेल तरी चालेल. पण प्रकल्प विज्ञानावर आधारित असणे बंधनकारक आहे.

या उपक्रमाच्या प्रवेशिकेत खालील बाबींचा समावेश असावा
१. प्रकल्पाचे नाव
२. प्रकल्पाचे फोटो (कमीत कमी १ आणि जास्तीत जास्त ७)
३. प्रकल्पासाठी वापरलेले साहित्य (जर मॉडेल असेल तर)
४. प्रकल्पाचा उद्देश किंवा त्याचा व्यवहारिक उपयोग
५. या प्रकल्पाची कल्पना कशी सुचली आणि तुम्ही यातून काय शिकलात?

नियम
१. बालवैज्ञानिक ही स्पर्धा नसून, एक उपक्रम आहे.
२. हा उपक्रम केवळ मायबोलीकरांच्या पाल्यांकरिता आहे.
३. मुलं प्रकल्प सादर करण्यासाठी आपल्या पालकांची मदत घेऊ शकतात.
४. या उपक्रमात आधीपासून बनवलेले प्रकल्प सुद्धा वापरता येतील.
५. एक आय. डी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका सादर करू शकतो.
६. कृपया तुमच्या पाल्याने तुमच्या मदतीने केलेले प्रकल्पच केवळ सादर करावेत, बाहेरील किंवा आंतरजालावरील प्रकल्प सादर करू नयेत. (त्यांच्या प्रतिकृती, ज्या तुम्ही बनवल्यात त्या ग्राह्य धरता येतील.)

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या :
१. प्रवेशिका पाठवण्याकरिता 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
२. 'मायबोली गणेशोत्सव २०१९' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
३. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१९ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
४. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे - {बालवैज्ञानिक} - {प्रवेशिकेचं नाव} - {तुमचा आयडी}
५. प्रवेशिका ०२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१९ या वेळेत पाठवता येतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users