असंच कुठेतरी व्हिडिओ पाहातांना हे दिसलं होतं. थोडं इम्प्रॉव्ह करून मस्तच चव जमली. मोस्टली घटक सगळे घरात असणारेच आहेत आणि एखाददिवशी भाजीला पर्याय म्हणून खरोखरीच सुरेख आहे. तर घटक -
- दीड वाटी तुरीची डाळ
- एक टेबलस्पून किंवा आवडत असेल तर जरा जास्तही मेथ्या
- एक मध्यम मोठा कांदा
- २/३ हिरव्या मिरच्या
- मूठभर हिरवीगार ताजी फडफडीत कोथिंबीर
- ४-५ चमचे तेल
- मोहोरी -जिरं अर्धा चमचा, मोठी चिमटी हिंग
- ५-६ लसूण पाकळ्या
- लाल तिखट (आवडीनुसार)
- मीठ चवीनुसार
- घरचा असेल तर उत्तमच नाहीतर बाजारचा (मी अंबारीचा वापरला) अर्धा चमचा गोडा मसाला
तुरीची डाळ आणि मेथ्या निसून, स्वच्छ करून एकत्रच पाण्यात भिजत घालावं तासभर तरी; (हा वेळ कृतीत धरलेला नाही, अर्थात). नंतर निथळून फोडणीत घालायला तयार ठेवावं. फोडणीत पडण्याआधी डाळ.-मेथ्यांमधलं पाणी पूर्णपणे निघून जायला हवं.
एकीकडे भांडभर पाणी गरम करत ठेवावं.
दोन लहान चमचे तेलाची खमंग फोडणी करून त्यात मोहोरी-जिरं-मोठी चिमटी हिंग घालून वर जरा जाड चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. फार परतत बसायचं नाही कांदा जरा पारदर्षक झाला की डाळ + मेथ्या घालाव्या आणि अगदी बारीक आचेवर चांगले ८-१० मिनिटं तरी परतावं. अतीच कोरडं वाटलं तर पाणी न घालता लहान चमचाभर तेल घालावं.
डाळ चांगल्यापैकी परतल्या गेली की शिजल्यानंतर जरा मोकळी होते म्हणून परतणं आवश्यक आहे.
यात आता हळद , मीठ आणि बेताचं गरम पाणी घालून एकदा ढवळावं आणि वर झाकण घालून उसळ नीटपैकी शिजू द्यावी. अधून मधून जरा पाहायला लागेलच अर्थात; पाणी कमी वाटलं तर बेताबेतानंच घालायचं आहे.
ही अगदी गीर्र शिजवायची नाहीय, सो ९०-९५% झाली की आच बंद करावी, गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट हलवून झाकण घालून १० मिनिटं तरी मुरू द्यावं.
आता सगळ्यात मस्त प्रकार - वाढायच्या अगदी आधी उरलेलं तेल लहान कढल्यात कडकडीत तापवून त्यात लसूण ठेचून लालसर तळून घ्यावा; आच बंद करून रंगापुरतं लाल तिखट घालून हे उसळीवर ओतावं. मधून मधून कोथिंबीरीचा हिरवा, डाळीचा पिवळा, कमी प्रमाणात मेथ्यांचा तपकिरी आणि वरून ओतलेल्या फोडणीचा लाल + खरपूस सोनसळी लसणाचा असे विविध रंग असलेली डाळ-मेथ्यांची उसळ तयार आहे. अत्यंत टेस्टी अशी ही उसळ पोळी, भाकरी बरोबर गरमच खावी. भाकरीबरोबर विशेष चविष्ट लागते.
तुरीच्या डाळीचा प्रकार जरी असला तरी टेक्स्चर उसळ टाईप + अगदी अंगासरसा रस असं असायला हवंय. सो त्यामानानी गरम पाणी बेतानी घालत शिजवायचं आहे.
टेबलस्पूनभर जरी मेथ्या असल्या तरी कडसर चव नव्हती; असली तरी मला जाणवली नाही.
मस्त आहे. छान लिहिलंय
मस्त आहे. छान लिहिलंय साग्रसंगीत नेहेमीप्रमाणे.
वाढायच्या आधी उरलेलं तेल लहान कढल्यात कडकडीत तापवून त्यात लसूण ठेचून लालसर तळून घ्यावा; आच बंद करून रंगापुरतं लाल तिखट घालून हे उसळीवर ओतावं. >>> हे लय भारी एकदम.
मस्तच वाटतेय रेसिपी
मस्तच वाटतेय रेसिपी
मस्त वर्णन आहे.आम्ही घरी डाळ
मस्त वर्णन आहे.आम्ही घरी डाळ कांदा करतो.साधारण याच रेसिपी ने, मेथ्या न घालता आणि लसूण फोडणी न देता.
कोथिंबीरीचा हिरवा, डाळीचा
कोथिंबीरीचा हिरवा, डाळीचा पिवळा, कमी प्रमाणात मेथ्यांचा तपकिरी आणि वरून ओतलेल्या फोडणीचा लाल + खरपूस सोनसळी लसणाचा असे विविध रंग असलेली डाळ-मेथ्यांची उसळ >>> मस्त वर्णन. वाचूनच खावीशी वाटतेय. नक्की करून बघणार.
तोंपासु . योकू स्पेशल फडफडीत
तोंपासु . योकू स्पेशल फडफडीत कोथिंबीर हा शब्द वाचून झ्याक वाटलं,.
:
आमच्या कडे करतात, फक्त मेथ्या तळून डाळीत घालून वरण आधी शिजवून घेते, कुकरमध्ये एखादी शिटी मग सेम रेसिपी. शेवटची स्टेप तर मस्टच आहे ,लसणीची चरचरीत फोडणी. आम्ही ह्याला उसळ न म्हणता डाळमेथ्यांचं वरण म्हणतो,.
अशी डायरेक्ट फोडणीला डाळ पण करते मी कधी कधी, आता उद्याच करते
वाह, फार भारी पाककृती. फोटो
वाह, फार भारी पाककृती. फोटो नाहीये का
मजा आली वाचताना. करून बघेन
मजा आली वाचताना. करून बघेन नक्कीच.
फोटो असता तर....
मुंह मे जोरसे लाळ आ गयी पढकर.
मुंह मे जोरसे लाळ आ गयी पढकर. लिखने का तर्रीका बहुत अच्छा है योकू भै.
अशी डाळ बाळंतीणीला देतो आम्ही
अशी डाळ बाळंतीणीला देतो आम्ही.
डाळमेथी... अहाहा. आम्ही
डाळमेथी... अहाहा. आम्ही कांदा लसूण न घालता करतो. वाटीत घेवून नुसतीही खायला मजा येते.
गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर >>>> गरम मसाला की गोडा मसाला घातलायस? साहित्यात गोडा मसाला आहे.
मस्तच कृती!
मस्तच कृती!
मस्त ...
मस्त ...
आम्ही याला डाळमेथी म्हणतो आणि
आम्ही याला डाळमेथी म्हणतो आणि ती मोड आलेल्या मेथ्या घालूनच करतो. नो कांदा/लसूण.... आमसूल-गूळ ओलखोबरं घालून करतो.
आम्ही घरी डाळ कांदा करतो
आम्ही घरी डाळ कांदा करतो.साधारण याच रेसिपी ने, मेथ्या न घालता आणि लसूण फोडणी न देता.>>>>> आम्हीही, परंतु लसूण खोबरं घालतो वाटलेलं.
मस्त आहे पा कृ. नक्की करून पाहीन
अश्वे, गोडा मसालाच.
अश्वे, गोडा मसालाच.
मोडाच्या मेथ्यांची निराळ्या पद्धतीची उसळ होते कधी कधी घरी. आईच्या हातची सुरेख होते, एकदा विचारून करून पाहीन.
याच मेथ्या नुसत्या भिजवून नंतर पाण्यात उकळून ते पाणी टाकून द्यायचं. आणि त्या उकडलेल्या मेथ्यांचा झुणका ही करते आई. वेळेनुसार दोन्ही रेस्प्या देइनच इथे
मोड आलेल्या मेथीची पण आमटी
मोड आलेल्या मेथीची पण आमटी करतातना, डाळ वगैरे न घालता. सा बां कडून ऐकलं आहे. खाल्ली नाहीये कधी. सासरे मस्त करायचे, असं त्या सांगायच्या. रेसिपी सांगितलेली पण मी विसरले.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/4432 >> आम्ही अशी करतो ! तुझि क्रुती वेगळि आणी जरा भाजी कॅटेगरीतली आहे, मस्त आहे , फुटवा?
रेसिपी छान आहे, पण एक शंका
रेसिपी छान आहे, पण एक शंका आहे. तुरीची डाळ अन मेथी, पित्त होत नाही का?
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/4432
यह तो गायब हो चुका हैं.