२ किवी
१/२ वाटी साखर
१/२ वाटी मिल्क पावडर
१ वाटी काजू (जाडसर बारीक करून घ्या)
सुक्या खोबऱ्याचा किस
तुप
खाण्याचा हिरवा रंग
१. किवीची साल काढून घ्या
२. किवीचे छोटे तुकडे करुन मिक्सर करुन घ्या
३. बारीक केलेली किवी पॅन मध्ये घ्या आणि ५ मि. बारीक गॅसवर परतून घ्या ,एकसारख हलवत रहा
४. आता त्यामध्ये साखर घालून एकत्र करुन घ्या , मिश्रण हलवत रहा
५. ५ मि. झाल्यावर त्यामध्ये मिल्क पावडर , बारीक केलेली काजूची पावडर घालून एकत्र करुन घ्या
६. खाण्याचा हिरवा रंग आणि थोडस तुप घालून छान एकत्र करुन घ्या , एकसारख १० ते १५ मि हलवत राहा
जेव्हा मिश्रण पॅनपासून पूर्ण वेगळ होईल तेव्हा गॅस बंद करा
७. एका ताटाला थोडेसे तुप लावून मिश्रण ताटात घ्या
८. मिश्रण थोडेसे थंड होत आलेकी थोडेसे तुप ताट/फरशीला तुप लावून मिश्रणाचे आवडीप्रमाणे छोटे/मोठ्या आकारात रोल करुन घ्या
९. किवी काजू रोल खोबऱ्याचा किसमध्ये सर्व बाजूने फ़िरवून घ्या
१०. हे रोल फ्रिजमध्ये १ तास सेट करायला ठेवा
कीवी काजू रोल तयार आहेत
* साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करु शकता
* रोल ऐवजी आपल्या आवडीप्रमाणे आकार दिला तरी चालेल
रेसिपीचा पूर्ण व्हिडीओ : https://youtu.be/-PvajTCaJow
सुंदर रेसिपी... माझ्या
सुंदर रेसिपी... माझ्या आवडत्या १० मध्ये.
भारी रेसिपी, इथे पोस्टायच्या
भारी रेसिपी, इथे पोस्टायच्या आधीच तुनळीवर बघितली होती.
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी. किती दिवस टिकतात
मस्त रेसिपी. किती दिवस टिकतात?
छान रेसिपी.
छान रेसिपी.
मला वाटतं ह्याला कंपल्सरी गोल्डन किवी लागतील. (तुमच्या फोटोमध्येही तेच दिसत आहेत, माहिती मध्ये तसे स्पेसिफिकली सांगितलेत तर बरं पडेल)
ग्रीन किवी एक तर आंबट असतात आणि त्यातली मोहरीच्या दाण्यासारखी बी वेगळी करता येत नाही त्यामुळे रोल्स कचकच लागतील.
भारी आहे
भारी आहे
मस्त पाकृ आणि फोटो
मस्त पाकृ आणि फोटो
छान पाककृती, आवडली!
छान पाककृती, आवडली!
धन्यवाद 'सिद्धि' , बोकलत
धन्यवाद 'सिद्धि' , बोकलत ,देवकी ,भरत. ,मी अश्विनी,जाई.,किल्,, महाश्वेता
@,भरत. - साधारण १ ते दीड आठवडा राहातील फ्रिजमध्ये
@मी अश्विनी - ग्रीन किवी वापरली आहे , साखर घातल्यामुळे आंबटपणा कमी होतो आणि मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे कचकच नाही लागत
काही अडचणींमुळे खुप उशीरा प्रतिसाद दिला ,त्याबद्द्ल क्षमस्व ..
छान आहे रेसीपी. वेगळी आहे .
छान आहे रेसीपी. वेगळी आहे .
धन्यवाद सीमा
धन्यवाद सीमा