पेस वेलीची पाने
हि रानभाजी पावसाळ्यात आंगणात, रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर आपोआप उगवते. साधारण आपाट्याच्या आकाराची पण जरा जाड़सर आणि गडद हिरव्या रंगाची पाने असतात.
याचा बराच मोठा वेल होतो
कांदा -1 उभ्यात चिरलेला
टोमॅटो -1 चिरलेला
लसूण पाकळ्या - 5, 6 बारीक चिरून
सुक्या लाल मिरच्या- 2
मोहरी - एक लहान चमचा
हळद - एक लहान चमचा
हिंग - पाव चमचा
तेल - फोडणीसाठी
प्रथम पाने स्वच्छ धुवून चिरून घ्या.
एका कढईत थोडे तेल गरम करुन त्यात मोहरी घालून ती तडतडल्यावर सुक्या लाल मिरच्या, हिंग, हळद घाला.
आता यात चिरलेला लसूण आणि कांदा घालून लालसर रंगावर परतून घ्या. कांदा चांगला परतला की नंतर त्यात टोमॅटो घाला व 5 मिनिटे शिजू द्या.
टोमॅटो शिजला की पेसची पाने घाला व झाकण ठेवून 5-7 मिनिटे वाफ येऊ द्या.
गरम गरम ज्वारीच्या भाकरी किंवा पाखडीच्या भाताबरोबर खा. सोबत कच्चा कांदा/ मिरचीचा ठेचा असल्यास अहाहा...
कोणतीही रानभाजी ओळख पटल्याशिवाय खावू नये.
याच भाजीला फ़ास / पासवेल असेही म्हणतात. (कोणाला शास्त्रीय नाव माहित असेल तर सांगा)
पूर्व विदर्भात विशेषत: नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात आणि MP तील बालाघाट भागात पेसभाजी आवडीने खाल्ली जाते.
या भाजीची ओळख आम्हाला लहानपणापासून सांभाळण्यार्या आणि आता घरातीलच एक सदस्य बनलेल्या पण मूळच्या बालाघाटी असलेल्या बाईंनी करून दिली.
चवदार वाटतेय भाजी.
चवदार वाटतेय भाजी.
कुरडूशिवाय मी अजुन कुठलीच रानभाजी खाल्ली नाहीये.
दिसायला छान दिसतेय भाजी..
दिसायला छान दिसतेय भाजी.. चवीचा अंदाज येत नाहीये
नविन रानभाजी.
नविन रानभाजी.
मस्त रेसिपी आहे.
चवीचा अंदाज येत नाहीये>>
चवीचा अंदाज येत नाहीये>>
चवीला किन्चित खारट आणि meaty. (थोड़ीफ़ार गोड्या पाण्यातल्या fish सारखी चव असते)
कोकणातहि हि पानं असलेल्या
कोकणातहि हि पानं असलेल्या वेली बर्याच पाहिल्यात पण आंम्हाला नाहि माहित कि हि भाजी आहे अन बनवली जाते..
@कोकणातहि हि पानं असलेल्या
@कोकणातहि हि पानं असलेल्या वेली बर्याच पाहिल्यात पण आंम्हाला नाहि माहित कि हि भाजी आहे अन बनवली जाते..>>>
रानभाजी पूर्ण ओळख पटल्याशिवाय खायची रिस्क अजिबात घेऊ नका.
मस्त.
मस्त.
छान
छान
मस्त
मस्त
सर्वान्चे आभार
सर्वान्चे आभार
> आम्हाला लहानपणापासून
> आम्हाला लहानपणापासून सांभाळण्यार्या आणि आता घरातीलच एक सदस्य बनलेल्या पण मूळच्या बालाघाटी असलेल्या बाई > रोचक! अधिक जाणून घ्यायला आवडेल.
भारीच दिसतेय भाजी. कधी ऐकलं
भारीच दिसतेय भाजी. कधी ऐकलं नव्हते या भाजीविषयी.
आता रानभाज्यांची धमाल सुरू होणार.
गुलवेल !!??
गुलवेल !!??
@ गुलवेल !!?? >> नाही.
@ गुलवेल !!?? >> नाही.
हे एक पान बघा. आकारात फरक आहे.
अ
पेसची भाजी. वेगळ्या
पेसची भाजी. वेगळ्या पद्धतीने