पालक / पालकाचे देठ
गोड कणीस
१ चिरलेला कांदा
३ चिरलेल्या मिरच्या (आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करु शकता)
साय /दूध / अमूल फ्रेश क्रीम
तुप
मीठ
१. सर्वप्रथम एक पातेल घ्या.त्यामध्ये पाणी घ्या , कणीस , चवीनुसार मीठ घालून ३ ते ४ उकळून घ्या
२. तोपर्यंत सूपची तयारी करु
३. एका कढईत तूप घ्या आणि कमी गॅस फ्लेमवर गरम करा.
४. तुप गरम होत आलेकी चिरलेली मिरची घ्या आणि १ मि. परतून घ्या
५. आता चिरलेला कांदा घालून २ मि. परतून घ्या
६.स्वीट कॉर्न तयार आहे ,त्यातील पाणी काढून घ्या
७. कांदा २ मि. परतून झालाकी ,यामध्ये आता पालकाची चिरुन घेतलेली पाने /देठ घलून ८ ते १०मि. परतून घेऊया . मध्ये मध्ये हलवत राहायच
८.गॅस बंद करुन हे मिश्रण थंड करायला ठेवू
९. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या
१०. मध्यम गॅस फेमवर त्याच कढाईमध्ये तुप घ्या
११. तुप गरम होत आलेकी त्यामध्ये पालकाची पेस्ट , पाणी आणि चवीनुसार मीठ घालून ८ ते १० मि उकळून घ्या
१२. आता साय घाला (मस्त फेटून घ्या)सुप मध्ये घलून २ मि. उकळून घ्या
१३. सुप तयार आहे. सर्व्ह करताना त्यामधे स्वीट कॅर्न घाला
***** फक्त पालकाचे देठ वापरुन हे सूप करु शकतो
पुर्ण रेसिपीचा व्हिडिओ :
https://youtu.be/egO7vqafa8w
Mast.
Mast.
Chhan
Chhan
छान आहे क्रुती ( तुपाएवजी बटर
छान आहे क्रुती ( तुपाएवजी बटर वापरले तर अजुन छान चव लागते, क्रिम/साय घातली की उकळत नाही मी)
मस्त. करून पाहायला हवं या
मस्त. करून पाहायला हवं या पद्धतीनं.
स्वीट कॉर्न कधी आणि कुठल्या स्टेप ला घालायचा आहे?
साहित्यात कणीस लिहिलंय तर दाणे काढून वापरायचेत ना?
छान आहे रेसीपी. पालक कॉर्न
छान आहे रेसीपी. पालक कॉर्न एकदम विनिन्ग काँबिनेशन. आपले साधे अमूल चीज क्युब किसून वरून घातले तरी मस्त लागते.
अशीच पालकाची प्युरे करून घेउन व उकडलेले कॉर्न घालून ते मिक्ष्र व्हाइट सॉस बरोबर पास्त्त्यात घालायचे. मॅकरूनी नाहीतर स्पागेटी व वरून किसलेले चीज व ब्रेड क्रंब घालून दहा मिनिटे बेक करून घ्यायचे. हे ही यम्मी लाग्ते व्हाइट सॉस मध्ये एक चिमूट दालचिनी पाव्डर घालायची विसरू नका.
मस्त आहे
मस्त आहे
धन्यवाद देवकी , BLACKCAT ,
धन्यवाद देवकी , BLACKCAT , प्राजक्ता , योक,, अमा ,जाई
@ प्राजक्ता - बटर वापरुन बघेन
@ योकु - हो ,हो दाणे काढून पाण्यात मीठ घालून उकडून ठेवायचे आणि शेवटी सूप सर्व्ह करताना त्यात घालायचे
@ अमा - तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्की करुन बघेन
Ama, तुम्ही म्हणताय तसे
Ama, तुम्ही म्हणताय तसे मिश्रण (उकडलेला बारीक पालक, कॉर्न, व्हाइट सॉस , मिरे) कॅनॉपी मध्ये घालून , स्टार्टर, फिंगर फूड म्हणून ठेवतो हवे तर वर चिली फ्लेक्स/टोबेस्कॉ चे 2 थेंब
रेसिपी छान वाटते आहे,
रेसिपी छान वाटते आहे,
एक सुधारणा सुचवू का?
शब्दांचे डबे मागे पुढे झाल्याने वाचताना सोपे वाटत नाही
उदा- >>>>>कमी गॅस फ्लेमवर एक कढाई घ्या आणि त्यामध्ये तुप घ्या>>>
हे वाक्य , एका कढईत तूप घ्या आणि कमी आचेवर गरम करा.
असे वाक्य आले तर सोपे वाटेल वाचायला.
धन्यवाद सिम्बा .बदल केला आहे
धन्यवाद सिम्बा .बदल केला आहे