Submitted by Namokar on 21 June, 2019 - 03:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
३ चमचे मैदा
२ चमचे पीठी सखर
१/२ चॉकलेट पावडर / कोको पावडर
१/४ चॉकलेट इसेन्स / व्हॅनिला इसेन्स
१/४ बेकिंग सोडा
१ चमचा पातळ तुप/बटर
दूध
टूटी फ्रूटी
चॉकलेट सिरप (आवडीप्रमाणे)
क्रमवार पाककृती:
१. एक कप घ्या
२. त्यामध्ये ३ चमचे मैदा ,२ चमचे पीठी सखर, १/२ चॉकलेट पावडर , १/४ चॉकलेट इसेन्स,१/४ बेकिंग सोडा ,१ चमचा पातळ तुप/बटर घ्या आणि मिक्स करुन घ्या
३. आता थोडे थोडे दूध घालत मिश्रण एकत्र करुन घ्या (मिश्रण जास्त पातळ करायचे नाही)
४. आता हे साधारण २ते ३ मि. फेटून घ्या
५.आवडीप्रमाणे टूटी फ्रूटी घाला
६. ओव्हन मध्ये मायक्रोवेव + कन्वेक्शन मोड वर ५ मिनीट(240 degree) ठेऊन घ्यावे
कप केक तयार
वाढणी/प्रमाण:
१
अधिक टिपा:
* चॉकलेट सिरप आवडीप्रमाणे तयार कपकेक वर घालून खाऊ शकता
*मायक्रोवेव सेफ कप चा वापर करा
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या मायबोली वरील रेसिपीज्
माझ्या मायबोली वरील रेसिपीज् :
https://www.maayboli.com/node/70321
https://www.maayboli.com/node/70309
माझ्या मायबोली वरील रेसिपीज्
.
छान आहे रेसिपी
छान आहे रेसिपी
छान आहे
छान आहे
ही रेसीपी इंटरनेट वर फेमस आहे
ही रेसीपी इंटरनेट वर फेमस आहे. केक बनलेला दिसत नाही. कपात च ठेवतात. रूढ अर्थाने हा कप केक नव्हे. कपात बनवलेला केक.
टुटी फ्रूटी का बरे चॉकोलेट वर? फ्लेवर मिक्स होतो की.
रेस्पी छान आहे.
रेस्पी छान आहे.
अमा + १ कपकेक नव्हे कपातला केक
धन्यवाद कुसुमिता१२३४ , जाई.
धन्यवाद कुसुमिता१२३४ , जाई. सस्मित
@अमा
चालेल आपण अस म्हणू- कपात बनवलेला केक.
ही रेसीपी इंटरनेट वर फेमस आहे >> हो थोड्याफार वेगवेगळ्या पद्धतीने फेमस आहे
* चॉकलेट सिरप आवडीप्रमाणे तयार कपकेक वर घालून खाऊ शकता
टुटी फ्रूटी सुध्दा छान लागते (नाही घातली तरी चालेल)