घरा संबंधित आवश्यक कागदपत्रे

Submitted by रमेश रावल on 25 May, 2019 - 00:01

एक फ्लॅट आवडला आहे ताबा सहा महिन्यानंतर आहे, पण तो पुणे मांजरी ग्रामपंचायत मध्ये आहे. त्यामुळे पुढे जाऊन काही अडचण नको यासाठी नेमकी कोणती कागदपत्रे बिल्डरची क्लिअर असली पाहिजेत. वा बिल्डर कडून कोणकोणत्या गोष्टीची माहिती घ्यावी जेणेकरुन जागेसंबंधात कायदेशीर अडचणींना मला सामोरे जावे लागू नये. क्रुपया मार्गदर्शन करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Building NOC, project registration file, master file, flat agriment copy with attested or original.
जेव्हा आम्ही हडपसर मध्ये flat घेतला तेव्हा मी मागवलेले documents साधारण ३ वर्षा पूर्वी.
अजून असतील तर सांगते.
आणि मांजरी ही ग्रामपंचायत आहे बहुतेक, असेलच तर तलाठी दिखला, जागेचा ७/१२ वैगरे काही लागत का ते चेक करा.

सर्व डाक्युमेंटसच्या तारखा पाहा. ठराविक क्रमानेच लागतात. तरीसुद्धा पहिली एक रक्कम भरल्या शिवाय फाइल दाखवत नाहीत हीच गोची असते. गच्चीची जागा बिल्डरकडेच आहे का? तिथे मोबाईल टावर टाकून कमावतो.

तो फ्लॅट कायम तुमच्याच मालकीचा राहणार आहे का ते विचारा, मी असं ऐकलंय की आपण जे फ्लॅट विकत घेतो ते 80 वर्ष आपल्या मालकीचे असतात नंतर ज्याच्याकडून विकत घेतले तो त्याचा मालक होतो.

नाही.
१) जागेच्या(जमिनीच्या) मालकाशी बिल्डर करार करतो - डिवेलपर म्हणून देण्याचा आणि त्यावर इमारत उभी राहून लोक राहिला आले की त्या सोसायटीच्या नावे जमीन कन्वेअन्स करण्याचा.
२)या करारावर आधारभूत जमिनीच्या मालकाच्या नावेच स्थानिक ग्रामपंचायत/नगरपालिका/इतर अधिकृत आस्थापनाकडे NA करून त्यावर सोबत जोडलेल्या नकाशाप्रमाणे बांधकाम करण्याची परवानगी उर्फ NOC घेण्याचा अर्ज बिल्डर/डिवेलपर करतो.
३) NOC मिळते.
४) पेप्रात जाहिरात देऊन बुकिंग सुरू होते.
या १,२,३,४ डॉक्युमेंटसच्या तारखा क्रमाने हव्यात.
(( तुमचा NA चा अर्ज पास झालेला नाहीये. !!))

धन्यवाद Srd
एकंदरीत NA नसलेली जागा घेणे सध्या आर्थिक दृष्ट्या फायद्याची असली तरी भविष्यात तापदायक ठरू शकते हेच ना