
साहित्य :
गुलाबाची ताजी फ़ुले (देशी, सुगन्धी) - 20,
साखर -1 किलो,
पाणी - 1/2 लिटर
मंडळी आला आला उन्हाळा. असं वाटलं की या उन्हात काही जीवाला थंड वाटेलसं बनवूया. अनायासे घरची बागपण गुलाबांनी बहरली आहे म्हणून मग हे घ्या ताज्या ताज्या गुलाबफुलांचे सरबत.
A. रोझ सिरप
1. गुलाबाची फ़ुले स्वच्छ धुऊन माठातील / फ़्रीझमधील थंडगार पाण्यात 10 मिनिटे भिजवून ठेवावी
2. एका मोठ्या भांड्यात पाकळ्या आणि पराग काढून घ्यावे.
3. आता यात 1/2 लिटर पाणी घालून गॅसवर गरम करायला ठेवावे. भांड्यावर घट्ट बसणारे झाकण ठेवावे जेणेकरून वाफ बाहेर येणार नाही.
4.. पाकळ्यांचा रंग पांढरा झाला कि (याला साधारण 5-7 मिनिटे लागतात) gas बन्द करून झाकण न काढताच हे गुलाबपाणी थंड होऊ द्यावे (4 ते 5 तास) . असे केल्याने गुलाबांचा पूर्ण अर्क पाण्यात उतरतो.
5. हे थंड झालेले गुलाबपाणी एखादे सुती कापड वापरून गाळून पाकळ्या घट्ट पिळून घ्यावा.
6. आता या पाण्यात साखर घालून एकतारी पाक होईपर्यंत उकळी आणावी.
7. थंड झाल्यावर बाटलीत भरुन ठेवावे.
रोझ सिरप तयार आहे.
B. सरबत करण्यासाठी ग्लासभर पाण्यात 2 चमचे सिरप घालून छान डायल्युट करून घ्यावे.
आवडत असल्यास लिंबाची फोड पिळून आणि 1-2 पुदिन्याची पाने खलून घालावीत.
ठंड दूधातून घेतल्यास पित्त शामक आहे.
संपूर्ण नैसर्गिक. No artificial colour/ essence/ preservatives are used.
लहान मुलांसाठी उन्हाळ्यात उत्तम पेय. माझी मुलगी 6 महिन्यांची असल्यापासून आवडीने चाखतमाखत प्यायची.
घरी कुल्फ़ी / आईसक्रीम करताना रोझ इसेन्सला उत्तम पर्याय.
Awesome
Awesome
छान
छान
तयार सरबतापेक्षा बाटलीत
तयार सरबतापेक्षा बाटलीत भरलेला अर्क जास्त मस्त दिसतोय.
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
MAst
MAst. ती लहान बरणी मस्त आहे.तोंडाला दादरा बांधल्यासारखी.
मस्त दिसतंय.
मस्त दिसतंय.
Kateel!
Kateel!
शेवटचा फोटो भारी आहे
शेवटचा फोटो भारी आहे
मस्त! देशी गुलाब पुण्यात कुठे
मस्त! देशी गुलाब पुण्यात कुठे मिळतील?
धन्यवाद राजसी , काळी माऊ,
धन्यवाद राजसी , काळी माऊ, सायो, असुफ़, देवकी ताई, भरत, नानबा, जाई. _^_
<<ती लहान बरणी मस्त आहे.तोंडाला दादरा बांधल्यासारखी>>
मलापण खूप आवडतं ते झाकण
<<मस्त! देशी गुलाब पुण्यात कुठे मिळतील?
मंडईँमधे किन्वा कोणत्याही फूल मार्केटमधे मिळतील
खुप छान
खुप छान
भारीच! रंग काय छान आलाय!
भारीच! रंग काय छान आलाय!
वॉव.. भारीच..! पण साधारण किती
वॉव.. भारीच..! पण साधारण किती दिवस्/महिने टिकते?
खुप छान! रंग पण मस्तच!
खुप छान! रंग पण मस्तच!
मस्त.. सुगंधी आणि चवदार...
मस्त.. सुगंधी आणि चवदार...
wow....great... slurrrrr...p
wow....great...
slurrrrr...p
खूप खूप आभार सगळ्यांचे.
खूप खूप आभार सगळ्यांचे.
<<वॉव.. भारीच..! पण साधारण किती दिवस्/महिने टिकते?>>
पाक जरा घट्ट केल्यास वर्षभर सहज टिकते (फ्रीजमध्ये)
मस्तच!
मस्तच!
मस्त!!
मस्त!!
देशी गुलाब शक्यतो परसबागेतच
देशी गुलाब शक्यतो परसबागेतच मिळतात. व्यापारी उत्पादनाविषयी एवढी माहिती नाही. देशी गुलाबाच्या पाकळ्या लगेच गळून पडतात. विकत घेतो त्या फुलांवर भरपूर कीटकनाशके फवारले असण्याची शक्यता जास्त असते. हरितगृहातील फुले सजावटीच्या कामाची असतात, त्यांना सुगंध फार नसतो.
खुप छान!!!
खुप छान!!!