स्थळ- स्टेट बॅन्क ऑफ इंडिया, D.P. Road, कोथरूड, पुणे, आशिष गार्डनच्या जवळ.
एक आजोबा बॅन्केत शिरतात (वय पंचाऐंशी) त्यांना त्यांच्या पत्नीच्या नावे काही रक्कम SCSS (senior citizen savings scheme) मधे गुंतवायची आहे. SCSS म्हटल्यावर काऊंटरवरील बॅन्क कर्मचारी त्यांना सांगते की आपण आधी आमच्या ब्रान्च मॅनेजरशी बोला. मग ते शेजारीच असलेल्या ब्रान्च मॅनेजरच्या केबिन मधे जातात. ब्रान्च मॅ. त्यांना सांगतो की ह्या SCSS पेक्षा चांगली गुंतवणुकीची योजना मी तुम्हाला सांगतो व त्यामधे तुम्ही पैसे गुंतवा. तो लगेच तिथल्या तिथं केबिनमधे कसलासा म्युच्युअल फंड्सचा फाॅर्म मागवतो व भराभरा स्वतःच तो फाॅर्म भरायलाही लागतो. आजोबांच्या हालचाली वयानुसार ब-याच संथ झाल्या आहेत. रिअॅक्शनला जरा जास्त वेळ लागतोय. जरा वेळानं ते सांगतात, मला जो चेक तुम्हाला द्यावा लागेल त्यावर माझ्या बायकोची सही लागेल आणि त्यासाठी मला घरी जावं लागेल. त्यामुळे मला फाॅर्म द्या, मी तो वाचतो आणि उद्या येतो.
ब्रान्च मॅ. - कशाला? आमचा माणूस देतो ना मदतीला. तो तुमच्याबरोबर घरी येईल आणि सर्व मदत करेल.
आजोबा - नको नको. मीच सर्व गोष्टी बघून घेईन व उद्या परत येईन. ( आजोबांना विचार केल्याशिवाय पैसे गुंतवायचे नाहीयेत.)
आजोबा घरी जातात व माहीती मिळवतात. (आजोबा COEP passed out इंजिनीअर आणि निवृत्त शासकीय अधिकारी आहेत)
दुस-या दिवशी आजोबा ब्रान्च मॅनेजरला सांगतात की मी चौकशी केली, मला "आत्ता" म्युच्युअल फंड्सचा पर्याय योग्य वाटत नाही म्हणून मी आधी ठरवल्याप्रमाणे SCSS मधेच गुंतवणूक करायचं ठरवलं आहे त्यामुळे मला scss चा फाॅर्म द्यायला सांगा.
इथं मॅनेजरचा मूडच पालटतो. आजोबांकडे दुर्लक्ष करून, दुस-या एका कस्टमरशी गप्पा, तो नको म्हणत असतानाही आग्रह कर-करून त्याला पासबुक प्रिंट करून देणे, एका आलेल्या फोनवर बराच वेळ टाईमपास गप्पा, अजून एका कर्मचा-याशी गप्पाटप्पा. आजोबा शांतपणे तिथंच बसले आहेत.
ब-याच वेळानंतर....
आजोबा - माझ्या scss investment साठी मला फाॅर्म द्यायला सांगाल का?
B. M. - तुम्ही ह्यापूर्वी एकदा ह्यात इनव्हेस्ट केले आहेत. एकदाच करता येतात.
आजोबा - ह्यापूर्वी बॅन्केनेच मला दोनवेळा इन्व्हेस्ट करून दिले आहेत. एकदाच करायचे असा काही नियम नाही.
B. M. - तुम्हाला दोन वेळा भरून दिले असेल तर ती आमची चूक झाली.
आजोबा - मग मला नियम दाखवा नाहीतर फाॅर्म द्या.
परत टाईमपास सुरु.....
आजोबा - हे बघा, मला समजतंय की मी mutual funds मधे पैसे गुंतवत नाहीये आणि तुम्हाला त्या गुंतवणुकीचं टारगेट असणार म्हणून तुम्ही माझा मुद्दाम छळ करत आहात. मी वर तक्रार करीन.
इथं ग्राहकाकडे एक तुच्छ कटाक्ष व पुन्हा टाईमपास चालू.
आजोबा- मला फाॅर्म द्या.
B. M - (अती उद्धटपणे) तुम्ही बाहेर बसा.
शिपायाला फाॅर्म द्यायला सांगतो.
काऊंटरवरच्या इतर कर्मचा-यांना झाला प्रकार समजलेला आहे. बाहेर आल्यावर ते आजोबांना मदत करतात. फाॅर्मचे सोपस्कार पार पडतात.
दोन दिवसांनी चेक जमा झाला का बघायला आजोबा परत बॅन्केत जातात तर चेक return आलेला असतो आणि त्यासाठी SBI नं त्यांना दंड केलेला असतो. आताशा सही करताना आजोबांचे हात थरथरतात म्हणून सही चुकली की काय अशी भिती वाटते. मग ते गावातलया महाराष्ट्र बॅन्केत तिसर्या मजल्यावरील कक्षात जाऊन चौकशी करतात. तिथं समजतं की SBI नं चुकीचा नंबर कळवल्यामुळे चेक परत आलाय. अहंकार दुखावलेल्या ब्रांच मॅनेजरनं असा वचपा काढलेला असतो.
आजोबा BOM कडून sbi ची चूक आहे असं लेखी पत्र घेऊन येतात व SBI ला देतात. दंड माफ करायला लावतात.
पंचाऐंशीव्या वर्षी 3 SBI च्या आणि एक BOM च्या हेलपाट्यांनंतर फायनली एक गुंतवणूक पार पडते.
ग्राहक देवो भव:
कधीकधी प्रत्येक कंपनी च्या
कधीकधी प्रत्येक कंपनी च्या साईट वरून जाऊनही खरेदी करते. आमच्या लंच ग्रुप च्या शिऱ्या च्या मते असे केल्यास स्वस्त पडते.>>> हो, माझे ही असेच मत आहे. पण हल्ली सिप असो वा म्युच्युअल फन्ड मध्ये गुंतवणूक करणारे वाढलेत, किमान शहरांमध्ये, सो त्याचे टार्गेट पूर्ण करणे जास्त सोपे असते पोलिसी विकण्यापेक्षा☺️
बँकेच्या कस्टमर केअर नंबर ला
बँकेच्या कस्टमर केअर नंबर ला फोन करून कळवावे, त्वरित कारवाई केली जाते. वयस्कर माणसांसाठी विशेष सेवा दिली जाते पण हा प्रकार धक्कादायक आहे.
बँकेच्या कर्मचाऱ्यांवर पण खूप ताण असतो आजकाल.... काम वाढलेलं आहेच आणि ग्राहक पण बरेचदा अशा अविर्भावात येतात कि यांनी माझाच काम आधी केलं पाहिजे, मी कोण आहे माहित नाही का तुम्हाला इ. इ..... प्लस जास्त सतर्क राहून काम करायला लागतं.... असो, सगळीच माणसे पूर्ण चांगले किंवा पूर्ण वाईट नसतात..... हे लक्षात ठेवून वागावे.
macro लेव्हलला उपाय बँकांचे
macro लेव्हलला उपाय बँकांचे खाजगीकरण करणे हाच आहे, निदान डेली ऑपरेशन्स तरी आउटसोर्स करा. खाजगी बँकांत नक्कीच जास्त बरी सर्व्हिस मिळते.
आजोबांपुरता उपाय अर्थातच खाजगी बँकेत खातं उघडणे हाच आहे. तिथे क्रॉस सेलिंग होत नाही असं नाही पण हा स्पेशल सरकारी माज नसतो. पुण्यात सरकारी बँकांत मराठी भाषिक सापडत नाहीत पण प्रायव्हेटमध्ये मराठी लोक असतात.
बाकी या मॅनेजरची तक्रार करून ठेवू शकता पण हा प्राणी नियमाला अपवाद नसून बहुतेक सरकारी कर्मचारी असेच वागतात असा माझातरी अनुभव आहे. कधी कुठे सरळपणे काम झालं तर आश्चर्य वाटत राहतं .
सनव +१
सनव +१
पुण्यात आमची खाजगी बँक ज्याना वयामुळे किंवा काही कारणामुळे बँकेत जाणे जमत नाही त्याना फुकट घरपोच सेवा देते. बाकीच्याना पण मिळते पण त्याना चार्ज आहे. बहुतेक स्टाफ मराठी उत्तम बोलतात. ते लोक पण प्रोडक्ट गळ्यात मारण्याचा प्रयन्त करतात पण जर नाही घेतला तरी सर्विसचा दर्जा कमी होत नाही.
खाजगीकरण केल्यास लोन देताना पण काळजी घेण्यात येईल आणि सरकारला करदात्याचे पैसे टाकण्याची वेळ येणार नाही. खाजगी बँकाचे सरासरी NPA ( Non performing assets, बुडित कर्ज होण्याची पहिली पायरी) हे सरकारी / सहकारी बँकापेक्षा निम्म्या पेक्षा जास्त कमी आहे.
साहिल शहा, ICICI bank,
साहिल शहा, ICICI bank, videocon चंदा कोचर?
विजय मल्ल्याने अॅक्सिस बँकेचे किती बुडवलेत?
ग्लोबल ट्रस्ट बँक का बुडाली?
खाजगी क्षेत्रातल्या बँका आणि उद्योगपतींचे नेक्सस नसते म्हणता? सरकारी करणाआधी काय होत होतं?
अमेरिकेच्या अर्थ आणि बँकिंग व्यवस्थे बद्दल मला फार काही माहीत नाही. पण सब प्राइअम क्रायसिसि, बेल आउट , रिकॅपिटलायझेशन यांबद्दल उडत उडत ऐकलं आहे.
त्यांचं वय पाहता एजंट गाठणे
त्यांचं वय पाहता एजंट गाठणे उत्तम.
तक्रारमध्ये वेळ न घालवणे.
केवळ ठेवींच्या सुरक्षिततेसाठी
केवळ ठेवींच्या सुरक्षिततेसाठी ह्या नॅशनलाईज्ड बॅन्कांचा माज सहन करावा लागतो. अन्यथा कोणी पायरीही चढले नसते त्यांची.
त्यांचं वय पाहता एजंट गाठणे
त्यांचं वय पाहता एजंट गाठणे उत्तम.
तक्रारमध्ये वेळ न घालवणे>>आजोबांनी शांतपणे व चिकाटीने त्याच बॅन्केत scss करून घेतले तसंच दंड म्हणून कापलेल्या रकमेचा रिफंडही मिळवला.
आता झालेल्या अन्यायासाठी तक्रारकाम चालू आहे.
म्हणून कापलेल्या रकमेचा
म्हणून कापलेल्या रकमेचा रिफंडही मिळवला.
आता झालेल्या अन्यायासाठी तक्रारकाम चालू आहे.>>>>> मस्त!
आजोबांनी सगळं प्रकरण उत्तम
आजोबांनी सगळं प्रकरण उत्तम प्रकारे हाताळलंय. ते अर्थसाक्षरच नाहीत, तर माहीतगारही आहेत.
कोर्या फॉर्म्सवर फुल्या केलेल्या ठिकाणी सह्या करून मोकळे होणार्या बहुसंख्य लोकांनी आणि कुठे त क्रार करून वेळ वाया घालवयचा असे म्हणणार्यांनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा.
<अहंकार दुखावलेल्या ब्रांच मॅनेजरनं असा वचपा काढलेला असतो. >
असं करून तो ब्रँच मॅनेजर कागदोपत्री व्यवस्थित अडकलेला आहे. पुढल्या तक्रारकामासाठी आजोबांना शुभेच्छा.
स्टेट बॅन्केचा माझ्या
स्टेट बॅन्केचा माझ्या वडिलान्चा अभुभव ही वाईट आहे. रीटायरमेन्ट स्कीम मधे पैसे गुन्तवायचे होते, सर्व कागदपत्र नेऊन हि अगदी ४-५ खेपा विनाकरण मारायला लागल्या, जेव्हा काम झाले, तेव्हा बाबानी भन्नाट शिव्या दिल्या, काम्चुकार म्हणाले मॅनेजर ला स्टाफ देखत, वयाचा विचार न करता त्रास देता असेही सुनावले, आणि निघाले
पुर्वी पासून प्रामाणिकपणे शासकिय बॅन्केन्चे ग्राहक असायचे हे असे फळ मिळाले
अजोबांसाठी वाईट वाटले पण
अजोबांसाठी वाईट वाटले पण त्यांच्या चिकाटीचे कौतुक वाटले. पुर्वीच्या लोकांकडे ती होती.
आजकाल इतके करायला वेळ नसतो त्यामुळे बर्याचदा आपण भीक नको पण कुत्रा आवर या उक्तिनुसार आपले घोडे पुढे न दामटता बँक वाल्याचे ऐकतो.
एकदा मी पण अशीच ११०० रू ला एच डी एफ सी मध्ये गंडले आहे. मला एक स्टेटमेंट हवे होते ज्या साठी ऑल द वे माझ्या ब्रांच मध्ये न जाता जवळच्या ब्रँच मध्ये गेले आणि मॅनेजर ने मला काहीतरी विकले. ते काय होते मला नाही माहिती.
दुसरे म्हणजे स्टेट बँक वाईट अनुभव देण्यात "राजा"(?) दिसते. मी ही पी पी एफ अकाऊंट काढायला गेले तर माझ्याकडून शंभर फॉर्म भरून घेतले आणि आधी सेव्हिंग्ज अकाउंट उघडा त्या शिवाय पीपीएफ उघडता येणार नाही म्हणून दोन्ही अकाऊंट्स ओपन केली एकाच दिवशी. आता सारखे मेसेज पाठवतात की सेव्हिंग अकाउंट ला काही हलचाल नाही आम्ही सस्पेन्स मध्ये टाकू
त्यात पाच हजार आहेत.
बंद करून टाकू का? पी पी एफ तरी पण चालू राहिल ना?
बंद करून टाकू का? पी पी एफ
बंद करून टाकू का? पी पी एफ तरी पण चालू राहिल ना>> सेविन्ग मध्ये एक लंप सम टाकायची व मंथली इन्स्ट्रक्षन द्यायची पीपीएफ ला ट्रान्सफर होईल. हे एक. करता येइल किंवा तीन महिन्यातून एकदा पैसे काढायचे किंवा चेक बुक असेल तर एक चेक आपलय दुसृया अकाउंट मध्ये टाकायचा.
बँकेतल्या गोड बोलणार्या मुली नक्कीच काहीतरी फालतू म्युचुअल फंड किंवा इन्सुरन्स स्कीम गळ्यात मारायच्या मागे असतात.
बँकेतल्या गोड बोलणार्या मुली
बँकेतल्या गोड बोलणार्या मुली नक्कीच काहीतरी फालतू म्युचुअल फंड किंवा इन्सुरन्स स्कीम गळ्यात मारायच्या मागे असतात.>>>>>आम्हांला(नवरा-मी) हा अनुभव कधीच आला नाही.कदाचित आम्ही खरेदीदार दिसत नसू.
याउलट गेल्या काही वर्षांत बर्याच बँकेचा स्टाफ बर्याच सौजन्याने वागताना दिसतो.आमच्या पंजाब नॅशनल बँकेतले तर सिनियर मॅनेजर एकदम झकास आहेत.एकदा मी,लंच टाईममधे पोहोचले,तर सर्व स्टाफ लंचसाठी गायब होता.फक्त ते सि.मॅ.जाग्यावर होते.त्यांनीच माझे काम करून दिले.
कसला ह रा मी कारभार.
कसला ह रा मी कारभार.
आजोबांनी लेखी तक्रार करावी.
मेल पाठवली आहे सर्व पितरांना
आज बॅकेतून माफी मागण्यासाठी फोन आला होता. किमान ह्यापुढे तरी जे. ना ह्या कमकुवत घटकाला असं वेठीस धरलं जाणार नाही अशी आशा आहे.
मेधावी, हे ऐकून खूपच चांगलं
मेधावी, हे ऐकून खूपच चांगलं वाटलं.
नेटाने आणि खंबीरपणे इश्यू हाताळल्याबद्दल काकांचं अभिनंदन.
जमल्यास चांगलं शब्दांकन करून काकांना हा वृत्तांत फेसबुकवर टाकता येईल का?
अनू, टाकलाय ऑलरेडी.
अनू, टाकलाय ऑलरेडी. माझ्या वडीलांच्या बाबत घडलं होतं हे सगळं. खूप संताप आला, वाईट आणि असहाय्य वाटलं पण डायरेक्ट जाऊन भांडणं करण्यात अर्थ नव्हता. पण योग्य ठिकाणी तक्रारी केल्यानंतर फरक पडला.
Pages