पडका झाला बुरूज जेव्हा
मी कोसळताना पाहीला ,
उरला सुरला आवेश मराठी
मनात माझ्या विरून गेला
भिंतीवरली प्रेमचिन्हे
हसून मला चिडवत होती ,
इतिहासाची पाउलखूण
नजरेत माझ्या येत नव्हती
कड्यावरूनी आसमंत सारा
वेड्यासारखा पहात राहीलो ,
स्वत्वाची जाण निमाली
कधी नव्हे ते हरखून गेलो
कड्याखाली नजर माझी
रक्तचिन्हे शोधत होती ,
खुळी पाखरे प्रेमाची
रंग प्रेमाचे उधळीत होती
काय करावे सुचले नाही
दगडावरती ठेच लागली ,
वेडी आहे माती माझी
क्षणात येऊन जखम भरली
निमिषात ऊठलो, गाली हसलो
वेदना काहीच ऊरली न्हवती ,
इतिहास झाला धूसर जरी
माती माझी तशीच होती
वेडी आहे माती माझी
जोर हिच्यातला सरत नाही ,
जरी गुरफटलो ज्वाळांत मी
साथ माझी ही सोडत नाही
थोडेफार हे ऊरले आहे
ऊद्या असेल का माहीत नाही ,
नाळ मातीशी जुळल्यावाचून
जाण इतिहासाची कळत नाही
- वाळुंज मयुर (पुणे ,मंचर)
( 7219173604)
खुळी पाखरे >>
खुळी पाखरे >>