जेवणानंतर आम्ही हो ची मिन्हच्या उत्तरपश्चिम दिशेला असलेल्या प्रसिद्ध कू ची टनेल्स पहायला निघालो.कू ची ला जाताना छोटी छोटी गावे लागत होती.एक गावातल्या सगळ्या घरांच्या गेट वर दोन्ही बाजूला कुत्र्यांचे पुतळे होते.आम्ही गाईडला त्याबद्दल विचारले,तर तो म्हणाला की ते घराचे रक्षण करतात अशी भावना आहे.कू ची पोचायला जवळजवळ पाऊण तास लागला.जाताना रस्त्यात दोन्ही बाजूला खूप झाडे लावलेली होती,पण अगदी सरळ रेषेत लावली होती,त्यामुळे पाहायला छान वाटत होते.
रस्त्यात पावसाची मोठी सर आली.पण पुढेपाऊस पडून गेलेला होता.अर्ध्या,पाऊण तासाने आम्ही कू ची ला पोचलो.
व्हिएतनाम देश अनेक वर्षांच्या लढायांत होरपळलेला देश आहे.दक्षिण व उत्तर व्हिएतनाम
पण एकमेकांचे शत्रू होते.जवळ जवळ वीस वर्षे म्हणजे १९५५ ते
१९७५ पर्यंत तिथले कम्युनिस्ट वर्चस्व संपवण्यासाठी अमेरिकेने हल्ले केले.कारण त्यांना व्हिएतनाम सोबत लाओस व कंबोडिया येथेही कम्युनिस्ट राज्य करतील अशी भीती वाटली
फ्रेंच revolution सेना आधीच व्हिएतनाम मध्ये घुसली होती.या सर्व महाशक्ती चीन,रशिया,फ्रांस, अमेरिका ह्या देशांची नजर लाओस,व्हिएतनाम, कंबोडिया ह्या छोट्या देशांवर होतीच.प्रत्येक देशांनी ह्या छोट्या छोट्या देशांवर आक्रमण करायचा प्रयत्न केला.
म्हणून फ्रेंच लष्कराला मदत म्हणून अमेरिकेने हजारों सैनिक पाठवले.रॉकेट्स ,बॉम्ब,रासायनिक शस्त्रांचा उपयोग केला गेला.हजारो व्हिएतनामी नागरिक मारले गेले.त्यांना प्रतिकार करण्यासाठी वियेतकाँग सैन्याने१९६८ च्या आसपास हे tunnels लपायला,धान्य आणि शस्त्रसाठा करायला,जखमी लोकांवर उपचार करायला आणि रहायला ,बाहेरच्या जगाशी संपर्क करायला खोदले.अनेक ठिकाणी असे tunnels खोदले गेले.तिथे लपल्यावर अनेक प्रकारचे हाल व्हायचे.साप,किडे
हल्ले करायचे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार व्हायचे.
उपासमारही व्हायची.हवा,पाण्याचीही कमी भासायची.
ह्या युद्धात अनेक तरुणीही सामील झाल्या.त्याही हल्ला करण्यात प्रशिक्षित होत्या.साधारण ७५ मैल लांब असलेल्या ह्या tunnels च्या संरक्षणाची जबाबदारी आता व्हिएतनाम सरकारची आहे.अनेक देशानी ह्या युद्धात व्हिएतनामला साथ दिली.त्यात भारतही होता.आपल्याला सगळी माहिती देण्यासाठी तिथलाच प्रशिक्षित गाईड देतात.हे tunnels आता पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.अजूनही काही tunnels मोठे करून त्यात आपल्याला नेले जाते.तेंव्हाचे बनवलेले traps दाखवतात.घनदाट जनगलात हे tunnels आहेत.सुरवतीला एक छोटी documentary फिल्म दाखवतात.कू ची च्या जंगलात जाण्याचा रस्ता.घनदाट जंगल आहे.
हा त्यावेळी काढलेला जुना टनेल खोदतानाचा फोटो
जुने टनेल
तिथे अनेक traps शत्रूवर हल्ला करायला बनवले होते.
ह्या ट्रॅप मध्ये खाली सुळे बसवले आहेत.असेच ट्रॅप अलीकडे नक्षलवाद्यानी आपल्या जवानांवर हल्ला करण्यासाठी बनवले होते,पण वेळीच लक्षात आल्यामुळे जवानांचे प्राण वाचले.
आमच्या गाईडने प्रात्यक्षिक ही दाखवले.
ट्रॅपच्यावर पालापाचोळा गोळा करून ठेवायचा, मग तो डोक्यावर घेऊन खाली बसायचे.आणि शत्रूची चाहूल लागल्यावर अचानक वर येऊन हल्ला करायाचा.
तिथे आयुध बनवतही असत.
जखमी सैन्यांवर टनेलमध्ये उपचार करताना
तिथे सापडलेले हेलिकॉप्टर,रणगाडा दारुगोळा
त्या tunnels मधे उतरल्यावर हे लोक इतकी वर्षे तिथे राहून केवळ
देशप्रेमाखातर अनेक हालअपेष्टा सोसून अमेरिकन सैन्याचा कसा प्रतिकार करत असतील ह्या विचारानेच अस्वस्थ होतो.बाहेर अंधार दाटत
असल्यामुळे आम्ही लगेच परतीच्या मार्गाला लागलो.परत गर्दीमुळे घरी
पोचायला उशीरच झाला.
घरी पोचलो तर मनीष हुआ ने मृणालच्या वाढ दिवसाची जय्यत तयारी घराच्या मागच्या स्विमिंग पुलाजवळच्या गार्डन मध्ये केलेली दिसली.फ्रेश होऊन खाली आलो.खाली गार्डन मधल्या gazebo मध्ये बसलो.खूप गप्पागोष्टी फ्रुटजूस सोबत झाल्या.
बाहेर पापडी चाट,पाणीपुरी आमची वाट पहात होते.अगदी भारतात असल्यासारखे वाटले.सगळ्यांच्याच आवडीचे पदार्थ असल्यामुळे खाताना मजा आली.केक कापण्याच्या कार्येक्रमानन्तर पावभाजीवर सगळ्यांनी ताव मारला.सोबत व्हेज,नॉनव्हेज स्प्रिंग रोल होते..
Gazibo[05/01, 1:37 pm]
मानिषचे घर मागून
मृणाल केक कापताना
नन्तर वर येऊन सगळे चक्क बदामसात खेळलो.सर्व भावंडे नॉस्टॅल्जिक झाली.लहानपणीच्या त्यांच्याआठवणींमध्ये रात्रीचे 12 कधी वाजले ते कळलंच नाही.
अश्या रीतीने एका ऐतिहासिक दिवसाची समाप्ती झाली.दुसऱ्या दिवशी मेकाँग डेल्टाला जायचे होते
Chhan challay. Foto khupach
Chhan challay. Foto khupach mast.
सुरेख चाललीय मालिका. पुढचे
सुरेख चाललीय मालिका. पुढचे भाग टाका पटापट.
मस्त वर्णन. घर फारच गोड आहे
मस्त वर्णन. घर फारच गोड आहे. वैनी बाय ग्रेट.
भारीच
भारीच
चांगली चाललीय मालिका!
चांगली चाललीय मालिका!
प्रतिसादांबद्दल सगळ्यांना
प्रतिसादांबद्दल सगळ्यांना धन्यवाद