ही सुद्धा एका युट्यूब चॅनल वर पाहीलेली आणि घरी नंतर ट्राय केलेली रेसीपी.
थोडे बदल केले आहेत माझ्या सवयीनुसार पण हे ही सुप्पर झालं होतं.
तर साहित्य -
- ओंजळभर मिरच्या (नेहेमीच्या, फोडणीत तिखटपणाला ज्या वापरतो त्यत्या)
- २ ते ३ चमचे बेसन (चण्याच्या डाळीचं पीठ)
- चमचाभर धण्याची पूड
- पाव चमचा हळद
- अर्धा/पाऊण चमचा बडीशेप पूड
- एका मोठ्या लिंबाचा रस (मूळ कृतीत आंबट दही वापरलेलं आहे)
- मीठ
- २-३ टेबलस्पून तेल, मोहोरी, चिमटीभर हिंग
- मिरच्या धूवून, पुसून कोरड्या करायच्या आणि नंतर भरल्या वांग्यांना + आकारांत चिरा देतो तसं चिरून घ्यायचं; म्हणजे त्यांची फुलं होतील.
- बेसन कोरडंच जरा ५/१० मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचं
- आता फोडणी करून मोहोरी चांगली तडतडू द्यायची आणि चिमटीभर हिंग घालून प्रकरण जरासं फसफसलं की मिरच्या घालायच्या.
- सगळ्या मिरच्यांना तेल व्यवस्थित माखलं की यात सगळे कोरडे मसाले आणि मीठ घालून जरा मसाले तेलावरच पोळू द्यायचे.
- आता यात भाजलेलं बेसन घालून सगळं नीट हलवून घ्यायचं आणि लिंबाचा रस घालून गॅस बंद करायचा. कढईत भाजी तशीच जरा ५/७ मिनिटं राहू द्यायची आणि मग कशाही बरोबर तोंडीलावणं म्हणून घ्यायची.
- बेसन आधी भाजून घ्या किंवा नंतर मेन कृतीत शिजवून घ्या (मूळ कृतीत आधी भाजून घेतलेलं नाहीय). ते नीट होणं महत्त्वाचं आहे नाहीतर कच्चट चव आणि वास दोन्हीही जाणवेल. बेसन अतीही वापरायचं नाहीय. जस्ट मिरच्या कोट होतील इतपतच.
- बडीशेप पूड अवश्य वापरा, सुरेख चव येते.
- आंबटपणाही जरासा पुढे हवा तरच ती अपेक्षित धणे + तिखट + आंबट आणि बडिशेपेच्या सुरेख सुवासाची चव साधते.
आज मस्तच लागेल. उद्याबद्दल
आज मस्तच लागेल. उद्याबद्दल काही सांगता येत नाही.
एकदा लांब पोपटी मिरच्यांचं सालन केलं होतं. भारी लागलं पण भाजी जितकी मुरते तितका तिखटपणा वाढत जातो. बडीशेप मस्त लागते ह्यात.
(दोन्ही वाक्यात आज आणि उद्याला वेगळा अर्थ आहे)
आय हाय! वाचून आणि रेसिपी बघून
आय हाय! वाचून आणि रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटलं
Whoa! सही! फोटो कुठाय?
Whoa! सही!
फोटो कुठाय?
खरंच तुफान रेसिपी आहे आणि
खरंच तुफान रेसिपी आहे आणि सोपी सुद्धा. सध्या थंडीमुळे तिखट खाण्यात धोका नाही, त्यामुळे ताबडतोब करण्यात येईल. योकू, तुमचं पीठ आधीच भाजून घेण्याच सजेशन आवडलं. मला आलटून पालटून कधी लिंबू रस आणि कधी दह्यात शिजवलेली मिरची आवडेल.
आवंढा गिळला.
आवंढा गिळला.
मस्त वाटली रेसिपी, करून
मस्त वाटली रेसिपी, करून बघण्यात येईल, नक्कीच.
फोटु रे टोण्या?
फोटु रे टोण्या?
भारिच लागेल हि रेस्पी.
आणि जर समज आमचूर पावडर घातली जरा तर?
चालेल काय?
भारी आहे रेसिपी. एक मैत्रिण
भारी आहे रेसिपी. एक मैत्रिण आहे, हिरव्या मिरच्यांवरच जगते. तिला पाठवेन कृती.
आमचूर पावडर घातली तरीही चालेल
आमचूर पावडर घातली तरीही चालेल की.
सोसवेल एवढी भाजी (!) खावी.
सोसवेल एवढी भाजी (!) खावी. यासाठी +१
--
मिरचांचा पिठातला खरडाच हा!!
मस्त आहे
मस्त आहे
आईच्या छान होतात.माझा हा प्रकार म्हणजे खमंग काळं बेसन अधिक मिरच्या किंवा बेसन पिठलं यापैकी एक असतो.
यम्मी वाटतंय प्रकरण!
यम्मी वाटतंय प्रकरण!
ही रेसिपी वर आली की मला
ही रेसिपी वर आली की मला प्रचंड भूक लागल्याची जाणीव होतेय. भाकरी किंवा थालिपीठ ह्याबरोबर मस्त लागेल ही मिरची.
सॉलिड आहे.
सॉलिड आहे.
झकास...
झकास...
तोंडाला पाणी सुटल. फोटो हवा
तोंडाला पाणी सुटल. फोटो हवा होता.
तोंडाला पाणी सुटल. फोटो हवा
तोंडाला पाणी सुटल. फोटो हवा होता.
योकु, मस्त रेस्सीपी.
योकु, मस्त रेस्सीपी.
तुझी बघुन मी , आमच्या घरी नेहमी केली जाणारी मलई मिरचीची रेसीपी लिहिली.
मस्तच आहे तोंडीलावणे ...कढी
मस्तच आहे तोंडीलावणे ...कढी आणि साधी खिचडी सोबत छान लागेल
मस्त रेसिपी! फोटू द्या बुवा.
मस्त रेसिपी! फोटू द्या बुवा.
मिरचीss तुफाssन.. टायर
मिरचीss तुफाssन.. टायर पंक्चर! असंच वाचलं जातय हेडिंग
झकास रेसिपी.
स्लर्प... योकू फतू पायजेल पण.
स्लर्प... योकू फटू पायजेल पण..
अखिल मायबोली मिर्चीमय झाली
अखिल मायबोली मिर्चीमय झाली आहे. मिरच्यांच्या व्हरायटी रेसिपीज दिसताहेत, त्यातली मला ही थोडी जास्त आवडेल अस वाटतं आहे.
जे लोक फोटोचा हट्ट करताहेत त्यांनी रेसीपी मध्ये दिलेली युट्यूब लिंक पाहून घ्या बरं. एन्ड प्रोडक्ट भारी दिसतं आहे
आज करून पाहिले.पण
आज करून पाहिले.पण मिरच्यांपेक्षा इतर masala ,बेसन jarasé जास्त पडले.पण मस्त लागले.फोटोत पीठ खूप दिसत आले तरी तेवढे नाही.
yoku, धन्यवाद!पुढच्यावेळी लोणचे करून पहाणार.
मस्त आहे ही पाककृती पण.
मस्त आहे ही पाककृती पण.
देवकी छान दिसतंय.
योकु, मिरच्या खूप खातोस का?