१. मैदा: १/४ किलो
२. साजुक तुप: १०० ग्रॅम किंवा १ वाटी
३. खाण्याचा सोडा: चिमुटभर
४. दही किंवा ताकः २०० मिली किंवा एक पेला
५. तेलः तळणीसाठी
६. साखरः ३५० ग्रॅम अन्दाजे
७. पिण्यायोग्य पाणी
पाकः
१. साखर भिजेल इतपत पिण्यायोग्य पाणी टाकुन घट्ट पाक करुन घ्यावा
२. पाकात वेलची पूड टाकु शकता, आवडत असेल तर
बालुशाही:
१. तुप थोडे कोमट करुन घ्यावे/पातळ असावे.
२. मैद्यामध्ये तुप व सोडा घालुन एकजीव करावे.
३. पोळीसाठी कणिक मळतो तसे , वरील मिश्रणात ताक/दही घालत घालत मळून घ्यावे
हि तिंबलेली कणिक मऊसूत आणि सैलसर असावी. बोटाने स्पर्श करुन पाहिला तर कणकेच्या आत बोट गेलं पाहिजे
(थोडंफार पुरणपोळी साठी भिजवतो तशी कन्सिस्टन्सी )
४. वरील मैद्याच्या मिश्रणाचे लिंबाएवढे एक एक गोळे तळहातावर घेऊन चपटे करावे, मधोमध छिद्र पाडावे. थोडक्यात, त्या पामर मैद्याच्या गोळ्यांना बालुशाहीचा आकार द्यावा
५. जाड बुडाच्या कढईत तेल तापत ठेवावे, तेल अगदी गरम करावयाचे नाही. फक्त कोमट होऊ द्यायचे आहे
६. तेल कोमट झाले की आच बंद करावी.
७. ह्या कोमट तेलात एक एक करुन वर तयार केलेली बालुशाही सोडावी
असे केल्यानंतर कडेकडेने पिटुकले बुडबुडे येऊ लागतील, एक एक बालुशाही तेलातल्या तेलात हळूच ऊडी मारुन वर तरंगु लागेल
८. असे झाल्यानंतर आच सुरु करावी.
९. बालुशाही थोड्या लालसर झाल्या की उलट करुन/ परतून/ दोन्ही बाजुंनी तळून घ्याव्यात
१०. लालसर दोन्ही बाजुंनी तळून झालं की आच बंद करावी
११. तळलेल्या बालुशाही एका स्टीलच्या चाळणीत किंवा ताटात झार्याने काढुन घ्याव्यात
१२. पाकात ह्या तळलेल्या बालुशाही बुडवुन थोडा वेळ (पाक मुरेपर्यन्त ठेवाव्यात)
पाकातुन काढुन डिशमध्ये आणि डिशमधुन उचलून थेट खाऊन टाकाव्यात.
प्रकाशचित्रे:
मैद्याचा तिंबलेला गोळा:
कोमट तेलात बालुशाही:
तळत असताना:
तयार बालुशाही:
झाल्या सगळ्या करूनः, या खायला
१. तळणीच्या तेलाचे तापमान योग्य साधले पाहिजे.
एकदा वरील कृतीप्रमाणे करुन पाहिलं की अंदाज येईल.
तेल जास्त गरम झाले तर बालुशाही खुसखुशीत होत नाहीत.
२. बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात, पण असं कधी घडलं नसल्यामुळे नेमके किती दिवस टिकतात ते काही सांगता यायचं नाही
३. माझी मैत्रीण ह्यात वरून चोकोलेट सॉस घालून fusion बनवते, तसंही try करून पाहू शकता
४. आधीचे बालुशाही चे धागे
बालुशाही: https://www.maayboli.com/node/42163 : प्राजक्त्ता , 30 March, 2013
बालुशाही (फोटोसह): https://www.maayboli.com/node/39694 : madevi , 17 December, 2012
@ आ.रा.रा. :
@ आ.रा.रा. :
हा पदार्थ एअर फ्रायर मध्ये तळता येइल का?
<<
नक्कीच.
नाचणीचा जास्त चांगला होइल.
या लेखाची आठवण येऊन नाईलाजाने
या लेखाची आठवण येऊन नाईलाजाने प्रदीप स्वीट मधून मलई मैसूरपा आणावा लागला.
मी अजिबात घरी करणार नाहीये पण मला प्रोसेस बद्दल कुतूहल आहे.सोनपापडी केलीय का कोणी विकत च्या सारखी, दोरे दोरे उचलून खाता येणारी?
सोनपापडी आवडत असेल तर ती तयार
सोनपापडी आवडत असेल तर ती तयार करतानाचे व्हिडिओ बघू नकोस. मला आवडत नाही त्यामुळे मला फार फरक पडला नाही
बे सोनपापडी अन घरी? तुला घरची
बे सोनपापडी अन घरी? तुला घरची मांजर चावली का काय? आपल्या त्या ह्यांची (हो, नागपूरचेच) सोनपापडी मिळते की हवी तेव्हढी; आणावी अन खावी. कशाला नसता कुटाना आं?
रच्याकने, हीरा स्वीट्स ची सोनपापडी आणि सोन-रोल्स जास्त टेस्टी आणि अलवार असतात हे सांगून ठेवताय.
एकदम एव्ढ्या पोष्टी बघून धागा
एकदम एव्ढ्या पोष्टी बघून धागा भरकटला कि काय असे वाटले
धागा आता २०० कडे न्यायचाच
धागा आता २०० कडे न्यायचाच ठरतंय तर आमच्याकडुन फुल ना फुलाची पाकळी म्हणून या एका पोस्टची भर......
चितळ्यांचे गुलाबजाम आणि मिठासची अंजीर कतली सोडून मला काहीही गोड लागत नाही त्यामुळे बालुशाही वगैरेला पुर्ण पास.
मी नाहीच करणारे घरी
मी नाहीच करणारे घरी
एकदा दिल्ली ची एक खाल्ली होती. सेपरेट प्लास्टिक मध्ये गोल गोल सोन केक्स होते. आणि त्या नागपुर च्या ह्यांच्या पेक्षा कमी गोड. मस्त लागत होती.
सोन पापडी चे मेकिंग व्हिडीओ पाहिले, फारच मेहनत आहे.
एकदा दिल्ली ची एक खाल्ली >>>
एकदा दिल्ली ची एक खाल्ली >>> आता किल्लीची खा.
मला यातून 'मैने आपका नमक खाया
मला यातून 'मैने आपका नमक खाया है सरदार' 'अब गोली खा'वाला सूर का जाणवतोय :):) :)??
(No subject)
माझी आई बालुशाही बनवताना
माझी आई बालुशाही बनवताना साठ्याच्या करंजी प्रमाणे मळलेल्या कणकेचे थर लावून त्याच्या लाठ्या करून बालुशाही तुपात तळते. ह्या बालुशाहीला छान पुडे सुटतात, ही बालुशाही मध्यम आचेवर कढईत साखरेच्या पाकात, बालुशाही वर साखरेचा पांढरा थर होईपर्यंत घोळवते. अशाप्रकारे बनवलेली बालुशाही हलकी , खुसखुशीत व मध्यम गोड चवीची होते. तुम्ही बनवलेली बालुशाही ही ओलसर अती गोड ,जत्रेत मिळणाऱ्या बालुशाही सारखी होते.
एकदा दिल्ली ची एक खाल्ली >>>
एकदा दिल्ली ची एक खाल्ली >>> आता किल्लीची खा. >>>
आता किल्लीची खा. >>>>>>
आता किल्लीची खा.
>>>>>>
जुन्या की या नव्या मायबोलीवर
जुन्या की या नव्या मायबोलीवर मनुस्विनी की मनस्विता नावाच्या मुलीने सोनपापडी घरी करुन त्याची रेसेपी दिली होती, ती अॅडमीनना शोधायला लावा.
अगं किल्ली या बालुशाही वर (
अगं किल्ली या बालुशाही वर ( तयार ) वरुन केशराच्या काड्या आणी पिस्त्या चे काप टाक की. एकदम राजशाही/ राजवर्खी बालुशाही तयार होईल.
पिस्ता काप करण्याचा पदार्थ
पिस्ता काप करण्याचा पदार्थ आहे!!
रश्मी गुड आयडिया
रश्मी गुड आयडिया
मी पिस्ता काप ही रेसिपी करून स्टेप बाय स्टिओ व्हिडीओ टाकते.माझे पिस्ता काप छान होतात ☺️☺️☺️☺️☺️☺️
बालुशाही ते इतर मिठाई
बालुशाही ते इतर मिठाई _सविस्तर
धाग्याचे नवीन नामकरण
(पञ्च शतकी वाटचालीस शुभेच्छा)
माझ्या बालुशाहीने तेलात उडी
माझ्या बालुशाहीने तेलात उडी मारली नव्हती>>> होतं असं पण
घरी-बिरी अजिबात ट्राय करणार नाहीये>>
असे पदार्थ घरी बनवणे ट्राय करायला सांगणारे लेख हे समाजासाठी(बायकांसाठी) एक घातक पायंडा पाडत आहेत>>> असा पायंडा पडण्या आधीच कंटाळा हे शस्त्र वापरायचं
हळूहळू निषेधाकडे वाटचाल व्हायला लागली>>>> हाये ये क्या हो रहा इधर, हे भगवान बचा ले धागे को
मला तर सत्कारस्थळावरून तूतू मैंमैं होईल की काय हे वाटत होतं>> हे हे
नाचणीचा जास्त चांगला होइल>>>> करावा का? तुम्ही करता का हे पुण्यकर्म ??
बे सोनपापडी अन घरी? तुला घरची मांजर चावली का काय? आपल्या त्या ह्यांची (हो, नागपूरचेच) सोनपापडी मिळते की हवी तेव्हढी; आणावी अन खावी. कशाला नसता कुटाना आं?>>>> खरय, पण मी म्है पा करून बघणार आहे
फुल ना फुलाची पाकळी म्हणून या एका पोस्टची भर.>>> _/\_
सोन पापडी चे मेकिंग व्हिडीओ पाहिले, फारच मेहनत आहे.>> हो ना,आईने एकदा करुन पाहण्याचा प्रयत्न केला होता , फसला होता. चव अलेली, पण दोरे नाही अले फार
आता किल्लीची खा>>>
अगं किल्ली या बालुशाही वर ( तयार ) वरुन केशराच्या काड्या आणी पिस्त्या चे काप टाक की>> त्यासाठी बालु पुन्हा करावी लागेल
मी पिस्ता काप ही रेसिपी करून स्टेप बाय स्टिओ व्हिडीओ टाकते.माझे पिस्ता काप छान होतात>> नक्कीच, वाट पाहतेय
@ मार्मिक गोडसे रेसीपी द्या ना , नेमकी
पञ्च शतकी वाटचालीस शुभेच्छा>>
पञ्च शतकी वाटचालीस शुभेच्छा>> धन्स डूआयडू
@ रश्मी:
माझ्या बालुशाहीने तेलात उडी मारली नव्हती>> जाड झाली असेल, वजन पेलवलं नसेल तिला
जाड झाली असेल, वजन पेलवलं
जाड झाली असेल, वजन पेलवलं नसेल तिला>>>>
(No subject)
@ मार्मिक गोडसे रेसीपी द्या
@ मार्मिक गोडसे रेसीपी द्या ना , नेमकी
कणिक बनविण्याची कृती सेम आहे. बालुशाही बनविण्याची पद्धत साठ्याचा करंजी सारखी आहे, इथे फक्त साठा लावण्याऐवजी कणकेचे एकावर एक चार ते पाच थर लाटून त्याची गुंडाळी करून हव्या त्या आकाराचे गोळे कापून करंजी प्रमाणे लाटण्या ऐवजी हाताने बालुशाही चा आकार द्यावा. मध्यम आचेवर गरम पाकात बालुशाही वर साखरेचा पांढरा थर जमेपर्यंत घोळवावे.
धन्यवाद मार्मिक गोडसे
धन्यवाद मार्मिक गोडसे
मस्त रेसीपी व प्रतिक्रिया
मस्त रेसीपी व प्रतिक्रिया
या प्रतिसादांना धागा भरकटवणे
या प्रतिसादांना धागा भरकटवणे नाही तर काय म्हणतात?
ती बिचारी किल्ली काही बोलेना म्हणून सगळेच सुटलेत
(आमची पण पाकळी)
धागा भरकटवायला अजून एक काडी:
धागा भरकटवायला अजून एक काडी:
तुपा ऐवजी कॅश्यू बटर चालेल काय ?? ☺️☺️☺️
साठ्याचा करंजी सारखी ....
साठ्याचा करंजी सारखी .....बालुशाही वर ( तयार ) वरुन केशराच्या काड्या आणी पिस्त्या चे काप ....तुपा ऐवजी कॅश्यू बटर.... अगागा!! कुठे नेऊन ठेवले बालुशाहीला!
पिसतयाचे रोल छान असतात
पिसतयाचे रोल छान असतात
पिसतयाचे रोल छान असतात >>>>
पिसतयाचे रोल छान असतात >>>> मग आता पिस्तारोलची पण रेसेपी टाका कुणीतरी.
अनु, हो. पिस्ता काप गाजर हलव्यात पण मस्त लागतात.
किल्ले तू प्रयोग करीत रहा, आम्ही येत राहु.
Pages