इंग्रजी मालिका/कार्यक्रम

Submitted by भरत. on 11 October, 2018 - 23:41

स्टार वर्ल्ड, स्टार वर्ल्ड प्रिमियर, झी कॅफे यासारख्या वाहिन्यांवरील तसंच नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइमवरील इंग्रजी मालिका व कार्यक्रमांबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

मालिकांवर लिहिलेलं वाहून जाऊ नये, इतकं महत्त्वाचं वाटत नाही म्हणून (आणि माझ्याशिवाय इथे कोणी लिहील का याची शंका असल्याने धागा वाहून जाणारच नाही, या भीतीपोटी Wink हा वाहता धागा.
इंग्रजीतल्या मालिका संथपणे न चालता भरभर गरगर वाहत असतात. संथ चालती सारखं काही शीर्षक कोणाला सुचत असेल, तर सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॅकप घेताना एन्क्रिप्शन आणि की- मॅनेजमेंट चा तिढा सोडवता आला की येईल. पण ती टेस्ट केस कोणी विचारात घेतली असेल असं वाटत नाही.

कोणी धिस इज अस सीझन ४ बघतंय का?
मला जाम बोअर होतंय. एकतर नवीन डझनभर पात्रं आणून भरली आहेत. त्यांच्याशी रिलेट होता येत नाहीये जसं आधीच्यांशी होता येत होतं. मालिकेचा जीव ३ सीझन्सचाच होता असं वाटतंय.

मी अजून पाहायला सुरुवात केली नाहीए. मला तिसर्‍या सी झनमध्येच जॅकचा भाऊ आणला, त्यांचा व्हिएतनाममधला भूतकाळ दाखवला हे सगळं जास्तच पसरवलेलं वाटलं होतं.

मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचा लास्ट सी झन पाहायचा संपवून महिनाभर झाला आणि त्याबद्दल लिहायचं राहूनच गेलं होतं.
झी कॅफेवर आठवा सीझनही याच्या जोडीने चालू होता. त्यामुळे लिहिताना दोघांची सरमिसळ होते आहे.

फायनलला सर्व्हिस चॅलेंज होतं आणि खायला आलेले मा ऑ चे who's who होते. सगळे माजी विजेते + गेस्ट शेफ्स.
लॅरिसा सगळ्यात आतापर्यंत कमी वयाची विजेती ठरली. तिने अनेकदा जजेस शंका घेत असतानाही कॉबिनेशन्सचे अभिनव प्रयोग केले आणि त्यात यशस्वी होत गेली. उपविजेती टेसा मला जिंकलंच पाहिजे, स्वतःला सिद्ध करायचंय असा ताण घेऊन होती, असं वाटलं. निकोल आनि डेरेक माझे फेव स्पर्धक होते.
Q train आणि melbourne star वरचे टीम सर्व्हिस चॅलेंजेस वेगळेच होते.

भारतीय पदार्थ जगभर पोचलेत हे अनेकदा दिसलं. चटणी, पुरी, रोटी हे शब्द अनेकदा कानावर पडत होते.
मॅट आणि गॅरी भारतात फिरुन गेलेले आहेत. मास्टरक्लासमध्ये यात ल्या एकाने इंडियन डिशही करून दाखवली होती.
आताच्या सीझनमध्ये स्टेफ नावाची एक मध्यमवयीन महिला होती. तिने आपल्यातले शैशव पुन्हा जगाय ची संधी साधली. मी खरीखुरी जशी आहे, तसं राहायची , लोकांसमोर यायची संधी मला मिळाली आणि यापु ढेही मी तशीच राहीन असं तिने एलिमिनेट होताना सांगितलं.
तिचं काही इंडिया कनेक्शन असावं. जजेस ऑडिशनसा ठी तिने पाणीपुरी केली होती आणि सिक्रेट रेसिपी साठी विंदालू.
ताती नावाची अतिपूर्वेच्या देशातून आलेली एक स्पर्धक होती. ती केळीच्या आणि हळदीच्या पानांचा नियमित उपयोग करीत असे.

एका टीम चॅलेंजमध्ये कंट्री स्पेसिफिक स्ट्रीट फुड द्यायचं होतं. त्यात तातीच्या टीमला इंडियाची थीम आली. त्यांच्यातल्या कोणीतरी मीट समजून बीफ आणलं . यावर तातीचं Indians dont consume beef, we should not insult their culture by serving beef असं सांगणं लक्षात राहिलं. चिकन करीसोबत राइस आणि समोशासोबत चटणी सर्व्ह न केल्याने ही टीम एलिमिनेशन मध्ये गेली होती.

संदीप आधी त्याच्या रडारडीमुळे आवडला नव्हता. मग त्याचे होस्टेस नमस्कार आणि फुड इज मेडिटेशन पण नाही आवडलं.
एलिमिनेशन राउंडमध्ये त्याला साखर न वापरता गोड पदार्थ करायचा होता. त्याने खीर पुरी केली. खि रीला केशराचा ओव्हरडोस झालाय हे रंगावरून कळत होतं. मास्टरशेफ साठी ही डिश खूप साधीही वाटली होती. शेवटी एका इंडियन डिशने त्याला एलिमिनेट केलं.
माजी विजेत्या अँ डी अ‍ॅलन समोर त्याने ३०/३० गुण मिळवत इम्युनिटी पिन जिंकली होती.

हा सीझन या जजेसचा शेवटचा. सीझन दरम्यान जॉर्जचं रेस्टॉरंट बंद झालं आणि शेवटची सर्व्हिस मा ऑ च्या स्पर्धकांनी दिली. तसंच त्याच्या डोळ्याला स्क्वॅश खेळताना बॉल लागून दोन तीन ऑपरेशन्स ही झाली.

माशे ऑ चे हाउस जजेस आणि गेस्ट जजेस ही खू प गोड, प्रेमळ असतात. चुका झाल्यावरही खूप सौम्यपणे सांगतात.

मध्येच एकदा मा शे अमेरिका चाल लेला दिसला , त्यात एकता कपूर टाइप निगेटिव्हिटी आणि त्याला साजे से क्लोज अप्स आणि पार्श्वस ंगीत पाहून हे आणखीनच जाणवलं.
मा शे ऑ मध्ये काही स्पर्धक टीम चॅलेंज् मधे कॅप्टनची ड्युटी पार पडताना अगदीच साफ उताणे पडले. त्यांच्या वागण्यावर शाब्दिक टिप्पण्ण्या न दिसल्यासारख्या होत्या. तेच मा शे अमेरिकामध्ये दोन्ही टीमना तुमच्यातली कमजोर कडी कौन असं विचारलं गेलेलं दिसलं. हाच गॉर्डन रामसे गेल्या सीझनमध्ये गेस्ट शेफ म्हणून आलेला तेव्हा नारळा फणसासारखा वरून कठीण / काटेरी आणि आत गोड , रसाळ वाटला होता.

एका डंपलिंग स्पेशल भागात गेस्ट शेफने वळलेले डंपलिंग्ज पाहून आपले उकडीचे मोदक सामान्य वाटायला लागले.
एका भागात sandwich press, an electric kettle or a microwave ही तीनच उपकरणं वापरून काही करायचं होतं त्यात बहुधा स्टेफने सँडविच मेकर वापरून उत्तप्पा टाइप ब्रेड केला होता.

प्राईम वरची यंग शेल्डन ही मस्त मालिका आहे.
बिग बँग थिअरी मधल्या शेल्डन च्या तोंडी असलेले रेफरन्स व्यवस्थित जुळवून त्यावर पूर्ण नवी मालिका काढणे हे कठीण काम होते.फ्रेंड्स नंतर जोई सिरीयल निघाली होती. पण ती काही भागात बंद पडली.इथे व्यवस्थित निभावली आहे ती जबाबदारी.
शेल्डन च्या भूमिकेतला मुलगा गोंडस आहे.त्याचं पाठांतर पण सॉलिड.मिमॉ म्हणजे आजी सुंदर आणि हौशी आहे.(मध्ये मध्ये पेनी ची आठवण येते.)
शेल्डन चा बाप, बहीण मिसी सगळे परफेक्ट.
सर्वात कौतुक म्हणजे मोठा भाऊ जॉर्जी चं पात्र.त्याचं सेल्समन टॅलेंट, टायर दुरुस्तीत असलेलं स्किल, मुलींच्या मागे जाणं येऊ सगळं धमाल रंगवलं आहे.
शेल्डन ची धार्मिक आई मेरी, आणि पेस्टर जेफ दोन्ही पात्रं पण.
ही मालिका पाहण्या आधी बिग बँग थिअरी पाहिली असल्यास उत्तम, नसल्यास नवी मालिका म्हणून पण पाहायला चालेल.
मोठा शेल्डन बोलता बोलता 'माझ्या बायकोच्या डिलिव्हरी च्या वेळी' असा संदर्भ देतो एका वेळी, त्यामुळे बिग बँग थिअरी सिझन 13 येण्याची पण एक धूसर शक्यता ओपन ठेवली आहे.

नेटफ्लिक्सवरच्या Anjaan: Rural Myths आणि Anjaan: Special Crimes Unit पाहिल्यात का कोणी? पैकी पहिली लिमिटेड एपिसोडसची आहे. दुसरीचा सिझन १ च झाला. ह्यात ६५ एपिसोडस होते. आधी डिस्कव्हरी जीत वर ही सिरियल दाखवली जायची म्हणे पण ते चॅनेल बंद झाल्यावर बहुधा नेटफ्लिक्सवर आली. ह्यात रविंद्र महाजनीचा मुलगा गश्मीर आहे. सुपरनॅचरल कथा आहेत दोन्हीत. दुसरीत काही गोष्टींत मानवी गुन्हेगार आहेत. मला दोन्हींचं सादरीकरण खूप आवडलं. पांढरी साडी, पांढरे डोळे वगैरे टाईप्स आह्ट, रात होनेको है ह्या भयाण सिरियल्सच्या मानाने अंजानच्या दोन्ही सिरियल्स फार उजव्या आहेत.

अंजली_१२, rmd - मस्त वाटलं तुम्हीही ही सिरियल पहाता हे वाचून. माझा Anjaan: Special Crimes Unit चा एकच एपिसोड बाकी आहे बघायचा. मिस करणार मी ही सिरियल. Sad

Anjaan: Special Crimes Unit चा शेवटचा एपिसोड पाहिला. Sad Supernatural मधले काही भाग ह्या सिरियलमध्ये वापरल्यासारखे वाटतात. उदा. The yellow-eyed demon इथे वनराज म्हणुन दाखवलाय.

आता The Mist पहायला सुरुवात केली आहे. ह्याचा चित्रपट आवडला होता. आणखी चांगल्या सुपरनॅचरल सिरिज असतील तर प्लीज सांगा.

@मीरा.
इथे मीरा यांनी मसाबा मसाबा सुचवले होते. मला आवडले .. funny, refreshing and light ... Thanks Meera. Happy

सध्या miss marple बघतेय सोनी लिव वर .
पायरो बघत होतेआ, आता ही चालू केली .

सगळ्यात जास्त काय आवडतय तर ते १९३०-४० मधलं वातावरण.
त्यांचे कपडे , घरे , रहाणीमान , बोलणं - एकदम मस्त वाटतयं
एक छोटसं गाव , जिथे सगळे एकमेकाना ओळखतात , एक छोटसं चर्च, टुमदार घरं , बाजूलाचं जंगल .
एक्दम फील गुड.

झी कॅफेवर १२ ऑक्टोबर पासून लिटल विमेन दाखवणार आहेत.
आमची हर्मायनी ग्रँजर दिसली म्हणजे फिल्म तुकड्या तुकड्यांत दाखवणार आहेत.

झी कॅफेवर १२ ऑक्टोबर पासून लिटल विमेन दाखवणार आहेत.
आमची हर्मायनी ग्रँजर दिसली म्हणजे फिल्म तुकड्या तुकड्यांत दाखवणार आहेत. <<<< हा लिटील विमेन अजिबात बघू नका. वेळ वाया जाईल.

नाही , मी पुस्तक वाचलेलं नाही. ही देखील पाहे नच असं नाही. चौघीजणी वाचवलं नव्हतं.

यावर एक हिंदी मालिका आली होती ना कोणे एके काळी?

चौघीजणी वाचवलं नाही? (मनात 'नही' ओरडून कानावर हात) पुस्तक इतकं मस्त आहे आणि वाचवलं नाही तर पिक्चर फ्लअ‍ॅशबॅक आणि फोर्थ चा गोपालकाला आहे तो कसा सहन होणार ? Happy

चौघीजणी पुस्तक बोअर आहे ह्याच्याशी सहम्त. पिक्चर बघणं शक्य नाही. कदाचित बरा असेल पुस्तकापेक्षा पण रिस्क कोण घेईल?

मी ही उशीरा वाचले बहुतेक चौघीजणी, अति बोअर झाले. काही रिलेटेबल च वाटले नाही . ते "ज्यो, लाडक्या "वगैरे तर अगदी वाचवेना. कदाचित जरा अ‍ॅडलसन्ट एज मधे चांगले वाटत असावे.

मला त्यातल्या मिस मार्च मुलींना ज्या गोष्टी शिकवते त्या आजही रिलेट होतात. फक्त 'आपलं पण जुळायला पाहिजे' चांगल्या मुलांचे लक्ष वेधायला आपण स्वतः नाही ते बनून दिखाऊ बनू नका. आधी स्वतःच्या पायावर उभ्या रहा. स्वतःचे गुण वाढवा. (डेस्पो बनू नका.)
चारही बहिणी आयुष्यात वेगवेगळे विचार, वेगवेगळा दृष्टीकोन ठेवूनही आपल्या आयुष्यात सुखी होतात (बेथ सोडून)
लॉरी चे अचाट रोमान्स चे विचार सोडून त्याला प्रॅक्टिकली समाजात प्रेझेंटेबल,विचारात प्रॅक्टिकल मुलीबरोबर सेटल व्हावं लागतं.
आपले प्रांजल विचार किती मोठी किंमत मोजायला लावणार आहेत हे ज्यो ला उशिरा कळतं.
मेग ला स्वतःच्या संसाराच्या आणि बजेट च्या मर्यादा कळायला लागतात.
मला चौघीजणी इटर्नल वाटतं.

चौघीजणी कधी वाचल याला महत्त्व आहे. मी दहावी नंतर वाचलं तेव्हा खूपच आवडलं.
आता माहिती नाही तेवढच क्लिक होईल का नाही ते.