#metoo चळवळ आजकाल फार गाजत असलेली सोशल मिडिया मध्ये आपल्याला दिसते. मला स्त्रियांच्या बद्दल नितांत आदर आहे हे मी पोस्ट च्या सुरुवातीलाच नमूद करू इच्छितो नाहीतर तथाकथित फेमिनिस्ट माझ्यावर तुटून पडणार आहेत याची मला खात्री आहे.
असो कुठल्याही ठिकाणी स्त्रियांचा होणारा मानसिक किंवा शारीरिक छळ हा निंदनीय आहे हे वाक्य शंभर टक्के खरं आणि ऐकायला जरी बरं वाटत असलं तरी मी याच्याशी सहमत नाहीये. कुठल्याही ठिकाणी स्त्रियांचा किंवा पुरुषांचा शारीरिक किंवा मानसिक छळ हा निंदनीय आहे हे वाक्य मला पटत. आजकाल चाललेल्या या #metoo campaign मुळे सगळ्या सेक्टर मध्ये काम करणारे प्रामाणिक पुरुष जरा घाबरून च वावरत असतील कारण या बाबतीत दोन्ही कडील बाजू ऐकून घेण्याची पद्धत नाहीये.तुमच्यावर आरोप झाला म्हणजे समाज तुम्हाला गुन्हेगार ठरवून मोकळा होतो. भलेही तो आरोप गैरसमजुती मधून झाला असेल किंवा पूर्व वैमनस्य मधून झाला असेल.
आपल्या देशात आदर करणे हे कार्य जबरदस्ती प्रत्येकावर थोपलेलं आहे. कोणी एक व्यक्ती स्त्री आहे तर तिचा आदर तुम्हाला करायलाच पाहिजे.कोणी एक व्यक्ती वयस्कर आहे तर तिचा आदर तुम्हाला करायचा आहे आणि बरेच असे criteria आपल्या देशामध्ये आहेत.
माझ्या सोबत घडलेला एक किस्सामी इथे सांगू इच्छितो, मी ऑफिस मध्ये काम करत असताना माझी एका मुलीशी खूप घट्ट मैत्री झाली त्याला आमच्या कलीग नी वेगळा रंग दिला ही गोष्ट वेगळी.काही दिवस आमची मैत्री चांगली चालू होती पण अचानक आमच्यात भांडणं होऊ लागली.एक दिवस असंच जोराचं भांडण झाले आणि आम्ही एकमेकांना खूप काही बोललो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने ऑफिस मध्ये आली तेव्हा कदाचीत तिचा इमोशनल breakdown झाला असावा ती खूप रडली मला राहवले नाही मी तिला सॉरी म्हणायला गेलो ऑफिस मध्ये. तिला माझा राग आला होता तिने आमच्या हेड कडे तक्रार केली. आता त्यांना आमच्यामैत्री बद्दल काहीच माहिती न्हवती.त्यांनी मला harrasssment चा दोषी करून टाकले आणि मलालास्ट ची वॉर्निंग देण्यात आली. माझा खूप इन्सल्ट झाला माझ्या आई बाबांचे संस्कार हि काढण्यात आले. हि बातमी पूर्ण कंपनीत पसरली.सगळे मला तुच्छतेच्या नजरेने पाहू लागले. मी दोन महिने प्रचंड डिप्रेशन मध्ये जगत होतो. कधी कुणाला कारण नसताना त्रास न देणारा मी आज माझ्यावर harrassment चा आरोप होत होता. वाटत होत कि आत्महत्या करावी आणि संपवावं सगळं. पण कसंबसं नेटानं एक दोन महिने ढकलले.
एके दिवशी असाच तिला सॉरी चा मॅसेज केला तर तिनेच उलटं मला सॉरी म्हणून मॅसेज केला आणि म्हणाली की मी त्यावेळी रागात होते त्यामुळे तुझी complaint केली मला माफ कर आणि रडू लागली. मी तिला माफ केले पण मनात एक प्रश्न होता2खरंच मी तेव्हा निराश होऊन आत्महत्या केली असती तर???? खरंच मी तो अपमान पचवू शकलो नसतो तर????
अर्थात सगळ्याच केस मध्ये असे असेल असे मी मुळीच म्हणत नाही पण सगळ्याच केस मध्ये पुरुष दोषी असतो असे सुद्धा म्हणता येणार नाही. अश्या आरोपांमुळे अनेकांचे करियर बरबाद झाले अनेक जण त्या नैराश्यातून बाहेर पडू शकत नाहीयेत.एखादी व्यक्ती अमुक एका gender ची आहे म्हणून ती खरं बोलते किंवा तिचा रिस्पेक्ट करायचा हे मला पटत नाही.रिस्पेक्ट हा कमवायला लागतो तुम्ही अमुक एका gender चे आहेत म्हनुन तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचा हा कोणता न्याय.
#metoo campaign
Submitted by Abhishek Sawant on 8 October, 2018 - 15:17
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुक्याबरोबर ओलेही भरडले जातात
सुक्याबरोबर ओलेही भरडले जातात. त्यामुळे सुक्याचे भरडले जाणे चालू राहू नये..
??????
हेला, मला वाटते तुमचा गैरसमज
हेला, मला वाटते तुमचा गैरसमज होतोय,
स्त्रीने आरोप केला म्हणजे तो व्यक्ति १००% गुनेहगारच समजायला हवा >>>>>
अजिबात नाही, पण जिने आरोप केला तिची लायकी काढली जाऊ नये, तिला निर्भयपणे पुढे येऊन आपले म्हणणे मांडता यावे इतकी साधी अपेक्षा सुद्धा या प्रकरणी पूर्ण होत नाहीये.
10 वर्षापूर्वी तिने तोंड उघडल्यावर।तिच्या गाडीची तोडफोड झाली, आज तिने तोंड उघडल्यावर ती कशी चारित्र्यहीन आहे हे सांगण्यात लोक पुढे आहेत.
दुसरी गोष्ट, कायद्यापुढे सगळे समान असले तरी कायदा पीडितांना कायम झुकते माप देतो, मग ती पीडित सून असो किंवा पीडित दलित असो.
जर तुमच्या लॉजिक प्रमाणे गेले तर हुंडा विरोधी कायदा किंवा अट्रोसिटी कायदा रद्द करावा लागेल,
अजिबात नाही, >> असे तुम्हि
अजिबात नाही, >> असे तुम्हि म्हणत आहात. पण वास्तवात तसे आहे का? जिथे कुठे ह्या चर्चा चालु आहेत तिथे सरळ दोन तट पडलेत की नानासमर्थक आणि तनुश्रीसमर्थक. दोन्ही पार्ट्या विरोधीमाणसाचे फुल्लॉन वाभाडे काढत आहेत. इथल्याच कोण्या धाग्यावर च्रप्स म्हणतात की ट्विटरवर तनुश्रीला लाखो लोक समर्थन करत आहेत बोलेतो इस्का मत्लब नाना इज गुन्हेगार? अरे काय? काहीपण..
तनुश्री खोटे बोलते की खरे हे ठरवणारी यंत्रणा असेलच, ती झुंडीने आपल्या हातात घेऊन न्यायाधिशगीरी करायची काय गरज आहे? किंबहुना कोणत्याही हर्रासमेंट केस मध्ये पब्लिकला का इतका न्यायधिशगीरी करायचा सोस?
जर तुमच्या लॉजिक प्रमाणे गेले
जर तुमच्या लॉजिक प्रमाणे गेले तर हुंडा विरोधी कायदा किंवा अट्रोसिटी कायदा रद्द करावा लागेल,
मीटु चळवळ ही कायदा आहे का? आपण बहुतेक कायद्यांबद्दल चर्चा करत नाही आहोत इथे.
कायद्यात वेळोवेळी बदल घडत असतात. त्याची एक विशिष्ट प्रोसेस आहे. हुंडाविरोधी कायद्याबद्दल काहीही माहित नसणार्या असंख्य स्त्रीया अजूनही होरपळल्या जात आहेत व त्याच कायद्याचा हुशारीने गैरवापर करुन कित्येक पुरुष(विथ अख्खे कुटूंब- अगदी जे त्या घरात राहत नाहीत, पाचशे किलोमिटरवर दुसर्या गावात राहतात पण फक्त ब्लड रिलेशन आहे म्हणून जेलबंद होतात) नागवले जात आहेतच. त्यात यथायोग्य ते बदल घडत आहेत.
अरेच्चा तिकडे वाचून प्रतिसाद
अरेच्चा तिकडे वाचून प्रतिसाद देईपर्यंत इकडे 498A येऊन गेला होता कि!
> ती झुंडीने आपल्या हातात घेऊन न्यायाधिशगीरी करायची काय गरज आहे? किंबहुना कोणत्याही हर्रासमेंट केस मध्ये पब्लिकला का इतका न्यायधिशगीरी करायचा सोस? > हे ठीक आहे. अशा केसेसमध्ये माझी शक्यतो स्त्रियांनाच सिम्पथी असते पण एकाच ठराविक केसची मीडिया ट्रायल करायची गरज नाही हे मान्य.
फक्त हेदेखील आहे कि एक व्हिक्टिम पुढे आली, तिला सामान्यांचा सपोर्ट मिळाला तर तशाच इतरही बऱ्याच मुली पुढे येऊन बोलू लागतील. आणि मग हे किती मोठ्या प्रमाणात होत, किती कॉमन आहे हे कळेल.
हे किती मोठ्या प्रमाणात होत,
हे किती मोठ्या प्रमाणात होत, किती कॉमन आहे हे कळेल.;;; कळायचे काय त्यात.. हे आहेच कि कॉमन .. पुढे काय?
> पुढे काय? > मला वाटतं या
> पुढे काय? > मला वाटतं या केसनंतर नानांची बाजु घेऊन भांडण्याऐवजी पुरुषांनीदेखील अशी Me_Too कॅम्पेन चालू केली असती ज्यात ते स्वतः मोलेस्टेशनचे व्हिक्टिम आहेत आणि दोषी स्त्री/पुरुष आहे तर जास्त सुयोग्य राहील असतं आणि ही कॅम्पेन लिंगनिरपेक्ष करता आली असती.
कटप्पाच्या एका धाग्यावर पुरुष बालकांचे वयाने मोठ्या स्त्रीने केलेले लैंगिक शोषण हा मुद्दा थोडाफार चर्चिला गेला होता.
सध्या जेकाही चाललंय ते असिफा केसनंतरची हिंदुत्ववाद्यांची वागणूक याचाच पाणीदार अवतार आहे....
अॅमी. पुर्णपणे सहमत.
अॅमी. पुर्णपणे सहमत.
बोकलत> आवडले तुमचे विचार.
बोकलत> आवडले तुमचे विचार. बरोबर आहे
इथे लेखकाने जे काही लिहीले
इथे लेखकाने जे काही लिहीले आहे ती त्याची एकट्याची बाजू आहे. ही कथा काल्पनिक नसेल तर दुसरी बाजू समजण्यासाठी काय पर्याय आहे वाचकांकडे ? समजा लेखक खरे बोलत जरी असेल तरी त्याने अशा अपवादात्मक अनुभवांचा कांगावा करून सर्वच स्त्रियांना आरोपीच्या पिंज-यात आणू नये. भारतात हे सध्या मोठ्या प्रमाणावर घडत आहे. आणि अशा कांगाव्यांना यशही मिळते आहे.__
@मेरिच गिनो... मी तुम्हाला न्यायनिवाडा करण्यासाठी हि पोस्ट टाकली नाही माझ्या मनात त्या मुलीबद्दल रागही नाही.
तुमचं एक वाक्य सर्वच स्त्रियांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका.मला सुद्धा हेच म्हणायचं आहे फक्त माझ्या वाक्यात gender डिफाईन केलेले नसेल.कोणालाच लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका मग ती स्त्री असो किंवा पुरुष.
तुम्हा सगळ्यांना माझी एक
तुम्हा सगळ्यांना माझी एक विनंती आहे. जरा स्वतःला माझ्या ठिकाणी ठेऊन बघा. तुम्हाला आज1पर्यंत कोणी आवाज चढवून बोलले हि नसेल आणि फक्त एका मुलीच्या रागीट आणि हळव्या स्वभावामुळे तुमच्यावर harrassment ची कंप्लेंट झाली तर???? तुम्हाला किती त्रास होईल. भलेही ती मुलगी तुमची माफी मागून रडली तरी तो डाग धुतला1जाणार आहे का. आपली प्रतिमा बनवायला लोक आयुष्य खर्ची घालतात आणि एका व्यक्तीच्या तर्कशुन्य कृती मुळे ती प्रतिमा धुळीस मिळते तेव्हा कसे वाटत असेल.
@मेरिच गिनो... मी तुम्हाला
@मेरिच गिनो... मी तुम्हाला न्यायनिवाडा करण्यासाठी हि पोस्ट टाकली नाही >>>> तुम्ही या साइटचे ओनर आहात हे आताच समजले. तुम्ही द्याल त्या आज्ञा आम्ही पाळूच.
आपला आज्ञाधारक...
बोकलत> आवडले तुमचे विचार.
बोकलत> आवडले तुमचे विचार. बरोबर आहे>>>>
@मेरिच गिनो...सॉरी तुम्हाला
@मेरिच गिनो...सॉरी तुम्हाला वाईट वाटले असेल तर पण खरंच हि पोस्ट मी भावनिक होऊन टाकली होती.
सर्वांचेच प्रतिसाद पटण्या
सर्वांचेच प्रतिसाद पटण्या सारखे आहेत जरी अगदी भिन्न आहेत तरी.... स्त्री आणि पुरूष असा फरक न करता एक व्यक्ती म्हणून एकमेकाकडे पाहून त्यांच्या कामाचा आणि व्यक्ती आदर केला पाहिजे ...जो पर्यंत असे होणार नाही तो पर्यंत हे असेच चालू राहणार एकमेकावर आरोप प्रत्यारोप
माझ्या सहका-याने मला
माझ्या सहका-याने मला सांगितलेला त्याच्या आधीच्या आॅफिसमधला किस्सा, एका मुलाचे व मुलीचे पूर्वी भांडण झाले होते, त्या मुलीचे कुणाशीच पटायचे नाही, एक दिवस तिने तक्रार केली की त्या आधी भांडण झालेल्या मुलाने तिला धक्का मारला, त्या मुलाला तत्क्षणी नोकरीवरून काढून टाकले.
मला वाटतं सीसीटीव्ही फूटेज असल्याशिवाय कुणाला नोकरीवरून काढू नये.
कॉर्पोरेटमध्ये विरुद्धलिंगी
कॉर्पोरेटमध्ये विरुद्धलिंगी मैत्रीची एक लिमिट असते. वेगवेगळे टप्पे असतात, माझ्या पाहणीत मैत्रीतून अगदी कन्सेन्शुअल सेक्स नंतर भांडणं करून बोलणं तोडून मोकळे झालेले आणि तरीही सोबत, एकाच टीमला काम करणारे लोक आहेत. का? कारण त्यांनी दोघांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीत कंसेंट होता. एक कंसेंट सांभाळला तर टोकाची भांडणं होणार नाहीत.
पण निमशहरातून किंवा एका विशिष्ट मानसिकतेतून कार्पोरेट मध्ये आलेले तरुण या गोष्टी समजत नाहीत. मुलगी आपल्यासोबत कायम असते, आपली चांगली मैत्रीण आहे याचा अर्थ आपण त्यांच्यावर हक्क गाजवायला मोकळे आहोत असं समजण्यात होतं. असे तरुण त्या मुलीच्या पर्सनल स्पेस मध्ये इन्वेजन करतात जे त्या स्वतंत्र मुलीला पटत नाही, मग हे अल्पबुद्धी तरुण मानसिक कार्ड काढतात. मानसिक छळ करतात अक्षरशः.. आणि ती मुलगी भांडली, अबोला धरला तर ती कशी वाईट आणि मी कसा बिचारा असं लोकांना सांगत फिरतात.
राहिला मुद्दा हॅरेसमेंट तक्रारीचा, तर शक्यतो (चांगल्या) मुली फार मोठं काही नसेल, खरोखरच्या मैत्रीतली गोष्ट असेल तर तक्रार करत नाहीतच. तुमच्या या प्रसंगात ३ शक्यता आहेत.
१. ती तुमची खरंच चांगली मैत्रीण असेल आणि तुम्ही नकळत/ जाणूनबुजून काहीतरी मोठी चूक केलीत.
२. मुळात तुमची मैत्री तेवढी काही खास नसेल, पण तुम्ही ती खास आहे असं समजून इन्व्हेजन केलं असावं वगैरे.
३. ती मुलगी मुळात स्वार्थी किंवा वर लिहिलेल्या (चांगल्या) मुलींपैकी नसावी.
@abhisheksawant..
@abhisheksawant..
Tumhi lihilela lekh vachala..tumche mhanane hi barobar ahe..purushanchi baaju hi aikun ghyayla havi..karan naanyala donhi baaju astat..tumchya sobat je zal tyabaddal vait vatla..
ऑफिसमध्ये कोणत्याही मुलीशी
ऑफिसमध्ये कोणत्याही मुलीशी जास्त मैत्री करू नये, कामापुरते बोलावे, प्रोफेशनल वागावे, +११११११११११११
मीटू चा मुख्य हेतु हा
मीटू चा मुख्य हेतु हा व्हिक्टिम ला तु एकटी नाहीस आम्हालाही अशाच प्रकारचा सामना करावा लागला. तू घाबरु नकोस आम्ही तुझ्या सोबत आहोत. हा दिलासा देण्यासाठी आहे. त्याचा उपयोग हा पुढे अन्य कारणासाठीही होउ लागला आहे.. ते योग्य की अयोग्य हे त्या त्या केसनुसार असावे. हा प्रश्न मूळ समाजमनाच्या लैंगिक व्यवस्थापनाचा आहे. त्याचे अनेक पैलू आहेत.
Pages