एक वाटी तांदूळ पीठ
सात आठ लिंबे
लिंबू पाउडर
लिंबाचा रस साखर अथवा मीठ घालून फ्रिजमध्ये ठेवणे इत्यादि साठवण्याचे दोनतीन प्रकार केले जातात. .
नेता येणारी पावडर अशी करता येईल.
एक वाटी तांदूळाचे पीठ
आठ लिंबे
फोटो १
तांदुळाचे पीठ पसरून त्यावर लिंबाचा रस पिळायचा. बिया काढून टाका.
फोटो २
चमच्याने पीठ थोडे हलवून दुसरे तिसरे याप्रमाणे पीठ भिजेपर्यंत लिंबे पिळल्यावर -
फोटो ३
घरातच पंख्याखाली वाळायला पीठ ठेवायचे.
दोनचार तासांनी लगद्याचा ओलेपणा कमी होत जाईल तसे ढेकळे चुरायची.
पावसाळी हवा असल्यास दोनतीन दिवस लागू शकतात. स्टील अथवा प्लास्टिक प्लेट्स घेऊ नका.
काचेची / चिनी मातीच्या बऱ्या.
ढेकळे खडखडीत वाळतात, काळपटपणा येत नाही.
फोटो ४
मिक्सरमध्ये फिरवून पूड करा.
फोटो ५
सॅाल्ट डिस्पेन्समध्ये भरून भुरभुरवता येते.
हिंगाच्या रिकाम्या बॅाटलमध्ये भरल्यास प्रवासात नेता येते. लिंबू सरबत करता येते. तळाला तांदूळ पीठ राहील तेसुद्धा पिण्याने नुकसान नाही. एनर्जी ड्रिंक झाले. भेळेत टाकता येते.
वरण-भातावर घेता येते. चुरमुरे/भातात पीठ सहज मिसळते.
एक वाटी पिठात आठ लिंबांचा रस असतो - बऱ्यापैकी आंबटपणा असतो.
दोन महिने सहज टिकेल फ्रिजशिवाय.
प्रवासात नेण्याची सोयीची आणि दोन महिने टिकाऊ.
छान आयडिया आहे.
छान आयडिया आहे.
Mast idea
Mast idea
मस्त आहे रेसिपी
मस्त आहे रेसिपी
मस्त वाटतेय करून बघेन
मस्त वाटतेय
करून बघेन
छान रेसिपी. फक्त तांदुळ पिठ
छान रेसिपी. फक्त तांदुळ पिठ तितकेसे झेपले नाही. काही तरी पर्याय हवा.
आयडिया चांगली आहे. पण तांदळाच
आयडिया चांगली आहे. पण तांदळाच पीठ सरबतात ,भेळेत बहुदा जाणवेल खाताना.
साखर /मीठ वापरून केले तर होत असाव का? इथे रस मिळतो बाटलीत त्यामुळ काही प्रॉब्लेम नाही पण जिथे तो पर्याय नाही त्यांना चांगली आहे युक्ती.
काय छान आयडिया आहे!
काय छान आयडिया आहे!
पिठीसाखर आणि वेलदोडे पावडर
पिठीसाखर आणि वेलदोडे पावडर आणि साखर असे मिश्रण करून पहायला हवं.
@sulu,
@sulu,
>>फक्त तांदुळ पिठ तितकेसे झेपले नाही. काही तरी पर्याय हवा.>>
आपला हिंगसुद्धा गव्हाच्या पिठात असतो. हिरा हिंग फार कडवट जहाल असतो तो थोडासा पिठात मिसळून देतात.
--
तांदळाचे पीठ भिजून वाळल्याने त्याची 'पिठी' ( मोदकाला, भाकरीला वापरतात तशी हलकी होते) होते. वरणभात, पोहे, भेळ यामध्ये तर मिसळलेले कळतही नाही.
@ मेधावि, पिठीसाखर आणि
@ मेधावि, पिठीसाखर आणि वेलदोडे मिस्रण करतोच आपण आणि वेलदोडे घालण्याचे पदार्थ गोडच असल्याने साखरेत टाकल्याने अडचण येत नाही. आयुर्वेदातले सीतोपलादी चूर्णात असते साखर, वेलदोडे.
@सीमा, भेळेत समजत नाही. कुरमुरे शेव अधिक ही पाउडर टाकून चिरलेला कांदा घालून हलवले की मिसळते. प्रवासासाठी.
@कुंद, बरोबर आहे तुमचं. मी
@कुंद, बरोबर आहे तुमचं. मी फक्त सरबताचा विचार करत होते. त्यात पिठी जरा विचित्र वाटेल. पण उपमा पोहे वगैरेत तां पिठाला हरकत नाही.
छान आयडिया
छान आयडिया
व्वा.मस्त आयडीया आहे.
व्वा.मस्त आयडीया आहे.
नाईस आयडिया.
नाईस आयडिया.
गोड्/तिखट/लोणची, रसलिंबू करून दमल्यावर अगदी रोज ४०-५० वाटून टाकावे लागले इतके लिंबू यंदा आले होते. नेक्स्ट टाईम हा प्रकार करून पाहीन
ओन्ली, लिंबासोबत मीठ वापरून त्याचे क्रिस्टल्स कसे बनतात ते पाहू. सॅलडच्या क्रशरमधे वापरायला छान होईल असे वाटते.
नुसती आंबट चव हवी तिथे हे पिठीचं प्रकरण करून पहायला हवे.
वॉव.. कित्ति मस्त आयडिया..!!
वॉव.. कित्ति मस्त आयडिया..!!
Interesting
Interesting