
- ताजी वांगी: पाव किलो/८-९ (मोठ्या आकाराची असतील तर उत्तम)
- कोथिंबीर बारीक चिरून
- लाल तिखट :चवीनुसार
- मीठ :चवीनुसार
- धण्याची पूड - चिमूटभर
- हळद - चिमूटभर
- दाण्याचे कूट /तिळाचे कूट
- तेल - थोडेसे- फोडणीसाठी
- हिंग
- कुठला तुमचा खास गरम /काळा /घरगुती मसाला असेल तर तोही घ्या चिमूटभर, नाहीतर फार विचार न करता चिमूटभर गरम मसाला द्या ढकलून
- चार दाणे साखर
घरात खूप वांगी असतील, भरली किंवा मसाल्याची भाजी करण्यास वेळ नसेल, तर एक झटपट भाजी म्हणून हा प्रकार करावा.
सोपी कृती आहे, कष्ट फारसे नाहीत. एका बाजूला पोळ्या करताना सहज होऊन जाते
- जाड बुडाच्या कढईत तेल तापत ठेवावे. नेहमीच्या फोडणीला घेतो त्यापेक्षा जास्तच तेल घ्यावे. अंदाजे छोटी अर्धी वाटी वगैरे.
- ताजी रसरशीत वांगी घ्यावीत. काटे काढून टाकावेत. वांग्याच्या उभ्या फोडी चिरून घ्याव्यात. पाण्यात भिजवू नये.
सगळी तयारी करून शेवटी वांगी चिरून थेट फोडणीत घालता येतील असे पाहावे.
- तेल तापले की त्यात मोहरी/जिरे तडतडवून आणि हिंग घालून फोडणी करावी
- चिरलेली वांगी फोडणीत घालून नीट मिसळून घ्यावे .
- आता प्रेमळपणे कढईवर झाकण ठेवून अत्यंत मंद आचेवर वांगी स्वतः च्या रसात वाफेवर शिजतील ह्या आशेवर पोळ्या किंवा इतर वेळखाऊ काम करावे
- १५-२० मिनिटात वांगी चांगली परतल्या जातात आणि त्यांच्या आकार बदलतो
- भाजीच्या फोडी परतून झाल्यांनतर त्यात लाल तिखटाची पूड, मीठ, हळद , मसाला, दाण्याचे कूट, साखरेचे फक्त ४ दाणे घालून मिसळून घ्यावे
- पुन्हा एकदा प्रेमळपणे कढईवर झाकण ठेवून अत्यंत मंद आचेवर ५ मिनिटे ठेवावे.
- शेवटी सजावटीसाठी कोथिंबीर आहेच !
अशाच प्रकारे गवारीच्या शेंगेचे दोन भाग तोडून तिचीही सुकी भाजी करता येते
डब्यात देण्यासाठी उत्तम पर्याय आहे
झटपट होते
फार मसाले वगैरे लागत नाहीत. तेल जास्त लागते मात्र! ( shallow fry method )
ही भाजी शक्य तितक्या मंद आचेवर होऊ द्यावी
ह्यात कांदा,लसूण, आलं वगैरेची गरज नाही, पण आवडत असेल तर फोडणीत बारीक ठेचून घालू शकता
(No subject)
फोटो टाकलात, बरे केले. आता
फोटो टाकलात, बरे केले. आता पाककृती वाचतो.
छानच लागेल.
छानच लागेल.
तशीही वांग्याची भाजी मला आवडतेच.
बहुतेक खाल्लीय अशी भाजी.
बहुतेक खाल्लीय अशी भाजी.
एकदा करून बघतो.
बरं, रागीट पद्धतीची पाकृ पण येणाराय का?
मस्त!! काका
मस्त!!

काका
प्रेमळपणे कढईवर >>>>>>>
प्रेमळपणे कढईवर >>>>>>> tikaDe kaDhaI saNasaNeet taapavaayachee aaNi ithe प्रेमळपणे कढईवर झाकण घालायचे.पा.कृ. करायला हवी.
बरं, रागीट पद्धतीची पाकृ पण येणाराय का?.......:D
वांगं आवडत.. करायला हवी एकदा.
वांगं आवडत.. करायला हवी एकदा..
फोटो छान दिसतोय. करुन बघिन.
फोटो छान दिसतोय. करुन बघिन.
हम्म...करून बघायला हवी...छान
हम्म...करून बघायला हवी...छान वाटतेय.
सॉलिड मस्त दिसतेय भाजी.
सॉलिड मस्त दिसतेय भाजी. करुन बघेन अशी.
वांग्याच्या काच-यापण छान होतात. फोडणी आणि फक्त तिखट मिठ घालून. किंचित ओवा, मिरपुडपण छान लागते त्यात.
शीर्षकात प्रेमळ पद्धत असं
शीर्षकात प्रेमळ पद्धत असं वाचुन पाकृ वाचली नाही.



पण तयार भाजी बघुन आजिबात वाटत नाहीये की ही भाजी प्रेमळ पद्धतीने बनवली आहे एवढी तिला (भाजीला) भाजली आहे. आणि फिस्करुन टाकली आहे.
रागीट पद्धत आली तर वाचेन.
हलके घ्या.
अशी भाजी मी पण बनवते. झटपट होते. आणि भाकरीशी मस्त लागते.
ही भाजी मला नुसती खायलाही
ही भाजी मला नुसती खायलाही आवडते. यात कांदाही छान लागतो.
मला पण ही भाजी फार आवडते..
मला पण ही भाजी फार आवडते.. सोबत दही घेतलं तर चविला अगदी चार-चांद लागतात..!!
व्वा खमंग वास सुटलाय
व्वा खमंग वास सुटलाय
तसं वांग्याच भरीत माझ फेवरेट
हेही बनवायला सांगतो आईला.
सस्मिते..
सस्मिते..
मला आधी त्यातली वांगी दिसलीच नाहीत. म्हटलं वांग्याची भाजी म्हणून गवारच्या भाजीचा फोटो टाकलास की काय.
पण सोपी आणि चांगली वाटतेय. करुन बघेनच.
भाजीच्या फोटू वरून ती
भाजीच्या फोटू वरून ती प्रेमळपणे केली असेल असे नाही वाटत. छान कृती.
लागणारे जिन्नस:
लागणारे जिन्नस:
- ताजी वांगी: पाव किलो/८-९ (मोठ्या आकाराची असतील तर उत्तम)
<<
पाव किलो वजनामधे ८-९ मोठ्या आकाराची वांगी कोणत्या मार्केट मध्ये मिळतात ?
पाव किलो वजनामधे ८-९ मोठ्या
पाव किलो वजनामधे ८-९ मोठ्या आकाराची वांगी कोणत्या मार्केट मध्ये मिळतात ?>>>
पाव किलो/८-९
तो '/' किवा ह्या अर्थाने वापरलाय
तात्पर्य: खुप वान्गी असतील तर ती ह्या कृतीने वापरा आणि सम्पवा
सर्वांचे आभार!!
आमच्याकडे सगळ्यात ताजी वांगी
आमच्याकडे सगळ्यात ताजी वांगी आहेत. आज केली होती भाजी (पाण्याचा वापर न करता) पण लहान तुकडे केले होते, भाजी छान झाली होती. आता अशीही करून बघता येईल...
रागीट पद्धत आली तर वाचेन <<
रागीट पद्धत आली तर वाचेन << रागीट पध्धत म्हणजे भरीतच असेल....
वांग आवडतं. मी ह्यात शेंगदाण्याची चटणी टाकते २ चमचे... पण अशी तोंडली सारखी कापुन कधी केली नाही. आता करुन बघेन...
किल्ले, मी याच पद्धतीने करते.
किल्ले, मी याच पद्धतीने करते. मस्त लागते ही भाजी.
छान दिसतेय भाजी...
छान दिसतेय भाजी...
Harsh प्रेम असेल
Harsh प्रेम असेल
सर्व वाचकान्चे आभार
सर्व वाचकान्चे आभार


Harsh प्रेम असेल>>
रागीट पद्धत>> आहे ती पण
इथे वांगी चांगली मिळत नाहीत!
इथे वांगी चांगली मिळत नाहीत!
घरी गेलो कि करुन बघेन नक्की!