ज्वारीचे धपाटे

Submitted by pltambe@yahoo.co.in on 6 August, 2018 - 19:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : चार वाट्या ज्वारीचे पीठ , दोन मध्यम कांदे किसून , ८-१० लसणाच्या पाकळ्या, एक टेबलस्पून शेंगदानयाचे कूट , एक चमचा भाजले ले तीळ , मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार लाल मीराचीचे
तिखट व मीठ व एक टेबलस्पून तेल

क्रमवार पाककृती: 

कृती : प्रथम एका परातीत ज्वारीचे पीठ चाळून घ्या व त्यात कांद्याचा कीस , शेंगदाण्याचे कूट , तीळ , मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , चवीनुसार लाल मिरचीचे तिखट व मीठ एकत्र मळावे.
गॅसवर तवा गरम करत ठेवावा , परातीत हे पीठ भाकरीप्रमाणे थापावे. तवा तापल्यावर हा धपाता तव्यावर थोडेसे तेल टाकून त्यावर लालसर होईपर्यंत भाजावा
दही किंवा चटणी सोबत हे ज्वारीचे धपाटे सर्व्ह करावेत.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

हे ज्वारीचे धपाटे ७-८ दिवस छान टिकतात आणि त्यामुळे प्रवासात बरोबर नेण्यासाठी फार सोईस्कर व उपयुक्त आहेत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार,

मला २० किलो मोदक मधे किति नग बसतात कोणि सांगु शकेल का? आणि कोणि बनवुन देत असेल तर प्लिज किमंत सांगाल का १ मोदकची.

दक्षा

1. एका मोदकाचं वजन करा. आणि मग 20ला त्या वजनाने भागा. ग्रॅम आणि किलोग्रॅम चा गोंधळ घालू नका.
2. 20 किलोच्या किंमतीला वरील 1 मध्ये आलेल्या संख्येने भागा की एका मोदकाची किंमत मिळेल.

There are 186 calories in a 1 serving of fried modak - homemade. Calorie breakdown: 28% fat, 68% carbs, 4% protein.

आता गणित मांडता येईल. कार्ब्स आणि प्रोटीन च्या एका ग्रॅम मध्ये ४ कॅलोरीज, आणि फॅट मध्ये ९ कॅलोरीज. १८६ कॅलोरीज करता हे गणित सोडवले की एका मोदकाचे वजन येते ४०.१ ग्राम्स. यात फायबर्स, पाणी, मिनरल्स या करिता २०% अधीक केल्यास एका मोदकाचे वजन ४८ ~ ५० ग्राम्स.