#अंबाडीच्या #देठांची #चटणी

Submitted by pltambe@yahoo.co.in on 6 August, 2018 - 08:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : एक वाटीभरून पालेभाजी-आंबाडीची कोवळी देठे , एक टेबलस्पून पांढरे तीळ,पाव वाटी शेंगदाणे , दोन टेबलस्पून पंढरपूरी डाळे , चवीनुसार चार लाल सुक्या मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा, कढीपत्त्याची ५-६ पाने,चवीनुसार मीठ व साखर,अर्धी वाटी दही , बारीक चिरलेली कोथिंबीर , परतण्यासाठी व फोडणीसाठी जरुरीप्रमाणे तेल, फोडणीसाठी मोहरी,जिरे,हळद व हिंग

क्रमवार पाककृती: 

कृती : प्रथम अंबाडीची देठे जर जास्त लांब असतील तर कापून छोटी करून घ्या. गॅसवर एका नॉनस्टिक फ्राय पॅनमध्ये थोडेसे तेल घालून ते गरम झाल्यावर त्यान बारीक केलेली अंबाडीची देठे, शेंगदाणे , पंढरपूरी डाळे , चवीनुसार चार लाल सुक्या मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा, कढीपत्त्याची ५-६ पाने घालून चांगले परतून घ्या. आता चवीनुसार मीठ व साखर घालून पुन्हा एक मिनिट परतून घेऊन गॅस बंद करा. थंड झाल्यावर परतलेले सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घाला व अर्धी वाटी दही व चिरलेली कोथिंबीर घालून चटणी वाटून घ्या, गॅसवर एका कढल्यात फोडणीसाठी थोडेसे तेल गरम घेऊन घेऊन त्यात मोहरी ,जिरे,हळद व हिंग घालून फोडणी करून घ्या व ती त्या वाटलेल्या चटणीत घाला व कालवून घ्या.
सर्व्ह करतेवेळी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पोळी सोबत वाढा.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ व्यक्तींसाठी
माहितीचा स्रोत: 
स्वत:च अंदाजाने बनवली
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे रेसीपी. देठ कोवळी मिळण जरा कठीण वाटतय इथे.
घरची अंबाडी असली तरी. कारण जी अंबाडी उगवते ती चांगली ३-५ फुट उगवते आणि देठ फार जुनं.