भोपळा,
रवा,
मैदा,
दही दूध,
साखर
( प्रमाण :
एक मोठा चमचा मैदा अधिक अर्धी वाटी रवा,
साखर अर्धी वाटी,
दूध अधिक दही अर्धी वाटी,
पीठ दोन तास भिजल्यावर
भोपळा शिजवून लगदा एक मोठा चमचा, आणि अर्धा टिस्पून सोडा मिसळून केक भांड्यात ओतणे.)
भोपळ्याचा केक
(बिन अंड्याचा रवा केक, लाल भोपळा वापरून.)
आपण नेहमी रवा केक तव्यावरती करतो तसाच आहे फक्त यामध्ये लाल भोपळ्याचा उपयोग केलेला आहे.
साहित्य :
लाल भोपळ्याचे तुकडे, बारीक आणि मोठे,
भोपळ्याच्या बिया सोलून,
खायचा सोडा,
दही,
साखर,
रवा,
मैदा,
दूध,
( प्रमाण
एक मोठा चमचा मैदा अधिक अर्धी वाटी रवा,
साखर अर्धी वाटी,
दूध अधिक दही अर्धी वाटी,
पीठ दोन तास भिजल्यावर
भोपळा शिजवून लगदा एक मोठा चमचा, आणि अर्धा टिस्पून सोडा मिसळून केक भांड्यात ओतणे..)
- फोटो आणि कृती -
फोटो १
भोपळ्याच्या मोठ्या फोडी उकडून लगदा करून ठेवायच्या. बिया केकमध्ये घालण्यासाठी.
भोपळ्याच्या मोठ्या फोडी उकडून ठेवायच्या.
फोटो २
फोटो ३
फोटो ४
कढई तापवून थोडी साखर घालून वितळवून थोडे तांबूस पातळ कॅरमल केले.
त्या कॅरमलमध्ये भोपळ्याच्या बारीक फोडी किंचित शिजवायच्या. गॅस बंद ठेवल्याने कॅरमल काळे होणार नाही.
फोडी थोड्या शिजल्यावर त्या वेगळ्या ठेवायच्या, पाक नंतर केकवर घालायचा. पाकालाही छान चव येते
फोटो ५
सर्व साहित्य. मध्यभागी कॅरमल केलेल्या बारीक फोडी, उरलेला पाक.
रवा, थोडा मैदा, दही, दूध आणि साखर ( रवा मैदा मिश्रणाएवढी साखर लागते, अर्धा वाटी ) साधारणपणे दोन तास भिजवायचे.
उकडलेल्या भोपळ्याचा गर पिठात मिसळायचा. थोडासा खायचा सोडा टाका.
केकच्या भांड्याला तळाला तुपाचा हात लावून बटर पेपर ठेवून पीठ ओता. तवा गरम करून त्यावर हे भांडे झाकून ठेवा. गॅस मंद ठेवायचा.
फोटो ६
केकचे पीठ अर्धवट शिजल्यावर असे दिसेल.
साधारण दहा मिनिटांनी पीठ अर्धवट शिजेल तेव्हा झाकण उघडून कॅरमल केलेल्या फोडी आणि बिया पेरल्या. आणखी दहा मिनटांनी गॅस बंद करा. केक शिजला असेल.
थोडे गार झाल्यावर भांड्यातून काढून वरची बाजू वर ठेवल्यावर त्यावर कॅरमलचा पाक टाकता येईल.
फोटो ७
फोटो ८
कॅरमल पाक वर घालून.
भोपळ्याच्या गरामुळे केक हलका होतो आणि रंग येतो.
------------------------------------------------------------------
लेखिका - कुंद
भोपळ्याच्या गरामुळे केक हलका होतो आणि रंग येतो. बियांचाही उपयोग होतो.
मस्त दिसतोय केक.
मस्त दिसतोय केक.
मस्तच.
मस्तच.
अगदी अश्याच पद्ध्तीने मी स्विट पोटॅटो घालून केक केला पण एक अंडे घातले.
सुरेख!
सुरेख!
छानच!
छानच!
वॉव...Very tempting !
वॉव...Very tempting !
मस्त दिसतोय केक. तव्याकडची
मस्त दिसतोय केक. तव्याकडची बाजू छान खरपूस झाली असेल ना?
काय सुंदर दिसतोय केक!
काय सुंदर दिसतोय केक!
~~~तव्याकडची बाजू छान खरपूस
~~~तव्याकडची बाजू छान खरपूस झाली असेल ना?~~
- हो. फार खरपूसही करायची नाही, जळकट वास लागू शकतो. कारण हे तव्यावर करतो आपण.
मस्त!
मस्त!
मस्त बनलाय केक
मस्त बनलाय केक
रवा मैदा साखर भोपळा इ. इ. चे
रवा मैदा साखर भोपळा इ. इ. चे प्रमाण द्या ना. .. करून बघावासा वाटतेय..
एक मोठा चमचा मैदा अधिक अर्धी
एक मोठा चमचा मैदा अधिक अर्धी वाटी रवा,
साखर अर्धी वाटी,
दूध अधिक दही अर्धी वाटी,
पीठ दोन तास भिजल्यावर
भोपळा शिजवून लगदा एक मोठा चमचा, आणि अर्धा टिस्पून सोडा मिसळून केक भांड्यात ओतणे.
मस्तय.
मस्तय.
कुंद ताई, धागा एडिट करून वर प्रमाण अॅड करा की. जास्त सोपं जाईल.
मस्त दिसतोय हा भोपळ्याचा केक
मस्त दिसतोय हा भोपळ्याचा केक.वरची डिजाईन खूप छान!!
सुरेख दिसतोय केक
सुरेख दिसतोय केक
साहित्य प्रमाण धाग्यात घेतलं
साहित्य प्रमाण धाग्यात घेतलं आहे.
१) बिया आणि कॅरमल फोडी कुणाचं नाव लिहिण्यास उपयोगात आणता येतील. वाढदिवस असणाय्रांनी स्वत: एक मोठा केक दुकानातून आणलेला असतोच त्यास जोड म्हणून हा छोटासा चालेल.
२) तवा आणि त्यावरचं छोटं भांडं याचा विचार करता एकावेळी दुप्पट साहित्य घेता येईल.
मस्त ! फोटो पा हून लगेचच
मस्त ! फोटो पा हून लगेचच करावासा वाटतोय....
मस्तच दिसतोय.
मस्तच दिसतोय.
वाह! चवीलाही मस्त असणार
वाह! चवीलाही मस्त असणार घारग्यांसारखा
वा! फारच मस्त दिसतोय केक !
वा! फारच मस्त दिसतोय केक !
मस्त दिसतोय केक
मस्त दिसतोय केक
खूपच सुंदर दिसतोय केक. पाकृ
खूपच सुंदर दिसतोय केक. पाकृ सोपी वाटतेय. आभार कुंदाताई. अजून काही रेसिपी असतील तर सांगा नक्की.
मस्त दिसतोय केक...नक्की करणार
मस्त दिसतोय केक...नक्की करणार
रव्याचा दह्यादुधाचाकरते ..
रव्याचा दह्यादुधाचाकरते .. आता ला.भो. चा करुन पाहिन. मस्त वाटतीये कृती.
मस्त
मस्त
++रव्याचा दह्यादुधाचाकरते .++
++रव्याचा दह्यादुधाचाकरते .++ अनघा.
हो. त्यात खूप पिकलेलं केळं वापरून मऊ होतो. यावेळी भोपळ्याचा प्रयोग केला तो सहज जमला.
++अजून काही रेसिपी असतील तर सांगा नक्की++ चिन्नू.
- हो.
पाककृती करताना फोटो काढून ठेवायचे जमलं आहे.
खूप छान झाला केक कुंदाताई.
खूप छान झाला केक कुंदाताई. त्या caramel आणि caramelized फोडींमुळे वेगळीच लज्जत आली होती. Moist पण झाला. थॅक यू!