परदेशातून भरतात (छोट्याश्या) व्यावसायिक कामासाठी पैसे मागवण्याचा स्वस्त व कायदेशीर मार्ग कुठला?

Submitted by यक्ष on 4 May, 2018 - 22:48

माझ्या एका EU परदेशी सहकार्‍याचे 'Engineering Outsourcing' ची सुरुवातीची एक छोटिशी assignment करवून देण्यात मी instrumental (? मध्यस्थ?..) आहे.
तर ते काम माझ्याच परिचयातील अनुभवी भारतीय कंपनीकडून करवून घेतो आहे. पण त्यात माझे थोडे contribution असल्याने मला अंशलाभ आहे, व व्यवहार माझ्यामार्फत करणे आहे. माझे फक्त साधे बचत खाते आहे. येणारी रक्कम तशी किरकोळ आहे (x,xxx Euro).
तर हा व्यवहार माझ्या बचत खात्यातून करणे कायदेशीर आहे कां? ह्यात 'RBI' चे कुठले नियम लागू होतात कां?
तसेच ही रक्कम परदेशातूम मागवण्याचा स्वस्त व कायदेशीर मार्ग कुठला?(wire transfer?) व साधारण किती हस्तांतरण शुल्क लागेल?
ह्याबद्दल सल्ला मिळाल्यास मदत होइल.
धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेपाल चे खाते घ्या आणि ते वापरून तुम्हाला पैसे घेता येतील आणि तुमच्या खात्यात जमा होतील. हे सगळ्यात स्वस्त पडेल. मी काही छोटी कामे करवून घेतली आणि त्यासाठी असे पैसे दिले होते. खाते घेण्यसाठी काही सोपस्कार करावे लागतील पण ते सगळे पेपाल च्या साईट वर दिसतील.

जर तुमच्या deal मध्ये पैसे फक्त युरो मधुन रुपयात transfer होणार असतिल आणि ते पैसे परत भारताबाहेर घेउन जायचे नसतिल तर you don't have to inform RBI as per FERA act (you may have to inform if you have to take income tax benefit)
जर भारतातिल Outsourcing कंपनी तुमच्या बचत खात्याचा चेक स्विकारत असल्यास बचत खात्यातुन व्यवहार करु शकता.
भारतात जे उत्पन्न मिळेल त्यावर आयकर खात्याचे विवरण पत्र बरण्यासाठी तुम्ही बांधिल आहात. ह्या उत्पन्नावर कदाचित करामधुन सुट पण मिळु शकेल. पण त्यासाठी थोडी किचकट प्रोसेस आहे.

To transfer money: बिट्कॉईन आल्यापासुन बर्याच बॅका वायर ट्रन्स्फर फुकट करतात.
https://transferwise.com ही कंपनी पण खुप स्वस्तात पैसे एका देशातुन दुसर्या देशात पैसे पाठवते. Money transfer process is very transparent. ह्या साईट ला MAS ( सिंगापुरची RBI) चे अ‍ॅर्पुवल आहे त्यामुळॅ जर सिंगापुर वरुन पैसे पाठवणार असेल तर सरकरचे सुरक्षा कवच आहे. युरोप मधुन पाठवणर असाल तर स्वताचा जबाबदारीवर पाठवणे.

धन्यवाद श्री. साहिल!

१. हो. ह्या deal मध्ये पैसे फक्त युरो मधुन रुपयात transfer होणार आहेत.
२. त्यानंतर माझ्या बचत खात्यातून Outsourcing कंपनीला चेक ने देणार आहे. ( ते स्विकारतात का अशी वेगळी विचारणा करावी लागेल काय?)
३. "भारतात जे उत्पन्न मिळेल त्यावर आयकर खात्याचे विवरण पत्र बरण्यासाठी तुम्ही बांधिल आहात": होय. ते मी करणार आहे.
४. "ह्या उत्पन्नावर कदाचित करामधुन सुट पण मिळु शकेल. पण त्यासाठी थोडी किचकट प्रोसेस आहे": ह्याबद्दल अधिक महिती मिळाल्यास मदत होइल.
५. "https://transferwise.com", "युरोप मधुन पाठवणर असाल तर स्वताचा जबाबदारीवर पाठवणे": माझा परदेशी सहकारी ह्या साइट तर्फे युरोपातून पाठवण्यात काही रिस्क आहेत कां? मागे एकदा मी flywire ने माझ्या एका course ची फीस भरली होती. तेन्व्हा काही documents submit करावी लागली होती; तेवढाच पुर्वानुभव.

आपल्या माहितीबद्दल धन्यवाद!

त्यानंतर माझ्या बचत खात्यातून Outsourcing कंपनीला चेक ने देणार आहे. ( ते स्विकारतात का अशी वेगळी विचारणा करावी लागेल काय?)>>
जर ती कंपनी मोठी असेल तर ती तुम्हाला बिल मागेल. त्या बिलावर जे नाव असेल त्या नावाने ती कंपनी चेक देईल. तुम्ही तुमचे नाव हेच कंपनीचे नाव करुन त्या नावाने बिल बनवुन त्या कंपनीच्या account department ला देउ शकतात. देणेकरुन त्या नावाने चेक मिळेल. काही कंपन्या तुमच्या नावाने बिल दिल्यास ते स्विकारत नाहीत. त्याना बिलावर कंपनीचे नाव लागते. जर तुमच्या कंपनेचे नाव अबक कंपनी असेल तर चेक पण त्याच नावाने मिळेल.
छोटी कंपनी असेल तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. अश्या कंपन्यात रिसिट बुक वर हस्ताक्षर घेउन चेक दिला जाईल
https://transferwise.com", "युरोप मधुन पाठवणर असाल तर स्वताचा जबाबदारीवर पाठवणे" >>> ही साईट बरीच वर्ष चालु आहे. खुप कमी दरात पैसे एका देशातुन दुसर्या देशात पाठवते. त्यामुळे तशी रिलायबल आहे. फक्त जर तुम्ही पैसे टाकले आणि दुसर्या दिवशी जर बंद पडली (तसे व्ह्यायची शक्यता खुप खुप कमी आहे) तर त्या देशातिल वित्त बॅक (RBI) तुम्हाला तुमचे पैसे परत देतिल का ते माहित नाही. सिंगापुर मध्ये अश्यावेळी सरकार $५०००० पर्यन्त पैसे परत देतिल. कारण ही साईट त्त्याचाकडे रजिस्टर आहे. छोटी रक्कम असेल तर एकाच वेळी transfer करा , मोठी असेल तर दोन-तीन टप्प्यात transfer करा.
आयकरामध्ये मी आजुन अशी केस केली नाही त्यामुळे त्याबद्दल काही कल्पना नाही. जर जास्त कर येत असल्यास एखाद्या CA ला विचारुन बघा.

मी ही पेपॅलच सजेस्ट करणार होते. फक्त जे पैसे पाठवतील ते ‘फ्रेंड्स अँड फॅमिली‘ ह्या ऑप्शनखाली पाठवायला सांगा. जर गुड्स अँड सर्विसेस हा ऑप्शन निवडला तर तुम्हांला कमिशन बसेल.

तुमच्या रेग्युलर सेविंग्ज अकाउंट मध्ये फॉरेन करंसीचा चेक डिपॉझिट करायला काय प्रॉब्लेम आहे? रक्कम चार आकडिच असल्याने रेडार मध्येहि येणार नाहि...

मनःपूर्वक धन्यवाद साहिल, सायो, तर्राट जोकर, राज!
कर सल्लागारांचा सल्ला घेतला. त्यांन्नी रक्कम किरकोळ असल्याने बचत खात्यात घेण्यास हरकत नाही असे सुचवले. फक्त track (document proof) व्यवस्थित ठेवा, गरज लागल्यास दाखवता आले पहिजे असे सांगितले!
बाकी आपण सुचवलेले संदर्भ योग्य त्या दक्षतेसह उपयोगत आणेन.
महिती बद्दल पुनश्च धयवाद!