बटाटा पुर्‍या

Submitted by pltambe@yahoo.co.in on 28 April, 2018 - 08:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : ३-४ मध्यम आकाराचे बटाटे,एक वाटी कणीक,एक वाटी ज्वारीचे पीठ,अर्धी वाटी बेसन (चणा डाळीचे पीठ),दोन टेबलस्पून तांदूळाची पिठी,चवीनुसार मीठ,चिमूटभर हळद,एक छोटा चमचा लाल तिखटाची पावडर,एक चमचा जिरे पूड,एक चमचा तीळ,एक छोटा चमचा ओवा,अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,एक चमचा आले-लसूण-हिरव्या मिरचीचा ठेचा,पाव वाटी ताजे घट्ट मलईचे दही.

क्रमवार पाककृती: 

कृती : प्रेशरकुकरमधून बटाटे उकडून घ्यावेत.कुकरमधून काढल्यावर सोलून गरम असतानाच बटाट्यांचा पूरणयंत्रावर लगदा करून ठेवा किंवा किसणीवर किसून ठेवा.
एका परातीत हा बटाट्याचा लगदा किंवा कीस घेऊन त्यात कणिक,ज्वारीचे पीठ,बेसन,तांदूळाची पिठी,हळद,लाल तिखटाची पावडर, मीठ ,आले-लसूण-हिरव्या मिरच्यांचा ठेचा, जिरेपूड, तीळ,ओवा,मलईचे घट्ट ताजे दही घालावे व लागेल तसे पाणी घालून पुर्यां साठी घट्ट पीठ मळावे.तेलाचे मोहन घालून पुन्हा मळावे. १५-२० मिनिटे ओल्या सूती कपड्याने झाकून बाजूला ठेवावे. १५ मिनिटांनी कपडा काढून पुन्हा एकदा पीठाला तेलाचा हात लावून कणिक मळतो तसे मळून घ्यावे. परातीला पीठ चिकटता कामा नये.
या मळून घेतलेल्या पिठाचे लिंबाएव्हढे गोळे करून ठेवावेत. एकेक गोळा लाटून बेताच्या आकाराच्या पुर्याो लाटून तळावे व आपल्याला आवडत्या लोणचे किंवा, चटणी बरोबर सर्व्ह करा

वाढणी/प्रमाण: 
२ व्यक्तींसाठी १०-१२ नग
माहितीचा स्रोत: 
बायको
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुर्याय हा शब्द कधी ऐकला नाही. काय त्याचा अर्थ?
फोटो नाहिये कि मला दिसत नाही.
वाचून तरी चटपटीत असेल असे वाटते, करून बघायला हवे.

भरडा ( कच्चे पीठ, भाजणी नाही ) वडे ( पुय्रा ) करतो त्यात थोडा बटाटा लगदा घालायचा असं आहे. नक्कीच चविष्ट लागणार.