कोरा सातबारा

Submitted by Pradipbhau on 24 February, 2018 - 06:01

कोरा सातबारा
शासन करू लागले सातबारा कोरा।
सर्वच म्हणू लागले आमचाच करा।
शेतकरी म्हणतात आम्ही कर्जबाजारी।
नोकरदार म्हणतात आम्ही तुमचेच शेजारी।
बिल्डर म्हणतात आमच्या कडेही पहा जरा।
कामगार म्हणतात हा तर आमचाच हक्क खरा।
महिला म्हणतात पन्नास टक्क्याचाही विचार करा।
बागायतदार म्हणतात बागा गेल्या राहिली दारे।
आमचाही का नाही करत कोरा सातबारा गडे।
युवा म्हणते शिक्षण घेऊन झालो कर्जबाजारी।
 नाही मिळाली नोकरी करा आता सातबाऱ्याची होळी।
डॉक्टरही चिंतेत कोरा करण्यासाठी सातबारा।
घातलेले पैसे काढू कसे हीच त्यांची चिंता।
अंड्याला नाही दर कोंबड्या पाळणार तरी कसा।
पोल्ट्रीधारक म्हणतो बोजा  करा आता कोरा।
सर्वाना एकच चिंता कसा होणार सातबारा कोरा।
शासन म्हणते आम्ही देखील आहोत कर्जबाजारी ।
न मागता कोण करील आमचाही कोरा सातबारा।
                     प्रदीप जोशी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults