शेंगदाणा कूट - १ वाटी
पाणी - १ १/२ वाटी / गरजेनुसार
चिंचेचा कोळ - १ छोटी वाटी / आवडीनुसार (आंबट)
हिरवी मिरची - ५/६ / आवडीनुसार (तिखट)
मीठ - चवीनुसार
साखर - आवडीनुसार (गोड)
कोथिंबीर - १/२ छोटी वाटी
फोडणीसाठी :
तेल किंवा तूप - गरजेनुसार
जीरा - १ छोटा चमचा
लवंग - ४/५ तुकडे
दालचिनी - २/३ छोटे तुकडे
कडीपता - ७/८ पान
१. शेंगदाणे भाजून कूट करून घेणे.
२. त्यात १ वाटी पाणी घालून वाटून घेणे.
३. चिंच पाण्यात घालून ठेवा व नंतर त्यातील बीया काढून टाका.
४. मिरचया कापून घ्या. किंवा वाटून घ्या.
५. गॅसवर पातेले / टोप ठेवा.
६. त्यात तेल / तूप टाका.
७. ते गरम झाल की जीरा टाका. नंतर लवंग, दालचिनी, मिरची तुकडे टाका. कडीपत्ता टाका.
८. वाटलेले शेंगदाणा कूट मिश्रण टाका. १/२ वाटी पाणी टाका.
९. मीठ, साखर टाका.
१०. कोथिंबीर बारीक चिरून टाका.
११. शेंगदाणा आमटी तयार. गरमागरम वाढा.
मस्त
मस्त
चिंच विसरलात टाकायला. बाकी
चिंच विसरलात टाकायला. बाकी ही आमटी माझ्या आवडीची. चिंच कधी टाकली नव्हती. आता बघेन करून.
लवंग दालचिनी??उपवासाला चालते
लवंग दालचिनी??उपवासाला चालते का??
आम्ही याच्यात बटाटे टाकतो.
आम्ही याच्यात बटाटे टाकतो.
>> लवंग दालचिनी??उपवासाला
>> लवंग दालचिनी??उपवासाला चालते का??
उपवासाचे कुठे कोण पोलीस असतात. घरगुती असले आणि त्यांनां पटणार नसेल तर घालू नये
पण कोणी पोलीस नसले तर आपल्या मनाला पटेल ते करावं.
खडा मसाला घालून करून पाहायला
खडा मसाला घालून करून पाहायला हवी... .
भगर-आमटीतली आमटी ही एक मस्त कृती आहे. अशीही करून पाहा.
यात आमच्याकडे आमसूल टाकतात
यात आमच्याकडे आमसूल टाकतात मला वाटतं. एकदम भारी लागते ही आमटी.
आमच्याकडे कोकम टाकतात यात.
आमच्याकडे कोकम टाकतात यात. बटाटा टाकला की चांगली मिळून येते. लवंग दालचिनी नाही टाकत. पण लवंग टाकून बघेन आता. मिरची आलं दाणे कुट असं एकत्र वाटून घेतो आम्ही.
छान पाककृती... पण सगळ्या
छान पाककृती... पण सगळ्या गोष्टी तुम्ही "टाकता" का? "घालत" का नाही?
दही पण टाकतात छान लागते,
दही पण टाकतात छान लागते, शेंगदाणे दही , साखर ,हिरवी मिरची एकत्र पेस्ट करून घायवी. त्यात पाणी टाकून घुसळून आमटी करावी
गूळ नाही का याच्यात ? चिंचेची
गूळ नाही का याच्यात ? चिंचेची चव बॅलन्स करायला ? साखरेनी खमंगपणा नाही वाटणार...
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
माझी अत्यंत आवडती.
अरे व्वा छान
अरे व्वा छान