रवा - २़ कप
नारळ (किसलेले) - २़ कप
मावा - ५० ग्राम
वेलची पावडर - २ चमचे
साखर - १ १/२ कप
पाणी - १/२ कप (पाक बनवण्यासाठी)
बदाम, पिस्ता, काजू - आवश्यकतेनुसार
केसर - पर्यायी (optional) एक चिमूटभर
तूप - आवश्यकतेनुसार (रवा भाजणे आणि प्लेटवर पसरवणे)
१. कढ़ई गॅस वर ठेवा. तूपात रवा भाजून घ्या.
2. मावा, वेलची पावडर, बदाम, पिस्ता, काजू् तुकडे एकत्र मिक्स करून घ्या.
3. आता साखरेेचा पाक तयार करण्यासाठी पाणी उकळत ठेवा. नंतर साखर घाला आणि सतत हलवत रहा. मिश्रण चिकट झाले तर वेलची पावडर घाला आणि सतत हलवत रहा. नंतर केसर घाला. ढवलत राहा. गॅस बंद करा.
4. नंतर वरील मिश्रणात भाजलेला रवा, किसलेले नारळ, मावा मिश्रण घाला. चांगले मिक्स करा.
5. एका प्लेटवर तूप पसरवा. त्यावर वरील मिश्रण पसरवा. समान रीतीने पसरवा.
6. मिश्रण थंड होऊ द्या. चाकूने तुकडे करा.
7. रवा-खोबरा वडी तयार.
1. जर बदाम, पिस्ता, काजू् तुकडे मिश्रणावर पसरले तर ते अधिक चांगले दिसतील आणि अधिक चवदार लागतील.
2. जर थंड झाल्यानंतर मिश्रण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले, हे 5-6 तासांमध्ये तयार होतील.
मस्त! नारळीपाकाचे लाडु माझे
मस्त! नारळीपाकाचे लाडु माझे जास्त आवडते, त्यामुळे ही वडी करणार.